Mazi Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मिळणार महिन्याला 1500 रू.

Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे, आता राज्य सरकार महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रू. देणार आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल जाहीर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या संबंधी मोठी घोषणा केली आहे.

या आर्टिकल मध्ये मी याच संबंधी सविस्तर माहिती सांगणार आहे, त्यामुळे कृपया आर्टिकल शेवटपर्यंत वाचा एक शब्द पण सोडू नका, कारण माहिती मोठी कामाची आहे.

महिन्याला 1500 रुपये म्हणजे तब्बल 18,000 रुपये एवढी आर्थिक मदत आता महिलांना मिळणार आहे, आणि ती पण सरसकट! त्यामुळे एवढी Golden Opportunity आली आहे, त्यामुळे थोडासा वेळ काढून याची माहिती एकदा जाणून घ्या.

Mazi Ladki Bahin Yojana 2024

योजनेचे नावलाडकी बहिण योजना
केव्हा सुरु होणार1 जुलै 2024
अर्जाची शेवटची तारीख15 जुलै 2024
अर्ज कोठून करायचाअंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय
पहिल्या हप्त्याची तारीख14 ऑगस्ट 2024
प्रत्येक महिन्याला15 तारखेला हप्ता मिळणार

महाराष्ट्र शासनाने अंतरिम अर्थसंकल्प जून 2024 मध्ये जाहीर केलेल्या Mazi Ladki Bahin Yojana मार्फत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचे योजले आहे.

मध्यप्रदेश राज्यात सुरू करण्यात आलेल्या लाडली बेहना योजनेच्या धर्तीवर ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने नवीन अमलात आणली आहे. या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार? आर्थिक लाभ किती मिळणार? अर्ज कसा करायचा? कोणाला अर्ज करता येणार? प्रक्रिया काय असणार? अशी सर्व माहिती आता आपण खाली वेगवेगळ्या सेक्शन मधून जाणून घेऊ.

Mazi Ladki Bahin Yojana Benefits

माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे 1500 रू. दिले जाणार आहेत. प्रत्येक महिन्याला 1500 म्हणजे वर्षाला एकूण 18,000 रू. महिलांना मिळणार आहेत.

Mazi Ladki Bahin Yojana Criteria

  • महिला या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाव्यात.
  • महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षा पर्यंत असावे.
  • विवाहित, विधवा, निराधार महिलांना प्राधान्य असणार आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख पेक्षा कमी असावे.
  • महिलेचे बँक खाते असावे.
  • महिलेच्या नावाने चारचाकी गाडी, ट्रॅक्टर नसावे. (कुटुंबातील कोणाच्याही नावाने नसावे)

Mazi Ladki Bahin Yojana Document List

  1. महिलेचे आधार कार्ड
  2. रहिवासी प्रमाणपत्र
  3. जन्म दाखला
  4. कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  5. बँक खाते पासबुक
  6. पासपोर्ट आकाराचा फोटो
  7. रेशन कार्ड
  8. योजनेच्या अटीचे पालन करण्यासंबंधी हमीपत्र

Mazi Ladki Bahin Yojana Narishaktidoot App Process

मोबाईल वर नारीशक्ती दूत अ‍ॅपवरुन असा करा अर्ज :-

  1. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वर नारीशक्ती दूत अँप सर्च करून इन्स्टॉल करून घ्या.
    अँप इन्स्टॉल झाल्यावर त्यात तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी आणि टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करून या अॅप्लीकेशनला लॉगिन करून घ्या. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाइल अपडेट करा असा ऑप्शन दिसेल.
  2. त्यात तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी, तुमचा जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, ग्रामसेवक या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत.
  3. त्यानंतर नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय निवडा.
  4. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स भरायची आहे. त्यात अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरा.
  5. बँक डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र अपलोड करण्यासाठी अपलोड हा पर्याय निवडायचा आहे.
  6. त्यामध्ये आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, हमीपत्र, बँक पासबुक आणि जर तुमचा जन्म परराज्यात झाला असेल तर त्याचा दाखला ही सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  7. आता सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला दिसेल. तिथे तुमचा पासपोर्ट फोटो अपलोड करा.
  8. फोटो अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली ‘Accept हमीपत्र डिस्क्लेमर’ यावर क्लिक करा.
  9. त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून खालील दिलेले सबमिट फॉर्म या बटनावर क्लिक करा.
  10. आता तुम्हाला एक ओटीपी येईलतो ओटीपी टाका. अशा रीतीने तुमचा मख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म यशस्वीरीत्या भरून झाला आहे.

Mazi Ladki Bahin Yojana फॉर्म PDF

माझी लाडकी बहीण योजना फॉर्म – इथे बघा

माझी लाडकी बहीण योजना GR पीडीएफ – इथे क्लिक करा

Mazi Ladki Bahin Yojana Application Form

माझी लाडकी बहिण योजना साठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी पात्र उमेदवारांना अंगणवाडी केंद्रात जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे. योजनेसाठी शासनाने GR प्रसिद्ध केला आहे, त्यामुळे आता लवकरच फॉर्म सुरु होणार आहेत.

  • सर्वात पहिल्यांदा जेव्हा या योजनेसाठी अर्ज सुरु होतील, तेव्हा तुम्हाला माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म मिळवायचा आहे.
  • त्यानंतर योजनेच्या फॉर्म वर जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या, माहिती चुकीची नसावी, त्यासाठी काळजीपूर्वक फॉर्म भरा.
  • फॉर्म सोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील अर्जासोबत अपलोड करायचे आहेत, ते पण करून घ्या.
  • एकदा का फॉर्म मध्ये document अपलोड केले कि नंतर तुम्हाला थेट फॉर्म तपासून सबमिट करायचा आहे.
  • जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या योजनेंतर्गत पैसे मिळतील.
फॉर्म मध्ये दिलेली पूर्ण माहिती योग्य रित्या भरून, सोबत कागदपत्रे जोडून अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर पीक विमा, किंवा PM Kisan चे जसे पैसे बँक खात्यात Direct जमा होतात त्याप्रमाणे अर्जदार महिलांच्या बँकेत दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जाणार आहेत.

टीप: महिलेचे बँक खाते हे आधार लिंक केलेले असणे अनिवार्य आहे.

Mazi Ladki Bahin Yojana FAQ

माझी लाडकी बहिण योजना केव्हा सुरू होणार?

माझी लाडकी बहिण योजना ही 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे.

माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा कोणी केली?

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या Mazi Ladki Bahin Yojana ची घोषणा केली आहे.

माझी लाडकी बहिण योजनेद्वारे किती रुपये मिळणार?

माझी लाडकी बहिण योजनेद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये एवढी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार?

माझी लाडकी बहिण योजनेसाठी 21 वर्षे वयाच्या महिला पात्र असणार आहेत, वयाची मर्यादा ही 60 वर्षे आहे. बाकी इतर पण निकष आहेत, त्याची माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

2 thoughts on “Mazi Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मिळणार महिन्याला 1500 रू.”

Leave a comment