PGCIL Bharti 2024: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन मध्ये पदवी पास वर भरती! 40,000 रू. + महिना पगार

PGCIL Bharti 2024: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये इंजिनीयर ट्रेनी या पदासाठी भरती निघाली आहे. विविध शाखे अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, यामधे इलेक्ट्रिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अशा 4 शाखा आहेत.

PGCIL Bharti 2024 साठी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्या सर्वांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकूण रिक्त जागा या 435 सोडण्यात आल्या आहेत, ज्या इंजिनियर ट्रेनी पदासाठी असणार आहेत. मात्र वर सांगितल्याप्रमाणे शाखेनुसार जागांची विभागणी करण्यात आलेली आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, त्याची पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.

PGCIL Bharti 2024

पदाचे नावइंजिनिअर ट्रेनी
रिक्त जागा435
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी40,000 रू. + महिना
वयाची अट18 ते 28 वर्षे
भरती फीसामान्य प्रवर्ग: 500 रु. (मागासवर्ग: फी नाही)

PGCIL Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावशाखापद संख्या
1इंजिनिअर ट्रेनीइलेक्ट्रिकल331
सिव्हिल53
कॉम्प्युटर सायन्स37
इलेक्ट्रॉनिक्स14
Total435

PGCIL Bharti 2024 Education

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती साठी निघालेल्या या भरती साठी उमेदवारांचे शिक्षण हे पदाला अनुसरून असणे आवश्यक आहे.

  • अर्जदार उमेदवार हा B.E, B Tech, B.Sc (Eng) पास असावा, आणि त्याला किमान 60 टक्के गुण मिळालेले असावेत.
  • सोबत उमेदवाराने GATE 2024 ची परीक्षा दिलेली असावी.

PGCIL Bharti 2024 Selection Process

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी उमेदवारांची निवड ही GATE 2024 Exam वर होणार आहे. जर उमेदवार जारी करण्यात आलेल्या निकषात बसत असतील तर त्यांना रिक्त पदांवर निवडले जाणार आहे.

भारतीय तटरक्षक दलात 10 वी 12 वी पास वर भरती! 53,800 रु. महिना पगार

पावर ग्रेट कॉर्पोरेशन ची भरती ही दोन स्तरावर होणार आहे, सुरुवातीला गेट परीक्षेत मिळालेले मार्क तपासले जाणार आहेत. त्यानंतर ग्रुप Discussion & मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीमध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना Final Selection द्वारे निवडले जाणार आहे.

  • GATE Exam 2024
  • Group Discussion & Interview
  • Final Selection

GATE Exam 2024

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी ज्यामध्ये अर्ज केला आहे त्या उमेदवारांनी GATE 2024 ची Exam दिलेली असावी. Exam मध्ये Inroll झालेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

Gate परीक्षेत 100 पैकी उमेदवारांना किती गुण मिळाले आहेत, यावरून त्यांची Shortlisting केली जाणार आहे. त्यानंतर पुढे त्यांना मुलाखती साठी बोलावले जाणार आहे.

Group Discussion & Interview

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना Interview आणि Group Discussion साठी Call Latter पाठवले जाईल. त्यानंतर दिलेल्या कालावधी मध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी जायचे आहे, मुलाखत ही हिंदी किंवा इंग्रजी या दोन भाषेत असणार आहे, उमेदवारांना भाषा Select करता येणार आहे.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ग्रॅज्युएशनवर भरती! 90,000 रू. महिना पगार

Final Selection

मुलाखतीमध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना Final Merit List मध्ये Add केले जाईल. त्यानंतर शेवटी Final Selection वेळी Merit List मधील उमेदवारांना Job साठी Call Latter पाठवले जाईल.

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख14 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख04 जुलै 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

PGCIL Bharti 2024 Apply Online

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पावर ग्रिड कॉर्पोरेशनच्या पोर्टलवर रिडायरेक्ट व्हाल.
  • तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी करून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन झाल्यानंतर भरतीचा फॉर्म ओपन करून जी माहिती विचारली आहे ती त्यात टाकायची आहे.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करून घ्यायचे आहेत.
  • भरतीसाठी परीक्षा फी देखील आकारली जाणार आहे, त्यामुळे ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे फी भरून घ्या.
  • शेवटी भरतीचा फॉर्म तपासून तो Verify करून घ्या आणि नंतर सबमिट करून टाका.

PGCIL Bharti 2024 FAQ

Who is eligible for PGCIL Bharti 2024?

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्जदार उमेदवार हे पदवीधर असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता निकष हे आर्टिकल मध्ये सांगितले आहेत, त्याची अधिक माहिती तुम्ही वरून मिळवू शकता.

How to apply for PGCIL Bharti 2024?

पावर ग्रिड कॉर्पोरेशन भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे, प्रक्रिया खूप सोपी आहे त्यामुळे एकदा नक्कीच चेक करा.

What is the last date of PGCIL Bharti 2024?

पावर ग्रिड कॉर्पोरेशन भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 4 जुलै 2024 आहे. एकदा मुदत संपली की नंतर कोणालाही अर्ज करता येणार नाही, त्यामुळे तारीख आहे तोपर्यंत फॉर्म भरून घ्या.

Leave a comment