Central Bank of India Bharti 2024: सेंट्रल बँकेत 10 वी पास वर भरती सुरू! मिळणार 37,815 रू. महिना

Central Bank of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत सफाई कर्मचारी आणि सब स्टाफ या पदांची भरती निघाली आहे. बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक मोठी सुवर्णसंधी आहे, संधीचे सोने करा आणि तात्काळ भरतीसाठी अर्ज करून टाका.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये आता भरती साठी अर्ज देखील सुरू झाले आहेत, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर या आर्टिकल मध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि भरतीचा फॉर्म सादर करा.

भरतीसाठी सेंट्रल बँकेद्वारे एकूण 484 जागा सोडण्यात आल्या आहेत, केवळ पात्र उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. एक महत्वाची बाब म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे. दहावी पास वर बँकेत नोकरी मिळणार आहे, भरती संबंधी इतर कोणत्याही अटी नाहीत त्यामुळे वाट बघु नका पोरांनो! आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचा आणि अर्ज करा.

Central Bank of India Bharti 2024

पदाचे नावसफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ
रिक्त जागा484
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी37,815 रू. महिना
वयाची अट18 ते 26 वर्षे
भरती फीसामान्य प्रवर्ग: 850 रु. (मागासवर्ग: 175 रु. )

Central Bank of India Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & सब स्टाफ484
Total484

Central Bank of India Bharti 2024 Education

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज सादर करणारे उमेदवाराचे शिक्षण हे बँके द्वारे जारी केलेल्या निकषाप्रमाणे असावे.

  • उमेदवारा किमान दहावी पास असावा.
  • उमेदवाराचे शिक्षण जर जास्त झाले असेल तर त्यांना प्राधान्य असणार.

Central Bank of India Bharti 2024 Exam Details

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात परीक्षा घेतली जाणार आहे. एकूण दोन परीक्षा होणार आहेत, पहिली परीक्षा ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे आणि दुसरी परीक्षा Local Language Test असणार आहे.

पहिल्या ऑनलाईन परीक्षेसाठी 70 मार्क आहेत, तर दुसरा टेस्ट साठी 30 मार्क आहेत. एकूण 100 मार्क असणार आहेत, पेपरचा वेळ हा टेस्ट नुसार आहे, पहिल्या टेस्ट साठी 1.5 घंटे दिले जाणार आहेत. तर दुसऱ्या टेस्ट साठी केवळ 0.5 घंटा असणार आहे.

Online Exam

  • एकूण मार्क – 70 Marks
  • पेपरचा वेळ – 90 मिनिटे
  • Exam Medium – English
Central Bank of India Bharti 2024 Online Exam

Local Language Test

  • एकूण मार्क – 30 Marks
  • पेपरचा वेळ – 30 मिनिटे
  • Exam Medium – Local Language
Central Bank of India Bharti 2024 Local Language Test

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
परीक्षेची तारीखजुलै/ऑगस्ट 2024
अर्ज सुरू होण्याची तारीख17 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख27 जून 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

Central Bank of India Bharti 2024 Apply Online

  • सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
  • तुम्ही भरतीच्या अधिकृत पोर्टल वर पोहोचाल, तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. जर आगोदर तुम्ही नोंदणी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला याची गरज नाही.
  • लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर भरतीचा डॅशबोर्ड उघडेल, तिथे तुम्हाला Apply वर क्लिक करायचे आहे.
  • जनरल बँक ऑफ इंडिया भरती चा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • माहिती काळजीपूर्वक आणि अचूक रित्या भरणे आवश्यक आहे, कोणत्याही चुका अपेक्षित नाहीत त्यामुळे लक्ष पूर्वक फॉर्म भरा.
  • सोबतच जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करून टाका.
  • कागदपत्रांसोबतच भरतीसाठी फी देखील आकारली जाणार आहे, फी भरणे अनिवार्य आहे त्यामुळे कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे Exam Fees भरून टाका.
  • शेवटी भरतीचा फॉर्म एकदा तपासून पहा, अर्ज भरताना एखाद्या चुका झाल्या असतील तर त्या सुधारून घ्या. नंतर फॉर्म Verify करून Submit करून टाका.

Central Bank of India Bharti 2024 Selection Process

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा टेस्ट द्वारे होणार आहे. जेव्हा उमेदवार सर्वाधिक मार्ग मिळवतील त्यांना मेरिट लिस्ट मध्ये Add केले जाईल, आणि मेरिट लिस्ट मधील उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्त केले जाईल.

Online Exam

सुरुवातीला जेव्हा उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांना ऑनलाईन टेस्ट द्यावी लागणार आहे. ऑनलाइन टेस्ट ची पूर्ण माहिती मी वर दिली आहे, तेथून तुम्ही Exam ची अधिक माहिती मिळवू शकता.

Local Language Test

लोकल लैंग्वेज टेस्ट साठी केवळ ऑनलाइन टेस्ट मध्ये पास झालेले उमेदवार पात्र असणार आहेत. या टेस्ट साठी उमेदवारांना Call Latter पाठवले जाणार आहे. मुख्य स्वरुपात या टेस्ट मध्ये उमेदवाराचे Local Language चे Knowledge तपासले जाणार आहे. 8 वी पर्यंत चा अभ्यासक्रम या टेस्ट मध्ये Include असणार आहे.

जे उमेदवार या दोन्ही टेस्ट मध्ये Cut Off Mark Obtained करतील त्यांना सेंट्रल बँके द्वारे रिक्त जागांवर निवडले जाणार आहे.

Central Bank of India Bharti 2024 FAQ

Who is eligible for Central Bank of India Bharti 2024?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्जदार उमेदवार हे किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. दहावी पेक्षा पण जास्त शिक्षण झाले असेल, तरीदेखील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. संपूर्ण माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

How to apply for Central Bank of India Bharti 2024?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया सफाई कर्मचारी भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप वर सांगितली आहे त्यानुसार अर्ज करून टाका.

What is the last date of the Central Bank of India Bharti 2024 Application Form?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती चा फॉर्म ऑनलाइन स्वरूपात भरण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. मुदतवाढ भेटणार नाही त्यामुळे अर्ज करून टाका, परीक्षेच्या तारखा देखील जाहीर झाले आहेत, त्यामुळे मुदत वाढ विसरून जा! आणि लवकरात लवकर जी तारीख आहे त्या तारखेच्या आत फॉर्म भरा.

Leave a comment