NFL Bharti 2024: नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये ट्रेनी पदासाठी भरती सुरू! पदवी डिप्लोमा पास वर संधी, लगेच अर्ज करा

NFL Bharti 2024: नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड द्वारे मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी भरती निघाली आहे. एकूण रिक्त जागा या 164 आहेत, ज्या एकाच पदासाठी सोडण्यात आल्या आहेत, मात्र मॅनेजमेंट ट्रेनी पदामध्ये शाखेनुसार जागांची विभागणी करण्यात आली आहे.

नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड भरतीसाठी अर्जदार उमेदवार हे पदवीधर डिप्लोमा पास असावेत, जर उमेदवाराचे शिक्षण शैक्षणिक पात्रता निकषा मध्ये येत नसेल तर अशा उमेदवारांना भरती साठी फॉर्म भरता येणार नाही.

ऑनलाइन स्वरूपातच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, यासाठी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड द्वारे अधिकृत पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती वाचून घ्या आणि सूचनेनुसार अर्ज सादर करा.

NFL Bharti 2024

पदाचे नावमॅनेजमेंट ट्रेनी
रिक्त जागा164
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी1,40,000 रू. महिना
वयाची अट18 ते 27 वर्षे
भरती फीसामान्य प्रवर्ग: 700 रु. (मागासवर्ग: फी नाही)

NFL Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावशाखापद संख्या
1मॅनेजमेंट ट्रेनीकेमिकल56
मेकॅनिकल18
इलेक्ट्रिकल21
इन्स्ट्रुमेंटेशन17
केमिकल लॅब12
सिव्हिल03
फायर सेफ्टी05
IT05
मटेरियल11
HR16
TotalTotal164
NFL Bharti 2024 Salary

NFL Bharti 2024 Education

  • नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान B.E, B.Tech, B.Sc Engg पर्यंत झालेले असावे.
  • उमेदवाराने MCA, MBA, PG पदवी, PG डिप्लोमा मिळवलेला असेल तरी पण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
  • फक्त अर्जदारांना 60 टक्के पेक्षा जास्त मार्क पदवी परीक्षेत मिळालेले असावेत.

NFL Bharti 2024 Exam Details

नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात परीक्षा घेतले जाणार आहे. MCQ Objective Type OMR Test होणार आहे, उमेदवारांना परीक्षेच्या तारीख आणि वेळेनुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून पेपर देणे बंधनकारक असणार आहे.

NFL Bharti 2024 Exam Details

  • पेपरचा वेळ – 2 घंटे
  • Negative Marking – नाही
  • Medium – हिंदी & इंग्रजी

SubjectsQuestionsMarks
General English
Quantitative
Aptitude
Reasoning & General Knowledge / Awareness
5050

एकूण १५० मार्कचा पेपर असणार आहे, यापैकी वर दिलेल्या तीन विषयासाठी 50 मार्क आहेत, बाकी 100 मार्क हे तुमच्या शैक्षणिक पात्रते नुसार असणार आहेत. एकूण प्रश्नांची संख्या हि 150 आहे आणि मार्क पण 150 आहेत, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 मार्क असणार आहे.

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख13 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख02 जुलै 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

NFL Bharti 2024 Apply Online

  • सुरुवातीला वरच्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
  • ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासमोरील Apply Now बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर पोर्टलवर तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या, नोंदणी झाल्यावर लॉगिन करून फॉर्म ओपन करा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  • जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे सूचनांचे पालन करा, आवश्यक कागदपत्रे सोबत परीक्षा फी भरून घ्या.
  • त्यानंतर शेवटी भरतीचा फॉर्म एकदा तपासा आणि नंतर Verify करून सबमिट करा.

NFL Bharti 2024 Selection Process

नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही एकूण तीन टप्प्यावर होणार आहे.

  • ऑफलाईन OMR Priksha
  • Personal Interview
  • Final Selection

Offline OMR Exam

ज्या अर्जदारांनी या भरतीसाठी फॉर्म भरला आहे, सुरुवातीला ऑफलाईन स्वरूपात परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा ही MCQ Objective Type OMR Based आहे. आणि या परीक्षेत मिळालेले मार्क Final Selection साठी विचारात घेतले जाणार आहेत.

Personal Interview

ज्या उमेदवारांनी भरतीची ऑफलाईन परीक्षा पास केली आहे त्यांना नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड द्वारे मुलाखती साठी बोलवले जाईल. मुलाखतीसाठी केवळ शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार पात्र असणार आहेत, इतर कोणत्याही उमेदवाराला डायरेक्ट मुलाखत देता येणार नाही. मुलाखतीचे मार्क पण Final Selection साठी Add केले जाणार आहेत.

Final Selection

परीक्षा आणि मुलाखतीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना कंपनीद्वारे मेरिट लिस्ट मध्ये समाविष्ट केले जाईल. मेरिट लिस्ट मध्ये सामील करण्यासाठी, उमेदवारांचे परीक्षेमधील आणि मुलाखतीमधील मार्क विचारात घेतले जाणार आहेत.

  • Offline OMR Exam – 80% Weightage
  • Personal Interview – 20% Weightage

उमेदवारांना या भरतीसाठी पास जर व्हायचे असेल तर परीक्षेमध्ये आणि मुलाखतीमध्ये Separately किमान 50% मार्क मिळवावे लागतील. जर दोन उमेदवारांना सारखेच मार्क असतील तर वयानुसार (जास्त वय असलेला) उमेदवार निवडला जाणार आहे.

NFL Bharti 2024 FAQ

Who is eligible for NFL Bharti 2024?

अर्जदार उमेदवारांनी किमान B.E, B.Tech, B.Sc Engg पदवीचे शिक्षण घेतलेले असावे, सोबत इतर पण काही पात्रता निकष आहेत त्यांची माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे, एकदा पाहून घ्या.

How to apply for NFL Bharti 2024?

नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. त्याची स्टेप बाय स्टेप माहिती वर आर्टिकल मध्ये मी दिली आहे, माहिती पाहून घ्या आणि त्यानुसार अर्ज सादर करा.

What is the last date of NFL Bharti 2024 Application Form?

नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 जुलै 2024 आहे. मुदत आहे तो पर्यंत फॉर्म भरण्याची संधी आहे, एकदा मुदत संपली की अर्ज करता येणार नाही त्यामुळे अजून वेळ आहे फॉर्म भरून टाका.

3 thoughts on “NFL Bharti 2024: नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये ट्रेनी पदासाठी भरती सुरू! पदवी डिप्लोमा पास वर संधी, लगेच अर्ज करा”

Leave a comment