Navy Selection Process: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण भारतीय नौसेने मध्ये उमेदवारांची निवड कशी केली जाते, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Indian Navy Selection Process सोबतच नौसेना मध्ये भरती होण्यासाठी कोणता अभ्यासक्रम असतो, आणि भरतीसाठी परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते, अशी सर्व महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा.
तुम्ही जर भारतीय नौसेनेमध्ये भरती होण्यासाठी तयारी करत असाल, तर तुम्हाला या लेखामध्ये दिलेली माहिती मोठी कामाची ठरणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक माहिती वाचा, आणि त्यानुसार तुमची तयारी सुरू ठेवा.
Indian Navy Selection Process
भारतीय नौसेनेमध्ये ज्या उमेदवारांना भरती व्हायचे आहे, त्यांना वेगवेगळ्या स्तरावर पास व्हावे लागते, भरती साठी योग्य उमेदवाराची निवड ही या चाचणी परीक्षे द्वारे केली जाते. जे उमेदवार या सर्व परीक्षेत उत्तीर्ण होतील केवळ त्यांनाच Indian Navy मध्ये रिक्त जागांसाठी निवडले जाते.
भारतीय नौसेनेमध्ये भरती अंतर्गत निवड होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते, परीक्षेसोबतच वेगवेगळ्या चाचण्या देखील घेतल्या जातात. परीक्षा आहे ऑनलाइन तसेच ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते, तसेच उमेदवाराचे शारीरिक स्वास्थ्य मेडिकल टेस्ट देखील केल्या जातात.
वर सांगितलेल्या सर्व चाचण्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या चाचण्या देखील घेतल्या जातात, यामधे उमेदवाराची मानसिक शक्तीची मोजदाद केली जाते. Inteligence Test, Psychological Test अशा Deep टेस्ट घेतल्या जातात.
Indian Navy Selection Process अंतर्गत येणाऱ्या सर्व चाचण्यांची माहिती आपण सविस्तरित्या खाली घेणार आहोत. सोबतच इतर काही महत्त्वाची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत.
Shortlisting
सुरुवातीला जेव्हा भारतीय नौसेनेमध्ये एखाद्या रिक्त पदांसाठी भरती निघेल, तेव्हा ऑनलाईन परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांचे निवड केली जाते. त्याद्वारे योग्य उमेदवार Shortlist केले जातात.
शॉर्टलिस्टिंग परीक्षेला Indian Navy Entrance Test असे देखील म्हंटले जाते, ही प्रवेश परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटरच्या सहाय्याने घेतले जाते. त्यामुळे सुरुवातीला जे उमेदवार नौसेना भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांच्याकडे कॉम्प्युटरची सुविधा असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटरच्या सुविधे सोबतच इंटरनेटची सुविधा पण असावी, आणि कम्प्युटरला वेब कॅमेरा देखील असावा.
Written Examination
भारतीय नौसेना प्रवेश परीक्षा मध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील, त्यांना Written Examination साठी अर्ज करता येणार आहे.
लेखी परीक्षा देखील ऑनलाइन स्वरूपात होणार आहे, ही परीक्षा Computer Based Test असणार आहे. वर सांगितल्या नुसार उमेदवाराकडे कॉम्प्युटर ची सुविधा असावी, सोबत internet आणि वेब कॅमेरा असावा.
नौसेनेसाठी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, जी Objective Type असणार आहे, यात MCQ स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत.
परीक्षेचे माध्यम हे इंग्रजी आणि हिंदी असणार आहे, इतर कोणत्याही माध्यमातून परीक्षा देता येणार नाही. उमेदवार केवळ हे दोन माध्यम निवडू शकतात.
परीक्षा ही Negative Marking System नुसार घेतली जाणार आहे, प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 0.25 मार्क कट केले जाणार आहेत. म्हणजे 1/4 अशी Negative Marking असणार आहे.
Physical Fitness Test (PFT)
Written Examination जे उमेदवार पास होतील त्यांना शारीरिक तपासणी बोलवले जाईल, आणि तेथे उमेदवाराची Physical Fitness Test घेतली जाईल.
शारीरिक चाचणी ही Indian Navy Bharti साठी अनिवार्य असणार आहे, जे उमेदवार ही चाचणी परीक्षा देणार नाहीत, त्यांना Navy Bharti साठी रिक्त जागांवर निवडले जाणार नाही.
Physical Fitness Test मध्ये Running, Squats, Push-ups, Bent Knee Situps अशा कसरती घेतल्या जाणार आहेत. यात पुरुष आणि महिला यांच्या साठी निकष हे वेगवेगळे आहेत.
