Nagar Parishad Bharti 2025: 10वी आणि 12वी पासवर नगर परिषद मधे 3200+ जागांची भरती! संधी सोडू नका!

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025. नमस्कार मित्रांनो! महाराष्ट्र Nagar Parishad Bharti 2025 साठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विविध नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयांमध्ये 3215 पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही संधी गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील अनेक तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याचा मोठा मार्ग उघडणारी आहे. तुम्ही 10वी, 12वी किंवा पदवीधर असाल, तरीही या भरतीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे.

ही भरती Maharashtra Nagar Parishad म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबवली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास 55,000 पदे रिक्त असून, त्यापैकी 40,000 पदांवर भरती लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे ही भरती केवळ आकडेवारी नसून, राज्यातील हजारो तरुणांसाठी रोजगाराचे मोठे साधन ठरणार आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः Online पद्धतीने होणार असून, जिल्हा निवड समितीमार्फत निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ३४ जिल्ह्यांमध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील एकूण ३७२० पदांसाठी ही मोहीम राबवली जाईल. त्यामुळे ज्यांना सरकारी नोकरी मिळवायची आहे, त्यांनी या भरतीकडे लक्ष ठेवावे.

या भरतीबाबत सविस्तर आणि उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख अवश्य वाचा!

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची माहिती

माहितीचा तपशील (Details)माहिती (Information)
Organization Name (संस्था)महाराष्ट्र नगर परिषद / नगर पंचायत (Maharashtra Nagar Parishad)
Total Posts (एकूण पदसंख्या)अंदाजे 3215 पदे (Approx. 3215 Vacancies)
Post Categories (पदांचे प्रकार)गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्ग
Job Location (नोकरीचे ठिकाण)महाराष्ट्रातील सर्व जिल्हे / नगरपरिषद क्षेत्र

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

खालील तक्त्यामध्ये गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील भरतीतील विविध पदांची माहिती दिली आहे:

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 – पदांची यादी

  1. Clerk (लिपिक)
  2. Driver (चालक)
  3. Fireman (अग्निशमन)
  4. Glani Chalak (ग्लानी चालक)
  5. Granthpal (ग्रंथपाल)
  6. Havaldar / Naik (हवालदार / नाईक)
  7. Pump Operator / Vijtantri / Jodri (पंप ऑपरेटर / वीजतंत्री / जोडारी)
  8. Safai Kamgar (सफाई कामगार)
  9. Sahayak Granthpal (सहायक ग्रंथपाल)
  10. Shipai / Peon (शिपाई / प्यून)
  11. Steno cum Typist (लघुटंकलेखक)
  12. Wireman (तारतंत्री)
  13. Udyan Pariveshak (उद्यान पर्यवेक्षक)
  14. Whalman (व्हालमन)
Categoryजागा संख्या (Vacancies)
गट ‘क’ (Group C)2,151 पदे
गट ‘ड’ (Group D)987 पदे
एकूण:3,138 पदे

तसेच, राज्यस्तरीय Nagar Parishad / Nagar Panchayat मध्ये खालील तांत्रिक व प्रशासकीय पदांसाठी पदे रिक्त आहेत (राज्यस्तरावर):

  • स्थापत्य अभियंता – 315
  • विद्युत अभियंता – 35
  • संगणक अभियंता – 58
  • पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता – 76
  • लेखापाल & लेखा परीक्षक – 154
  • कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी – 543
  • अग्निशमन सेवा – 403
  • स्वच्छता निरीक्षक – 280
  • नगर नियोजक – 400

(एकूण राज्यस्तरीय पदे: 2,264)

