CIDCO Recruitment 2025: सिडको भरती 2025 अंतर्गत 38 पदे भरली जाणार असून, ही महाराष्ट्रातील महत्त्वाची सरकारी नोकरीची संधी आहे. सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (CIDCO) ही भारतातील सर्वात संपन्न सरकारी प्राधिकरणांपैकी एक आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट शहरे आणि औद्योगिक क्षेत्रांचे नियोजन व विकास करणे आहे.
या भरती अंतर्गत असोसिएट प्लॅनर, डिप्टी प्लॅनर, ज्युनियर प्लॅनर आणि फील्ड ऑफिसर (आर्किटेक्ट) या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. महाराष्ट्रातील शहरी आणि औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडकोमध्ये नोकरी मिळवणे ही सुवर्णसंधी ठरू शकते.
सिडकोमध्ये नोकरी मिळवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख वाचा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
CIDCO Recruitment 2025 Details भरतीची माहिती
विवरण | माहिती |
संस्था नाव | सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (CIDCO) |
पदाचे ठिकाण | महाराष्ट्र |
एकूण पद संख्या | 38 पदे |
पदांचे प्रकार | सहयोगी नियोजनकार, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजनकार, फील्ड ऑफिसर (आर्किटेक्ट) |
वेतनमान | ₹41,800 – ₹2,08,700/- (पदानुसार) |
परीक्षा शुल्क | राखीव प्रवर्ग / माजी सैनिक / दिव्यांग: ₹1062/ -खुला प्रवर्ग: ₹1180/- |
CIDCO Bharti 2025 Posts & Vacancy (पदे आणि जागा)
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहयोगी नियोजनकार | 02 |
2 | उपनियोजनकार | 13 |
3 | कनिष्ठ नियोजनकार | 14 |
4 | क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) | 09 |
Total | 38 |
CIDCO Recruitment 2025 Education Qualification (शिक्षण पात्रता)
पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
1 | (i) पदवी [Civil/Architecture/Planning (Town/Urban/City)] किंवा पदव्युत्तर पदवी (Town Planning, Regional Planning, City Planning, Town & Country Planning, Urban Planning किंवा संबंधित उपविशेषज्ञता, जसे की Environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning) (ii) 05 वर्षांचा अनुभव |
2 | पदवी [Civil/Architecture/Planning (Town/Urban/City)] किंवा पदव्युत्तर पदवी (Town Planning, Regional Planning, City Planning, Town & Country Planning, Urban Planning किंवा संबंधित उपविशेषज्ञता, जसे की Environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning) |
3 | प्लॅनिंग पदवी |
4 | (i) B.Arch / G.D. Arch. SAP (ii) ERP (TERP-10) (iii) 01 वर्षाचा अनुभव |
CIDCO Bharti 2025 Age Limit (वयोमर्यादा)
वयोमर्यादा | माहिती |
वयाची अट | 10 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे |
मागासवर्गीय/आदिवासी/अनाथ | 05 वर्षांची सूट |
दिव्यांग | 07 वर्षांची सूट |
CIDCO Recruitment 2025 Exam Pattern – परीक्षेचे स्वरुप
अ.क्र. | परीक्षेचा विषय | प्रश्नांची संख्या | एकूण गुण | माध्यम | कालावधी |
1 | इंग्रजी (General English) | 25 | 50 | इंग्रजी | 120 मिनिटे |
2 | सामान्य ज्ञान (General Awareness) | 25 | 50 | इंग्रजी | |
3 | आकलन क्षमता (Reasoning) | 25 | 50 | मराठी | |
4 | व्यावसायिक ज्ञान (Subject Knowledge) | 25 | 50 | इंग्रजी | |
एकूण | 100 | 200 | 120 मिनिटे |
CIDCO Recruitment 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)
निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे तपशीलवार दिली आहे:
- ऑनलाईन परीक्षा
- उमेदवाराला गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
- विहित अर्हता आणि अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची प्राप्त गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
- वर्ग अ (सर्वसाधारण/विशेष प्रवर्ग)
- वर्ग अ मधील उमेदवारांच्या अंतिम निवडीसाठी 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि 25 गुणांची मुलाखत असे एकूण 225 गुण गृहित धरले जातील.
- कनिष्ठ नियोजनकार पदासाठी
- कनिष्ठ नियोजनकार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड 200 गुणांची ऑनलाईन परीक्षाच्या गुणांच्या आधारावर केली जाईल.
- क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) पदासाठी
- क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) पदासाठी अर्ज करणाऱ्यांची निवड 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि सॅप प्रमाणपत्राचे 10 गुण यांवर आधारित केली जाईल.
- यासाठी एकूण 210 गुण गृहित धरले जातील.
