RRB Junior Engineer Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये ज्युनियर इंजिनियर पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे, त्यासंदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे.
ज्या उमेदवारांना या भरती साठी अर्ज करायचा आहे, जे इच्छुक आहेत ते सर्व जन RRB Junior Engineer Bharti साठी फॉर्म भरू शकतात. 2,570 जागांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, सोबतच यात केवळ ज्युन्निय्र इंजिनियर पद नव्हे तर सुपरवायझर/ सुप्रीटेनडंट हे पद भरले जाणार आहेत.
पदवीधर, डिप्लोमा धारक या भरती साठी अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यामुळे तुमची जर डिग्री झाली असेल तर तुम्ही पण या भरती साठी अर्ज करू शकता. तब्बल 35,400 रु. पगार असणार आहे, त्यामुळे सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी हि एक सुवर्णसंधी आहे.
Railway RRB Junior Engineer JE Bharti विषयी पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे हे आर्टिकल काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा आणि लगेच अर्ज सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
RRB Junior Engineer Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
भरती करणारी संस्था | भारतीय रेल्वे (RRB) |
भरतीचे नाव | RRB Junior Engineer Bharti 2025 |
पदाचे नाव | ज्युनियर इंजिनियर/ सुपरवायझर/ सुप्रीटेनडंट |
रिक्त जागा | 2,570 |
वेतन | 35,400 रु. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | पदवी/ डिप्लोमा पास |
वयोमर्यादा | 18 ते 36 वर्षे |
अर्जाची फी | खुला प्रवर्ग: ₹500/- राखीव प्रवर्ग: ₹250/- |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
RRB Junior Engineer Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | Junior Engineer (Electrical, Mechanical, Engineering, S&T) | 2312 |
2 | Chemical Supervisor & Metallurgical Supervisor | 63 |
3 | Depot Material Superintendent | 195 |
– | Total | 2570 |
RRB Junior Engineer Bharti 2025: Age Limit (वयाची अट)
वयोमर्यादा | 18 ते 36 वर्षे |
SC/ST प्रवर्ग | 5 वर्षे सूट |
OBC प्रवर्ग | 3 वर्षे सूट |
RRB Junior Engineer Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
Junior Engineer (Electrical, Mechanical, Engineering, S&T) | अर्जदाराने Electrical, Mechanical, Engineering, S&T मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असावा. |
Chemical Supervisor & Metallurgical Supervisor | अर्जदाराने विज्ञान शाखेत Bachelor’s degree केलेली असावी, सोबतच डिग्री मध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषय घेतलेले असावेत, आणि किमान गुण हे 55 टक्के असावेत. |
Depot Material Superintendent | अर्जदाराने कोणत्याही शाखेतून Engineering मध्ये डिप्लोमा/पदवी मिळवलेली असावी. |
RRB Junior Engineer Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
भारतीय रेल्वे भरती 2025 साठी निवड प्रक्रिया हि 4 टप्प्यात आहे, यात ऑनलाईन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल तपासणी समाविष्ट आहे.
Stage 1- Computer-Based Test (CBT-I)
क्र. | विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ |
---|---|---|---|---|
1 | Mathematics | 30 | 30 | 90 मिनिटे |
2 | General Intelligence and Reasoning | 25 | 25 | |
3 | General Awareness | 15 | 15 | |
4 | General Science | 30 | 30 | |
– | Total | 100 | 100 | – |
Stage 2- Computer-Based Test (CBT-2)
क्र. | विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ |
---|---|---|---|---|
1 | General Awareness | 15 | 15 | 120 minutes |
2 | Physics & Chemistry | 15 | 15 | |
3 | Basics of Computers and Applications | 10 | 10 | |
4 | Basics of Environment and Pollution Control | 10 | 10 | |
5 | Technical Abilities | 100 | 100 | |
– | Total | 150 | 150 | – |
Stage 3- Document Verification
वरील दोन्ही स्टेज मधील ऑनलाईन CBT Exam झाल्यानंतर जे काही उमेदवार पास झाले आहेत त्यांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल. या टप्प्यात भरती साठी लागणारी अर्जदाराची सर्व कागदपत्रे तपासली जातील. सोबतच फॉर्म भरताना उमेदवाराने काय माहिती टाकली होती, कोणते कागदपत्रे अपलोड केले होते, अशा प्रकारची पडताळणी या टप्प्यात केली जाते.
