NHAI Bharti 2026: NHAI मध्ये विना परिक्षा परीक्षा सरकारी नोकरी! ₹56,100 पगार, लगेच इथून अर्ज करा

NHAI Bharti 2026 अंतर्गत National Highways Authority of India (NHAI) मार्फत सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी मोठी सरकारी भरती जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार इंजिनिअरिंग क्षेत्रात स्थिर, सुरक्षित आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

या भरतीमध्ये मध्ये Deputy Manager (Technical) पदासाठी एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. निवड प्रक्रिया पूर्णपणे GATE 2025 स्कोअरवर आधारित असल्यामुळे कोणतीही वेगळी परीक्षा द्यावी लागणार नाही. GATE परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी ही भरती करिअरला मोठी दिशा देणारी ठरणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला ₹56,100 रुपये मासिक पगार मिळेल. यासोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, मेडिकल सुविधा, प्रवास भत्ता, पेन्शन सुविधा आणि केंद्र सरकारच्या इतर सर्व सुविधा लागू होतील. त्यामुळे NHAI Bharti 2026 ही आर्थिकदृष्ट्या तसेच करिअरच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे.

या लेखामध्ये तुम्हाला NHAI Bharti संदर्भातील पात्रता, वयोमर्यादा, पगार, जागा, निवड प्रक्रिया, अर्ज पद्धत, आवश्यक कागदपत्रे, महत्वाच्या तारखा आणि FAQs याबाबत सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती मिळणार आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

NHAI Bharti 2026 – भरतीची संपूर्ण माहिती

घटकमाहिती
भरती करणारी संस्थाNational Highways Authority of India (NHAI)
भरतीचे नावNHAI Bharti 2026
पदाचे नावDeputy Manager (Technical)
एकूण जागा40
वेतन₹56,100 – ₹1,77,500 + DA
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताCivil Engineering पदवी
वयोमर्यादाकमाल 30 वर्षे
निवड प्रक्रियाGATE 2025 Score
अर्ज प्रक्रियाOnline

NHAI Bharti 2026 – पदे आणि रिक्त जागा

या NHAI Bharti 2026 मध्ये सध्या एकाच पदासाठी भरती जाहीर झाली आहे.

पद क्र.पदाचे नावजागा
1Deputy Manager (Technical)40

वर्गनिहाय जागा

  • UR – 20
  • SC – 05
  • ST – 02
  • OBC (NCL) – 09
  • EWS – 04
  • PwBD – 02

गरजेनुसार जागांची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.


NHAI Bharti 2026 – शैक्षणिक पात्रता

NHAI Bharti 2026 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

आवश्यक शिक्षण

  • Civil Engineering मध्ये Bachelor Degree असणे अनिवार्य आहे.
  • पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून घेतलेली असावी.
  • अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत.
  • Degree Certificate किंवा Provisional Certificate अपलोड करणे आवश्यक आहे.

GATE पात्रता

  • उमेदवाराकडे GATE 2025 (Civil Engineering) चा वैध स्कोअर असणे बंधनकारक आहे.
  • निवड पूर्णपणे GATE Score वर आधारित असेल.

NHAI Bharti 2026 – वयोमर्यादा

  • कमाल वय: 30 वर्षे

वय सवलत

  • SC / ST – 5 वर्षे
  • OBC – 3 वर्षे
  • PwBD – 10 ते 15 वर्षे
  • Ex-Servicemen – 5 वर्षे

सरकारी नियमांनुसार वय सवलत लागू होईल.


NHAI Bharti 2026 – पगार आणि भत्ते

NHAI Bharti 2026 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाते.

  • सुरुवातीचा पगार: ₹56,100 प्रति महिना
  • Pay Matrix Level: Level 10
  • कमाल पगार: ₹1,77,500
  • अतिरिक्त फायदे:
    • महागाई भत्ता (DA)
    • घरभाडे भत्ता (HRA)
    • मेडिकल सुविधा
    • प्रवास भत्ता
    • पेन्शन योजना
    • प्रमोशन संधी

ही नोकरी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता देते.


NHAI Bharti – निवड प्रक्रिया

NHAI Bharti ची निवड प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक आहे.

निवड टप्पे

  1. GATE 2025 Score आधारित Merit List
  2. Shortlisting (अर्ज जास्त असल्यास)
  3. Interview (गरज असल्यास)
  4. Document Verification

समान गुण असल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते.


आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • 10वी प्रमाणपत्र (जन्मतारीख साठी)
  • Civil Engineering Degree Certificate
  • GATE 2025 Score Card
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)

महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात का?

होय. महाराष्ट्रातील उमेदवार NHAI Bharti साठी अर्ज करू शकतात. मात्र जात प्रमाणपत्र Central List मध्ये असणे आवश्यक आहे.


महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात का?

होय. NHAI Bharti साठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. महिला उमेदवारांना विशेष प्रोत्साहन दिले जाते.


महत्वाच्या अटी (Hidden Conditions)

  • निवड झाल्यानंतर ₹5 लाखांचा Service Bond लागू होतो.
  • किमान 3 वर्षे सेवा करणे बंधनकारक आहे.
  • फक्त Online अर्ज स्वीकारले जातील.
  • Degree Certificate अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाही.

NHAI Bharti 2026 – महत्वाच्या तारखा

इव्हेंटतारीख
अर्ज सुरू09 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख09 फेब्रुवारी 2026

Important Links

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा
वैध आरक्षण प्रमाणपत्रांचा नमुनायेथे क्लिक करा


अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

  1. NHAI अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Recruitment सेक्शन ओपन करा.
  3. Deputy Manager (Technical) जाहिरात निवडा.
  4. नवीन Registration करा.
  5. वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
  6. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  7. अर्ज तपासून Submit करा.
  8. अर्जाची पावती सेव्ह करा.

