लेक लाडकी योजना महाराष्ट्र, मुलींना मिळणार 1 लाख रुपये, अर्ज करा | Lek Ladki Yojana Maharashtra

नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण लेक लाडकी योजना संबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो सर्व मुलींना आता तब्बल एक लाख एक हजार रुपयाची आर्थिक मदत राज्य सरकार द्वारे केली जाणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या पालनपोषणासाठी मुलीच्या आई-वडिलांना हे पैसे भेटणार आहेत.

जेव्हा मुलींचा जन्म होईल तेव्हापासून ते मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिल तो पर्यंत म्हणजेच मुलीच्या अठराव्या वर्षापर्यंत 1 लाख रुपया पेक्षा जास्त मदत केली जाणार आहे.

लेक लाडकी योजनेचा लाभ कसा घ्यायचा? कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र असणार? लेक लाडकी योजना अर्ज कोठे करायचा? कोण कोणते कागदपत्रे लागणार? अशी प्रत्येक महत्वाची बाब या लेखामध्ये दिलेली आहे. 

जर तुम्हाला लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार लेक लाडकी योजनेसाठी अर्ज सादर करा.

Lek Ladki Yojana Maharashtra

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेची घोषणा केली आहे. त्यानुसार आता या योजनेसंबंधी अधिकृत शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

लेक लाडकी योजना सुरू झाली आहे, योजनेसाठी अर्ज सादर करणे देखील प्रारंभ झाले आहे. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने लेक लाडकी योजनेसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. योजनेसाठी कोणत्याही स्वरूपाची ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत उपलब्ध नाही, त्यामुळे ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे.

लेक लाडकी योजना उद्दिष्ट

राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवा तसेच मुलींना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी हि अभिनव अशी योजना सुरू करण्यात आली आहे.

लेक लाडकी योजनेद्वारे मुलींच्या पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी पालनपोषणासाठी मोठा आधार मिळणार आहे. आर्थिक सहायता केल्यामुळे समाजातील लोकांची मानसिकता बदलण्यास याचा मोठा फायदा होणार आहे.

लेक लाडकी योजना पात्रता निकष

लेक लाडकी योजनेसाठी शासनाद्वारे पात्रता निकष देखील ठरवण्यात आले आहेत. ज्या कुटुंबातील मुली या पात्रता निकषा अंतर्गत येतील, अशा सर्व मुलींना जन्मापासून या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेसाठी मुख्य अट सांगण्यात आली आहे, त्यानुसार राज्यातील ज्या कुटुंबाकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहे त्याच कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत मिळणार आहे.

शिधापत्रिका सोबतच कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असणे देखील आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असावे, तसेच कुटंब आर्थिक दृष्ट्या मागास असणे देखील आवश्यक आहे.

यासोबतच एक महत्त्वाची अट म्हणजे पालकांना केवळ दोन अपत्य असणे अनिवार्य आहे. दोन आपत्त्यानंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे देखील गरजेचे आहे. 

सोबतच अजून एक महत्वाची अट म्हणजे ज्या मुलीला लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे, तिचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा. ज्या मुली या तारखे पूर्वी जन्मल्या आहेत त्यांना माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेता येईल.

लेक लाडकी योजना लाभ

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना शासनाद्वारे आर्थिक मदत दिली जाते, ही आर्थिक मदत मुलीच्या जन्मापासून ते मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत मुलीच्या पालकांना मिळत राहते.

  • मुलीचा जन्म झाल्यावर मुलीच्या पालकांना 5000 रुपयांची आर्थिक मदत मिळते.
  • मुलगी इयत्ता पहिली मध्ये गेल्यावर 6000 रुपये मिळतात.
  • मुलगी इयत्ता सहावी मध्ये गेल्यावर 7000 रुपये दिले जातात.
  • त्यानंतर मुलगी अकरावी मध्ये गेल्यावर 8000 रुपये दिले जातात.
  • शेवटी मुलगी जेव्हा अठरा वर्षांची होईल तेव्हा एकत्रित रोख रुपये 75000 मुलीच्या नावे तिच्या आई वडिलांच्या बँक खात्यावर जमा केले जातात.

