Central Bank of India Apprentice Bharti: नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी बंपर भरती निघाली आहे. तब्बल 3000 पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे अप्रेंटिस पदासाठी अधिकृत जाहिरात अधीसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी इच्छुक आहेत, त्यांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे.
अप्रेंटिस भरतीसाठी जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांनाच अर्ज करता येणार आहे, परंतु ज्या उमेदवारांनी अद्याप Graduation पूर्ण केलेले नाही, त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
बँकेमध्ये नोकरी करण्याची ही एक मोठी सुवर्णसंधी आहे, त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया साठी निघालेली बंपर भरती तुमच्या साठी संधी आहे, ही संधी सोडू नका, याचा वापर चांगला करा आणि लगेच ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करा.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती संबंधी सविस्तर माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, त्यामुळे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी कृपया या लेखामधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या. सोबतच बँकेत द्वारे जाहीर करण्यात आलेली अधिसूचना पीडीएफ देखील काळजीपूर्वक वाचा, आणि मगच प्रत्यक्षरीत्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती साठी अर्ज सादर करा.
Central Bank of India Apprentice Bharti 2024
📢 भरतीचे नाव – Central Bank of India Apprentice Bharti
✅ पदाचे नाव – Apprentice
🚩 एकूण रिक्त जागा – तब्बल 3000+ रिक्त जागा
👨🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणतीही पदवी प्राप्त केलेली असावी, म्हणजे उमेदवार हा किमान पदवीधर असावा.
➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत
💰 पगार – 15,000 रू. प्रती महिना
💵 परीक्षा फी – Open/OBC: ₹800/- (SC,ST, महिला: ₹600/-) [PWD: ₹400/-] सोबतच GST देखील अधिकचा भरावा लागणार आहे.
📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
🔞 वयोमर्यादा – उमेदवाराचे वय हे 20 ते 28 वर्षे असावे.
📍 वयोमर्यादा सूट – SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट.
📆 फॉर्मची Last Date – 27 मार्च, 2024
🌐 अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
🖥️ जाहिरात PDF | Download करा |
📝 ऑनलाईन अर्ज | येथून करा |
Central Bank of India Apprentice Bharti Apply Online
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी तब्बल 3000 पेक्षा जास्त रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची निवड भरती द्वारे केली जाणार आहे.
जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर करायचा आहे. अधिकृत वेबसाईटची लिंक वर दिली आहे, तुम्ही येथे क्लिक करून पण अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता.
अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.
उमेदवारांना तो फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे, अर्जामध्ये विचारलेल्या प्रत्येक बाबी योग्यरीत्या वाचून त्याजोगी माहिती भरायची आहे.
माहिती ही अचूक असावी, कोणत्याही स्वरूपाची चूक चालणार नाही. अर्जामध्ये एखादी चूक आढळली तर अर्ज हा तात्काळ रद्द केला जाईल.
ऑनलाइन अर्ज सादर करताना जाहिरातीमध्ये सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करून त्यानुसारच अर्ज भरायचा आहे. कोणत्याही इतर बाबींचा वापर करायचा नाही, ज्या सूचना दिली आहेत त्यानुसारच अर्ज करायचा आहे.
केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज करणे ग्राह्य धरले जाणार आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर केल्यास ते अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत आणि तात्काळ ते सर्व अर्ज बाद केले जातील.
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे हे फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे सॉफ्ट कॉपी स्वरूपात असावेत. इतर कोणतेही फॉरमॅट स्वीकारले जाणार नाही.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी परीक्षा फी देखील भरायची आहे. परीक्षा फी प्रत्येक प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे, साधारण प्रवर्ग, ओबीसी प्रवर्ग, सर्व महिला अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी वेगळी भरायची आहे.
परीक्षा फी भरून झाल्यानंतर शेवटी अर्ज सबमिट करण्याच्या वेळी, एकदा भरती चा फॉर्म तपासून पाहायचा आहे. कोणतीही चूक आढळली तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्यायचे आहे. कोणतीही चूक माफ केली जाणार नाही त्यामुळे काळजी घ्यायची आहे.
भरतीचा फॉर्म तपासून झाल्यानंतर अर्ज खाली दिलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करून, भरती चा फॉर्म सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडे सादर करायचा आहे.
Central Bank of India Apprentice Bharti Selection Process
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवाराची निवड हि उमेदवाराच्या पात्रता निकषांवर होणार आहे, अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याने योग्य उमेदवारांची निवड हि सेंट्रल बँक ऑफ इंडिया करीयर डिपार्टमेंट द्वारे केली जाणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना सर्वात प्रथम online स्वरुपात अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया लेखामध्ये स्पष्ट केली आहे.
online अर्ज भरल्यावर बँकेद्वारे आलेल्या अपडेट नुसार भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे, हि परीक्षा online स्वरुपात असणार आहे. त्यामुळे उमेदवाराकडे इंटरनेट असणे अनिवार्य आहे, सोबतच कॉम्पुटर किंवा Laptop तर आवश्यक आहेतच.
परीक्षा झाल्यावर उमेदवाराची चाचणी घेतली जाणार आहे, यामध्ये मुलाखत आणि कागदपत्रे पडताळणी समाविष्ट असणार आहे. जे उमेदवार या सर्व प्रक्रियेतून पात्र होतील पास होतील त्यांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी निवडले जाईल.
Central Bank of India Apprentice Bharti FAQ
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरतीसाठी एकूण तब्बल 3000 पेक्षा जास्त रिक्त जागा आहेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची आहे, अर्ज करण्याची सविस्तर माहिती लेखामध्ये दिली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्यासाठी 27 मार्च, 2024 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
2 thoughts on “सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी बंपर भरती! तब्बल 3000+ रिक्त जागा | Central Bank of India Apprentice Bharti 2024”