Modi Awas Gharkul Yojana: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण मोदी आवास योजना संबंधी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
मोदी आवास योजने साठी कोण पात्र असणार? कोणाला घरकुल मिळणार? योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? अर्ज कसा करायचा? अशी सर्व महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महा अर्थसंकल्प 2023 मध्ये अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोदी आवास योजनेची घोषणा केली आहे.
त्यानुसार राज्यातील सर्व गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे. परंतु यासाठी शासनाने काही निकष देखील ठरवले आहेत, त्यानुसार फक्त पात्र लाभार्थ्यांना या योजेनेचा लाभ मिळणार आहे.
जर तुम्हाला पण या घरकुल योजने द्वारे आपले हक्काचे घर पाहिजे अस तर ही महत्वाची अशी माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि त्यानुसार मोदी आवास योजना साठी अर्ज सादर करा.
Modi Awas Gharkul Yojana Maharashtra
योजनेचे नाव | Modi Awas Gharkul Yojana |
सुरुवात | महाराष्ट्र शासन अर्थसंकल्प 2023 |
घोषणा कोणी केली | अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस |
उद्देश | गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांना हक्काचे पक्के घर देणे |
लाभ | राज्यातील सर्व गरीबांना घरकुल मिळते |
लाभार्थी | महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गातील नागरिक |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
Modi Awas Gharkul Yojana Qualification Details (पात्रता निकष)
मोदी आवास योजनेसाठी राज्य सरकारने काही पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार राज्यातील ज्या लोकांना या योजने अंतर्गत घरकुल हवे असेल त्यांना हे सर्व पात्रता निकष पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.
- अर्जदार उमेदवार इतर मागास वर्गातील असावेत, त्यांची कास्ट ही ओबीसी (OBC) असावी.
- अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असावी, इतर राज्यातील लोक या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात किमान 15 वर्षे वास्तव केलेले असावे. आणि चालू वेळेत व्यक्ती राज्याचा रहिवासी असावा.
- लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार रुपये पेक्षा जास्त नसावे, त्यापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच मोदी आवास योजने द्वारे घरकुल मिळते.
- लाभार्थी व्यक्तीने शासनाची घरकुल संबंधी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, तसेच गृह कर्ज पण घेतलेले नसावे.
- व्यक्तीकडे घर बांधण्यासाठी पुरेशी जमीन असावी, आणि त्या जमिनीवर कच्चे घर असावे.
थोडक्यात वर सांगितलेले सर्व पात्रता निकष हे मोदी आवास घरकुल योजना साठी लागू असणार आहेत. जे व्यक्ती हे निकष पूर्ण करतील त्यांना हक्काचे घर मिळणार आहे.
Modi Awas Gharkul Yojana Benifits (लाभ, फायदे)
मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत अर्जदार व्यक्तीला मोठे फायदे मिळणार आहेत. यामध्ये जे व्यक्ती पात्र आहेत त्यांना सरकार द्वारे पक्के घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
मोदी आवास योजनेद्वारे राज्यातील तब्बल 10 लाख कुटुंबांना पक्के घर देण्याचा उद्देश आहे. यासंबधी नवीन माहिती समोर आली आहे, त्यानुसार महाराष्ट्र शासनाने मोदी आवास योजना साठी पहिल्या यादी मधील पात्र लोकांना 375 कोटी रुपये अनुदान मंजूर केले असून, दिनांक 28 फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनुदानाचे वितरण देखील करण्यात आले आहे.
मोदी आवास योजनेद्वारे जे लोक अर्ज सादर करतील त्यांना घर बांधण्यासाठी प्रत्येकी 1.20 लाख रुपये दिले जाणार आहेत. हे अनुदान सबसिडी स्वरूपात मिळणार आहे, म्हणजे घर बांधण्यासाठी 1.20 लाखापर्यंतचा खर्च राज्य सरकार देणार आहे, बाकी घरासाठी लागणार उर्वरित खर्च हा अर्जदार व्यक्तीला करायचा आहे. यात एक महत्वाची बाब म्हणजे, घरकुल योजनेसाठी पात्र असलेल्या व्यक्तींना 5 ब्रास पर्यंत मोफत वाळू देखील दिली जात आहे, त्यासाठी पण राज्य सरकारने मोफत वाळू योजना सुरू केली आहे.
Modi Awas Gharkul Yojana Document List (आवश्यक कागदपत्रे)
मोदी आवास घरकुल योजनेसाठी अर्जदारांना आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत सादर करणे अनिवार्य आहे. कागदपत्रे जर सादर केले नाही, किंवा एखादे आवश्यक Document राहिले तर मोदी आवास योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही.
मोदी आवास योजना साठी आवश्यक कागदपत्रे:
- जमिनीचा सातबारा उतारा
- संपत्ती रजिस्टर
- ग्राम पंचायतचे जमीन मालकी प्रमाणपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रेशनकार्ड
- जातीचा दाखला (कास्ट सर्टिफिकेट)
- मतदान कार्ड
- विजेचे बिल
- मनरेगा जॉब कार्ड
- अर्जदाराच्या बँकेचे पासबुक
थोडक्यात वर जे कागदपत्रे सांगितले आहेत, त्या सर्वांची एक प्रत मोदी आवास योजनेच्या फॉर्म सोबत जोडायची आहे. प्रत ही झेरॉक्स कॉपी असावी, तसेच Original Documents देखील सोबत ठेवायचे आहेत, जेणेकरून आवश्यकता भासल्यास ते Original Documents देता येतील.
Modi Awas Gharkul Yojana Application Form अर्ज कसा करायचा?
मोदी आवास योजनेचा लाभ ग्रामीण स्तरावर गरीब मागासवर्गीय लोकांना होणार आहे. या योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात करायचा आहे, ऑनलाईन कोणत्याही स्वरूपाची अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
मोदी आवास योजनेसाठी सुरुवातीला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी व्यक्तिला अर्ज करावा लागेल. त्यानंतर घरकुलासाठी व्यक्तीचे नाव हे Waiting List मध्ये टाकले जाईल, त्यांनतर ग्राम पंचायत द्वारे गावातील मागासवर्गीय अर्जदारांचे नाव निवडले जातील आणि त्यानुसार सर्व अर्जदारांना मोदी आवास योजनेचा फायदा मिळेल.
याची संपूर्ण प्रक्रिया ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत द्वारे केली जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतीकडे संपर्क साधू शकता.
Modi Awas Gharkul Yojana FAQ
मोदी आवास योजनेसाठी कोण पात्र आहे?
मोदी आवास योजनेसाठी राज्यातील मागासवर्गीय लोक पात्र असणार आहेत.
मोदी आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
मोदी आवास योजनेसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज करण्याची प्रक्रिया आहे, त्यासाठी व्यक्ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून फॉर्म भरू शकते.
मोदी आवास योजनेद्वारे घर बांधण्यासाठी किती रुपये मिळतात?
मोदी आवास घरकुल योजनेद्वारे मागासवर्गीय व्यक्तींना घर बांधण्यासाठी एकूण 1.20 लाख रुपये दिले जातात.
Hi