RRB Group D Selection Process 2026 या पोस्टमध्ये भारतीय रेल्वेतील ग्रुप D भरतीची संपूर्ण आणि सोपी माहिती दिली आहे. अनेक उमेदवार 10वी किंवा ITI नंतर रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असतात.
या भरती प्रक्रियेत निवड कशी केली जाते, कोणती परीक्षा घेतली जाते आणि पुढचे टप्पे कोणते असतात, याची स्पष्ट माहिती येथे देण्यात आली आहे. लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणी या सगळ्या स्टेप्स सोप्या शब्दांत समजावून सांगितल्या आहेत.
तसेच RRB Group D परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे? कोणते विषय आहेत? आणि परीक्षेची पद्धत कशी असते? याचीही सविस्तर माहिती दिली आहे. नव्याने तयारी सुरू करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती खूप उपयोगी ठरेल.
याशिवाय RRB Group D परीक्षेसाठी कोणती पुस्तके वाचावीत, अभ्यास कसा करावा यावरही मार्गदर्शन केले आहे. ही पोस्ट शेवटपर्यंत वाचल्यास RRB Group D भरती 2026 बाबत तुम्हाला एकूण सविस्तर अशी माहिती मिळून जाईल.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
RRB Group D Selection Process 2026: Complete Overview
| भरती करणारी संस्था | रेल्वे भरती बोर्ड (RRB) |
| भरतीचे नाव | RRB Group D Selection Process 2026 |
| परीक्षेचा प्रकार | केंद्रीय स्तरावरील भरती |
| निवड प्रक्रिया टप्पे | CBT परीक्षा, शारीरिक चाचणी (PET), कागदपत्र तपासणी, वैद्यकीय तपासणी |
| लेखी परीक्षा प्रकार | ऑब्जेक्टिव्ह (MCQ) |
| परीक्षेचे माध्यम | मराठी, हिंदी, इंग्रजी |
| एकूण प्रश्न | 100 |
| परीक्षेचा कालावधी | 90 मिनिटे |
| नकारात्मक गुण | 1/3 गुण वजा |
| अंतिम निवड | मेरिट लिस्टनुसार |
RRB Group D Selection Process 2026: रेल्वे ग्रुप D भरती निवड प्रक्रिया
RRB Group D Bharti Selection Process ही 4 टप्प्यात केली जाते, पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षा होते, नंतर शारीरिक चाचणी आणि मग शेवटी कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्ट यावरच अंतिम निवड ठरवली जाते.
- Computer-Based Test (CBT)
- Physical Efficiency Test (PET)
- Documents Verification
- Medical Examination
RRB Group D Selection Process For CBT (Computer-Based Test)
निवड प्रक्रियेतील पहिलं टप्पा लेखी परीक्षेचा असणार आहे, ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होईल. गणित, Reasoning, सामान्य विज्ञान आणि GK GS असे 4 विषय असणार आहेत. मार्क 100 असतील आणि प्रश्न देखील 100 आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कचा आहे. पेपर साथी एकूण टाइम हा 90 मिनिटे म्हणजे 1.5 घंटे आहे, परंतु विकलांग दिव्यांग विश्यार्थ्याना मात्र पूर्ण 120 मिनिटे दिले जाणार आहेत.
| विषय | प्रश्न संख्या | मार्क्स |
|---|---|---|
| गणित | 25 | 25 |
| Reasoning | 30 | 30 |
| सामान्य विज्ञान | 25 | 25 |
| GK GS | 20 | 20 |
| Total | 100 | 100 |
RRB Group D Selection Process For PET (Physical Efficiency Test)
| TEST | पुरुष | महिला |
|---|---|---|
| चालणे | 35 KG वजन उचलून 100 मी 2 मिनिटात चालणे | 20 KG वजन उचलून 100 मी 2 मिनिटात चालणे |
| धावणे | 1000 मी 4 मिनिट 15 सेकंद मध्ये धावणे | 1000 मी 5 मिनिट 40 सेकंद मध्ये धावणे |
Physical Efficiency Test पास होण्यासाठी काही टिप्स:
- दररोज किमान 20–30 मिनिटे धावण्याचा सराव करा.
