LIC Golden Jubilee Scholarship 2025:10वी, 12वी पास विद्यार्थ्यांना पदवीसाठी LIC द्वारे मिळणार 40,000 रु. स्कॉलरशिप! इथून अर्ज करा

LIC Golden Jubilee Scholarship 2025: देशातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. त्यामधीलच एक महत्वाची योजना म्हणजे LIC Golden Jubilee Scholarship. या स्कॉलरशिप अंतर्गत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे.

LIC Golden Jubilee Scholarship 2025 अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹40,000 पर्यंत इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी पैशांची अडचण भासत असलेल्या विद्यार्थ्यांना हा मोठा आधार ठरणार आहे.

या शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, पदवी, व्यावसायिक कोर्सेस अशा विविध क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप खूप फायद्याची राहणार आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. त्याविषयी आपण या आर्टिकल मध्ये पूर्ण माहिती दिली आहे, हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा आणि नंतर तुम्ही जर पात्र असाल तर अर्ज करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

LIC Golden Jubilee Scholarship 2025 – स्कॉलरशिपची संपूर्ण माहिती

विवरणमाहिती
योजनेचं नावLIC Golden Jubilee Scholarship 2025
स्कॉलरशिप देणारी संस्थाLife Insurance Corporation (LIC)
पात्रता (शैक्षणिक)10वी, 12वी पास, पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी
शिष्यवृत्ती रक्कम₹15,000 ते ₹40,000
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अधिकृत वेबसाईटwww.licindia.in

LIC Golden Jubilee Scholarship 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

किमान शैक्षणिक पात्रता या स्कॉलरशिप साठी 10वी पास आहे, सोबतच 12 वी पास विद्यार्थी पण या स्कॉलरशिप फॉर्म भरू शकणार आहेत. स्कॉलरशिप चे तीन विभाग आहेत यात 10वी/12वी/स्पेशल मुलींसाठी स्कॉलरशिप असणार आहे, त्यानुसार त्यांचे नियम अटी पण भिन्न आहेत.

शैक्षणिक पात्रताकिमान 10वी / 12वी पास
किमान गुण60 टक्के
वार्षिक उत्पन्न4,50,000 रुपये वार्षिक

LIC Golden Jubilee Scholarship 2025: Benifts विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ

शिष्यवृत्ती रक्कम₹15,000 ते ₹40,000
स्कॉलरशिप प्रकारचालू शिक्षणस्कॉलरशिप (प्रती वर्ष)Installmentsकालावधी
General ScholarshipMedicine (MBBS, BAMS, BHMS, BDS)₹40,0002 × ₹20,000पूर्ण कोर्स संपे पर्यंत
 –Engineering (BE, B.Tech, B.Arch)₹30,0002 × ₹15,000पूर्ण कोर्स संपे पर्यंत
 –Graduation (any discipline), Integrated Courses, Diploma (any field), Vocational Courses, ITI, Equivalent Courses₹20,0002 × ₹10,000पूर्ण कोर्स संपे पर्यंत
Special Scholarship for Girl Child –₹15,0002 × ₹7,5002 वर्ष

LIC Golden Jubilee Scholarship 2025: Selection Process – निवड प्रक्रिया

  1. Merit List (गुणांच्या आधारे निवड)
    • विद्यार्थ्यांची निवड 10वी/12वी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
    • जास्त टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
  2. Family Income (कौटुंबिक उत्पन्न)
    • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसावे.
    • कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य मिळते.
  3. Reservation & Preference (आरक्षण व प्राधान्य)
    • मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्राधान्य.
    • आर्थिकदृष्ट्या दुर्बल, ग्रामीण भागातील विद्यार्थी, तसेच समाजातील मागास वर्गातील विद्यार्थ्यांना जास्त संधी.
  4. Final Selection (अंतिम निवड)
    • वरील सर्व निकष तपासून पात्र विद्यार्थ्यांची Final Merit List तयार केली जाते.
    • निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जातात व त्यांना Direct Bank Transfer (DBT) द्वारे शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते.

LIC Golden Jubilee Scholarship 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्ज सुरू होण्याची तारीखऑगस्ट 2025
अर्जाची अंतिम तारीख6 ऑक्टोबर 2025

LIC Golden Jubilee Scholarship 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथून अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

LIC Golden Jubilee Scholarship 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम वरील – इथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
  • LIC ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल, तिथे LIC Golden Jubilee Scholarship apply now link वर क्लिक करा.
  • तुमच्या समोर स्कॉलरशिप चा फॉर्म ओपन होईल.
  • फॉर्म मध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • सोबतच जे काही नियम आणि अटी सांगितल्या आहेत त्या सर्वांचे योग्य रित्या पालन करा.
  • त्यानंतर जे काही कागदपत्रे सांगितले आहेत ते सर्व फॉर्म मध्ये अपलोड करा.
  • मग स्कॉलरशिप चा फॉर्म एकदा रिचेक करून घ्या, काही चुकल असेल तर दुरुस्त करून घ्या.
  • शेवटी मग अर्ज सबमिट करून टाका, आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
इतर स्कॉलरशिप

HDFC Bank Parivartan ECSS Programme 2025-26: 1ली ते 10वी, ITI, 12वी, डिप्लोमा, डिग्री करणाऱ्यांसाठी 75 हजार रु पर्यंतची स्कॉलरशिप ! इथून अर्ज लवकर करा!

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: 10वी पास आणि 11वी पास विद्यार्थ्यांना ₹10,000 शिष्यवृत्ती, मोठी संधी सोडू नका!

Raman Kant Munjal Scholarship 2025-26: 12वी पास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 5.5 लाख पर्यंतची स्कॉलरशि मिळणार! संधी गमावू नका!

Infosys Foundation STEM Stars Scholarship Program 2025-26: 12वी पास मुलींना मिळणार ₹1 लाख शिष्यवृत्ती! आजच अर्ज करा!

Mirae Asset Scholarship 2024-25: 12वी नंतर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी 40 हजार रु.पर्यंत स्कॉलरशिप मिळत आहे! लगेच इथून अर्ज करा!

Kotak Junior Scholarship Program 2025-26: कोटककडून गरीब विद्यार्थ्यांसाठी 10वी नंतर दरमहा ₹3,500 शिष्यवृत्ती! लवकर अर्ज करा!

Kotak Suraksha Scholarship Program 2024-25: ग्रेजुएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये स्कॉलरशिप!

Swami Dayanand Merit India Scholarships 2024-25:1 लाख रू.स्कॉलरशिप मिळत आहे इंजीनियरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी!

LIC Golden Jubilee Scholarship 2025 – 26 : FAQ

LIC Golden Jubilee Scholarship 2025 साठी कोण पात्र आहे?

10वी/ 12वी पास उमेदवार या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात.

LIC Golden Jubilee Scholarship मध्ये लाभ काय भेटणार आहे?

15 हजार रुपये ते 40 हजार रुपये स्कॉलरशिप भेटणार आहे.

LIC Golden Jubilee Scholarship साठी अर्ज कसा करायचा?

LIC च्या अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.

LIC Golden Jubilee Scholarship मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

या स्कॉलरशिप साठी विद्यार्थ्यांची पडताळणी करून अंतिम निवड हि केली जाणार आहे.

2 thoughts on “LIC Golden Jubilee Scholarship 2025:10वी, 12वी पास विद्यार्थ्यांना पदवीसाठी LIC द्वारे मिळणार 40,000 रु. स्कॉलरशिप! इथून अर्ज करा”

Leave a comment