आता सर्वांना मोफत वीज मिळणार, कायमची! केंद्र सरकारची नवीन योजना | PM Surya Ghar Yojana 2024

PM Surya Ghar Yojana: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण प्रधानमंत्री सूर्य घर योजना संबंधित सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

मुख्य स्वरूपात प्रधानमंत्री सूर्य घर योजनेद्वारे गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना आता कोणत्याही स्वरूपाचे लाईट बिल भरण्याची गरज नाही. 300 युनिट पर्यंत मोफत तब्बल 1 करोड पेक्षा जास्त लोकांना मिळणार आहे.

या सूर्य घर योजनेसाठी कोण पात्र असणार? कोणाला या योजनेचा लाभ मिळणार? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? कोण कोणते कागदपत्रे लागणार? आर्थिक मदत मिळेल का? योजनेअंतर्गत सबसिडी किती मिळणार आहे? अशा सर्व बाबी आर्टिकल मध्ये स्पष्ट केल्या गेल्या आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक ही महत्त्वाची अशी माहिती वाचा.

PM Surya Ghar Yojana 2024

योजनेचे नावPM Surya Ghar Yojana
सुरुवातकेंद्र सरकार द्वारे
लाभमध्यमवर्गीय कुटुंबांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणे.
लाभार्थीदेशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब.
अर्ज पद्धतीऑनलाईन
सबसिडी40% अनुदान
अधिकृत संकेतस्थळpmsuryaghar.gov.in

PM Surya Ghar Yojana Objective (उद्देश)

प्रधानमंत्री सोलर पॅनल योजनेद्वारे गरीब कुटुंबांना 300 युनिट पर्यंत मोफत विन देण्याचा मुख्य उद्देश केंद्र शासनाचा आहे. 

गरीब कुटुंबाचे आर्थिक ओझे कमी करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुर्य घर योजने द्वारे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 

अनुदान तत्वावर सोलर पॅनल योजना राबवली जाणार आहे, योजनेद्वारे सोलार देशातील प्रत्येक घरावर बसवण्याचा उद्देश आहे.

तसेच या सबसिडी योजनेद्वारे स्वच्छ ऊर्जेला चालना देणे शक्य होणार आहे, सोबतच मोठा आर्थिक फायदा हा मध्यमवर्गीय कुटुंबांना होईल, आणि अनेक रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील असा शासनाचा या योजने मागे उद्देश आहे.

PM Surya Ghar Yojana Benifits (लाभ, फायदे)

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेद्वारे बरेचसे फायदे होणार आहेत, यामध्ये सर्वात मोठा फायदा हा मध्यमवर्गीय कुटुंबांना होणार आहे.

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेद्वारे गरीब कुटुंबांना मोफत 300 युनिट पर्यंत वीज मिळणार आहे, तेही प्रत्येक महिन्याला कायमस्वरूपी.

योजनेद्वारे अर्जदारांच्या घरावर सोलार पॅनल बसवले जाणार आहेत, जे सबसिडी वर घेता येणार आहेत. जेवढे जास्त किलो वॅट चे सोलर पॅनल तेवढे जास्त अनुदान मिळणार आहे.

योजनेद्वारे लाभार्थ्यांना सोलर पॅनल वर 40% एवढे अनुदान दिले जाणार आहे, आणि अनुदानाची रक्कम ही थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

केवळ 60% एवढाच खर्च लागणार आहे, बाकी सर्व पैसे सरकार देणार आहे. आणि तुम्ही जी गुंतवणूक कराल ती काही कालावधी मध्येच निघून जाणार आहे, कारण तुम्हाला दर महिन्याला 300 युनिट एवढी वीज सोलर द्वारे मिळणार आहे.

जर तुमचे प्रती महिना वीज वापर केवळ 100 ते 150 युनिट असेल तर तुम्ही उर्वरित 150 युनिट महावितरण ला विक्री पण करू शकणार आहात, म्हणजे एकाच गुंतवणुकी तून डबल दुप्पट फायदा होणार आहे.

