Indian Navy B.Tech Entry Scheme 2024: भारतीय नौदलात बारावी पासवर भरती, फी नाही, लगेच अर्ज करा

Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदलाद्वारे कॅडेड एन्ट्री स्कीम सुरू करण्यात आली आहे, बारावी पास उमेदवारांना या स्कीम अंतर्गत नेवी मध्ये जॉब करता येणार आहे.

ज्या उमेदवारांना भारतीय नौसेनेमध्ये आपलं करियर बनवायच आहे, त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. कॅडेट एंट्री स्कीम द्वारे तुम्ही भारतीय नौदलामध्ये भरती होऊ शकता.

या स्कीम अंतर्गत 36 जागा भारतीय नौदलाद्वारे सोडण्यात आले आहेत, विशेष बाब म्हणजे या स्कीमसाठी अर्ज करण्यास कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जात नाहीये.

जर तुम्हाला नौदलामध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुमच्यासाठी Indian Navy B.Tech Entry Scheme अंतर्गत नौदलामध्ये जॉईन होणे खूप सोप आहे.

आर्टिकल मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि लास्ट डेट संपण्यापूर्वी तुमचा फॉर्म भरून घ्या.

Indian Navy B.Tech Entry Scheme 2024

भरतीचे नाव10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम
रिक्त जागा36
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी56,100 रुपये
वयाची अट16 ते 19 वर्षे
भरती फीफी नाही

Indian Navy B.Tech Entry Scheme Vacancy Details

पदाचे नावब्रांच (शाखा)पद संख्या
10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2025)एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच36
Total36

Indian Navy B.Tech Entry Scheme Education Qualification

भरतीचे नावशिक्षण
10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण) + JEE (Main)-2024

Indian Navy B.Tech Entry Scheme Apply Online

इंडियन नेव्ही बी टेक एन्ट्री स्कीम साठी अर्जदार उमेदवारांना खाली दिलेली प्रोसेस फॉलो करायची आहे, आणि त्यानुसार अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन अर्जफॉर्म भरा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट20 डिसेंबर 2024
  • सुरुवातीला तुम्हाला इंडियन नेव्ही च्या अधिकृत रिक्रुटमेंट पोर्टलला भेट द्यायची आहे.
  • पोर्टल वर गेल्यानंतर तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमच राज्य निवडून कॅपच्या फील करायचा आहे.
  • त्यानंतर पुढे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी करून झाली की नंतर पोर्टलवर लॉगिन करायच आहे.
  • डॅशबोर्ड उघडल्यानंतर Apply Online Link शोधायची आहे, आणि त्यावर क्लिक करायचे आहे.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
  • सोबतच आवश्यक कागदपत्रे देखील अर्जासोबत अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर फॉर्म मध्ये भरलेली सर्व माहिती तपासायची आहे, माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.

Indian Navy B.Tech Entry Scheme Selection Process

ज्या उमेदवारांनी या स्कीम साठी अर्ज केले आहेत त्यांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.

  • अर्जदार उमेदवारांना JEE Main मध्ये मिळालेल्या मार्क च्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाणार आहे.
  • त्यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना SSB Interview साठी बोलवले जाईल. (ईमेल वर मेसेज केला जाईल)
  • इंटरव्यू साठी एकदा का सेंटर निवडले कि ते चेंज करता येणार नाही, याची काळजी उमेदवारांना घ्यावी लागेल.
  • SSB मध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारावर उमेदवारांची मेरिट लिस्ट काढली जाणार आहे.
  • मेरिट लिस्ट मध्ये आलेल्या उमेदवारांना मेडिकल एक्झामिनेशन साठी जावे लागेल.

ट्रेनिंग कशी असेल

या स्कीम की अंतर्गत जे उमेदवार निवडले जातील त्यांना इंडियन नेव्ही द्वारे 4 वर्षांची ट्रेनिंग दिली जाईल, यामध्ये कॅडेट ना बी टेक डिग्री देखील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी द्वारे अवॉर्ड केली जाईल.

ट्रेनिंग दरम्यान जेवढा काही खर्च येईल तो खर्च इंडियन नेव्ही द्वारे दिला जाणार आहे. सोबत ट्रेनिंग साठी लागणारे बुक, रीडिंग मटेरियल इत्यादी देखील उमेदवारांना ऑफर केले जाणार आहेत.

या सोबत ट्रेनिंग दरम्यान Per Month Stipend देखील दिला जाणार आहे. तो Stipend हा 56,100 रुपये एवढा किंवा या पेक्षा जास्त असू शकतो.

Indian Navy B.Tech Entry Scheme पूर्ण झाली की नंतर उमेदवारांना Executive Technical Branch अंतर्गत नेव्ही मध्ये डायरेक्ट जॉब मिळणार आहे.

नवीन भरती अपडेट:

Indian Navy B.Tech Entry Scheme FAQ

Who is eligible for Indian Navy B.Tech Entry Scheme?

ज्या उमेदवारांनी बारावी मध्ये विज्ञान शाखा निवडली होती त्या उमेदवारांना या स्कीम अंतर्गत फॉर्म भरता येणार आहे.

How to apply for Indian Navy B.Tech Entry Scheme?

अर्जदार उमेदवारांना भारतीय नौसेनेच्या अधिकृत रिक्रुटमेंट पोर्टल वरून फॉर्म भरता येतो.

What is the last date to apply for Indian Navy B.Tech Entry Scheme?

इंडियन नेव्ही बी टेक एन्ट्री स्कीम साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे.

Leave a comment