20 रुपयात 2 लाखांचे इन्शुरन्स मिळणार! लगेच फायदा घ्या | Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण प्रधान मंत्री सुरक्षा बीमा योजना या अभिनव अशा योजनेची माहिती घेणार आहोत. 

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेद्वारे कोणत्याही व्यक्तीला फक्त वीस रुपयांच्या प्रीमियम वर तब्बल दोन लाख रुपयांचा इन्शुरन्स म्हणजेच विमा भेटणार आहे.

सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली Pradhan Mantri Suraksha Bima Yojana ही Insurance क्षेत्रातील सरकारची एक बहु आयामी फायद्याची योजना आहे.

वर्षात फक्त 20 रुपये भरायचे आहेत, आणि त्याबदल्यात तुम्हाला भरभक्कम असा जीवन विमा संरक्षण इन्शुरन्स मिळणार आहे. मोठी फायद्याची अशी ही योजना आहे, तुम्हाला स्वतः हून काहीच करण्याची गरज नाही तुमच्या बँक खात्यावरून प्रीमियम वेळी फक्त 20 रुपये कपात होणार, आणि तुम्हाला पुढील वर्ष भर विमा संरक्षण मिळणार.

जर दुर्दैवाने तुमचा Accident झाला तर तुम्हाला या Pradhan Mantri Suraksha Bima Yojana द्वारे 20 रुपयात 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार, हे पैसे तुम्ही तुमच्या हॉस्पीटल खर्चासाठी देखील वापरू शकता.

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजने साठी कोण पात्र आहे? लाभ कोणकोणते मिळणार? आर्जसाठी कोणती कागदपत्रे लागणार? योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अशी सर्व महत्त्वाची माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत, त्यामुळे जर तुम्हाला पण या प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेचा फायदा उचलायचा असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि लागलीच अर्ज सादर करून विमा संरक्षण मिळवा.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana 2024

योजनेचे नावPradhan Mantri Suraksha Bima Yojana
सुरुवातकेंद्र सरकार द्वारा
उद्देशगरीब मध्यमवर्गीय लोकांना कमी पैशात विमा संरक्षण मिळवून देणे.
लाभार्थीदेशातील 18 ते 70 वर्षा दरम्यानचे सर्व नागरिक
लाभ2 लाखांचे विमा संरक्षण
प्रीमियमफक्त 20 रुपये प्रति वर्षी
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळjansuraksha.gov.in

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Benifits (लाभ आणि फायदे)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना द्वारे बरेचसे लाभ आणि फायदे अर्जदाराला मिळतात, यामधे विमा संरक्षण तर आहेच, परंतु त्या अंतर्गत देखील बरेच लाभ देण्यात येतात. 

  • गरीब आणि मागास वर्गातील अर्जदारांना अगदी कमी पैशात रास्त दरामध्ये जीवन विमा संरक्षण मिळते.
  • व्यक्तीचा जर दुर्दैवाने अपघात झाला किंवा अर्जदार मृत्यू पावला तर त्याच्या कुटुंबाला भरपाई म्हणून या विमा योजने द्वारे 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  • जर अर्जदाराचा अपघात होऊन त्याला आंशिक अपंगत्व आले किंवा कायमस्वरूपी अर्जदार अपंग झाला तर त्यासाठी या विमा योजने द्वारे 1 लाख रुपये दिले जातात.
  • जे लोक खाजगी तसेच इतर कंपन्या द्वारे विमा उतरवू शकत नाहीत, अशा सर्व लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेद्वारे विमा कव्हर उपलब्ध करून दिले जाणार, व त्याद्वारे दोन लाख रुपयांचा त्यांचा फायदा होणार आहे.

थोडक्यात असे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे वेगवेगळे फायदे आहेत, या विमा योजनेद्वारे अर्जदाराला देखील फायदा मिळू शकेल. आणि अर्जदाराच्या कुटुंबाला पण याचा फायदा मिळेल. जरी अर्जदाराने त्याची कोणत्याही स्वरूपाची गुंतवणूक केली नसेल, किंवा इतर कंपन्यांमध्ये विमा उतरवला नसेल तरीदेखील सरकार द्वारे फक्त वीस रुपयांमध्ये दोन लाख रुपये भेटणार आहेत.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Qualification Details (पात्रता निकष)

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना साठी देखील केंद्र शासनाने काही पात्रता निकष लावलेली आहेत, या पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व नागरिकांना या विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पात्रता निकष:

