Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात भरती निघाली आहे, त्यासंदर्भात IB द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. फक्त 10वी पास वर हि भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) ड्रायव्हर या पदासाठी हि भरती होणार आहे. पात्र उमेदवार जे आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन हे केंद्रीय गुप्तचर विभागा द्वारे करण्यात आले आहे.
सरकारी नोकरी असणार आहे + यामध्ये तुम्हाला 69,100 रु. एवढा पगार प्रती महिना मिळणार असून ज्यांना इच्छा असेल त्यांना अर्ज करता येणार आहे. भरती संदर्भात पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे. त्यामुळे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचून काढा आणि जाहिरात पण वाचा आणि नंतरच अर्ज सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Intelligence Bureau Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) |
भरतीचे नाव | Intelligence Bureau Bharti 2025 |
पदाचे नाव | सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) SA(MT) |
रिक्त जागा | 455 |
वेतन | ₹69,100 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | 10वी उत्तीर्ण/ वाहन चालक परवाना (LMV)/ 01 वर्ष अनुभव असलेले उमेदवार. |
वयोमर्यादा | 18 ते 27 वर्षे |
अर्जाची फी | General/OBC/EWS: ₹650/- SC/ST/ExSM/महिला: ₹550/- |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Intelligence Bureau Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) {SA(MT)} | 455 |
Total | 455 |
Intelligence Bureau Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
वयाची अट | 18 ते 27 वर्षे |
SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
Intelligence Bureau Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
शैक्षणिक पात्रता | अर्जदाराने किमान 10वी पास पर्यंत शिक्षण घेतलेले असावे आणि त्याच्या कडे वाहन चालक परवाना (LMV) असणे आवश्यक आहे या सोबतच त्याला ड्रायव्हिंग चा किमान 01 वर्षाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. |
Intelligence Bureau Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Tier I (Writeen Exam)
विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ |
---|---|---|---|
General Awareness | 20 | 20 | – |
Basic Transport/Driving Rules | 20 | 20 | – |
Quantitative Aptitude | 20 | 20 | – |
Numerical/Analytical/Logical ability & Reasoning | 20 | 20 | – |
English Language | 20 | 20 | – |
Total | 100 | 100 | 1 घंटा (60 मिनिट) |
2) Tier II (Driving Test/Interview)
लेखी परीक्षा मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी बोलवले जाईल, या टप्प्यात उमेदवाराला ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. ड्रायव्हिंग सोबतच उमेदवाराची मुलाखत देखील घेतली जाणार आहे, यात उमेदवार पदासाठी पात्र आहे कि नाही हे पाहिले जाईल; आणि नंतरच योग्य अर्जदारांना या टप्प्यात पास केले जाईल.
टेस्ट | मार्क्स |
---|---|
Driving Test/Interview | 50 |
3) Character & Antecedent verification
त्यानंतर या टप्प्यात उमेदवाराचे चारित्र्य हे तपासले जाईल, काही संशयात्मक आढळल्यास मात्र त्या उमेदवाराला तात्काळ त्याच वेळी अपात्र ठरवून बाद केले जाते. निवड प्रक्रियेत या टप्प्यात सगळ्यात जास्त स्त्रीक स्वरुपात तपासणी केली जाते.
4) Medical Examination
एकदा चारित्र्य तपासणी पार पडली कि नंतर मग पात्र झालेल्या उमेदवारांना मेडिकल तपासणी साठी बोलवले जाते. यात अर्जदार फिट आहेत कि नाही हेच पाहिले जाते. जर उमेदवार फिट असेल तर त्याला फिट ठरवले जाते आणि जर तो शारीरिक दृष्ट्या फिट नसेल तर अशा उमेदवाराला मेडिकल तपासणी मध्ये अपात्र ठरवले जाते.
त्यानंतर मग शेवटी सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर मगच पात्र उमेदवार जेवढे काही आहेत त्यांना Intelligence Bureau Bharti अंतर्गत रिक्त जागांवर भरती केल जात.
Intelligence Bureau Bharti 2025: Exam Center
IB Bharti च्या लेखी परीक्षेसाठी खालील इमेज मध्ये परीक्षा केंद्र कुठे कुठे असणार याची माहिती दिली आहे. सोबतच यात महाराष्ट्रात 12 केंद्र असणार आहेत. त्यात अमरावती, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर हे परीक्षा केंद्र आहेत. यापैकी तुमच्या जवळील कोणत्याही परीक्षा केंद्रात तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकणार आहात.

Intelligence Bureau Bharti 2025: Syllabus (अभ्यासक्रम)
Subject | Syllabus |
---|---|
General Awareness | Current Affairs (National & International), Indian History, Geography, Constitution, Science & Technology, Economy, Banking, Awards, Sports, Defense & Security Awareness |
Basic Transport / Driving Rules | Motor Vehicle Act basics, Traffic signs, Driving rules & discipline, Road safety, Vehicle maintenance, First Aid, Accident care, Basic technical knowledge (Engine, Tyres, Fuel, Mileage) |
Quantitative Aptitude | Number System, Simplification, Percentages, Profit & Loss, Average, Ratio & Proportion, SI & CI, Time & Work, Speed-Time-Distance, Data Interpretation |
Numerical/Analytical/Logical Ability & Reasoning | Series (Number & Alphabet), Coding-Decoding, Analogy, Classification, Directions, Blood Relation, Puzzles, Arrangement, Logical & Analytical Reasoning |
English Language | Grammar, Vocabulary (Synonyms/Antonyms), Sentence Correction, Fill in the Blanks, Para Completion, Reading Comprehension, Idioms & Phrases, One Word Substitution |
Intelligence Bureau Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | तारीख |
---|---|
अर्जाची सुरुवात | 06 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 28 सप्टेंबर 2025 |
Intelligence Bureau Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Intelligence Bureau Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला वरील Apply Link वर क्लिक करायचे आहे.
- मग तुमच्या समोर cdn.digialm.com ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- या वेबसाईट वर तुम्हाला तुमची नाव नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी केली कि मग लॉगीन करून Apply Now या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- भरतीचा फॉर्म उघडेल त्यात जी काही माहिती विचारली आहे ती माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला लागू असलेली परीक्षा फी ऑनलाईन पेमेंट मोड च्या माध्यमातून भरून घ्यायची आहे.
- सोबतच मग तुम्हाला तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी योग्य साईज मध्ये अपलोड देखील करून टाकायची आहे.
- मग तुम्हाला भरतीचा फॉर्म एकदा रिचेक करायचा आहे, माहिती बरोबर असेल तर मग फॉर्म सबमिट करायचा आहे.
इतर भरती
GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा
BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा
LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा
Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा
IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा
West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा
IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025 – 26: FAQ
Intelligence Bureau Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) हे पद या भरती अंतर्गत भरले जाणार आहेत.
Intelligence Bureau Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा या 455 आहेत.
IB Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 28 सप्टेंबर 2025 आहे.
Intelligence Bureau Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, ड्रायव्हिंग टेस्ट, चारित्र्य तपासणी, मेडिकल टेस्ट च्या आधारे होणार आहे.