PMC TULIP Internship 2025: पुणे महानगरपालिकेत इंटर्नशिपची उत्तम संधी जाहीर झाली आहे. शिक्षणासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या इंटर्नशिपसाठी 10वी पास ते ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये इंटर्नना काम करण्याची संधी मिळणार आहे.
या इंटर्नशिपमधून उमेदवारांना पुणे महानगरपालिकेत प्रत्यक्ष काम करून शिकण्याची आणि सरकारी कामकाजाची समज मिळवण्याची संधी मिळेल. प्रशासनातील विविध प्रक्रिया, विभागीय जबाबदाऱ्या आणि कामकाजाचे स्वरूप हे जवळून पाहता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी यंत्रणेत काम करण्याचा पहिला अनुभव मिळणार आहे.
या इंटर्नशिपमधून उमेदवारांना केवळ कामाचाच नाही तर व्यवस्थापन, टीमवर्क आणि नेटवर्किंग या कौशल्यांचाही विकास होणार आहे. प्रत्यक्ष काम करताना वरिष्ठ अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अनेक गोष्टी शिकता येतील, हा अनुभव भविष्यातील करिअरसाठी अत्यंत उपयोगी ठरेल.
या इंटर्नशिपमध्ये उमेदवारांना कामाबरोबर स्टायपेंड (Stipend) देखील मिळणार आहे. त्यामुळे शिकता शिकता काही आर्थिक मदतही मिळेल. जर तुम्हाला सरकारी संस्थेत काम करण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर ही संधी नक्की साधा. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे — कृपया सर्व माहिती वाचा आणि त्वरित फॉर्म भरून अर्ज सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
PMC TULIP Internship 2025: Complete Internship Details – इंटर्नशिपची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | पुणे महानगरपालिका |
| भरतीचे नाव | PMC TULIP Internship 2025 |
| भरतीचे स्वरूप | Internship |
| पदाचे नाव | प्रशिक्षणार्थी (Intern) |
| रिक्त जागा | 255 |
| वेतन | 6,000 – 15,000 रु. |
| नोकरी ठिकाण | पुणे महानगरपालिका |
| शैक्षणिक पात्रता | 10 वी / पदवी पास |
| वयोमर्यादा | दिली नाहीये |
| अर्जाची फी | फी नाही |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
PMC TULIP Internship 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव/ट्रेड | पद संख्या | स्टायपेंड |
|---|---|---|---|
| 1 | अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य | 200 | 15,000 रु. |
| 2 | अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत | 15 | 15,000 रु. |
| 3 | पदवीधर इंटर्न – बी.कॉम | 10 | 12,000 रु. |
| 4 | माळी | 30 | 6,000 रु. |
| * | Total | 255 | * |
PMC TULIP Internship 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पदाचे नाव/ट्रेड | शिक्षण |
|---|---|
| अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य | BE/B.Tech (Civil) |
| अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत | BE/B.Tech (Electrical) |
| पदवीधर इंटर्न – बी.कॉम | B.Com |
| माळी | 10वी उत्तीर्ण |
PMC TULIP Internship 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
पुणे महानगरपलिका इंटर्नशिप साठी निवड प्रक्रिया हि मेरीट बेस आहे, यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि केवळ तपासली जाईल. अर्ज केलेल्या उमेदवारांचे मार्क्स यात चेक केले जातील, ज्यांना सर्वाधिक गुण मिळाले असतील त्यांना या इंटर्नशिप साठी निवडले जाईल.
- उमेदवारांनी प्रथम स्लॉट्ससाठी All India Council for Technical Education (AICTE) च्या नेशनल इंटर्नशिप पोर्टलवर नोंदणी करावी लागेल
- निवड सामान्यत: पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांवर त्यांचा अभ्यासक्रम व अनुभव यावरून “मेरिट”च्या आधारावर केली जाते.
- काही वेळा जर अर्ज जास्त आले तर मुलाखत किंवा प्रोफाइलची पडताळणी होण्याची शक्यता आहे.
PMC TULIP Internship 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 30 ऑक्टोबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 04 नोव्हेंबर 2025 |
PMC TULIP Internship 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
PMC TULIP Internship 2025: Step-by-Step Application Process
- सगळ्यात पहिल्यांदा वरचा जो महत्वाच्या लिंक्स चा टेबल आहे त्यातील Apply Now या लिंक वर क्लिक करा.
- internship.aicte-india.org हि वेबसाईट उघडेल, या वेबसाईट वर तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी झाली कि मग PMC TULIP Internship 2025-26 ची Apply Link शोधून त्यावर क्लिक करा.
- अर्ज उघडला कि त्यात जी काही माहिती दिली आहे ती माहिती बरोबर भरून घ्या.
- आवश्यक जे काही कागदपत्रे सांगितले आहेत ते अपलोड करून घ्या.
- त्यानंतर अर्ज एकदा रिचेक करा, आणि मग शेवटी फॉर्म सबमिट करून टाका.
इतर भरती
Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा
GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 10वी पास वर भरती! 47600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा
Indian Army TES Bharti 2025: भारतीय सैन्य दलात 12 वी पास वर भरती! टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 55 (जुलै 2026) इथून फॉर्म भरा
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: गुप्तचर विभागात भरती! 1,42,400 रु. पगार, पदवीधर उमेदवार अर्ज करा
UCO Bank Apprentice Bharti 2025: युको बँकेत भरती! पदवी पास वर भरती, लगेच अर्ज करा
BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ ITI पास अर्ज करा
ISRO SDSC SHAR Bharti 2025: सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये भरती! 1,77,500 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा
Jalgaon DCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! पदवी/ MSCIT पास अर्ज करा
NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा
ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा
Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा
SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
PMC TULIP Internship 2025 – 26: FAQ
PMC TULIP Internship 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
प्रशिक्षणार्थी पदासाठी हि इंटर्नशिप भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
PMC TULIP Internship साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या इंटर्नशिप मध्ये एकूण रिक्त जागा या 255 आहेत.
PMC TULIP Internship 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या इंटर्नशिप साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 04 नोव्हेंबर 2025 आहे.
PMC TULIP Internship ची निवड प्रक्रिया कशी आहे?
या इंटर्नशिप ची निवड प्रक्रिया हि पूर्णपणे मेरीट बेस आहे.
PMC TULIP Intern पदासाठी वेतन पगार किती आहे?
इंटर्नशिप मध्ये वेतन नाही तर स्टायपेंड दिले जाते, ते 6,000 – 15,000 रु. प्रती महिना याप्रकारे आहे.

1 thought on “PMC TULIP Internship 2025: पुणे महानगरपालिकेत 10वी पास वर इंटर्नशिपची संधी! लगेच इथून अर्ज करा”