पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणते? जाणून घ्या लगेच | Police Bharti Document List

Police Bharti Document List: महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, मोठी आनंदाची बाब म्हणजे पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ देखील देण्यात आली आहे.

त्यामुळे ज्या उमेदवारांचा अर्ज भरणे राहिले होते त्यांना ही नामी संधी आहे, या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती दिली आहे.

सोबतच पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत त्याची देखील लिस्ट आपण आर्टिकल मध्ये सांगितली आहे. महत्त्वाच्या अशी माहिती आहे, तुम्ही जर पोलीस भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ही माहिती मोठी फायद्याची ठरणार आहे.

Police Bharti Document List

पोलीस भरतीसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार याची लिस्ट खालील प्रमाणे आहे:

  • उमेदवाराचे ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
  • अर्जदाराची दहावीची मार्कशीट
  • अर्जदाराची बारावीची मार्कशीट
  • उमेदवार पदवीधर असल्यास गुणपत्रक
  • मुक्त विद्यापीठातून शिकत असल्यास गुणपत्रक
  • पद्वित्तीर्ण पदवी असल्यास गुणपत्रक
  • उमेदवाराने ITI/ डिप्लोमा केला असेल तर मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला TC
  • शाळेत शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र
  • कास्ट सर्टिफिकेट
  • वयाचा पुरावा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्यास EWS प्रमाणपत्र
  • महिलांसाठी 30 टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
  • अर्जदार खेळाडू असेल तर प्रमाणपत्र
  • होमगार्ड प्रमाणपत्र
  • वडील पोलीस असतील तर प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असतील तर डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र
  • माजी सैनिक असतील तर आर्मी एज्युकेशन प्रमाणपत्र

पोलीस भरतीची सविस्तर माहिती जाणून घ्या

थोडक्यात एवढे सगळे कागदपत्रे पोलीस भरतीसाठी लागणार आहेत, यामध्ये प्रत्यक्ष अर्ज करताना इतर दुसरे कागदपत्रे देखील लागू शकतात. त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घेऊन सर्व कागदपत्रे सोबत ठेवा, आणि जी कागदपत्रे भरतीसाठी लागणार आहेत ती सादर करा.

एकूण 22 वेगवेगळे कागदपत्रे डॉक्युमेंट पोलीस भरतीसाठी लागणार आहेत. यामधील काही कागदपत्रे हे पदानुसार असणार आहेत, म्हणजे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यानुसार कागदपत्रे तुम्हाला सादर करायचे आहेत.

Police Bharti Online Form (How To Apply)

  1. सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  2. होमपेज वरील भरती Recruitment या Option वर क्लिक करा, आवश्यक ती सर्व माहिती सुरुवातीला वाचून घ्या.
  3. त्यानंतर Apply Online या Link वर क्लिक करा, तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
  4. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या, कोणत्याही स्वरूपाची चूक करू नका.
  5. पुढे भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे फोटो आणि सही सोबत इतर डॉक्युमेंट अपलोड करा.
  6. परीक्षेसाठी ठरवलेली फी भरून घ्या, फी साठी तुम्ही फॉर्म मध्ये दिलेले कोणतेही Payment Mode वापरू शकता.
  7. एकदा पोलीस भरतीचा फॉर्म तपासून घ्या, अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या.
  8. शेवटी त्यांनतर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करा, अशा प्रकारे तुमचा पोलीस भरतीचा ऑनलाईन फॉर्म पूर्ण होईल.

पोलीस भरतीची सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सध्या अर्ज सुरू आहेत, ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. पंधरा दिवसांची मुदत वाढ भेटली आहे, त्यामुळे ही मोठी सुवर्णसंधी आहे, लागलीच तुमचा फॉर्म भरून घ्या.

Police Bharti FAQ

What is the last date for Police Bharti 2024 in Maharashtra?

महाराष्ट्र पोलीस भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल, 2024 आहे.

How can I apply for Maharashtra Police Bharti?

तुम्ही ऑनलाईन माध्यमातून mahapolice.gov.in या वेबसाईट वरून फॉर्म भरू शकता. अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे.

What documents are required for police Bharti in Maharashtra?

पोलीस भरती साठी एकूण 22 वेगवेगळे कागदपत्रे लागणार आहेत, Police Bharti Document List या लेखामध्ये सुरुवातीलाच दिली आहे. एकदा चेक करून घ्या, म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला Problem येणार नाही.

1 thought on “पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणते? जाणून घ्या लगेच | Police Bharti Document List”

Leave a comment