केंद्र सरकारने गरीबांना पक्के घर देण्यासाठी सुरू केलेली एक अभिनव आणि कल्याणकारी योजना म्हणजे PM Awas Yojana होय. ग्रामीण आणि शहरी अशा दोन विभागात गरीबांना घर बांधण्यासाठी या योजनेद्वारे मदत केली जाते.
तब्बल 1,20,000 रुपये प्रत्येकी अशी भली मोठी रक्कम या योजनेद्वारे अर्जदारांना मिळते. त्यामुळे ज्या व्यक्तीकडे पक्के घर नाही त्यांना स्वतःचे पक्के आणि मजबूत घर बांधण्यासाठी मोठी मदत होत आहे.
PM Awas Yojana साठी नक्की कोणते व्यक्ती पात्र आहेत? निकष काय आहेत? अर्ज कसा आणि कोठे करायचा? घर बांधण्यासाठी पैसे कसे मिळणार? अशी सर्व महत्त्वाची माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे.
त्यामुळे ज्या व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा घ्यायचा आहे, त्यांनी हे आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचून घ्यावे. आणि तुमच्या जवळील लोकांना पण या योजनेची माहिती द्यावी, जेणेकरून त्यांना पण पक्के घर मिळेल.
प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे गरिबांना त्यांचे स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज सादर केल्यानंतर शासनाद्वारे घरकुल मंजूर होणार आहे. ज्यावेळी घरकुल मंजूर होईल त्यावेळी अर्जदाराच्या बँक खात्यावर घरकुलाची अनुदान रक्कम जमा केली जाईल.
ग्रामीण भागात आणि शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजना वेगवेगळ्या स्वरूपाची राबवली जाते. ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजना शहरी या नावाने राबवली जात आहे.
आवास योजनेसाठी अर्ज करण्याची निश्चित मुदत केंद्र शासनाद्वारे सांगण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदार उमेदवारांना दिलेल्या तारखेच्या आतच फॉर्म भरायचा आहे. एकदा का तारीख निघून गेली की पुन्हा केंद्र शासनाद्वारे योजनेसाठी मुदतवाढ देईपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
आता नवीन मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यासंबंधी मंत्रिमंडळात योजनेसाठी मान्यता पण दिली गेली आहे. ये नव्या मुदतवाढीनंतर जे लोक आवास योजनेसाठी पात्र आहेत त्यांना अर्ज करता येणार आहे.
PM Awas Yojana Maharashtra Highlights
योजनेचे नाव | PM Awas Yojana |
योजनेची सुरुवात | केंद्र सरकार |
उद्देश | गरीबांना पक्के घर देणे. |
फायदा | 1,20,000 रुपये अनुदान |
पात्रता | आर्थिक दृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय व्यक्ती |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | डिसेंबर 2024 |
PM Awas Yojana Maharashtra Qualification Details
- अर्जदार व्यक्ती हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असावा.
- अर्जदाराचे कुटुंब हे कच्या घरात, झोपडपट्टी मध्ये राहत असावे, किंवा कुटुंब हे बेघर असावे.
- कुटुंबाच्या सदस्याच्या नावे कोणतेही पक्के घर नसावे.
- व्यक्ती हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असावा.
- शहीद सैनिकाच्या विधवा पत्नीला देखील आवास योजना द्वारे घरकुल दिले जाते.
- अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 3 ते 6 लाख रुपये असावे.
PM Awas Yojana Maharashtra Benifits
- लाभार्थी व्यक्तिला 1,20,000 रुपये एवढी सबसिडी अनुदान मिळणार आहे.
- बाकी घरकुलासाठी 1,20,000 लाखाच्या वर जेवढा खर्च येईल, तो अर्जदाराला स्वतःहुन करावा लागणार आहे.
- दुर्गम आणि डोंगरी भागात राहणाऱ्या लाभार्थी व्यक्तीला घर बांधण्यासाठी 10,000 रुपये जास्तीचे दिले जाणार आहेत, म्हणजे एकूण 1,30,000 रुपये अशा अर्जदारांना मिळणार आहेत.
जे अर्जदार प्रधानमंत्री आवास योजना द्वारे घरकुलासाठी पात्र झाले आहेत, त्यांना राज्य शासनाद्वारे घर बांधण्यासाठी मोफत वाळू दिली जाणार आहे. म्हणजे अर्जदारांना घर बांधण्यासाठी रेती साठी येणारा खर्च काही प्रमाणात कमी होण्यास पण मोठी मदत होणार आहे.
PM Awas Yojana Maharashtra Document List
प्रधानमंत्री आवास योजना साठी लागणारे कागदपत्रे:
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- EWS, LIG प्रमाणपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मनरेगा जॉब कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मागील 6 महिन्याची बँक स्टेटमेंट
- जमिनीचा सातबारा उतारा
- ना हरकत प्रमाणपत्र
- अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र
थोडक्यात एवढे सगळे कागदपत्रे PM Awas Yojana साठी लागणार आहेत, पण या कागदपत्रांसोबत इतर दुसरे कागदपत्रे देखील लागू शकतात. त्यामुळे एकदा याची चौकशी नक्की करून घ्या, त्यामुळे तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
PM Awas Yojana Maharashtra How To Apply?
ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्जदार प्रधानमंत्री आवास योजना साठी अर्ज करू शकतो. यामध्ये तुम्हाला ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा असेल तर अधिकृत वेबसाईटवर फॉर्म भरावा लागेल.
आणि जर ऑफलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा असेल तर तुम्ही योजनेसाठी दिलेला फॉर्म भरून, तो फॉर्म कार्यालयात दाखल करणे गरजेचे असणार आहे.
- सुरुवातीला PM Awas Yojana Official Website ला भेट द्या, pmaymis.gov.in हा वेबसाईट चा ऑनलाईन पत्ता आहे.
- वेबसाईट वर गेल्यावर तेथे तुम्हाला घरकुल योजना साठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर एक फॉर्म open होईल.
- तुम्हाला तो फॉर्म भरून घ्यायचा आहे, कोणतीही चुकीची माहिती द्यायची नाही, नाहीतर तुम्हाला पात्र नसताना योजनेचा लाभ घेत आहेत, म्हणून तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
- आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करा, आणि मग शेवटी फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करून अर्ज Submit करून टाका.
ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू शकता. जर तुम्ही शहरात राहता, तर तुम्हाला नगरपालिका किंवा महानगरपालिका मध्ये जाऊन फॉर्म भरावा लागेल.
नवीन सरकारी योजना:
- घर बांधण्यासाठी सरकार देणार मोफत वाळू, नविन योजना जाहीर! अर्ज करा
- झेरॉक्स शिलाई मशीन योजना, मिळणार फ्री मध्ये! अर्ज सुरू, लगेच फॉर्म भरा
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रू.
PM Awas Yojana Maharashtra FAQ
Is PM Awas Yojana still available in Maharashtra?
हो, महाराष्ट्रात PM Awas Yojana सुरू आहे. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात.
Who is eligible for Pradhan Mantri Awas Yojana?
जे व्यक्ती आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना घर बांधण्यासाठी PM Awas Yojana मार्फत अनुदान दिले जाणार आहे.
How much money is given in Pradhan Mantri Awas Yojana?
अर्जदार व्यक्तींना घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये एवढी आर्थिक मदत केली जाणार आहे, सोबत जर अर्जदार डोंगरी किंवा दुर्मिळ भागातील असेल तर त्याला 1,30,000 रुपये दिले जाणार आहेत.
Aawas yojna
PM Yojana Gharkul
Gharkul Yojana
Gharkul
घरकुल योजना