Mahavitaran Hall Ticket 2024 Download, महावितरण भरतीचे हॉल तिकीट जाहीर! येथून डाउनलोड करा

Mahavitaran Hall Ticket 2024 Download: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला महावितरण भरती संदर्भात परीक्षेचे जे हॉल तिकीट निघाले आहे त्यासंबंधी माहिती सांगणार आहे.

जर तुम्ही महावितरण भरतीसाठी फॉर्म भरला असेल तर तुमची एक्झाम आता काही दिवसांवर आली आहे. त्यासाठी परीक्षेचे हॉल तिकीट जारी करण्यात आले आहेत, आर्टिकल मध्ये मी तुम्हाला हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे या संदर्भात सविस्तर अशी माहिती सांगणार आहे.

स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि त्यानुसार स्टेप फॉलो करून Mahavitaran Hall Ticket 2024 Download करा.

याचबरोबर पदानुसार परीक्षा ह्या वेगवेगळ्या दिवशी होणार आहेत, त्यासंदर्भात परीक्षेचा दिनांक देखील आर्टिकल मध्ये नमूद केला आहे. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरला आहे त्या पदाची परीक्षा केव्हा असणार आहे हे तुम्ही या आर्टिकल द्वारे पाहू शकता.

Mahavitaran Hall Ticket 2024 Download

महावितरण मार्फत मेगा भरती निघाली होती, त्यानुसार कनिष्ठ सहाय्यक, शिकाऊ अभियंता अशा विविध पदांसाठी भरती निघाली होती.

महावितरण भरतीसाठी मोठ्या प्रमाणात जागा सोडण्यात आल्या होत्या, त्यानुसार आता भरतीसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख गेलेली आहे.

आता महावितरण द्वारे भरतीची परीक्षा डिक्लेअर करण्यात आली आहे. लवकरच या ऑक्टोबर महिन्यामध्ये परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

पदानुसार परीक्षेच्या तारखा वेगवेगळ्या ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून अर्जदार उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही.

Mahavitaran Hall Ticket 2024 Exam Date

पदाचे नावपरीक्षेचा दिनांक
कनिष्ठ सहाय्यक (लेखा)16, 17 & 18 ऑक्टोबर 2024
पदवीधर शिकाऊ अभियंता (स्थापत्य)21 ऑक्टोबर 2024
पदविकाधारक शिकाऊ अभियंता (स्थापत्य)22 ऑक्टोबर 2024
पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण) 23 ऑक्टोबर 2024
पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण)24 ऑक्टोबर 2024

How to download Mahavitaran Hall Ticket 2024?

NoticeRead
HallticketDownload

सूचना: अद्याप महावितरण भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक active झालेली नाही, जेव्हा अपडेट येईल तेव्हा आर्टिकल मध्ये सूचना दिली जाईल.

जर तुम्हाला महावितरण भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही खालील स्टेप चा वापर करू शकता आणि त्याद्वारे तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.

संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस परीक्षा असणार आहे. यासाठी स्वतंत्रपणे अधिकृत वेबसाईटवर हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हॉल तिकीट डाउनलोड करण्या साठी खालील स्टेप फॉलो करा.

  • सुरुवातीला तुम्हाला महावितरणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • तिथे तुम्हाला होम पेजवर महावितरण हॉल तिकीट संदर्भात एक लिंक दिसेल.
  • त्या लिंक कर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही महावितरणच्या हॉल तिकीट सेक्शन मध्ये जाल.
  • तिथे तुम्हाला तुमचा एप्लीकेशन नंबर टाकायचा आहे.
  • ज्यावेळी तुम्ही महावितरण भरतीसाठी फॉर्म भरला होता, तेव्हा अर्ज सोबत तुम्हाला एप्लीकेशन नंबर दिलेला होता, तोच नंबर या ठिकाणी वापरायचा आहे.
  • एप्लीकेशन नंबर टाकल्यानंतर तुमच्यासमोर महावितरण भरतीचे हॉल तिकीट प्रवेश प्रमाणपत्र ऍडमिट कार्ड प्रदर्शित होईल.
  • हॉल तिकीट प्रदर्शित झाल्यानंतर ती तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करू शकता.
  • एकदा का हॉल तिकीट डाउनलोड केले की त्याची तुम्हाला प्रिंट आउट काढून घ्यायची आहे.

एक लक्षात घ्या महावितरण भरतीसाठी परीक्षेला जाताना हे हॉल तिकीट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. हॉल तिकीट जर सोबत घेऊन गेले नाहीत तर तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये एन्ट्री भेटणार नाही, त्यामुळे हॉल तिकीट सोबत बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे या ठिकाणी तुम्ही एक करू शकता ते म्हणजे हॉल तिकीट च्या काही कॉपीज तयार करून ठेवू शकता. सोबतच हॉल तिकीट ची कलर प्रिंट काढून ठेवा, एक दोन झेरॉक्स प्रती काढल्यानंतर पुढे तुम्हाला त्याचा वापर करता येईल.

नवीन भरती जॉब अपडेट:

Mahavitaran Hall Ticket 2024 FAQ

How to download Mahavitaran Hall Ticket 2024?

महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरून एप्लीकेशन नंबर वापरून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.

What is the exam date for Mahavitaran Bharti 2024?

महावितरण भरतीसाठी पदानुसार परीक्षेची तारीख वेगवेगळी असणार आहे त्याची माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.

How will the Mahavitaran Exam Conduct?

महावितरण ची परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपाची असणार आहे, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा असून विद्यार्थ्यांना कम्प्युटर बेस आधारे एक्झाम द्यायचे आहे.

Leave a comment