Central Bank of India Apprentice Bharti 2025. नमस्कार मित्रांनो! Central Bank of India Apprentice Bharti 2025 अंतर्गत ४५०० पदांसाठी अप्रेंटिस भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत केली जाणार आहे आणि ही एक जबरदस्त संधी आहे बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करण्यासाठी.
Central Bank of India ही एक प्रमुख Public Sector Bank असून देशभरात 4500+ शाखा आहेत. या बँकेचं एकूण व्यवसाय ₹7 लाख कोटींहून अधिक आहे आणि 33,000+ कर्मचारी या बँकेचा कणा आहेत. ही संस्था 1911 मध्ये स्थापन झाली असून ही पहिली पूर्णपणे भारतीयांकडून चालवलेली Commercial Bank आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या विविध शाखांमध्ये/कार्यालयांमध्ये अप्रेंटिस म्हणून नियुक्त केलं जाणार आहे. ही प्रक्रिया Apprenticeship Policy नुसार पार पडणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Central Bank of India Apprentice Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची माहिती
तपशील (Details) | माहिती (Information) |
---|---|
संस्था नाव (Organization Name) | Central Bank of India (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) |
पदाचे नाव (Post Name) | Apprentice (अप्रेंटिस) |
पदसंख्या (Total Posts) | 4500 जागा |
नोकरी ठिकाण (Posting Location) | संपूर्ण भारत (All India) |
शुल्क (Application Fees) | General/OBC/EWS: ₹800 + GST SC/ST/महिला: ₹600 + GST PWD: ₹400 + GST |
पगार/स्टायपेंड (Pay Scale / Stipend) | दरमहा ₹15,000/- स्टायपेंड |
Central Bank of India Apprentice Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
एकूण जागा (Total Vacancies): 4500 जागा
पद क्र. | पदाचे नाव (Post Name) | पद संख्या (No. of Vacancies) |
---|---|---|
1 | अप्रेंटिस (Apprentice) | 4500 |
Total (एकूण) | 4500 |
Central Bank of India Apprentice Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण (Graduate) असावी.
- पदवी AICTE/UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून घेतलेली असावी.
Central Bank of India Apprentice Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
🔹 वयोमर्यादा (Age Limit):
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 28 वर्षे
- वयाची गणना 31 मे 2025 रोजी करण्यात येईल.
🔹 वयामध्ये सवलत (Age Relaxation):
- SC/ST उमेदवारांसाठी: 5 वर्षे सूट
- OBC उमेदवारांसाठी: 3 वर्षे सूट
Central Bank of India Apprentice Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
- अर्जदारांनी ऑनलाईन फी भरल्यानंतर BFSI SSC द्वारे आयोजित ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल.
- त्यानंतर स्थानिक भाषा परीक्षा देखील द्यावी लागेल, जी त्या राज्यातील स्थानिक भाषेची वाचन, लेखन, बोलणे आणि समज यावर आधारित असेल.
Online Examination Pattern – ऑनलाईन परीक्षा पद्धत
क्र. | परीक्षेचे नाव (Test Name) | प्रश्नांची संख्या (No. of Questions) | गुण (Marks) | कालावधी (Duration) | परीक्षेची भाषा (Medium) |
---|---|---|---|---|---|
1 | Quantitative Aptitude | 15 | 15 | 60 मिनिटे | इंग्रजी / हिंदी |
2 | Logical Reasoning | 15 | 15 | इंग्रजी / हिंदी | |
3 | Computer Knowledge | 15 | 15 | इंग्रजी / हिंदी | |
4 | English Language | 15 | 15 | इंग्रजी | |
5 | Basic Retail Products | 10 | 10 | इंग्रजी / हिंदी | |
6 | Basic Retail Asset Products | 10 | 10 | इंग्रजी / हिंदी | |
7 | Basic Investment Products | 10 | 10 | इंग्रजी / हिंदी | |
8 | Basic Insurance Products | 10 | 10 | इंग्रजी / हिंदी | |
एकूण (Total) | 100 | 100 |
- चुकीच्या उत्तरांवर कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही.
- परीक्षेत यशस्वी उमेदवारांची यादी मेरिट नुसार तयार केली जाईल.
- गुण सारखे आल्यास वयोमानानुसार उमेदवारांची क्रमवारी ठरवली जाईल.
Test of Local Language – स्थानिक भाषा परीक्षा
- उमेदवारांनी ज्या राज्यात अप्रेंटिसपदासाठी अर्ज केला आहे, त्या राज्याची स्थानिक भाषा वाचन, लेखन, बोलणे आणि समज यामध्ये पारंगत असणे आवश्यक आहे.
- भाषेची यादी आणि तपशील अॅनेक्सर-II मध्ये दिला आहे.
Final Selection – अंतिम निवड
- ऑनलाइन परीक्षेत कटऑफ मार्क्स पूर्ण करणे अनिवार्य आहे.
- शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वर्गवारी आणि इतर माहितीचे डॉक्युमेंट्स तपासणीस यशस्वी होणे आवश्यक आहे.
- शारीरिकदृष्ट्या फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांना डिजिटल अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट दिला जाईल (https://nats.education.gov.in)
Intimation & Communication – सूचना व माहिती
- ऑनलाईन परीक्षेसाठी तारखा आणि वेळ ईमेलद्वारे कळवली जातील.