NHAI Bharti 2026 मधील अतिरिक्त Hidden अटी (अवश्य वाचा)

🔹 1) Central List जात प्रमाणपत्र अनिवार्य

SC / ST / OBC / EWS उमेदवारांचे जात प्रमाणपत्र Central Government List मध्ये असणे आवश्यक आहे. राज्य यादीतील प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमची जात Central List मध्ये आहे का हे तपासणे गरजेचे आहे.

विशेषतः OBC उमेदवारांनी Non-Creamy Layer प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील असणे आवश्यक आहे. जुने प्रमाणपत्र अपलोड केल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.


🔹 2) Degree Certificate अपलोड करणे बंधनकारक

अनेक उमेदवार फक्त मार्कशीट अपलोड करतात, पण NHAI ने स्पष्ट सांगितले आहे की Degree Certificate किंवा Provisional Degree Certificate अपलोड केल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

फक्त सेमेस्टर मार्कशीट अपलोड केल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो.


🔹 3) एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास फक्त शेवटचा अर्ज ग्राह्य

जर उमेदवाराने चुकून एकापेक्षा जास्त वेळा अर्ज केला असेल तर NHAI फक्त शेवटचा सबमिट केलेला अर्ज स्वीकारेल. आधीचे सर्व अर्ज आपोआप रद्द केले जातील.


🔹 4) अर्ज Submit केल्यानंतर बदल करता येणार नाही

एकदा अर्ज Final Submit केल्यानंतर:

  • नाव बदलता येणार नाही
  • कागदपत्रे बदलता येणार नाहीत
  • कॅटेगरी बदलता येणार नाही

म्हणून अर्ज Submit करण्याआधी Preview नीट तपासणे अत्यंत गरजेचे आहे.


🔹 5) Service Bond अटी अत्यंत कठोर आहेत

निवड झाल्यानंतर उमेदवारांना ₹5 लाखांचा Service Bond साइन करावा लागतो. किमान 3 वर्षे सेवा करणे बंधनकारक आहे. या कालावधीत नोकरी सोडल्यास पूर्ण रक्कम भरावी लागू शकते.

इतर सरकारी संस्थेचा bond transfer मान्य नाही.


🔹 6) All India Posting स्वीकारावी लागेल

ही पोस्ट All India Service Liability अंतर्गत येते. म्हणजे निवड झाल्यावर भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते. फक्त आपल्या राज्यातच पोस्टिंग हवी असेल तर ही भरती योग्य नाही.


🔹 7) Shortlisting / Interview होऊ शकते

जरी निवड प्रक्रिया GATE स्कोअरवर आधारित असली तरी:

  • अर्ज खूप जास्त असल्यास NHAI shortlisting करू शकते
  • काही उमेदवारांना interview साठी बोलावले जाऊ शकते

🔹 8) चुकीची माहिती दिल्यास कधीही निवड रद्द होऊ शकते

अर्जामध्ये चुकीची माहिती, खोटी कागदपत्रे किंवा माहिती लपवली असल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द केली जाऊ शकते – नियुक्ती झाल्यानंतरही.


🔹 9) ई-मेलवरच सर्व Communication येईल

NHAI कडून:

  • Call Letter
  • Shortlist सूचना
  • Interview माहिती
  • Document Verification अपडेट

सर्व काही फक्त ई-मेलवर येईल. त्यामुळे सक्रिय ई-मेल देणे अत्यंत महत्वाचे आहे.


🔹 10) उमेदवारी Withdraw करता येणार नाही

एकदा अर्ज केल्यानंतर उमेदवार स्वतःहून अर्ज मागे घेऊ शकत नाही.

FAQs – NHAI Bharti 2026 संदर्भातील प्रश्न

NHAI Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
एकूण 40 जागा आहेत.

महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात का?
होय, अर्ज करू शकतात.

NHAI Bharti 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
GATE 2025 Score वर आधारित निवड होईल.

NHAI Bharti 2026 मध्ये पगार किती आहे?
सुरुवातीचा पगार ₹56,100 आहे.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?
होय, महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात.

इतर भरती अपडेट्स

Beed Police Patil Bharti 2026: बीड जिल्हा पोलीस पाटील भरती! 1178 जागा, 10 वी पास अर्ज करा

Indian Airforce Group Y Bharti 2026: भारतीय वायू सेना भरती! 26900 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा

RBI Office Attendant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत फक्त 10वी पासवर शिपाई पदाची भरती, लगेच अर्ज करा

SAMEER Bharti 2026: SAMEER मुंबई मध्ये नोकरी! फी नाही, 34000 रु. पगार, ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती! 30,000 रु. पगार, 12वी पास अर्ज करा

CSIO Recruitment 2026: केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्थेमध्ये भरती! 56900 रु. पगार, 10वी/ 12वी पास अर्ज करा

Income Tax Department Bharti 2026: आयकर विभागात भरती! 81100 रु. पगार, 10वी/12वी पास (खेळाडू) अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती! फी नाही, 125000 रु. पगार, पदवी / डिप्लोमा पास अर्ज करा

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: भारतीय नौदल भरती 2026, फी नाही, 177500 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा

Indian Army SSC Tech Bharti 2026: इंडियन आर्मी SSC टेक्निकल भरती, पगार 56,100 रु.लगेच इथून अर्ज करा

Leave a comment