- सुरुवातीला हळू धावा, नंतर वेग वाढवा.
- वजन उचलण्याचा सराव हळूहळू करा, अचानक जड वजन उचलू नका.
- धावण्याआधी आणि नंतर स्ट्रेचिंग नक्की करा.
- रोज हलका व्यायाम आणि चालण्याची सवय ठेवा.
- जंक फूड टाळा, साधं आणि पौष्टिक अन्न घ्या.
- पाणी भरपूर प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.
- परीक्षा आधीच्या दिवशी जास्त मेहनत करू नका.
- PET दिवशी आरामदायक कपडे आणि बूट वापरा.
RRB Group D Selection Process For Document Verification
RRB Group D भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा (CBT) आणि शारीरिक चाचणी (PET) पास झाल्यानंतर उमेदवारांना Document Verification साठी बोलावले जाते. या टप्प्यात उमेदवारांनी अर्ज करताना दिलेली माहिती खरी आहे की नाही याची तपासणी केली जाते. शैक्षणिक पात्रता, वय, ओळखपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत तपासली जाते.
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (Date of Birth साठी)
- शैक्षणिक पात्रतेची मार्कशीट / प्रमाणपत्र (10वी / ITI असल्यास)
- आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र
- जात प्रमाणपत्र (SC / ST / OBC उमेदवारांसाठी, लागू असल्यास)
- OBC उमेदवारांसाठी Non-Creamy Layer प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- निवास प्रमाणपत्र / Domicile Certificate (लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (अपंग उमेदवारांसाठी, लागू असल्यास)
- Ex-Serviceman प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो (Latest)
- RRB Group D अर्जाची प्रिंट कॉपी
- PET / CBT कॉल लेटर (जर मागितले तर)
Document Verification दरम्यान कोणतेही कागदपत्र चुकीचे, अपूर्ण किंवा अर्जातील माहितीसोबत जुळत नसल्यास उमेदवाराची निवड रद्द होऊ शकते.
त्यामुळे सर्व कागदपत्रे आधीच नीट तयार ठेवणे गरजेचे आहे. Document Verification यशस्वी झाल्यानंतर उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले जाते.
RRB Group D Selection Process For Medical Examination
RRB Group D भरती प्रक्रियेत Document Verification पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना Medical Examination साठी बोलावले जाते. या टप्प्यात उमेदवार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या पदासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाते. उंची, वजन, छाती, दृष्टी (डोळे), ऐकण्याची क्षमता तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासले जाते.
| Standard | Visual Acuity Criteria |
|---|---|
| A-2 | दूरची दृष्टी: 6/9, 6/9 (चष्म्याशिवाय) जवळची दृष्टी: Sn. 0.6, 0.6 (चष्म्याशिवाय) रंग ओळख, दोन्ही डोळ्यांची समन्वय क्षमता, रात्रीची दृष्टी इ. चाचण्या पास असणे आवश्यक |
| A-3 | दूरची दृष्टी: 6/9, 6/9 (चष्म्यासह किंवा शिवाय, चष्म्याची शक्ती 2D पेक्षा जास्त नसावी) जवळची दृष्टी: Sn. 0.6, 0.6 (चष्म्यासह किंवा शिवाय) रंग ओळख, रात्रीची दृष्टी इ. चाचण्या आवश्यक |
| B-1 | दूरची दृष्टी: 6/9, 6/12 (चष्म्यासह किंवा शिवाय, चष्म्याची शक्ती 4D पेक्षा जास्त नसावी) जवळची दृष्टी: Sn. 0.6, 0.6 (जवळचे काम असल्यास) रंग ओळख व इतर चाचण्या आवश्यक |
| B-2 | दूरची दृष्टी: 6/9, 6/12 (चष्म्यासह किंवा शिवाय, 4D पर्यंत) जवळची दृष्टी: Sn. 0.6, 0.6 (जवळचे काम असल्यास) दोन्ही डोळ्यांची समन्वय क्षमता आवश्यक |
| C-1 | दूरची दृष्टी: 6/12, 6/18 (चष्म्यासह किंवा शिवाय) जवळची दृष्टी: Sn. 0.6, 0.6 (जवळचे काम असल्यास) |
| C-2 | दूरची दृष्टी: 6/12, NIL (चष्म्यासह किंवा शिवाय) जवळची दृष्टी: Sn. 0.6 (दोन्ही डोळ्यांनी मिळून, जवळचे काम असल्यास) |
Medical Examination मध्ये जर उमेदवार निर्धारित वैद्यकीय निकष पूर्ण करत नसेल तर त्याची निवड होऊ शकत नाही. त्यामुळे या टप्प्यापूर्वी आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. Medical Examination यशस्वी झाल्यानंतरच RRB Group D भरती प्रक्रियेत अंतिम निवड निश्चित केली जाते.