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता (Civil Engineer)– स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
– MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा
– मराठी भाषेचे ज्ञान
विद्युत अभियंता (Electrical Engineer)– विद्युत अभियांत्रिकी पदवी
– MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा
– मराठी भाषेचे ज्ञान
संगणक अभियंता (Computer Engineer)– संगणक अभियांत्रिकी पदवी
– MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा
– मराठी भाषेचे ज्ञान
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (Sanitation Engineer)– मलनिस्सारण व स्वच्छता शाखेतील पदवी
– MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा
– मराठी भाषेचे ज्ञान
लेखापाल / लेखापरीक्षक (Accountant/Auditor)– वाणिज्य शाखेतील पदवी
– MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा
– मराठी भाषेचे ज्ञान
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी (Tax & Admin Officer)– कोणत्याही शाखेची पदवी
– MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा
– मराठी भाषेचे ज्ञान
अग्निशमन अधिकारी (Fire Officer)– कोणत्याही शाखेची पदवी
– केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचा अग्निशमन अधिकारी व प्रशिक्षक कोर्स
– MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा
– मराठी भाषेचे ज्ञान
स्वच्छता निरीक्षक (Sanitation Inspector)– कोणत्याही शाखेची पदवी
– स्वच्छता निरीक्षक पदविका
– मराठी भाषेचे ज्ञान

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे वयोमर्यादा लागू राहील:

वर्गकिमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
सामान्य प्रवर्ग (Open)21 वर्षे38 वर्षे
मागासवर्गीय (SC/ST/OBC)21 वर्षे43 वर्षे
दिव्यांग (PWD)21 वर्षे45 वर्षे
माजी सैनिक (Ex-Servicemen)21 वर्षे45 वर्षे पर्यंत (सेवा कालानुसार सवलत)
शासकीय कर्मचारी21 वर्षे43 वर्षे (निर्धारित अटींच्या अधीन)

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

📌 1. निवड प्रक्रिया (Selection Process):

नागरी सेवा भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे खालील प्रमाणे आहेत:

1.1. शैक्षणिक पात्रतेची पूर्तता अनिवार्य

  • जाहिरातीत दिलेल्या पात्रतेच्या अटी फक्त किमान आहेत. त्या पूर्ण केल्याने निवड निश्चित होत नाही.

1.2. लागू असलेले नियम आणि अधिनियम:

उमेदवारांची निवड खालील अधिनियमानुसार होईल:

  • महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरे राज्यसेवा नियम, 2006
  • स्वच्छता निरीक्षक पदासाठी लागू: राज्यसेवा नियम, 2019
  • वेळोवेळी शासन निर्णय व सुधारणा लागू होतील.

📌 2. परीक्षा पद्धत (Exam Pattern):

परीक्षाविषयगुणप्रश्नसंख्या (अंदाजे)किमान पात्रता गुण
पेपर 1मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता1206045%
पेपर 2संबंधित विषय ज्ञान804045%

टीप: दोन्ही पेपर एकाच सत्रात घेतले जातील.
पेपर 1 मध्ये 45% गुण नसल्यास पेपर 2 तपासला जाणार नाही.

📌 3. निकाल व गुणवत्ता यादी (Result & Merit List):

  • दोन्ही पेपरमध्ये किमान 45% गुण अनिवार्य आहेत.
  • किमान गुण नसल्यास उमेदवार बाद मानले जातील.
  • गुणवत्ता यादी फक्त पात्र उमेदवारांमधून तयार केली जाईल.
  • गुणवत्ता यादीत सामाजिक व समांतर आरक्षण लागू केलं जाईल.

📌 4. आरक्षण व गटानुसार निवड (Category-wise Selection):

  • सर्व उमेदवारांना प्रथम सर्वसाधारण गटासाठी विचारात घेतले जाईल.
  • विशेष आरक्षित पदासाठी त्याच गटातील उमेदवारांचा विचार होईल, बशर्ते त्यांनी वैध प्रमाणपत्र सादर केले असेल.
गटस्पष्टीकरण
गट असामान्य गुणवत्ता यादीतील पहिली निवड
गट बदुसऱ्या टप्प्यातील निवड
गट कनगरपरिषद/नगरपंचायत कर्मचारी असलेल्यांसाठी राखीव 25% जागा

📌 5. अतिरिक्त महत्त्वाचे मुद्दे:

  • कोणत्याही परिस्थितीत किमान गुणांमध्ये शिथिलता दिली जाणार नाही.
  • जरी पदे रिक्त राहिली तरी किमान पात्रता गुण आवश्यक आहेत.
  • नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचारी असल्यास, सवसाधारण पात्रतेप्रमाणेच पात्रता आवश्यक आहे.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अ.क्र.विषयकार्यपूर्ती कालावधी
1.जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करारनामा करणे15 जून 2025
2.पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे15 जुलै 2025
3.परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणे30 सप्टेंबर 2025

