RCFL Bharti 2024: राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्स मध्ये पदवी, डिप्लोमा पास वर भरती! मुंबई मध्ये नोकरी, 30,000 रू. + महिना पगार

RCFL Bharti 2024: राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी भरती निघाली आहे. विविध शाखेसाठी ही भरती असणार आहे, एकूण रिक्त जागा या 158 सोडण्यात आल्या आहेत.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येणार आहे, RCFL द्वारे या संदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे, त्यामुळे अजून वेळ वाया घालू नका, तात्काळ जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर अर्ज करून टाका.

अर्ज कसा करायचा? कोणते उमेदवार पात्र असणार? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? या संदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार अर्ज सादर करा.

RCFL Bharti 2024

पदाचे नावमॅनेजमेंट ट्रेनी
रिक्त जागा158
नोकरीचे ठिकाणमुंबई
वेतन श्रेणी30,000 रू. + महिना
वयाची अट18 ते 27 वर्षे वयोमर्यादा
भरती फीसाधारण प्रवर्ग: 1000 रु. (मागासवर्ग: नाही)

RCFL Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावशाखापद संख्या
मॅनेजमेंट ट्रेनीकेमिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ सिव्हिल/ फायर/ CC लॅब/ इंडस्ट्रियल/मार्केटिंग/ HR/ ट्रेनी एडमिन/ कॉर्पोरेट कम्युनिकेशन158
Total158

RCFL Bharti 2024 Education Qualification

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेड भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना कंपनी द्वारे सांगितलेल्या शैक्षणिक पात्रता निकषांचे पालन करणे आवश्यक आहे.

  • अर्जदार उमेदवार हा किमान B.E, B.Tech, पदवी/ डिप्लोमा धारक असावा.
  • अर्जदाराने किमान 60 टक्के गुण पदवी, डिप्लोमा परीक्षेत मिळवलेले असावेत.
  • केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रूमेंटेमेशन, सिव्हिल या शाखेत B.E, B. Tech चे शिक्षण झालेले असावे.
  • किंवा त्याने कोणत्याही शाखेतून पदवी मिळवलेली असावी + MBA केलेले असावे.

RCFL Bharti 2024 Online Test Details

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेड भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे, त्यांना सुरुवातीला ऑनलाइन स्वरूपाची टेस्ट द्यावी लागेल.

RCFL Bharti 2024 Online Test Details

  • एकूण मार्क – 150 Marks
  • पेपरचा वेळ – 90 मिनिटे
  • Exam Medium – Hindi/ English
  • Negative Marking – Yes
विषयप्रश्नमार्क
Course Curriculum Qualification50 प्रश्न100 Mark
General English, Quantitative Aptitude, Reasoning & General Knowledge/ Awareness50 प्रश्न50 Mark
100 प्रश्न150 मार्क

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख20 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख01 जुलै 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून पहा

RCFL Bharti 2024 Apply Online

  • सर्वात पहिल्यांदा वर दिलेल्या टेबलमधून हे येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्ही IBPS पोर्टल वर जाल, तेथे तुम्हाला पहिल्यांदा तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी करून लॉगिन करून घ्या, नंतर Apply वर क्लिक करून भरतीचा फॉर्म Open करा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  • जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करून टाका.
  • सोबत परीक्षा फी देखील भरून घ्या, यासाठी तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड चा वापर करू शकता.
  • शेवटी फॉर्म भरून झाला की एकदा अर्ज तपासून पाहू शकता, एखादी Writing Mistake असेल तर ती दुरुस्त करून घ्या नंतर Verify करून Submit करून टाका.

RCFL Bharti 2024 Selection Process

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेड भरती साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. जे उमेदवार हे दोन टप्पे यशस्वी रित्या पार करतील त्यांना RCFL मधे मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी नोकरी मिळणार आहे.

  • ऑनलाईन टेस्ट
  • मुलाखत

Online Test

भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सुरुवातीला ऑनलाइन स्वरूपाची परीक्षा द्यावी लागेल, या परीक्षेमध्ये 150 मार्काचा पेपर असेल, हिंदी आणि इंग्रजी असे दोन मिडीयम असणार आहेत. ऑनलाइन टेस्टमध्ये उमेदवारांना जेवढे मार्क पडतील तेवढे Final Selection साठी ग्राह्य धरले जातील.

Personal Interview

ऑनलाइन टेस्ट झाल्यानंतर जे उमेदवार त्यामध्ये पास होतील, त्यांना RCFL द्वारे मुलाखती साठी बोलवले जाईल. मुलाखत देखील Final Selection साठी महत्वाचा Role Play करणार आहे. जेव्हा उमेदवार मुलाखती मध्ये पास होतील तेव्हाच त्यांना Final Selection च्या मेरिट लिस्ट मध्ये समाविष्ट केले जाणार आहे.

त्यासंदर्भात माहिती ही उमेदवारांना SMS, E-Mail, द्वारे पाठवली जाणार आहे. Call Later Revive केल्यानंतर अर्जदार उमेदवार मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी मुंबई येथे RCFL Ltd मध्ये Join होऊ शकणार आहेत.

RCFL Bharti 2024 FAQ

Who is eligible for RCFL Bharti 2024?

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स भरती साठी अर्जदार उमेदवारांची किमान शिक्षण हे B.E, B.Tech, पदवीधर डिप्लोमा पास पर्यंत झालेले असावे. इतर पण काही निकष आहेत, त्यांची माहिती मी वर आर्टिकल मध्ये दिली आहे, एकदा नक्की चेक करा.

How to apply for RCFL Bharti 2024?

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स भरती साठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ अधिकृत पोर्टल वर जाऊन नोंदणी करून फॉर्म भरायचा आहे. स्टेप बाय स्टेप याची माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

What is the last date of the RCFL Bharti 2024 Application Form?

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 जुलै 2024 आहे, मुदत केवळ एवढीच दिली जाणार आहे, पुढे यात वाढ होईल या आशेवर राहू नका लगेचच फॉर्म भरा.

3 thoughts on “RCFL Bharti 2024: राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्स मध्ये पदवी, डिप्लोमा पास वर भरती! मुंबई मध्ये नोकरी, 30,000 रू. + महिना पगार”

Leave a comment