RRB Group D Exam Syllabus: अभ्यासक्रम (विषयानुसार Subject Wise)
| विषय | अभ्यासक्रम / Important Topics |
|---|---|
| Mathematics | Number System, Percentage, BODMAS, LCM–HCF, Simple Interest, Compound Interest, Algebra, Profit and Loss, Ratio & Proportion, Time & Work, Time & Distance |
| General Intelligence and Reasoning | Analogies, Data Sufficiency, Syllogism, Coding–Decoding, Relationships, Direction Sense, Venn Diagram, Statement & Conclusion |
| General Science | Physics, Chemistry आणि Life Sciences (CBSE Class 10 स्तरावर आधारित) |
| General Awareness | Current Affairs, Science & Technology, Sports, Culture, Important Personalities, Economics, Politics |
RRB Group D Exam Books (Subject-Wise Important Books List)
Mathematics (गणित)
- Quantitative Aptitude for Competitive Exams – R.S. Aggarwal
- Fast Track Objective Arithmetic – Rajesh Verma
- Kiran’s RRB Group D Mathematics Book
General Intelligence & Reasoning (सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती)
- A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning – R.S. Aggarwal
- General Intelligence & Reasoning for RRB Exams – Arihant
- Kiran’s RRB Group D Reasoning Book
General Science (सामान्य विज्ञान)
- Lucent’s General Science (CBSE Class 10 आधारावर)
- General Science for Competitive Exams – Arihant
- Science सामग्री – NCERT Class 6-10 (Important Chapters)
General Awareness (सामान्य जागरूकता / GK)
- Lucent’s General Knowledge
- Manorama Yearbook / GK Capsule Books
- Current Affairs Monthly Magazines / Current Affairs PDF
Books Links –
Complete Guide for RRB Group D Level 1 Exam 2019 2nd Edition
Disha 3500+ Previous Years RRB General Awareness Questions for Junior Engineer, NTPC, ALP & Group D Exams (2015-2024) 2nd Edition
Target RRB Group D Level I Exam 2019 – 15 Practice Sets & 10 Solved Papers
इतर भरती अपडेट्स
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा
BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा
Bank of India Apprentice Bharti 2026: बँक ऑफ इंडिया मध्ये भरती, पदवी पास अर्ज करा
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास खेळाडू अर्ज करा
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
RRB Group D भरती 2026 साठी निवड प्रक्रिया कशी आहे?
RRB Group D भरतीसाठी निवड प्रक्रिया चार टप्प्यांत होते – CBT (लेखी परीक्षा), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), Document Verification आणि Medical Examination.
RRB Group D CBT परीक्षेत किती प्रश्न असतात?
CBT परीक्षेत एकूण 100 वस्तुनिष्ठ (MCQ) प्रश्न विचारले जातात.
RRB Group D परीक्षेत नकारात्मक गुण आहेत का?
होय, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातात.
RRB Group D PET सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे का?
होय, CBT पास केलेल्या सर्व उमेदवारांना PET देणे अनिवार्य आहे. PET पास न झाल्यास पुढील टप्प्यासाठी पात्रता राहत नाही.
RRB Group D भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवार 10वी उत्तीर्ण किंवा ITI पास असणे आवश्यक आहे.
