MPSC Medical Bharti 2025: अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ आणि जिल्हा शल्यचिकित्सक गट-अ पदांसाठी विविध विषयांमध्ये 320 विशेषज्ञ संवर्गांच्या जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) हा भारताच्या संविधानाच्या कलम 315 अंतर्गत स्थापन केलेला स्वायत्त संस्थात्मक आयोग आहे. या आयोगाद्वारे महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवांमधील अधिकाऱ्यांची निवड उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार व आरक्षण नियमांच्या आधारे केली जाते.
एमपीएससीने या भरतीसंबंधी अधिकृत अधिसूचना जारी केली असून, या पदांसाठी अर्ज प्रक्रिया जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक अप्रतिम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
MPSC Medical Bharti 2025: Details (भरतीची माहिती)
घटक | माहिती |
संस्था नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
एकूण जागा | 320 |
पदाचे नाव | विशेषज्ञ संवर्ग व जिल्हा शल्यचिकित्सक गट-अ |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
वेतनश्रेणी | लागू नियमानुसार |
अर्ज शुल्क | खुला प्रवर्ग: ₹719/- |
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/- |
MPSC Medical Bharti 2025: Posts & Vacancy (पदे आणि जागा)
जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 ते 010/2025 | 1 | विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 95 |
011/2025 | 2 | जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 225 |
Total | 320 |
विशेष प्रवर्गासाठी राखीव जागा:
या भरतीअंतर्गत राखीव प्रवर्ग, खेळाडू, महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत.
MPSC Medical Bharti 2025: Education (शिक्षण पात्रता)
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | (i) MBBS/MD/M.S./M.D/DM/D.N.B. (ii) 05/07 वर्षे अनुभव |
2 | जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | (i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (iii) 05 वर्षे अनुभव |
MPSC Medical Bharti 2025: Age Limit (वयोमर्यादा)
पद क्र. | पदाचे नाव | वयोमर्यादा (01 मे 2025 रोजी) | विशेष प्रवर्गासाठी सवलत |
1 | विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 18 ते 38 वर्षे | मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट |
2 | जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 19 ते 38 वर्षे | मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट |
MPSC Medical Bharti 2025: Selection Process (निवड प्रक्रिया)
MPSC Medical Bharti 2025: अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया स्पष्टपणे आखण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे:
- किमान पात्रता निश्चित करणे:
- जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान आहेत.
- पात्रता धारण केल्यावरही उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावले जाईलच असे नाही.
- अर्जांची छाननी:
- जाहिरातीस अनुसरून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास आयोग अर्जांची छाननी करेल.
- अर्जांची संख्या मर्यादित करण्यासाठी अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव, किंवा अन्य निकषांचा विचार केला जाईल.
- चाळणी परीक्षा (लागू असल्यास):
- अर्जांची संख्या जास्त असल्यास चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
- चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, माध्यम, आणि तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.
- चाळणी परीक्षा घेतल्यास, त्यातील गुण आणि मुलाखतीतील गुण विचारात घेऊन अंतिम निवड केली जाईल.
- चाळणी परीक्षा न झाल्यास, केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस केली जाईल.
- मुलाखत प्रक्रिया:
- मुलाखतीत किमान 41% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणे आवश्यक आहे.
- केवळ पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- अंतिम शिफारस:
- चाळणी परीक्षा घेतल्यास, चाळणी व मुलाखतीचे एकत्रित गुण विचारात घेतले जातील.
- मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाईल.
- सेवा प्रवेश नियम आणि कार्यनियमावली:
- निवड प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा प्रवेश नियमांनुसार होईल.
- शासन आणि आयोगाच्या कार्यनियमावलीतील सुधारणा लागू होतील.
