Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
भारतीय नौदल (Indian Navy) हे देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांपैकी एक अत्यंत प्रतिष्ठित दल आहे, जे आपल्या सागरी सीमांचे रक्षण करते. नौदलाच्या Directorate of Manpower Planning & Recruitment, नवी दिल्ली यांच्यामार्फत आता Agniveer (Apprentice) 01/2027 आणि 02/2027 batch साठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही भरती फक्त 10वी + डिप्लोमा पास उमेदवारांसाठी असून सुरुवातीला महिना ₹30,000 पगार, ₹48 लाख Life Insurance आणि 4 वर्षांनंतर सुमारे ₹10 लाख Seva Nidhi असे आकर्षक फायदे यात आहेत.
जे तरुण नौदलात देशसेवा करू इच्छितात आणि ज्यांनी Engineering किंवा Electrical शाखेतील डिप्लोमा पूर्ण केला आहे, अशा उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: संपूर्ण माहिती
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | भारतीय नौदल (Indian Navy) |
| पदाचे नाव | Agniveer (Apprentice) |
| Batch | 01/2027 आणि 02/2027 |
| एकूण जागा | Trade नुसार, राज्यनिहाय वाटप (Service requirement नुसार) |
| अर्ज पद्धत | Online |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत (Training: INS Chilka, Odisha) |
| निवड प्रक्रिया | INET 2/2026 (Stage I) + PFT + Written + Medical (Stage II) |
| पगार | ₹30,000 प्रति महिना (सुरुवातीला) |
| अर्ज सुरू | 05 जून 2026 (10:00 वा.) |
| शेवटची तारीख | 29 जून 2026 (17:00 वा.) |
| अधिकृत वेबसाइट | joinindiannavy.gov.in |
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: एकूण जागा
या भरतीसाठी एकूण जागांची निश्चित संख्या जाहिरातीमध्ये दिलेली नाही. Trade नुसार जागांचे वाटप हे सेवेच्या आवश्यकतेनुसार (Service Requirement) ठरवले जाणार आहे. तसेच ही भरती राज्यनिहाय (State-wise) होणार असून, प्रत्येक राज्याला जागा वाटून दिल्या जातील.
👉 Shortlisting राज्यनिहाय होणार असल्यामुळे cut-off marks प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे असू शकतात.
⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी:
10वी (Matriculation)
मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10वी (Matriculation) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
डिप्लोमा (Diploma)
AICTE मान्यताप्राप्त Polytechnic Institute मधून 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 50% गुणांसह पूर्ण केलेला असावा. डिप्लोमा खालील दोन शाखांपैकी असावा:
Engineering शाखा: Marine Engineering & Systems, Mechanical, Production/Automobile, Refrigeration & Air Conditioning, Repair & Maintenance, Power Plant Engineering, Industrial/Production, Maintenance, Machine, Manufacturing/Manufacturing Technology, Mechatronics, Metallurgy, Instrumentation, Electronics Instrumentation & Control Engineering.
Electrical शाखा: Electrical, Electronics & Communication, Instrumentation Technology, Electronics, Electrical & Electronics, Electronics Instrumentation & Control Engineering.
👉 Engineering आणि Electrical या दोन्ही शाखांसाठी वेगवेगळी परीक्षा घेतली जाणार आहे.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: वयोमर्यादा
या भरतीसाठी Batch नुसार जन्मतारखेची अट खालीलप्रमाणे आहे:
| Batch | जन्म कालावधी (दोन्ही तारखा धरून) |
|---|---|
| Agniveer (Apprentice) 01/2027 | 01 डिसेंबर 2004 ते 31 मे 2009 |
| Agniveer (Apprentice) 02/2027 | 01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 |
👉 01 डिसेंबर 2004 ते 31 ऑक्टोबर 2009 या कालावधीत जन्मलेले सर्व उमेदवार INET 2/2026 साठी पात्र आहेत. पुढे Stage II साठी संबंधित Batch च्या वयाच्या अटीनुसार पात्रता ठरेल.