  • अर्जदार उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे असावे, तर उमेदवारांसाठी वयाची मर्यादा ही 70 वर्षांची आहे. सत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला या विमा योजनेची पूर्ण रक्कम एकत्रित स्वरूपात दिली जाते.
  • ज्या उमेदवाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे किंवा 70 वर्षा पेक्षा जास्त आहे, अशा कोणत्याही अर्जदाराला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही.
  • अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्ड शी लिंक असणे देखील आवश्यक आहे, जर बँक खाते आधार लिंक नसेल तर अर्जदाराला या योजनेचा फायदा घेता येणार नाही.
  • जर बँक होते आधार कार्ड सिलिंग नसेल तर त्यासाठी अर्जदाराला जास्तीची फॉर्म प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यामध्ये अर्जासोबत आपले आधार कार्ड झेरॉक्स प्रत जोडावी लागते.
  • विमा योजनेसाठी वर्षाला वीस रुपये प्रीमियम भरावे लागणार आहे, हे प्रीमियम ज्या बँकेत तुमचे अकाउंट आहे त्या खात्यातून स्वयंचलित रित्या भरले जाणार आहे.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Document List (आवश्यक कागदपत्रे)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी फॉर्म भरताना उमेदवारांना आवश्यक ते सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. कागदपत्रे सादर केले नाही तर या विमा योजनेचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे तुम्हाला या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

  • योजनेचा अर्ज नमुना
  • अर्जदाराचे आधार कार्ड (ओळखपत्र)
  • वयाचा पुरावा (प्रमाणपत्र)
  • बँक खाते तपशील (पासबुक झेरॉक्स प्रत)
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते आधार सलग्न नसेल तर आधार कार्ड झेरॉक्स प्रत
  • मोबाईल नंबर
  • अर्जदाराची पासपोर्ट फोटो

थोडक्यात वर सांगितलेले सर्व कागदपत्रे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज सादर करताना लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही जरी ऑनलाईन किंवा ऑफलाइन कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर करत असाल, तरी हे सर्व कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत किंवा अपलोड करायचे आहेत.

आवश्यक कागदपत्र शिवाय चा विमा योजनेचा फॉर्म पुढे जाणार नाही, त्यामुळे तुम्हाला जर लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर अर्ज करताना तात्काळ हे सर्व कागदपत्रे सादर करा.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Application Form अर्ज कसा करायचा?

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज सादर करता येतो. ऑफलाइन माध्यमातून जर अर्ज सादर करायचा असेल तर उमेदवार झाला त्याचे ज्या बँकेमध्ये खाते आहे त्या बँकेत जाऊन प्रत्यक्षरीत्या स्वतः अर्ज करावा लागेल.

आणि जर अर्जदाराला ऑनलाइन स्वरूपात अर्ज करावयाचा असेल तर, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पण विमा योजनेसाठी अर्ज करता येतो.

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया: 

  1. अर्जदाराला ज्या बँकेत वारे या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या बँकेचे अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेसाठीचा फॉर्म शोधा आणि तो Download करून घ्या.
  3. त्यानंतर फॉर्म ची प्रिंट आऊट काढून घ्या, मग योजनेच्या फॉर्ममध्ये ची माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरा.
  4. फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत. आवश्यक कागदपत्राची लिस्ट वर दिली आहे त्याप्रमाणे कागदपत्रे सोबत लावा.
  5. फॉर्म भरून झाल्यानंतर कागदपत्रांसह बँकेमध्ये अर्ज सादर करा, बँकेच्या अधिकाऱ्याद्वारे तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
  6. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विमा योजनेसाठी प्रीमियम 20 रुपये भरा, त्यानंतर योजनेसाठी अर्ज केल्याची पोचपावती मिळेल, अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेसाठी लाभार्थी व्हाल.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana FAQ

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेसाठी कोण पात्र आहे?

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी 18 ते 70 वर्षांमधील सर्व नागरिक पात्र आहेत.

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

अर्जदार या विमा योजनेसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकतात, त्याची पूर्ण प्रक्रिया वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजने अंतर्गत कोणता लाभ मिळणार?

अर्जदार उमेदवारांना 20 रुपयांच्या प्रीमियम वर 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.

1 thought on “20 रुपयात 2 लाखांचे इन्शुरन्स मिळणार! लगेच फायदा घ्या | Pradhan Mantri Suraksha Bima Yojana”

Leave a comment