PM Internship Yojana 2024: केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत आता सर्व बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.
सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या तरुणांना युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक प्रकारे इंटर्नशिपची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये ज्या प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली होती, अगदी त्याच प्रकारे केंद्रस्तरावर प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली आहे.
या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ कसा घ्यायचा? कोण पात्र आहे? अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे.
PM Internship Yojana 2024
Yojana Name | PM Internship Yojana Maharashtra |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
योजनेचा उद्देश | Internship स्वरुपात नोकरी देणे |
लाभ | महिन्याला 5 हजार रुपये पगार |
लाभार्थी | 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ BA/ B.Sc/ B.Com/ BCA/ BBA/ B.Pharma उत्तीर्ण उमेदवार |
PM Internship Yojana 2024 Education Qualification
अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ BA/ B.Sc/ B.Com/ BCA/ BBA/ B.Pharma पर्यंत झालेले असावे.
शैक्षणिक दृष्ट्या गुणवंत उमेदवारांना या योजने अंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे. सर्व उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे. 10वी पासून ते पदवीचे शिक्षण घेतलेले सर्व स्तरातील गरजू सुशिक्षित उमेदवारांना देशाच्या मोठ्या मोठ्या कंपन्यात काम करण्याची संधी मिळणार आहे.
PM Internship Yojana 2024 Benefits
अर्जदार उमेदवार यांना या भरती अंतर्गत साठी निवडले गेले आहे त्यांना पदा नुसार वेगवेगळे लाभ भेटणार आहेत.
- देशातील टॉप कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव मिळेल.
- 12 महिन्यासाठी पी एम इंटर्नशिप अंतर्गत नोकरी मिळेल.
- यामध्ये मासिक स्वरूपात 5000 हजार रुपयांची आर्थिक मदत Stipend दिले जाणार आहे.
- सोबतच ज्यावेळी उमेदवार इंटर्नशिप साठी जॉईन होईल तेव्हा एक वेळ अनुदान स्वरूपात 6000 हजार रुपये दिले जाणार आहे.
- सोबतच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत उमेदवाराला विमा संरक्षण मिळेल.
PM Internship Yojana 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | तारीख आली नाहीये |
- सुरुवातीला तुम्हाला केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टल ला भेट द्यायची आहे.
- तिथे तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
- त्यानंतर पोर्टल वर लॉगिन करायचे आहे.
- तुमच्यासमोर पीएम इंटर्नशिप स्कीम साठी अर्ज करण्याचा ऑप्शन दिसेल.
- त्यावर क्लिक करा एक फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- या स्कीम साठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जाणार नाही, त्यामुळे सर्वजण पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
- फॉर्म योग्य रीतीने भरून झाल्यावर सबमिट बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज पीएम इंटर्नशिप स्कीम साठी सादर करा.
PM Internship Yojana 2024 Selection Process
ज्या उमेदवारांनी या योजनेअंतर्गत फॉर्म भरले आहेत त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही कंपनीमध्ये इंटर्नशिप करता येणार आहे.
उमेदवारांनी फॉर्म भरताना जे प्रेफरन्स टाकले आहेत त्यानुसार कंपनी उमेदवारांची निवड करणार आहे. जर उमेदवारांची प्रेफरन्स कंपनीच्या रिक्वायरमेंटशी जुळत असतील तर त्यांना निवडले जाणार आहे.
या निवड प्रक्रियेमध्ये सर्व उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील, आणि या दरम्यान अंतिम निवडीमध्ये तुमचे शैक्षणिक रेकॉर्ड देखील तपासले जाईल.
शासकीय योजना अपडेट:
- Anand Dighe Divyang Yojana: धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना 2024, महिन्याला 3 हजार रुपये मिळणार
- Mukhyamantri Annapurna Yojana: वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार! जाणून घ्या संपूर्ण माहिती
PM Internship Yojana 2024 FAQ
Who is eligible for PM Internship Yojana 2024?
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान दहावी, बारावी,आयटीआय, डिप्लोमा, पदवीपर्यंत झालेले असावे.
How to apply for PM Internship Yojana 2024?
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी केंद्र सरकारने एक स्पेशल पोर्टल सुरू केले आहे.
What is the last date to apply for PM Internship Yojana 2024?
पी एम इंटर्नशिप योजनेसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची कोणतीही शेवटची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही.