राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात भरती सुरू! कोणतीही फी नाही, मोठी संधी, अर्ज करा | NCRA TIFR Bharti 2024

NCRA TIFR Bharti: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात ट्रेनी पदासाठी भरती निघाली आहे. NCRA TIFR द्वारे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकूण फक्त 26 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 3 पदासाठी ही भरती असणार आहे, यामध्ये इंजिनियर ट्रेनी, टेक्निकल ट्रेनी आणि एडमिनिस्ट्रेटिव ट्रेनी असे रिक्त पडे भरले जाणार आहेत. यामधे सर्वात जास्त रिक्त जागा या एडमिनिस्ट्रेटिव ट्रेनी या पदासाठी आहेत, बाकी इतर दोन पदांची संख्या थोडी कमी आहे.

उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रा द्वारे एक संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या पोर्टल वरून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी ट्रेनी भरती बद्दल एक विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी उमेदवारास कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी भरायची गरज नाही, कारण सर्व प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी ही माफ करण्यात आली आहे.

भरती संबंधित सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, त्यामुळे तुम्हाला जर या भरती साठी अर्ज सादर करायचा असेल, तर तुम्ही ही माहिती आवर्जून वाचली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला अर्ज सादर करताना कोणती पण अडचण येणार नाही. ही माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि सोबत केंद्राद्वारे जारी केलेली अधिकृत जाहिरात देखील वाचून घ्या.

NCRA TIFR Bharti 2024

📢 भरतीचे नाव – National Centre for Radio Astrophysics, Pune Recruitment 2024

✅ पदाचे नाव – 

पदाचे नावपद संख्या
इंजिनिअर ट्रेनी (Servo/Digital)04
टेक्निकल ट्रेनी (Electrical/ Civil/Telescope Observer/ Electronics)10
एडमिनिस्ट्रेटिव ट्रेनी12
Total26

🚩 एकूण रिक्त जागा – 26 Vacancies

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – 

  • पद क्र.1: उमेदवार हा 60% गुणांसह BE/B.Tech. (Electronics & Communication/Electronics Engineering) उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.2: उमेदवार हा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Civil/Electronics/Electrical & Electronics/Radio Engineering) किंवा B.Sc. (Physics/Electronics) पास असावा.
  • पद क्र.3: उमेदवार हा पदवीधर असावा, तसेच त्यांना टायपिंग आणि वैयक्तिक संगणक आणि अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान असेल पाहिजे.

➡️ नोकरीची ठिकाण – पुणे आणि उटी

💰 पगार – 22 ते 35 हजार रुपये (पदानुसार वेतन श्रेणी भिन्न आहे)

💵 परीक्षा फी – कोणतीही परीक्षा फी नाही.

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – उमेदवार हा 28 वर्षा पेक्षा कमी वयाचा असावा.

📍 वयोमर्यादा सूट – कोणतीही अट शिथिल करण्यात आलेली नाहीये.

📆 फॉर्मची Last Date – 21 मार्च 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्जयेथून Apply करा

🖥️ जाहिरात (अधिसूचना) PDF

1 जाहिरातPDF Download करा
2 जाहिरातPDF Download करा

NCRA TIFR Bharti Apply Online अर्ज कसा करायचा?

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात ट्रेनी पदासाठी भरती सुरू झाली आहे, पात्र पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी लिंक Active करण्यात आली आहे. वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज येथून Apply करा या लिंक वर क्लिक करून तुम्ही Official Website वर जाऊ शकता, आणि तेथून फॉर्म भरू शकता.

फॉर्म भरताना उमेदवारांना सुरुवातीला साईट वर स्वतःची नोंदणी करणे अनिवार्य आहे, एकदा नोंदणी पूर्ण झाली की, Login करून उमेदवार NCRA TIFR Bharti साठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

अर्ज ओपन झाल्यानंतर उमेदवारांना आवश्यक ती सर्व माहिती फॉर्म मध्ये टाकायची आहे. एक महत्वाची बाब म्हणजे ऑनलाईन अर्ज करताना सुरुवातीला तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्याच लिंक वर क्लिक करून फॉर्म ओपन करा.

जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती सर्व माहिती फॉर्म मध्ये टाकल्या नंतर उमेदवारास भरती साठी लागणारी आवश्यक अशी सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.

कागदपत्रे हे जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य Size आणि Ratio मध्ये असावेत. जर कागदपत्रे योग्य प्रकारे Size केलेले नसतील, तर फॉर्म मध्ये ते अपलोड होणार नाहीत.

या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी भरायची गरज नाही, सर्व उमेदवारांना परीक्षा फी माफ असणार आहे. त्यामुळे एकदा तुम्ही आवश्यक कागदपत्रे अपलोड केले की नंतर लगेच तुम्ही अर्ज तपासून तो सबमिट करू शकता.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2024 आहे, त्यामुळे देय तारखे आगोदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे. दिलेल्या मुदती मध्ये अर्ज केला नाही, तर उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

नवीन भरती अपडेट:

NCRA TIFR Bharti FAQ

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र ट्रेनी भरती साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण 26 रिक्त जागा आहेत, ज्या 3 वेगवेगळ्या ट्रेनी पदासाठी असणार आहेत.

NCRA TIFR Bharti साठी अर्ज कसा करायचा?

NCRA TIFR भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी सविस्तर माहिती ही या लेखामध्ये मी दिली आहे.

NCRA TIFR Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

21 मार्च 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, या तारखे नंतर कोणालाही अर्ज सादर करता येणार नाही.

2 thoughts on “राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात भरती सुरू! कोणतीही फी नाही, मोठी संधी, अर्ज करा | NCRA TIFR Bharti 2024”

Leave a comment