⚠️ ही केंद्र सरकारची संरक्षण भरती असल्याने या जाहिरातीमध्ये प्रवर्गनिहाय (SC/ST/OBC) वयोमर्यादा सवलत स्वतंत्रपणे दिलेली नाही — वरील जन्म कालावधीच लागू आहे.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: पगार
अग्निवीरांना (Agniveer) सुरुवातीला महिना ₹30,000 चे Customised Package दिले जाईल आणि दरवर्षी निश्चित वाढ (Yearly Increment) मिळेल. याशिवाय Risk & Hardship, Dress आणि Travel भत्ते स्वतंत्रपणे दिले जातील.
अतिरिक्त फायदे आणि Seva Nidhi
| वर्ष | Package (महिना) | हातात (70%) | Corpus Fund (30%) | सरकारचा हिस्सा |
|---|---|---|---|---|
| 1st Year | ₹30,000 | ₹21,000 | ₹9,000 | ₹9,000 |
| 2nd Year | ₹33,000 | ₹23,100 | ₹9,900 | ₹9,900 |
| 3rd Year | ₹36,500 | ₹25,550 | ₹10,950 | ₹10,950 |
| 4th Year | ₹40,000 | ₹28,000 | ₹12,000 | ₹12,000 |
👉 4 वर्षांनंतर Seva Nidhi मध्ये उमेदवाराचे ₹5.02 लाख + सरकारचे ₹5.02 लाख असे एकूण सुमारे ₹10.04 लाख एकरकमी मिळतात.
इतर फायदे:
- ₹48 लाखाचे Non-contributory Life Insurance Cover
- सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास अतिरिक्त ₹44 लाख ex-gratia
- Disability असल्यास ₹44 / 25 / 15 लाख (100% / 75% / 50% नुसार)
- सेवेदरम्यान Medical आणि CSD canteen सुविधा
⚠️ नोट: अग्निवीरांना Gratuity आणि Pension मिळणार नाही. तसेच Ex-servicemen दर्जा मिळणार नाही.
👉 ही संरक्षण क्षेत्रातील देशसेवेची आणि चांगल्या आर्थिक फायद्यांची नोकरी मानली जाते.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.
ही All India Recruitment आहे त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातून उमेदवार अर्ज करू शकतात.
Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Ahilyanagar आणि इतर शहरांमधून परीक्षा देता येऊ शकते. मात्र परीक्षा केंद्राचे वाटप नौदलाच्या निर्णयानुसार होईल.
मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?
❌ नाही, ही भरती फक्त अविवाहित पुरुष (Unmarried Male) उमेदवारांसाठी आहे.
या भरतीमध्ये महिला उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. तसेच विवाहित पुरुष उमेदवारही पात्र नाहीत. निवड झाल्यास उमेदवाराला ‘अविवाहित’ असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल आणि 4 वर्षांच्या सेवाकाळात लग्न करता येणार नाही.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे:
Stage I — INET 2/2026 (ऑनलाईन परीक्षा)
- ऑगस्ट 2026 मध्ये SSC च्या मदतीने Computer-Based परीक्षा
- एकूण 100 प्रश्न, प्रत्येकी 1 गुण, वेळ 1 तास
- द्विभाषिक (हिंदी + इंग्रजी), Objective MCQ स्वरूप
- 4 विभाग: English & General Awareness, Science, Mathematics, Diploma (Trade Specific)
- सर्व विभागांत आणि एकत्रित (Aggregate) मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक
- ⚠️ Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होतील
- Engineering आणि Electrical साठी वेगवेगळी परीक्षा
Stage II — PFT + Written + Medical
- PFT (शारीरिक चाचणी): 1.6 किमी धावणे 6 मिनिटे 30 सेकंदात, 20 उठाबशा, 15 Push-ups, 15 Bent-Knee Sit-ups
- Written Exam: परत 100 प्रश्न, 1 तास, तीच 4 विभागांची रचना
- Recruitment Medical: PFT उत्तीर्ण उमेदवारांचीच Medical होईल
- अंतिम Merit List राज्यनिहाय गुणांवर तयार होईल
👉 NCC ‘C’ Certificate धारक आणि Sponsor उमेदवारांना INET परीक्षा माफ असून त्यांना थेट Stage II साठी बोलावले जाईल.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: अर्ज फी
| प्रकार | फी |
|---|---|
| परीक्षा फी (Stage I – INET) | ₹550 + 18% GST |
| CSC केंद्रातून अर्ज (Optional) | ₹60 + GST |
- 👉 फी Online पद्धतीने (Net Banking / Visa / Master / RuPay / UPI) भरावी लागेल.