अशाप्रकारे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांना सक्षम बनवण्यासाठी तब्बल प्रत्येकी 1 लाख 1 हजार रुपये एवढी आर्थिक मदत मिळणार आहे.

लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे

लेक लाडकी योजनेसाठी जे कुटुंब पात्र आहे त्यांना त्यांच्या मुलीच्या नावे, लेक लाडकी योजनेसाठी अर्ज सादर करता येतो.

अर्ज सादर करताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे पाहून सोबत जोडायचे आहेत, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच विश्वासार्हता तपासली जाणार आहे. आणि त्यानंतरच लेक लाडकी योजनेसाठी तुमचा अर्ज मंजूर केला जाणार आहे.

लेक लाडकी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत:

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
  • केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड
  • मुलीच्या आई वडिलांचे आधार कार्ड
  • मुलीचा जन्माचा दाखला
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावे)
  • बँकेचे पासबुक
  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र
  • स्वयंघोषणा प्रमाणपत्र
  • शेवटच्या लाभासाठी मुलीचे मतदान कार्ड
  • मुलगी शिक्षण घेत असेल तर चालू वर्षाची बोनाफाईड प्रमाणपत्र

थोडक्यात वर सांगितलेले सर्व कागदपत्रे अर्जदारांना फॉर्म सोबत सादर करायचे आहेत, फॉर्म ऑफलाइन स्वरूपात करायचा असल्यामुळे हे सर्व कागदपत्रे Hard Copy मध्येच सादर करायचे आहेत.

लेक लाडकी योजना अर्ज कोठे करायचा?

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात करायचा आहे, त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना जवळील अंगणवाडी केंद्रात जाऊन फॉर्म सादर करायचा आहे.

लेक लाडकी योजना फॉर्म PDF तुम्ही या निळ्या लिंक वर क्लिक करून Download करू शकता. डाउनलोड केल्यावर त्याची प्रिंट आउट काढून, आवश्यक ती सर्व माहिती त्यावर भरायची आहेत.

वर सांगितलेल्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती या फॉर्मला जोडायच्या आहेत. त्यानंतरच अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांच्याकडे हा अर्ज सुपूर्द करायचा आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत लेक लाडकी योजनेचा अर्ज पुढे ऑनलाईन स्वरूपात भरला जाईल. त्यांनतर महिला व बालकल्याण विभागाद्वारे तुमचा अर्ज मंजूर केला जाईल.

अर्ज मंजूर होण्यासाठी काय दिवसांचा कालावधी लागतो, एकदा का लेक लाडकी योजना फॉर्म मंजूर झाला की मुलीच्या नावे पैसे येण्यास सुरुवात होतात.

लेक लाडकी योजना ऑनलाईन अर्ज 

लेक लाडकी योजनेसाठी अद्याप कोणत्याही स्वरूपाचा ऑनलाईन फॉर्म सुरू करण्यात आलेला नाही. तसेच अधिकृत संकेत स्थळ देखील बनवण्यात आलेले नाही, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच लेक लाडकी योजनेसाठी इतर ऑनलाइन कार्य पार पडणार आहेत.

लेक लाडकी योजना ऑनलाइन अर्ज अद्याप सुरू झाला नाही, सद्यस्थितीला केवळ ऑफलाईन मार्गानेच अर्ज सादर करता येतो. 

नवीन सरकारी योजना:

Lek Ladki Yojana Maharashtra FAQ

लेक लाडकी योजनेचा अर्ज केव्हा सुरू होईल?

योजनेचा अर्ज ऑनलाईन स्वरूपात सुरू झाला आहे.

लेक लाडकी योजनेसाठी मुलींना किती रुपये मिळणार?

मुलीच्या जन्मापासून ते मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाइन स्वरूपात अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज सादर करायचा आहे.

23 thoughts on “लेक लाडकी योजना महाराष्ट्र, मुलींना मिळणार 1 लाख रुपये, अर्ज करा | Lek Ladki Yojana Maharashtra”

Leave a comment