Stage 4- Medical Examination
कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर पास झालेल्या उमेदवारांना मेडिकल तपासणी साठी बोलवले जाईल, या टप्प्यात उमेदवार फिट आहे कि नाही हे तपासले जाईल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अर्जदार तंदुरुस्त असणे गरजेचे आहे त्यामुळे या टप्प्यात उमेदवाराची कसून तपासणी हि केली जाते.
एकदा वरील सर्व टप्पे पूर्ण झाले कि मगच शेवटी अंतिम निवड केली जाते, यात पास झालेले उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातात, आणि लिस्ट नुसार पात्र उमेदवारांना जॉब ऑफर केला जातो.
RRB Junior Engineer Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
अर्जाची सुरुवात | Soon |
अर्जाची शेवटची तारीख | Soon |
RRB Junior Engineer Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
Draft Notification | इथून डाउनलोड करा |
जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
RRB Junior Engineer Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला वरील टेबल मधील Apply Link वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर मग तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर जाल.
- वेबसाईट वर गेल्यावर तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे.
- नोंदणी झाली कि मग लॉगीन करायचं आहे.
- पुढे भरतीचा फॉर्म उघडेल त्या फॉर्म मध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
- प्रवर्गानुसार परीक्षा फी सांगितली आहे ती पण ऑनलाईन स्वरुपात कोणत्याही पेमेंट मोड च्या माध्यमातून भरून टाका.
- त्यानंतर तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी पण अपलोड करून घ्या.
- नंतर मग एकदा भरतीचा फॉर्म रिचेक करा काही चुकल असेल तर दुरुस्त करून घ्या.
- आणि मग शेवटी भरतीचा फॉर्म सबमिट करा, आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
इतर भरती
MSRTC Bharti 2025, महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450 जागांसाठी मेगाभरती, चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथे बघा पूर्ण माहिती!
EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 10वी/12वी/पदवी पास वर भरती! 2,09,200 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा
YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10वी/ पदवी पास वर भरती! लगेच अर्ज करा
Thane Van Vibhag Bharti 2025: ठाणे वन विभाग भरती! 60 हजार रुपये पगार, 10वी पास अर्ज करा
North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वेत 10वी/ ITI पास वर भरती! इथून अर्ज करा
Western Railway Scout and Guide Bharti 2025: पश्चिम रेल्वेमध्ये 10वी/12वी/ITI पास वर भरती! ₹63200 पगार, लगेच अर्ज करा
Jalna Police Patil Bharti 2025: जालना पोलीस पाटील भरती जाहीर! अर्ज सुरु, 15 हजार रुपये महिना, 10वी पास फॉर्म भरा
MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक भरती सुरु! जाहिरात प्रसिद्ध, इथून अर्ज करा
RRB Section Controller Bharti 2025: भारतीय रेल्वेत भरती! 35400 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
PGCIL Apprentice Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 10वी/ITI/पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! लगेच अर्ज करा
RRB Junior Engineer Bharti 2025 – 26: FAQ
RRB Junior Engineer Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
ज्युनियर इंजिनियर/ सुपरवायझर/ सुप्रीटेनडंट या तीन पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
RRB Junior Engineer Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 2570 आहेत.
RRB Junior Engineer Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन अर्ज अजून सुरु झाले नाहीत, त्यामुळे अर्जाची शेवटची तारीख पण आली नाहीये.
Railway RRB Junior Engineer JE Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि CBT 1, CBT 2, कागदपत्रे पडताळणी, मेडिकल तपासणी च्या आधारे केली जाणार आहे, ज्यांना जास्त मार्क्स त्यांची निवड होणार आहे.