Merchant Navy Selection Process: मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करण्याचे तुमचे जर स्वप्न असेल, तर तुमच्या साठी ही महत्वाची अशी माहिती आहे. या पोस्ट मध्ये मी मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी कशी मिळवायची? पात्रता काय आहेत! याची सविस्तर अशी माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही जर मर्चंट नेव्ही भरती साठी तयारी करत असाल, तर या आर्टिकल मधील माहिती काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा.
मर्चंट नेव्ही ही एक प्रकारची Commercial Cargo and Passanger Transport सेवा पुरवणारी Fleet आहे. Merchant Navy मध्ये जॉईन करण्यासाठी मुख्य स्वरूपात केवळ दोन निकष पूर्ण करावे लागतात.
उमेदवाराचे वय हे योग्य असावे आणि उमेदवाराने आवश्यक शैक्षणिक स्तरावर शिक्षण घेतलेले असावे. यामधे सुरुवातीला तुम्हाला प्रशिक्षण घेणे देखील गरजेचे आहे, त्याशिवाय Merchant Navy मध्ये तुमचे Selection केले जाणार नाही.
Merchant Navy Selection Process
Merchant Navy मध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवार हा पात्र असणे आवश्यक आहे, उमेदवाराचे वय आणि शिक्षण हे पात्रता निकषानुसार असणे देखील आवश्यक आहे.
Selection Process मध्ये अजून बऱ्याच बाबी समाविष्ट आहेत, त्यात Education, Age, Medical, Skills, Documents, Training, Experience इत्यादी गोष्टी समाविष्ट आहेत.
Education
Merchant Navy मध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवाराने किमान 10 वी, 12 वी तसेच पदवीधर Graduation पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे. उच्च शिक्षण केलेल्या उमेदवारांना देखील मर्चंट नेव्ही भरती साठी प्राधान्य असणार आहे.
मर्चंट नेव्ही साठी पदानुसार वेगवेगळे ट्रेनिंग कोर्स करणे अनिवार्य आहे. यामध्ये सर्वांना बंधनकारक असणारे कोर्स म्हणजे G.P. Rating या कोर्स ची ट्रेनिंग सर्व Non Science Student साठी आवश्यक आहे. 6 महिन्याचा हा कोर्स आहे, जर Science Stream मधून 11 वी, 12 वी चे शिक्षण झाले नसेल, तर Commerce आणि Arts मधील उमेदवारांना हा ट्रेनिंग कोर्स करणे गरजेचे आहे.
इतर पण काही ट्रेनिंग कोर्स आहेत:
- DNS Course
- Engine Rating Course
- Deck Rating Course
- B.Sc. Nautical Science
- Diploma Nautical Science
- Diploma in Marine Engineering (DME)
हे सर्व कोर्स देखील उमेदवारांना भरती साठी अर्ज करण्यापूर्वी Complete करून घ्यायचे आहेत.
Age Limit
मर्चंट नेव्ही भरती मध्ये पदानुसार वयाची अट ही वेगवेगळी असते, परंतु साधारण पणे उमेदवाराचे वय हे 17 वर्षे असावे, आणि जास्तीत जास्त उमेदवार हा 25 वर्षांचा असावा.
Medical Test
भरती साठी मेडीकल तपासणी करणे अनिवार्य आहे, भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी घेतली जाते, त्यात शारीरिक तसेच मानसिक आरोग्य तपासणी केली जाते. या टेस्ट दरम्यान उमेदवार हा आरोग्य दृष्ट्या उत्तम असला पाहिजे.
Documents
भरतीमध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे हे फॉर्म सोबत जोडणे गरजेचे आहे. कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची लिस्ट यादी जाहिराती मध्ये देण्यात येते, त्यामुळे तुम्ही अधिसूचना जाहिराती मधून भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची माहिती घेऊ शकता.
Training
मान्यता प्राप्त इन्स्टिट्युशन द्वारे मर्चंट नेव्ही साठी उमेदवाराने कोर्स केलेला असणे आवश्यक आहे, त्यात उमेदवाराने मर्चंट नेव्ही साठी आवश्यक असलेली Training देखील केलेली असावी.
Experience
मर्चंट नेव्ही भरती मध्ये काही पदासाठी अनुभवी उमेदवार असणे आवश्यक असते, पदा नुसार मर्चंट नेव्ही मध्ये अनुभवी आणि फ्रेशर अशा दोन्ही उमेदवारांना अर्ज करता येतो.
Selection Process
- सुरुवातीला तुम्हाला मर्चंट नेव्ही मध्ये कोणती नोकरी करायची आहे, हे आगोदर ठरवणे आवश्यक आहे. Deck Officer आणि इंजिन ऑफिसर अशा दोन पोस्ट साठी तुम्ही तयारी करू शकता.
- त्यानंतर तुम्हाला IMU CET, AIMNET, Shipping Company Sponserd Exam या सर्व परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात.
- एकदा तुम्ही सर्व Exam Clear केले, त्यांनतर तुम्हाला Pre Sea Training साठी जावे लागते. या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला समुद्रात असताना काम कसे करायचे? या संबंधी माहिती तसेच Practical Guide देखील केले जाते.
- पुढे तुम्हाला कोणत्याही शिपिंग कंपनी मध्ये कॅडेट म्हणून सिनिअर ऑफिसर च्या Supervison मध्ये काम करून मर्चंट नेव्हीचा Experience मिळवायचा आहे.
- एकदा तुम्ही Experience मिळवला, की तुम्ही कोणत्याही Shipping Company मध्ये ऑफिसर पदासाठी अर्ज करून नोकरी वर रुजू होऊ शकता.
थोडक्यात वरील प्रमाणे Merchant Navy Selection Process प्रक्रिया राबवली जाते. यामधे उमेदवाराला नोकरी वर रुजू करण्यापूर्वी त्यांचे कागदपत्रे पडताळणी करून मुलाखत देखील घेतली जाऊ शकते. जर या दोन्ही टप्प्यात उमेदवार पास झाला तरच तो पुढे मर्चंट नेव्ही मध्ये जॉईन होऊ शकतो.
भरती निवड प्रक्रिया:
- BSF आर्मी भरती निवड प्रक्रिया, जाणून घ्या काय आहेत निकष
- अग्निवीर भरती निवड प्रक्रिया, कोणते उमेदवार पात्र? लगेच जाणून घ्या
- अग्निवीर वायू भरती निवड प्रक्रिया, कोणते उमेदवार पात्र असणार, जाणून घ्या माहिती
Merchant Navy Selection Process FAQ
How to Apply For Merchant Navy Bharti?
Merchant Navy Bharti साठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही मार्गाने अर्ज करता येतो.
What is the age Limit for Merchant Navy Bharti?
मर्चंट नेव्ही भरती साठी उमेदवाराचे वय हे 17 ते 25 या दरम्यान असावे, जर वय जास्त असेल तर उमेदवार भरती साठी पात्र होणार नाही.
What is the Education Qualification for Merchant Navy Bharti?
उमेदवार हा किमान 10 वी, 12 वी, पदवीधर Graduate असावा. उमेदवाराने त्याचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉलेज मधून केलेले असावे.
Tirupati
🥰🥰
🥰🥰🥰🥰🥰