- 👉 फी Non-refundable आहे — एकदा भरल्यानंतर परत मिळणार नाही.
- 👉 Stage II साठी कोणतीही वेगळी फी नाही.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे
✔️ पासपोर्ट साईज फोटो (मे 2026 नंतर काढलेला, 10 KB ते 50 KB) ✔️ 10वी (Matriculation) प्रमाणपत्र व मार्कशीट ✔️ डिप्लोमा प्रमाणपत्र व मार्कशीट ✔️ Domicile प्रमाणपत्र ✔️ NCC ‘C’ प्रमाणपत्र (असल्यास) ✔️ Sponsorship प्रमाणपत्र (असल्यास) ✔️ अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र (Enrolment वेळी)
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐
❗ फक्त अविवाहित आणि 4 वर्षे लग्नबंदी
ही भरती फक्त अविवाहित पुरुषांसाठी आहे. सेवेच्या संपूर्ण 4 वर्षांच्या काळात लग्न करता येणार नाही. लग्न केल्यास किंवा आधीच विवाहित असल्याचे आढळल्यास थेट सेवेतून बडतर्फ केले जाईल.
❗ किमान उंची 157 सेमी आणि कडक Medical
उमेदवाराची किमान उंची 157 सेमी असावी. Vision: Uncorrected 6/12, 6/12 आणि Corrected 6/6, 6/6 तसेच Colour Perception PASS असणे आवश्यक. Medical मध्ये Unfit ठरल्यास निवड रद्द होते.
❗ Tattoo संबंधी कडक नियम
Permanent Tattoo फक्त हाताच्या आतल्या बाजूला (कोपर ते मनगट) किंवा हाताच्या मागच्या बाजूला (Dorsal side) चालतो. शरीराच्या इतर कोणत्याही भागावर Tattoo असल्यास उमेदवार भरतीतून बाद होईल.
❗ 50% ची अट कडक आहे
10वी आणि डिप्लोमा दोन्हीत किमान 50% गुण आवश्यक. 49.99% चालणार नाही.
❗ 4 वर्षांनंतर फक्त 25% कायम होतात
4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक Batch मधील जास्तीत जास्त 25% अग्निवीरांनाच नौदलात कायमस्वरूपी (Regular Sailor / Artificer) म्हणून घेतले जाईल. हे पूर्णपणे नौदलाच्या निर्णयावर अवलंबून असून यावर उमेदवाराचा हक्क नाही.
❗ स्वतःहून Release नाही
4 वर्षे पूर्ण होण्याआधी स्वतःच्या इच्छेने सेवा सोडता येणार नाही (फक्त अत्यंत अपवादात्मक प्रकरणांत सक्षम अधिकाऱ्याच्या मान्यतेने).
❗ चुकीची Domicile/माहिती दिल्यास बाद
चुकीची Domicile, Gender किंवा इतर माहिती दिल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: अर्ज कसा करायचा?
Step 1
joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Step 2
“Register” वर क्लिक करून AVR (Apprentice) म्हणून नोंदणी करा.
Step 3
नोंदणी यशस्वी झाल्यावर “Login” करून (Apprentice) INET 2/26 निवडा.
Step 4
Application Form भरा:
- Personal Details
- Educational Details (10वी + डिप्लोमा)
- State Preference (परीक्षा केंद्रासाठी)
Step 5
आवश्यक कागदपत्रे आणि फोटो Upload करा. Webcam ने Live फोटोही घेतला जाईल.