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025: Important Links & Official Notification – अर्ज लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची शॉर्ट जाहिरात इथे डाउनलोड करा
Apply Onlineइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

UPSC NDA Bharti 2025:12वी पासवर सैन्यात जाण्याची मोठी संधी, NDA आणि नौदल अकॅडमी परीक्षा! पगार 56 हजार पासून सुरु!

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

👉 अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ:
🔗 https://mahadma.maharashtra.gov.in

📝 पायरी 1: ऑनलाईन अर्ज सादर करणे

  1. उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावा.
  2. अर्ज करण्याआधी संपूर्ण सूचना वाचून घ्याव्यात – या सूचना mahadma.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहेत.
  3. अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

📍 पायरी 2: परीक्षा केंद्र निवड

  1. उमेदवाराने अर्ज करताना 3 पसंतीप्रमाणे परीक्षा केंद्र निवडणे बंधनकारक आहे.
  2. निवडलेली परीक्षा केंद्रे उपलब्ध नसल्यास, उमेदवारास अन्य जवळील केंद्र देण्यात येईल.
  3. एकदा परीक्षा केंद्र निश्चित झाल्यावर, बदलाची विनंती स्वीकारली जाणार नाही.

💵 पायरी 3: परीक्षा शुल्क भरताना लक्षात घ्या

प्रवर्गपरीक्षा शुल्क
सामान्य₹1000/-
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ₹900/-

🔸 शुल्क हे Non-refundable आहे.
🔸 शुल्क फक्त Online पद्धतीने भरावे लागेल – (Debit/Credit Card, UPI, Net Banking).
🔸 अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यावरच पावती आणि Payment Successful संदेश दिसावा.

📌 महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करताना, शाळा प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणेच नावाची नोंदणी करावी.
  • चुकीची माहिती दिल्यास उमेदवार अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • एका किंवा अधिक सेवांसाठी अर्ज करत असल्यास, प्रत्येकासाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.

इतर भरती

Kotak Junior Scholarship Program 2025-26: कोटककडून गरीब विद्यार्थ्यांसाठी 10वी नंतर दरमहा ₹3,500 शिष्यवृत्ती! लवकर अर्ज करा!

SBI CBO Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी भारतीय स्टेट बँकेत CBO पदासाठी भरती! पगार ₹50,000 पासून!

CISF Sports Quota Bharti 2025: महाराष्ट्रातील 12वी पास खेळाडूंसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती! पगार ₹25,500-₹81,100/-

Indian Army TES Bharti 2025: 12 वी पासवर इंडियन आर्मीमधे भरती, 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स अर्ज सुरू, इथून अर्ज करा!

Top 5 Study Abroad Scholarships After 12th: पूर्ण ट्युशन फी, राहण्याचा-जेवणाचा खर्च मिळेल! अर्ज प्रक्रिया, फायदे आणि पात्रता!

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 FAQs

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा?

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा. अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती अचूक भरावी आणि परीक्षेचे शुल्क वेळेत भरावे.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 मध्ये परीक्षा शुल्क किती आहे?

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 साठी परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे आहे – सामान्य प्रवर्गासाठी ₹1000/- आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ उमेदवारांसाठी ₹900/-. परीक्षा शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 साठी परीक्षेचे केंद्र कुठे मिळेल?

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 परीक्षेसाठी केंद्र निवड उमेदवाराने अर्ज करताना दिलेल्या पसंतीनुसार केली जाईल. मात्र, आवश्यकता भासल्यास उमेदवारास इतर उपलब्ध केंद्रांवरही परीक्षा दिली जाऊ शकते.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 मध्ये एक पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करू शकतो का?

होय, उमेदवार Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 मध्ये एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करू शकतो. मात्र, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा लागेल आणि त्या-त्या पदासाठी वेगळे परीक्षा शुल्क भरावे लागेल.

Leave a comment