Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक अप्रेंटीस भरती, 10 वी ITI पास वर मेगा भरती! पोरांनो घाई करा

Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये ट्रेड अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. यासंबंधी माझगाव डॉक द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे.

जे उमेदवार भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे, दहावी आणि ITI पास वर उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. यामध्ये अजून एक विशेष बाब म्हणजे ग्रुप C साठी तर फक्त 8 वी पास वर देखील अर्ज करता येणार आहे.

ग्रुप A,B आणि C अशा एकूण तीन ग्रुप द्वारे पात्र उमेदवार रिक्त जागांवर निवडले जाणार आहेत. अप्रेंटिस पदासाठी भरती असल्यामुळे वयाची अट देखील कमी असणार आहे, सोबतच परीक्षा फी देखील फक्त 100 रुपये आकारली जाणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना तर फी मध्ये 100% सूट देण्यात आली आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपातच फॉर्म भरायचा आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे त्याची माहिती खाली दिलेली आहे. सोबतच कोणते उमेदवार पात्र असणार, ग्रुप नुसार शैक्षणिक पात्रता काय आहे? याची पण माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.

Mazagon Dock Bharti 2024

पदाचे नावट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
रिक्त जागा518
नोकरीचे ठिकाणमुंबई
वेतन श्रेणी8,050 रू. महिना (पदा नुसार वेतन वेगळे आहे)
वयाची अटउमेदवाराचे वय हे पदा नुसार वेगवगळे आहे.
भरती फीसामान्य प्रवर्ग: 100 रु. (मागासवर्ग: फी नाही)

Mazagon Dock Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)518
Total518

Mazagon Dock Bharti 2024 Trades

अ. क्र.ट्रेडपद संख्या
ग्रुप A 
1ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)21
2इलेक्ट्रिशियन32
3फिटर53
4पाईप फिटर55
5स्ट्रक्चरल फिटर57
ग्रुप B 
6फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर)50
7ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)15
8इलेक्ट्रिशियन25
9ICTSM20
10इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
11RAC10
12पाईप फिटर20
13वेल्डर25
14COPA15
15कारपेंटर30
ग्रुप C 
16रिगर30
17वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)30
Total518

Mazagon Dock Bharti 2024 Education

ग्रुप Aउमेदवार हा किमान 10 वी पास असावा, सोबत दहावीत त्याला 50 टक्के मार्क असावेत.
ग्रुप Bउमेदवार हा 50 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा.
ग्रुप Cउमेदवार हा 50 टक्के गुणांसह 8 वी पास असावा.
मागासवर्गीय SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना पास श्रेणी इतके गुण असावेत. (50 टक्के मार्कची गरज नाही)

भारतीय तटरक्षक दलात 10 वी 12 वी पास वर भरती! 53,800 रु. महिना पगार

Mazagon Dock Bharti 2024 Age Limit

  • ग्रुप A साठी : उमेदवाराचे वय हे 15 ते 19 वर्षे असावे.
  • ग्रुप B साठी : उमेदवाराचे वय हे 16 ते 21 वर्षे असावे.
  • ग्रुप Cसाठी : उमेदवाराचे वय हे 14 ते 18 वर्षे असावे.

Mazagon Dock Bharti 2024 Exam Details

माझगाव डॉक भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात Computer Based Test द्यावी लागणार आहे. परीक्षा ही शैक्षणिक पात्रतेनुसार आणि ग्रुप नुसार वेगवेगळी असणार आहे.

Mazagon Dock Bharti 2024 Selection Process

माझगाव डॉक भरतीसाठी उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यात केली जाणार आहे. यामध्ये जे उमेदवार तीनही स्टेज मधून पास होतील, त्यांनाच माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीमध्ये अप्रेंटिस या पदावर नियुक्त केले जाणार आहे.

  • Online Exam (CBT)
  • Document Verification
  • Medical Examination
  • Final Selection

ऑनलाईन परीक्षा

सुरुवातीला अर्ज सादर केल्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. ऑनलाइन परीक्षेमध्ये 100 मार्काचा पेपर असणार आहे, ग्रुप नुसार पेपर हे वेगवेगळे आहेत सोबत त्यांचा Syllabus देखील वेगळा आहे. ऑनलाईन परीक्षेत जे उमेदवार पास होतील केवळ त्यांनाच पुढे Shortlist करून Document Verification साठी बोलवले जाणार आहे.

बँक ऑफ बडोदा मध्ये ग्रेजुएशन पास वर भरती! लगेच अर्ज करा

कागदपत्रे पडताळणी

ऑनलाईन परीक्षेत जे उमेदवार पास झाले आहेत त्यांना जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे कागदपत्रे घेऊन ते पडताळणी करण्यासाठी हजर राहायचे आहे. कागदपत्रे पडताळणी करताना सर्व Documents हे Hard Copy मध्ये असणे आवश्यक आहे. सोबत त्यांची Soft Copy देखील तयार ठेवा जेणेकरून येणं वेळी ते कामी येईल.

मेडिकल तपासणी

ज्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झाली आहे त्यांना मेडिकल तपासणी साठी बोलवले जाईल. या दरम्यान माझगाव डॉक द्वारे नेमण्यात आलेल्या डॉक्टर द्वारे उमेदवारांची मेडिकल चाचणी घेतली जाईल.

चाचणी दरम्यान जर उमेदवार हा निरोगी आढळला तर त्याला मेडिकल टेस्ट मध्ये पास केले जाणार आहे. जर उमेदवारांचे आरोग्य चांगले नसेल तर त्याला टेस्ट मध्ये नापास केले जाईल. मेडिकल तपासणी वर कोणते उमेदवार निवडले जाणार हे अवलंबून आहे.

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख15 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख02 जुलै 2024

Imporatnt Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

Mazagon Dock Bharti 2024 Apply Online

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • नवीन वेबसाईटवर आल्यावर तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे नंतर लॉगिन करायचे आहे.
  • भरतीचा फॉर्म उघडल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक अचूक रित्या भरून घ्या.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करा.
  • भरतीसाठी फी देखील आकारली जाणार आहे त्यामुळे अर्ज करताना ऑनलाईन पेमेंटचा वापर करून फी देखील भरून घ्या.
  • फी भरून झाल्यावर माझगाव डॉक भरतीचा अर्ज एकदा काळजीपूर्वक तपासा आणि त्यानंतर सबमिट करून टाका.

Mazagon Dock Bharti 2024 FAQ

Who is eligible for Mazagon Dock Bharti 2024?

माझगाव डॉक भरतीसाठी अर्जदार उमेदवारा हा किमान आठवी दहावी किंवा ITI पास असावा. शैक्षणिक पात्रता निकष हे पदानुसार दिले आहे, त्याची माहिती तुम्ही आर्टिकल मधून घेऊ शकता.

How to apply for Mazagon Dock Bharti 2024?

माझगाव डॉक भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. स्टेप बाय स्टेप अर्ज करण्याची प्रक्रिया आर्टिकल मध्ये दिली आहे ती एकदा चेक करा.

What is the last date of Mazagon Dock Bharti 2024 Application Form?

माझगाव डॉक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 02 जुलै 2024 आहे. मुदतवाढ संपल्यानंतर अर्ज करता येणार नाही त्यामुळे मुदत आहे तोपर्यंत फॉर्म भरा.

3 thoughts on “Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक अप्रेंटीस भरती, 10 वी ITI पास वर मेगा भरती! पोरांनो घाई करा”

Leave a comment