- कर्तव्ये व जबाबदाऱ्या:
- निवड झालेल्या पदांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
MPSC Medical Bharti 2025: Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
अ.क्र. | तपशील | विहित कालावधी |
1 | अर्ज सादर करण्याचा कालावधी | 21 जानेवारी 2025 (14:00) ते 10 फेब्रुवारी 2025 (23:59) |
2 | ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 10 फेब्रुवारी 2025 (23:59) |
3 | चालानाची प्रत घेण्याची अंतिम तारीख | 12 फेब्रुवारी 2025 (23:59) |
4 | चालानाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 13 फेब्रुवारी 2025 (बँकेच्या कार्यालयीन वेळेत) |
MPSC Medical Bharti 2025: Important Links (महत्त्वाच्या लिंक्स)
घटक | लिंक/माहिती |
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची शॉर्ट जाहिरात – पद क्र.1: पद क्र.2: | इथे डाउनलोड करा इथे डाउनलोड करा |
ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
MPSC Medical Bharti 2025: How to Apply (ऑनलाइन अर्ज कसा करायचा)
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी खालील टप्प्यांचे पालन करावे लागेल:
अर्ज करण्याचे टप्पे:
- नोंदणी (Registration):
- आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणाली वर नोंदणी करा.
- नवीन उमेदवारांनी विहित पद्धतीने खाते (Profile) तयार करणे आवश्यक आहे.
- खाते अद्ययावत करणे (Profile Update):
- आधीपासून तयार खाते असल्यास, ते अद्ययावत करा.
- खात्यातील माहिती अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करा.
- अर्ज सादर करणे:
- विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करा.
- परीक्षा शुल्क भरणे:
- अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क विहित पद्धतीने भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे:
- प्रोफाईलमध्ये नमूद केलेल्या दाव्यांच्या आधारावर अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करावीत:
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित)
- आरक्षणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
- इतर विहित कागदपत्रे
- सर्व प्रमाणपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद केलेल्या निकषांनुसार सादर करणे अनिवार्य आहे.
परीक्षा शुल्क (Fees):
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
परीक्षा शुल्क भरण्याच्या पद्धती:
- ऑनलाईन पद्धतीने:
- क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरणे.
- “Payment Successful” संदेश येईपर्यंत लॉगआउट करू नका.
- शुल्क भरल्यानंतर प्राप्ती (Receipt) डाउनलोड करून ठेवा.
- ऑफलाईन पद्धतीने (चलनाद्वारे):
- चालानाची प्रत डाउनलोड करा.
- भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँकेच्या वेळेत परीक्षा शुल्क जमा करा.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे:
- अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर “Submit and Pay Fees” बटणावर क्लिक करा.
- अर्जाची स्थिती (Status) प्रोफाईलमध्ये तपासा.
- अर्ज सादर केल्यानंतर अंतिम मुदतीत शुल्क भरल्याशिवाय अर्ज वैध मानला जाणार नाही.
महत्त्वाचे मुद्दे:
- कोणत्याही कारणाने शुल्क भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास, अर्ज रद्द केला जाईल.
- तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे व्यवहार अयशस्वी ठरल्यास, अर्जदाराने अंतिम मुदतीतच शुल्क भरण्यासाठी प्रयत्न करावेत.
इतर भरती
MPSC Medical Bharti 2025: FAQs
MPSC Medical Bharti 2025 साठी किती पदे उपलब्ध आहेत?
MPSC Medical Bharti 2025 अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 320 जागा भरल्या जाणार आहेत.
MPSC Medical Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्र.1: MBBS/MD/MS/DM/DNB व 5 ते 7 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
पद क्र.2: MBBS व वैद्यकीय विषयातील पदव्युत्तर पदवीसह 5 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
MPSC Medical Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल आणि शेवटची तारीख काय आहे?
अर्ज प्रक्रिया 21 जानेवारी 2025 पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.
MPSC Medical Bharti 2025 साठी परीक्षा शुल्क किती आहे?
खुला प्रवर्ग: ₹719/-
मागासवर्गीय/दिव्यांग/अनाथ: ₹449/-
बँक शुल्क व कर अतिरिक्त लागू होतील.