घरकुल यादीत नावे कसे बघायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस | Gharkul Yadi Kashi Baghayachi

Gharkul Yadi Kashi Baghayachi: सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली घरकुल योजना ही गरिबांसाठी वरदान ठरत आहे, गरीबांना पक्के घर बांधण्यासाठी शासनाने खूप साऱ्या आवास योजना सुरू केल्या आहेत.

यामधे राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने देखील अनेक घरकुल योजना सुरू केल्या आहेत. वेगवेगळ्या मागासवर्गीय तसेच समाजासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवली जात आहे.

आजच्या या लेखामध्ये आपण घरकुल यादीत नावे कसे बघायचे? या संबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीला अर्ज करून सुद्धा नाव लागत नाही, त्यामुळे घरकुल यादीत नाव आले की नाही? हे बघण/ चेक करन आवश्यक असत.

त्यामुळे या लेखामध्ये दिलेली महत्वाची अशी माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि तुमचे पण नाव घरकुल यादी मध्ये तपासा.

Gharkul Yadi Kashi Baghayachi

घरकुल यादी तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील काढू शकता, या पोस्ट मध्ये आपण मोबाईल वर घरकुल यादीत नाव कसे बघायचे? याची माहिती जाणून घेणार आहोत.

मोबाईल साठी वापरलेली स्टेप तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा टॅब वर देखील करून घरकुल यादीत नाव चेक करू शकता.

घरकुल यादीत नाव कसे बघायचे?

  1. सर्वात पहिल्यांदा मोबाईल वरील Play Store मध्ये जाऊन Umang हा शासनाचा App Download करा.
  2. उमंग App Open केल्यावर तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यावी लागेल.
  3. त्यानंतर तुम्ही सेट केलेला M Pin आणि मोबाईल नंबर टाकून Log in करून घ्या.
  4. App Dashboard वर गेल्यावर Search मध्ये PMAYG असे सर्च करा.
  5. Pradhanmantri Awas Yojana Gramin या लिंक वर क्लिक करा.
  6. पंचायत Wise List वर क्लिक करून, तुमची पंचायत समिती, जिल्हा आणि राज्य कोणते आहे, ही माहिती भरुन घ्या.
  7. त्यानंतर पुढे गेल्यावर तुमच्या समोर तुमच्या गावाची यादी दिसेल, त्यात तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता. तसेच गावातील कोणाला घरकुल मंजूर झाले आहेत? याची पण माहिती मिळवू शकता.

वर दिलेल्या स्टेप वापरून व्यक्ती कोणत्याही मोबाईल वरून किंवा कॉम्पुटर वरून घरकुल यादीमध्ये आपले नाव चेक करू शकतो. थोडक्यात अगदी सहजपणे तुम्ही घरकुल यादीत तुमचे नाव बघू शकता, आणि घरकुलाची यादी पाहून Download देखील करू शकता.

Gharkul Yadi PDF Download

घरकुल यादी Download करण्यासाठी वर सांगितलेल्या स्टेप तुम्ही वापरू शकता, एकदा घरकुल लिस्ट यादी Visible झाली कि नंतर तुम्ही ती Browser मधून Download करू शकता.

Gharkul Yadi मध्ये तुमच्या गावातील सर्व घरकुल लाभार्थी तसेच त्यांचे नाव, सोबत कोणाला घरकुल मंजूर झाले आहे, याची माहिती लिस्ट स्वरुपात दिलेली आहे.

या लिस्ट मध्ये तुम्ही तुमचे नाव पण शोधू शकता, म्हणजे तुम्ही जर घरकुल योजना साठी अर्ज केला असेल तर त्याचे status तुम्हाला यादी मध्ये दिसून येईल. आणि जर तुम्हाला अद्याप घरकुल मंजूर झाले नसेल, तर मात्र तुम्हाला तुमचे नाव घरकुल यादी मध्ये दिसणार नाही. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी घरकुलाची यादी तपासावी लागेल, म्हणजे तुम्हाला जर घरकुल मंजूर झाले तर तुम्हाला लगेच यादी मध्ये कळून जाईल.

सरकारी योजना:

Gharkul Yadi FAQ

How to check name on Gharkul Yadi?

घरकुल यादीत नाव तपासण्यासाठी तुम्ही उमंग App वर जाऊन आवश्यक ती माहिती टाकून लिस्ट मध्ये नाव पाहू शकता.

How to Apply for Gharkul Yojana?

घरकुल योजना साठी अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात करता येतो, त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील ग्रामपंचायती मध्ये जाऊन लेखी अर्ज सादर करू शकता.

Who is eligible for Gharkul Yojana?

घरकुल योजना साठी देशातील सर्व गरीब आणि मध्यमवर्गीय मागासवर्गीय लोक पात्र असणार आहेत. इतर आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले व्यक्ती तसेच पक्के घर असलेले व्यक्ती देखील घरकुला साठी पात्र असणार नाहीत.

1 thought on “घरकुल यादीत नावे कसे बघायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस | Gharkul Yadi Kashi Baghayachi”

Leave a comment