NDA Exam 2026 ही परीक्षा 12वी नंतर थेट भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी आहे. आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी UPSC कडून ही परीक्षा घेतली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, त्यामुळे स्पर्धा खूपच जास्त असते. योग्य माहिती आणि नियोजन असेल तर NDA परीक्षा पास करणे नक्कीच शक्य आहे.
NDA Exam 2026 चा सिलेबस आणि परीक्षा पद्धत (Exam Pattern) समजून घेणे हे तयारीचे पहिले पाऊल आहे. लेखी परीक्षेत गणित (Maths) आणि सामान्य ज्ञान (GAT) हे दोन पेपर असतात. प्रत्येक विषयातील महत्त्वाचे टॉपिक्स ओळखून अभ्यास केला तर वेळ व मेहनत दोन्ही वाचतात. चुकीच्या प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे अचूकतेला खूप महत्त्व आहे.
या परीक्षेसाठी तयारी करताना महत्त्वाचे टॉपिक्स, मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका (Previous Year Papers) आणि योग्य Best Books यांची निवड करणे गरजेचे आहे. NCERT पुस्तके, बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करणे आणि रोज सराव करणे यामुळे आत्मविश्वास वाढतो. चालू घडामोडी (Current Affairs) नियमित वाचणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
या पोस्टमध्ये आपण NDA Exam 2026 सिलेबस, परीक्षा पॅटर्न, परीक्षेची तयारी कशी करावी, महत्त्वाचे टॉपिक्स आणि सर्वोत्तम पुस्तके याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत पाहणार आहोत. जर तुमचे स्वप्न NDA मार्फत अधिकारी होण्याचे असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
NDA Exam 2026: Overview Complete Details – परीक्षेची संपूर्ण माहिती
| परीक्षेचे नाव | NDA Exam 2026 |
| परीक्षा घेणारी संस्था | UPSC |
| परीक्षा स्तर | राष्ट्रीय स्तर |
| परीक्षा प्रकार | लेखी परीक्षा + SSB मुलाखत |
| एकूण पेपर | 2 (Maths, GAT) |
| परीक्षा माध्यम | इंग्रजी / हिंदी |
| नोकरी क्षेत्र | Army, Navy, Air Force |
| पात्रता | 12वी पास / Appearing |
| निवड प्रक्रिया | Written Exam, SSB, Medical |
| अधिकृत वेबसाइट | upsc.gov.in |
NDA Exam 2026 – Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | जानेवारी 2026 (अपेक्षित) |
| अर्जाची शेवटची तारीख | फेब्रुवारी 2026 |
| लेखी परीक्षा | एप्रिल 2026 |
| निकाल | मे / जून 2026 |
NDA Exam 2026 – Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| शैक्षणिक पात्रता | 12वी पास (कोणताही stream) | Navy आणि Air Force साठी: 12वी Physics आणि Maths सह. |
| वयोमर्यादा | 16.5 ते 19.5 वर्षे | अचूक तारीख नोटिफिकेशनमध्ये दिली जाते. |
| Physical पात्रता | ठराविक उंची व वजन आवश्यक सोबतच, डोळ्यांची दृष्टी चांगली असावी. | उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. |
NDA Exam 2026 – Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
NDA परीक्षेची निवड प्रक्रिया एकूण चार टप्प्यांमध्ये होते.
- लेखी परीक्षा
- SSB Interview
- Medical Test
- Final Merit List
लेखी परीक्षा आणि SSB Interview दोन्ही पास केल्यानंतरच अंतिम निवड होते.
NDA Written Exam 2026
NDA ची लेखी परीक्षा UPSC कडून घेतली जाते, ही परीक्षा Offline (OMR आधारित) पद्धतीने होते.
| परीक्षा पद्धत | Offline (OMR Sheet) |
| एकूण पेपर | 2 |
| विषय | Mathematics, GAT |
| प्रश्न प्रकार | Objective (MCQ) |
| भाषा | इंग्रजी आणि हिंदी |
| एकूण गुण | 900 |
| Negative Marking | आहे |
NDA Written Exam – Paper Details
| पेपर | विषय | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|---|
| Paper 1 | Mathematics | 120 | 300 | 2.5 तास |
| Paper 2 | GAT | 150 | 600 | 2.5 तास |
| एकूण | 270 | 900 | 5 तास |
NDA Exam Timing
| Shift | वेळ |
|---|---|
| Morning Shift | 10.00 am ते 12.30 pm (GAT) |
| Afternoon Shift | 2.00 pm ते 4.30 pm (Mathematics) |
NDA Marking Scheme (Negative Marking)
| विषय | चुकीच्या उत्तरासाठी गुण वजावट |
|---|---|
| Mathematics | -0.83 |
| GAT | -1.33 |
NDA SSB Interview
| Stage | प्रक्रिया |
|---|---|
| Stage 1 | Screening Test |
| Stage 2 | Psychological Test |
| Stage 3 | GTO Tasks |
| Stage 4 | Personal Interview |
| Stage 5 | Conference |
1) Screening Test
- Officer Intelligence Rating (OIR) Test
- Picture Perception & Discussion Test (PPDT)
या टप्प्यातच बरेच उमेदवार बाद होतात.