- हार्ड कॉपी स्वरूपात सूचना पोचवली जाणार नाही.
- ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व स्थानिक भाषा तपासणीसाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात बोलावलं जाईल.
- उमेदवारांनी नेहमी बँकेच्या व BFSI SSC च्या अधिकृत संकेतस्थळावरून अपडेट्स तपासणे आवश्यक आहे.
- ईमेल किंवा संकेतस्थळावर अपडेट न पाहिल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी बँक जबाबदार नाही.
Document Verification – आवश्यक कागदपत्रे
- ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत
- जन्मतारीख पुरावा (जन्म प्रमाणपत्र / १०वी मार्कशीट)
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व मार्कशीट्स
- जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS) – योग्य स्वरूपात आणि वैध
- अपंगत्व प्रमाणपत्र (PWD) आवश्यक असल्यास
- आवश्यक असल्यास स्क्राइब वापरलेल्या उमेदवाराचा तपशील
Central Bank of India Apprentice Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील (Event) | तारीख (Date) |
---|---|
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 जून 2025 |
Central Bank of India Apprentice Bharti 2025: Important Links & Official Notification – अर्ज लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक/माहिती |
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची शॉर्ट जाहिरात | Click Here |
Apply Online | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Central Bank of India Apprentice Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
अर्ज फक्त ऑनलाइन मोडमध्ये स्वीकारले जातील. कोणत्याही इतर माध्यमातून अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
- NATS पोर्टलवर नोंदणी (Registration):
- सर्व उमेदवारांनी आधी NATS पोर्टल वर स्वतःची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
- “Student Register/Login” विभागात जाऊन नोंदणी करावी.
- नोंदणी करताना अडचणी आल्यास, Candidate User Manual वापरावे.
- नोंदणी झाल्यानंतर मिळणारा Enrolment ID नोंदवून ठेवा, कारण भविष्यातील सर्व व्यवहारासाठी हा आवश्यक आहे.
- अर्जासाठी Central Bank of India चे Advertisement पाहणे:
- NATS पोर्टलवर लॉगिन करून “Central Bank of India” अप्रेंटिसशिप जाहिरात पाहू शकता:
https://nats.education.gov.in/student_type.php
- NATS पोर्टलवर लॉगिन करून “Central Bank of India” अप्रेंटिसशिप जाहिरात पाहू शकता:
- आवश्यक तपशील भरून Application Fee भरणे:
- BFSI SSC कडून (info@bfsissc.com) ईमेल येईल ज्यात जातीचा तपशील, प्रशिक्षण जिल्हा निवडणे व फी भरण्याची लिंक दिलेली असेल.
- फी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
- फोटो, स्वाक्षरी आणि कागदपत्रे स्कॅन करणे:
- अर्ज करताना तुमचे छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रे योग्य स्वरूपात स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे.
- अर्ज तपासणी आणि सादर करणे:
- अर्जातील सर्व माहिती नीट तपासा.
- एकदा SUBMIT केल्यानंतर कोणतीही माहिती बदलता येणार नाही.
- चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
- महत्त्वाची सूचना:
- नाव प्रमाणपत्रांप्रमाणे अचूक लिहावे.
- अर्ज पूर्ण झाल्यानंतर Enrolment ID आणि लॉगिन माहिती लक्षात ठेवा.
- शक्य तितक्या लवकर अर्ज करा, शेवटच्या दिवशी अर्ज केल्यास वेबसाइटवर जास्त ट्रॅफिकमुळे अडचणी येऊ शकतात.
- डॉक्युमेंट्स सादर करणे:
- नोंदणी करताना व नंतर BFSI SSC / बँकेच्या सूचना मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
- यात जन्मतारीख पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र इत्यादींचा समावेश आहे.
- सहाय्य व चौकशी:
- कोणतीही शंका असल्यास info@bfsissc.com वर ईमेल पाठवा.
इतर भरती
Nagar Parishad Bharti 2025: 10वी आणि 12वी पासवर नगर परिषद मधे 3200+ जागांची भरती! संधी सोडू नका!
SBI CBO Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी भारतीय स्टेट बँकेत CBO पदासाठी भरती! पगार ₹50,000 पासून!
Central Bank of India Apprentice Bharti 2025: (FAQs)
Central Bank of India Apprentice Bharti 2025 साठी पात्रता काय आहे?
Central Bank of India Apprentice Bharti 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 31 मे 2025 रोजी 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.
Central Bank of India Apprentice Bharti 2025 मध्ये परीक्षा पद्धत कशी आहे?
या भरतीमध्ये Online Objective Type परीक्षा घेतली जाईल. परीक्षेमध्ये 100 प्रश्न (100 गुण) असतील व त्यात Negative Marking नाही. तसेच स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.
Central Bank of India Apprentice Bharti 2025 मध्ये किती जागा उपलब्ध आहेत?
Central Bank of India Apprentice Bharti 2025 अंतर्गत एकूण 4500 जागांसाठी भरती होणार आहे.
Central Bank of India Apprentice Bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी प्रथम NATS Portal वर नोंदणी करावी. त्यानंतर BFSI SSC कडून मिळणाऱ्या लिंकवरून अर्ज सादर करावा व आवश्यक ती फी भरावी. अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होईल.
4 thoughts on “Central Bank of India Apprentice Bharti 2025: पदवी पाससाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती! लगेच अर्ज करा!”