Gender | 1.6 Km run | Squats | Push-ups | Bent Knee Situps |
---|---|---|---|---|
Male | 06 min 30 sec | 20 | 12 | – |
Female | 08 min | 15 | – | 10 |
शारिरीक चाचणी मध्ये वरील कसरती बरोबर उमेदवारांची उंची देखील मोजली जाते, व त्यानुसार त्यांची पात्रता ठरवली जाते. उंची ही पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी आहे, महिलांना उंची साठी पुरुषांच्या तुलनेत 5 सेमी ची सूट देण्यात आली आहे.
Gender | Height Standard (Minimum) |
---|---|
Male | 157 cms |
Female | 152 cms |
Medical Exam
जे उमेदवार शारीरिक चाचणी मध्ये पास होतील त्यांना पुढे मेडिकल तपासणी साठी बोलवले जाईल, यामधे उमेदवाराची सर्व मेडीकल तपासणी केली जाईल, जर उमेदवाराचे आरोग्य उत्तम असेल तर त्याला Medical Exam मध्ये पण पास केले जाईल.
मेडीकल तपासणी मध्ये उमेदवारांची सर्व शारीरिक चाचणी केली जाईल, डोळ्याची दृष्टी तपासली जाईल, जर उमेदवाराला चष्मा असेल तर त्यानुसार अशा उमेदवारांची तपासणी होणार आहे.
जे उमेदवार सर्व स्तरावर Medical Exam मध्ये पास झाले असतील, त्यांनाच पुढील स्तरावर जाता येणार आहे. आणि जे उमेदवार पास झाले नाहीत, किंवा एखाद्या Test मध्ये Fail झाले असतील, त्यांना मात्र पुढील प्रक्रिया साठी निवडले जाणार नाही.
Merit List
शेवटी वरील सर्व निवड प्रक्रियेतून जे उमेदवार उत्तीर्ण होतील, त्यांना त्यांची Merit List Indian Navy द्वारे प्रसिद्ध केली जाईल. त्यांनतर Merit List मध्ये आलेल्या सर्व उमेदवारांना Navy Bharti साठी रिक्त जागांवर निवडले जाईल, आणि त्यांना Joining साठी बोलवले जाईल. नौसेना मेरिट लिस्ट ही वरील सर्व निवड प्रक्रिया मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ठरवली जाणार आहे.
Indian Navy Bharti Exam Syllabus
भारतीय नौसेनेमध्ये वेगवेगळ्या पदासाठी भरती निघते, त्यामुळे पदानुसार Exam Syllabus हे वेगवेगळे असतात. उमेदवारांना ज्या भरतीसाठी अर्ज सादर करायचा असेल, त्या भरतीसाठी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला अभ्यासक्रम जाणून घेणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रम हा प्रत्येक भरतीसाठी वेगवेगळा असतो, त्यामुळे भारतीय नौसेना भरतीसाठी सारखाच अभ्यासक्रम सांगता येणे शक्य नाही. नौसेने अंतर्गत वेगवेगळ्या भरत्या होतात, त्यामुळे तुम्ही केवळ एका अभ्यासक्रमावर सर्व पदांसाठी अर्ज करू शकणार नाही.
मुख्य स्वरूपात सर्व भरतीसाठी सारखी असणारी बाब म्हणजे, भारतीय नौसेनेमध्ये भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा विज्ञान शाखेतील असावा. उमेदवाराने बारावी मध्ये विज्ञान शाखा निवडलेली असावी, तसेच उमेदवाराने Science Stream मध्ये Math घेतलेले असावे.
Indian Navy Selection Process FAQ
भारतीय नौसेनेमध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
नौसेनेमध्ये उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि शारीरिक चाचणी व मेडिकल तपासणी द्वारे केली जाते.
भारतीय नौसेनेमध्ये परीक्षा कोणत्या माध्यमातून होणार आहे?
Navy साठी दोन परीक्षा घेतल्या जातात, पहिली प्रवेश परीक्षा आणि नंतर Writeen Test घेतली जाते. या दोन्ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात कॉम्प्युटर द्वारे घेतल्या जातात.
भारतीय नौसेना भरती साठी अर्ज कसा करायचा?
Navy साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करता येतो, प्रत्येक भरती नुसार याची अर्ज करण्याची प्रक्रिया ही बदलते.
2 thoughts on “Navy Selection Process: नौसेनेत कोणते उमेदवार निवडले जाणार? पाहा सविस्तर माहिती”