PM Surya Ghar Yojana Qualification Criteria

प्रधानमंत्री सोलर पॅनल योजनेसाठी केंद्र सरकार द्वारे काही पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत, त्या निकषांमध्ये जे अर्जदार येतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

  • अर्जदार हा भारताचा कायमस्वरूपी नागरिक असावा.
  • अर्जदाराकडे विजेचे बिल असावे. (महावितरण अथवा अन्य)
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसावा.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
  • अर्जदाराचे कुटुंब हे गरीब आणि मध्यमवर्गीय असावे.

थोडक्यात वर जे पात्रता निकष सांगितले आहेत, त्यांचे पालन करणे अनिवार्य आहे. जे उमेदवार हे पात्र निकष पूर्ण करणार नाही त्यांना या PM Surya Ghar Yojana चा लाभ घेता येणार नाही.

PM Surya Ghar Yojana Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र 
  • विजेचे लाईट बिल
  • रेशनकार्ड
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते पासबुक

वर दिलेले सर्व कागदपत्रे हे PM Surya Ghar Yojana साठी आवश्यक असणार आहेत, अर्ज सादर करताना अर्जदारांना ही कागदपत्रे सॉफ्ट कॉपी मध्ये अपलोड करायचे आहेत. तसेच फॉर्म भरताना Hard Copy Documents पण तयार ठेवणे आवश्यक आहेत.

PM Surya Ghar Yojana Application Form

प्रधानमंत्री सोलर पॅनल योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.

अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला होम पेज वरच PM Surya Ghar Yojana साठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिसेल तेथे तुम्हाला Apply for Rooftop Solar या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर सूर्य घर योजनेचा फॉर्म उघडेल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे. दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.

त्या अगोदर योजनेसाठी Registration करून घ्यायचे आहे, यामधे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा आणि वीज कंपनीचे नाव निवडायचे आहे, तसेच ग्राहक क्रमांक देखील खाली टाकायचा आहे.

सर्व माहिती भरून झाल्यावर Next वर क्लिक करायचे आहे, तुम्हाला सांगितल्या प्रमाणे सर्व आवश्यक अशी माहिती भरून घ्यायची आहे. फॉर्म हा अचूक रित्या भरणे अपेक्षित आहे, त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज सादर करायचा आहे.

सोलर पॅनल हे एकूण 3 प्रकारचे आहेत, यात किलो वॅट नुसार सोलर पॅनल आहेत. किलो वॅट 1 ते 3 असे सोलर पॅनल योजने अंतर्गत उपलब्ध आहेत.

यापैकी तुमच्या सोईनुसार कोणतेही सोलर पॅनल निवडायचे आहे, त्यांनतर त्या सोलर वर असणारी सबसिडी पाहून घ्यायची आहे. आणि त्यानुसार तुम्हाला किती रुपये भरावे लागणार हे पाहायचे आहे.

सर्व माहिती पाहून आणि वाचून झाल्यावर अर्ज सबमिट करायचा आहे. त्या अगोदर एकदा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, एखादी Minor चूक असेल तर ती लागलीच दुरुस्त करून घ्यायची आहे.

अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकता. जर तुम्हाला या योजनेची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे खाली कमेंट करा, किंवा आमच्या Telegram Group ला जॉईन व्हा.

PM Surya Ghar Yojana FAQ

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी कोणते अर्जदार पात्र असणार आहेत?

देशातील सर्व गरिबांनी मध्यमवर्गीय कुटुंब, या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

प्रधानमंत्री सोलर पॅनल योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करता येतो. अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे.

प्रधानमंत्री सूर्य घर योजने अंतर्गत किती रुपये सबसिडी मिळते?

योजने अंतर्गत 40% एवढी सबसिडी दिली जाते, ही सबसिडी पूर्णपणे सोलर पॅनल च्या किलो वॅट वर अवलंबून असते.

2 thoughts on “आता सर्वांना मोफत वीज मिळणार, कायमची! केंद्र सरकारची नवीन योजना | PM Surya Ghar Yojana 2024”

Leave a comment