- समान गुण प्राप्त करणारे उमेदवार
- जर दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाले तर दि. 02.12.2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्राधान्य क्रम वापरून उमेदवारांची निवड केली जाईल.
- सॅप प्रमाणपत्र – क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ)
- जर उमेदवारांकडे सॅप प्रमाणपत्र नसेल, तर रुजू दिनांकापासून 1 वर्षाच्या आत सॅप प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- न केल्यास उमेदवारांची सेवा समाप्त केली जाईल.
- काही उमेदवारांसाठी (व्यवस्थापनाने मान्यता दिल्यास) परिविक्षा कालावधीच्या अंतिम दिनांकापासून 06 महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जाऊ शकतो.
- या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच्या सेवेची समाप्ती केली जाईल.
सर्व उमेदवारांनी या निवड प्रक्रियेतील सर्व निकषांची काळजीपूर्वक वाचून त्यानुसार तयारी करावी
CIDCO Bharti 2025 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
घटना | तारीख |
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 08 फेब्रुवारी 2025 |
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख | 08 मार्च 2025 |
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 08 मार्च 2025 |
महत्वाची सूचना | अर्ज फक्त ऑनलाईनच स्वीकारले जातील, अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. |
CIDCO Recruitment Important Links (महत्त्वाच्या लिंक्स)
घटक | लिंक/माहिती |
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची शॉर्ट जाहिरात | इथे डाउनलोड करा |
ऑनलाइन अर्ज [Starting: 08 फेब्रुवारी 2025] | इथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
CIDCO Recruitment 2025 Online Apply (ऑनलाइन अर्ज कसा करायचा)
- अर्जाची सुरवात:
- पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/cidcojul24/ या संकेतस्थळावर दि. 08.02.2025 पासून दि. 08.03.2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावा.
- आरक्षण व पदसंख्या बदल:
- स्पर्धात्मक परीक्षा स्थगित किंवा रद्द करण्याचा, परीक्षा ठिकाण व तारीख बदलण्याचा, पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल करण्याचा अधिकार सिडको व्यवस्थापनाकडे राहील.
- अर्ज भरण्याची प्रक्रिया:
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील, अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करतांना माहिती काळजीपूर्वक भरावी, अन्यथा त्रुटीमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो.
- कागदपत्रांची पडताळणी:
- अर्ज करतांना शैक्षणिक किंवा अन्य कागदपत्रे जोडणे आवश्यक नाही. मात्र, अर्जात नमूद केलेल्या माहितीची पूर्ण पडताळणी कागदपत्रांच्या छाननीनंतरच केली जाईल. अपात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया बंद केली जाईल.
- विशेष बाबी:
- इतर राज्यातून महाराष्ट्रात आलेले मागासवर्गीय उमेदवार आरक्षित पदांसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
- परीक्षेचा खर्च उमेदवाराच्या जबाबदारीवर असणार आहे.
- अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्यांबद्दल माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळवता येईल.
- उमेदवारांनी अर्ज नोंदवताना आयडी नंबर आणि पासवर्ड सुरक्षित ठेवावा.
- परीक्षा संबंधित प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल.
- परीक्षेबाबत सूचना:
- परीक्षा केंद्राचा पत्ता प्रवेशपत्रावर देण्यात येईल.
- परीक्षा केंद्र किंवा दिनांक व वेळेत बदलाची विनंती स्वीकारली जाणार नाही.
- परीक्षा केंद्र व परीक्षा स्थळ रद्द करण्याचे अधिकार सिडको व्यवस्थापनाकडे राहतील.
- सामान्य अटी:
- उमेदवारांनी संगणकीय प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे, ज्याचे निर्देश शासन निर्णय क्रमांक-मातंस 2012/प्र.क्र. 277/39, दि. 04.02.2013 मध्ये दिले आहेत.
इतर भरती
CIDCO Recruitment 2025 FAQs
CIDCO Recruitment 2025 साठी अर्ज कसा करावा?
CIDCO Bharti 2025 साठी उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/cidcojul24/ या लिंकवर जाऊन दि. 08.02.2025 पासून दि. 08.03.2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
CIDCO Recruitment 2025 साठी पात्रता काय आहे?
CIDCO Bharti 2025 साठी पात्रतेच्या आवश्यक अटी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी वर आधारित आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना त्यांची पात्रता तपासून अर्ज करावा.
CIDCO Recruitment 2025 साठी परीक्षा शुल्क किती आहे?
सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 1000/- रुपये असून, राखीव वर्गासाठी 900/- रुपये आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
CIDCO Recruitment 2025 साठी निवड प्रक्रिया कशी आहे?
CIDCO Bharti 2025 साठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेवर आधारित असेल. विविध पदांसाठी परीक्षा, मुलाखत, आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.