5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप! 400 रूपया पर्यंत, फायदा घ्या | Pre Matric Scholarship Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासनाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक Pre Matric Scholarship Yojana सुरू केली आहे. त्यानुसार पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना यामुळे मोठा फायदा मिळणार आहे, दरवर्षी या योजने अंतर्गत 200 ते 400 रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

परंतु केवळ पात्र विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे, Pre Matric Scholarship Yojana साठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत? त्यासाठी पात्रता निकष काय आहेत? अर्ज कसा करायचा? अर्ज कोठे करायचा? योजनेद्वारे शिष्यवृत्ती रक्कम कशी मिळणार आणि किती मिळणार? अशी सर्व माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.

त्यामुळे तुम्ही जर मागासवर्गीय प्रवर्गातील असाल, तर तुमच्या मुलांना किंवा तुमच्या जवळील मागासवगीर्य विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि ही पोस्ट इतरांना देखील शेअर करा.

Pre Matric Scholarship Yojana Maharashtra

Pre Matric शिष्यवृत्ती योजना अंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहायता केली जाणार आहे.

मुख्य आणि महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी मागासवर्गीय प्रवर्गातील सर्व विद्यार्थी पात्र असणार नाहीत. मागासवर्गामध्ये काही मोजक्या कास्ट साठी ही योजना लागू असणार आहे.

आणि योजनेद्वारे प्रत्येकी वर्षाला Annually आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी देण्यात येणार आहे.

Pre Matric Scholarship Yojana Highlights

योजनेचे नावPre Matric Scholarship Yojana
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन
उद्देशमागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे.
फायदा200 ते 400 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती
पात्रताVJNT आणि SBC प्रवर्ग
अर्ज प्रक्रियाऑफलाईन

Pre Matric Scholarship Yojana Qualification Details

  • अर्जदार विद्यार्थी हा मागासवर्गीय VJNT किंवा SBC या कास्ट चा असावा.
  • विद्यार्थ्याला मागील वर्षीच्या वार्षिक परीक्षेत 50% पेक्षा जास्त गुण मिळालेले असावेत.
  • विद्यार्थी हा वर्गातून पहिला किंवा दुसरा आलेला असावा.
  • विद्यार्थी 5 वी ते 10 वी या इयत्तेमध्ये शिकत असावा.
  • योजनेसाठी कोणत्याही स्वरूपाची वार्षिक उत्पन्न मर्यादा नाही.

Pre Matric Scholarship Yojana Benifits

पाचवी ते दहावीच्या मध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना, वर्षाला ठराविक रकमेची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. इयत्तेनुसार स्कॉलरशिप रक्कम कमी जास्त असणार आहे.

5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना200 रुपये शिष्यवृत्ती मिळणार
8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना400 रुपये शिष्यवृत्ती मिळणार

जे विद्यार्थी शाळेमध्ये नियमित उपस्थित राहतात त्यांनाच या योजने द्वारे शिष्यवृत्ती मिळणार आहे.

Pre Matric Scholarship Yojana Document List

  • विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड
  • पालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स
  • मागील वर्षीची मार्कशीट
  • रहिवासी Domicile सर्टिफिकेट

Pre Matric Scholarship Yojana How To Apply?

शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्ज करावा लागणार आहे.

  1. योजनेचा अर्ज हा विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे, त्या शाळेच्या हेड मास्टर (मुख्याध्यापक) यांच्या कडे जमा करायचा आहे.
  2. जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांद्वारे योजनेचा अर्ज तपासला जातो, जर तुमचा अर्ज योग्य असेल आणि विद्यार्थी पात्र असेल तर त्याला Pre Matric Scholarship Yojana अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.

Pre Matric Scholarship Yojana Where to Apply?

राज्यातील सर्व शाळकरी जे पात्र विद्यार्थी आहेत, त्यांना जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत योजनेसाठी अर्ज करता येतो. इतर कोणतीही अर्ज करण्याची प्रक्रिया नाहीये, केवळ ऑफलाईन मार्गानेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

मात्र मुंबई मध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर त्यांना केवळ Assistant Commissioner of Social Welfare यांच्याकडेच जाऊन अर्ज सादर करावा लागेल. त्याखेरीस कोणताही अधिकारी तुमचा अर्ज स्वीकारू शकणार नाही.

नवीन सरकारी योजना:

Pre Matric Scholarship Yojana FAQ

How much money is given for pre-matric scholarship?

Pre Matric शिष्यवृत्ती योजना द्वारे वर्षाला 200 ते 400 रुपये विद्यार्थ्यांना दिले जातात.

Who is eligible for the pre-matric scholarship in Maharashtra?

VJNT किंवा SBC प्रवर्गातील विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात.

How to Apply For Pre Matric Scholarship Yojana?

या योजनेसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, मुंबई मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना Assistant Commissioner of Social Welfare यांच्याकडे फॉर्म भरायचा आहे, तर राज्यातील इतर विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून अर्ज करता येणार आहे.

2 thoughts on “5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप! 400 रूपया पर्यंत, फायदा घ्या | Pre Matric Scholarship Yojana Maharashtra”

Leave a comment