2) Psychological Test
- TAT (Thematic Apperception Test)
- WAT (Word Association Test)
- SRT (Situation Reaction Test)
- Self Description Test
येथे उमेदवाराचा स्वभाव, विचारसरणी तपासली जाते.
3) GTO (Group Testing Officer) Tasks
- Group Discussion
- Group Planning Exercise
- Outdoor Tasks
- Command Task
- Individual Obstacles
येथे leadership, teamwork, confidence पाहिले जाते.
4) Personal Interview
- वैयक्तिक प्रश्न
- शिक्षण, कुटुंब, आवडी
- Current Affairs
- NDA join करण्यामागचा उद्देश
5) Conference
- अंतिम चर्चा
- Final decision
Final Merit List
- Written Exam (900) + SSB Interview (900)
- एकूण गुण: 1800
- Merit List नुसार NDA Training साठी निवड हि केली जाते.
NDA Exam 2026 Syllabus (परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम)
| Paper | Syllabus Topics |
|---|---|
| Mathematics | Algebra, Trigonometry, Geometry, Mensuration, Statistics, Calculus |
| General Ability Test (GAT) | English: (Grammar, Vocabulary, Comprehension) General Knowledge: (Physics, Chemistry, Biology, History, Geography, Polity, Current Affairs) |
NDA Exam 2026 – Important Topics
| Paper | महत्वाचे Topics |
|---|---|
| Maths | Trigonometry Algebra Geometry Mensuration |
| GAT | English Grammar Physics (Basic concepts) History आणि Geography Current Affairs |
NDA Exam 2026 – Best Books for Preparation (परीक्षेसाठी आवश्यक अशी महत्वाची पुस्तके)
| Maths साठी पुस्तके | GAT साठी पुस्तके |
|---|---|
| NCERT Maths (11वी व 12वी) | Objective General English |
| RS Aggarwal Maths | Lucent General Knowledge |
| NDA Maths Guide | NCERT Science Books |
| – | Current Affairs Monthly Magazine |
NDA Exam Book
NDA Exam 2026 – परीक्षेची तयारी कशी करावी?
- NDA परीक्षेसाठी तयारी करताना सुरुवातीला syllabus नीट समजून घ्यावा.
- रोज ठराविक वेळ अभ्यासासाठी द्यावा.
- Maths आणि GAT दोन्ही विषयांना समान वेळ द्यावा.
- दर आठवड्याला revision करणे खूप महत्त्वाचे आहे.
- जास्तीत जास्त mock tests द्यावेत, त्यामुळे वेळेचे नियोजन आणि प्रश्न सोडवण्याचा सराव होतो.
NDA SSB Interview Preparation Tips
- आत्मविश्वास ठेवा.
- Current Affairs ची माहिती ठेवा.
- Communication skills सुधारवा.
- Physical fitness वर लक्ष द्या.
NDA Exam 2026 – Common Mistakes टाळा
- अभ्यासक्रम न पाहता अभ्यास करणे.
- फक्त Maths किंवा फक्त GAT वर लक्ष देणे.
- Mock test न देणे.
- Revision न करणे.
NDA Exam 2026 – FAQs (नेहमी विचारले जाणारे प्रश्न
12वी चालू असताना NDA साठी अर्ज करता येतो का?
होय, Appearing विद्यार्थी अर्ज करू शकतात.
NDA परीक्षा कठीण आहे का?
योग्य तयारी केली तर परीक्षा अवघड नाही.
NDA परीक्षा किती वेळा देता येते?
वयोमर्यादेत बसत असेपर्यंत किती पण वेळेस परीक्षा देता येते.
SSB Interview किती दिवस चालते?
SSB Interview साधारण 5 दिवस चालतो, यादरम्यान उमेदवाराची पात्रता चेक केली जाते.
NDA नंतर पगार किती मिळतो?
ट्रेनिंगनंतर सुरुवातीचा पगार सुमारे 56,100 ते 1,77,500 रु. इतका असतो.