Step 6
₹550 + 18% GST ही परीक्षा फी Online भरा.
Step 7
Final Submit करून अर्जाची Print काढून ठेवा.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: Job Benefits
मुख्य फायदे
- सुरुवातीला महिना ₹30,000 पगार + दरवर्षी वाढ
- ₹48 लाख Life Insurance Cover (Free)
- 4 वर्षांनंतर सुमारे ₹10 लाख Seva Nidhi
- वर्षाला 30 दिवस रजा + Medical नुसार Sick Leave
- Medical आणि CSD Canteen सुविधा
- देशसेवेचा अभिमान आणि शिस्तबद्ध जीवन
- 4 वर्षांनंतर कायमस्वरूपी नौदल नोकरीची संधी (Top 25%)
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?
- Engineering किंवा Electrical शाखेतील डिप्लोमा पास उमेदवार
- देशसेवा आणि संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तरुण
- 10वी नंतर डिप्लोमा करून सरकारी नोकरी शोधणारे विद्यार्थी
- शारीरिकदृष्ट्या फिट आणि शिस्तप्रिय अविवाहित तरुण
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू | 05 जून 2026 (10:00 वा.) |
| शेवटची तारीख | 29 जून 2026 (17:00 वा.) |
| Correction Window | 06 जुलै 2026 |
| INET परीक्षा | ऑगस्ट 2026 |
| Stage I निकाल | ऑगस्ट अखेर / सप्टेंबर सुरुवात 2026 |
| Stage II (01/2027) | ऑक्टोबर 2026 |
| Induction (01/2027) | डिसेंबर 2026 — INS Chilka |
| Stage II (02/2027) | मार्च 2027 |
| Induction (02/2027) | मे 2027 — INS Chilka |
⚠️ वरील सर्व तारखा तात्पुरत्या (Tentative) असून अचूक तारखा Candidate Portal वर जाहीर केल्या जातील.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| Online अर्ज | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: FAQs
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?
10वी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि AICTE मान्यताप्राप्त Polytechnic मधून Engineering किंवा Electrical शाखेतील 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 50% गुणांसह पूर्ण असावा.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026 किती जागा आहेत?
जागांची निश्चित संख्या जाहीर केलेली नाही. Trade नुसार आणि सेवेच्या आवश्यकतेनुसार राज्यनिहाय जागांचे वाटप होईल.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026 वयोमर्यादा किती आहे?
01/2027 Batch साठी जन्म 01 डिसेंबर 2004 ते 31 मे 2009 दरम्यान, तर 02/2027 Batch साठी 01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 दरम्यान असावा.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026 पगार किती आहे?
सुरुवातीला महिना ₹30,000 पॅकेज, जे चौथ्या वर्षी ₹40,000 पर्यंत वाढते. याशिवाय भत्ते आणि 4 वर्षांनंतर सुमारे ₹10 लाख Seva Nidhi मिळते.
निवड प्रक्रिया काय आहे?
Stage I मध्ये INET 2/2026 ऑनलाईन परीक्षा (Negative Marking सह), त्यानंतर Stage II मध्ये PFT, Written Exam आणि Recruitment Medical होते.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
हो, ही All India Recruitment असल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून अर्ज करता येतो.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026 महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?
नाही, ही भरती फक्त अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी आहे. महिला आणि विवाहित पुरुष पात्र नाहीत.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026 अर्जाची शेवटची तारीख कधी आहे?
ऑनलाईन अर्ज 05 जून 2026 ते 29 जून 2026 (17:00 वा.) पर्यंत करता येईल.
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026 परीक्षा फी किती आहे?
परीक्षा फी ₹550 + 18% GST असून ती Online भरावी लागेल आणि Non-refundable आहे.
टीप: वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी joinindiannavy.gov.in वरील मूळ जाहिरात (Official Notification) नक्की वाचा. कोणताही Agent पैसे घेऊन भरती करून देतो असे म्हणाल्यास विश्वास ठेवू नका — निवड फक्त गुणवत्तेवर (Merit) होते.
इतर भरती अपडेट्स
