राज्यातील सर्व मुलींना मेडीकल इंजीनियरिंगचे शिक्षण मोफत! जून पासून अंमलबजावणी होणार | Free education for Girl in Maharashtra

Free education for Girl in Maharashtra: मित्रांनो राज्यातील मुलींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

आता राज्यातील सर्व मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग सारख्या मोठ्या मोठ्या कोर्ससाठी मोफत शिक्षण दिले जाणार आहे. यापूर्वी या उच्च शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करावे लागायचे, त्यामुळे गरिबांना हे शक्य होत नव्हत.

हेच शासनाने ओळखून आता मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याची नवीन योजना सुरू केली आहे, Free education for Girl in Maharashtra अंतर्गत एकदम फ्री मध्ये 800 पेक्षा जास्त कोर्स साठी मुलींना Admission घेता येणार आहे.

मुलींना मोफत शिक्षणाचा फायदा घेण्यासाठी काही अटी शासनाद्वारे सांगण्यात आल्या आहेत, त्याअंतर्गत ज्या मुली पात्र असतील तेच या Free Education for Girls योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

यासाठी अर्ज कसा करायचा? कोणते पात्रता निकष आहेत? केव्हापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार? मोफत शिक्षणाची अंमलबजावणी केव्हा होणार? अशी सर्व महत्त्वाची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आता जाणून घेऊया.

Free education for Girl in Maharashtra

उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या अभिनव अशा योजनेची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय परभणी मध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने घेतला आहे. परभणी मध्ये एका मुलीने उच्च शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली, त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

मुलींसाठी मोफत शिक्षणाचा आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षा मध्ये ज्या मुली उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असतील, त्यांना सर्व कोर्समध्ये शिक्षण घेण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

मोफत प्रवेशा बरोबरच इतरही फायदे मुलींना मिळणार आहेत, त्यामुळे मुलींना विनामूल्य शिक्षण मिळणार आहे. याचा थेट फायदा गरीब कुटुंबातील मुलींना सर्वाधिक होणार आहे.

Free education for Girl in Maharashtra Eligibility Criteria (पात्रता निकष)

मोफत शिक्षणासाठी राज्य शासनाने काही पात्रता निकष जारी केले आहेत, ज्या मुली या अटी पूर्ण करतील त्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे.

यामध्ये कुटुंबाच्या आधारे देखील मुलीला मोफत शिक्षण द्यायचे का नाही! हे ठरवले जाणार आहे. मुख्य स्वरूपात ही योजना मुळात गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे जर एखाद्या मुलीचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या कमकुवत नसेल तर त्या मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार नाही. अशा मुलींना उच्च शिक्षणासाठी Regular Fees Pay करून Admission घ्यावे लागणार आहे.

आता आपण पाहूया कोणत्या मुली Free education for Girl योजनेसाठी पात्र असणार.

  • मुलीचे कुटुंब हे आर्थिक दृष्ट्या मागासलेले असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखा पेक्षा कमी असावे.
  • मुलगी आणि तिचे आई वडील हे महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असावेत.
  • मुलगी ही ओबीसी किंवा EWS प्रवर्गातील असावी.

Free education for Girl in Maharashtra Documents

Mofat Shikshan मिळवण्यासाठी Free education for Girl in Maharashtra मध्ये अर्ज सादर करताना मुलींना काही आवश्यक कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.

सर्व कागदपत्रे हे झरॉक्स कॉपी स्वरूपात असावेत, तसेच Original Documents पण सोबत ठेवायचे आहेत. तसेच आवश्यक अशा सर्व कागदपत्रांची Soft Copy देखील तयार करून ठेवायची आहे.

  • अर्जदार मुलीचे आधार कार्ड
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (8 लाखापेक्षा कमी)
  • रहिवासी पुरावा
  • मुलीची TC
  • मागील शैक्षणीक वर्षाचे गुणपत्रक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी

Free education for Girl in Maharashtra Benefits

मोफत उच्च शिक्षण योजनेद्वारे मुलींना तब्बल 800 पेक्षा जास्त वेगवेगळ्या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रवेश फी ची आवश्यकता असणार नाही. अगदी मोफत फ्री मध्ये मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ अशा मोठ्या मोठ्या कोर्स साठी प्रवेश भेटणार आहे.

मोफत शिक्षणाची सुविधा ही सरकारी कॉलेज आणि खाजगी कॉलेज या दोन्ही मध्ये मिळणार आहे. यासंबधी काही दिवसापूर्वीच बातमी आली होती, त्यानुसार उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांना ही योजना लागू करण्यासाठी आदेश दिले होते.

Free education for Girl in Maharashtra Form

मुलींना मोफत शिक्षण घेण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात अर्ज करता येणार आहे. मुलींना थेट कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे, कॉलेजमधूनच सर्व पात्र मुलींना मोफत शिक्षणाचा पर्याय दिला जाणार आहे.

वेगळ्या प्रकारे या योजनेसाठी कोणते स्वरूपाचे इतर खर्च करण्याची गरज नाही, मुलींना जे शिक्षण घ्यायचे आहे त्यासाठी ज्या कॉलेजातून शिक्षण घेणे उत्तम आहे, तेथून तुमच्या आवडत्या कोर्स साठी अर्ज सादर करा. 

तुम्ही जर या नवीन योजने साठी पात्र असाल, तर तुम्हाला कोणत्याही कॉलेज मध्ये अर्ज सादर करताना प्रवेश फी भरायची गरज नाही, कारण तुम्हाला शासनाद्वारे प्रवेश फी माफ करण्यात आली आहे.

योजनेची अंमलबजावणी ही पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार आहे, त्यामुळे तुम्ही जर आता एखाद्या कोर्स साठी अर्ज केला असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण पुढील शैक्षणिक वर्षापासून तुमची प्रवेश फी माफ होणार आहे. 

Free education for Girl योजना केव्हा सुरू होणार?

मुलींसाठी मोफत शिक्षण योजना येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे, राज्यातील सर्व पात्र मुली जुन 2024 पासून मोफत शिक्षण घेऊ शकणार आहेत.

म्हणजे ज्यावेळी तुम्ही जून मध्ये नवीन Admission घेता तेव्हाच ही Free education for Girl योजना अमलात येणार आहे. 

परंतु अद्याप या योजनेसाठी कोणताही शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला नाही, त्यामुळे अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला अजून काही महिने वाट पाहावी लागेल, ज्यावेळी शासन निर्णय GR प्रसिध्द होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ही योजना सर्व ठिकाणी लागू होईल.

Free education for Girl FAQ

कोणत्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार?

आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे.

मोफत शिक्षण योजना केव्हा सुरू होणार?

जून 2024 मध्ये या योजनेचा शुभारंभ होणार आहे.

मुलींना कोणत्या कोर्स साठी शिक्षण मोफत मिळणार आहे?

मुलींना मेडीकल, इंजिनिअरिंग, लॉ अशा एकूण 800 कोर्स साठी शिक्षण मोफत मिळणार आहे.

9 thoughts on “राज्यातील सर्व मुलींना मेडीकल इंजीनियरिंगचे शिक्षण मोफत! जून पासून अंमलबजावणी होणार | Free education for Girl in Maharashtra”

Leave a comment