CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा

CCRAS Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी चालून आली आहे. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) या भारत सरकारच्या अखत्यारीतील संस्थेमार्फत 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत 394 रिक्त पदांवर भरती होणार आहे, जी 26 वेगवेगळ्या पदांमध्ये विभागली गेली आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून 10वी, 12वी किंवा ITI उत्तीर्ण, पदवीधर असणं आवश्यक आहे. उमेदवार त्याच्या पात्रतेनुसार योग्य पदासाठी अर्ज करू शकतात. ही भरती विविध प्रकारच्या प्रशासनिक, तांत्रिक आणि सहाय्यक पदांसाठी आहे.

या नोकऱ्या केवळ पगारापुरत्या मर्यादित नाहीत, तर केंद्र शासनाच्या सेवेमुळे अनेक सेवा सुविधा, भत्ते आणि Future Financial Security असे सर्व फायदे उमेदवारांना मिळणार आहे. याशिवाय ही भरती प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार असल्यामुळे कोणताही अर्ज ऑफलाइन पाठवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्हाला घरबसल्या सहज अर्ज करता येणार आहे.

या CCRAS भरती 2025 संदर्भातील सविस्तर माहिती – पदांची नावे, शैक्षणिक अट, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया आणि अर्जाची लिंक – सर्व काही खाली दिलेल्या लेखात स्पष्ट करून सांगितले आहे. त्यामुळे लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुमचा अर्ज वेळेत भरून घ्या.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

CCRAS Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

विवरणमाहिती (Details)
भरतीचे नावCCRAS Bharti 2025 (केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद भरती)
भरती करणारी संस्थाCCRAS – Central Council for Research in Ayurvedic Sciences
एकूण पदसंख्या394 जागा
शैक्षणिक पात्रता10वी / 12वी / ITI / संबंधित पात्रता पदानुसार
अर्ज प्रक्रियाऑनलाइन (Online)
अर्ज फी300 रु. ते 1500 रु. (पदा नुसार भिन्न)
वेतन श्रेणी39100 रुपया पर्यंत (पदानुसार कमी जास्त)
वयोमर्यादाकिमान 18 वर्षे (कमाल वयोमर्यादा पदानुसार)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत (All India Level)
अधिकृत वेबसाइटwww.ccras.nic.in

CCRAS Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावGroupपद संख्या
1रिसर्च ऑफिसर (Pathology)A01
2रिसर्च ऑफिसर (Ayurveda)A15
3असिस्टंट रिसर्च ऑफिसर (Pharmacology)B04
4स्टाफ नर्सB14
5असिस्टंटB13
6ट्रान्सलेटर (Hindi Assistant)B02
7मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्टB15
8रिसर्च असिस्टंट (Chemistry)C05
9रिसर्च असिस्टंट (Botany)C05
10रिसर्च असिस्टंट (Pharmacology)C01
11रिसर्च असिस्टंट (Organic Chemistry)C01
12रिसर्च असिस्टंट (Garden)C01
13रिसर्च असिस्टंट (Pharmacy)C01
14स्टेनोग्राफर ग्रेड-IC10
15स्टॅटिस्टिकल असिस्टंटC02
16उच्च श्रेणी लिपिक (UDC)C39
17स्टेनोग्राफर ग्रेड-IIC14
18निम्न श्रेणी लिपिक (LDC)C37
19फार्मासिस्ट (Grade-1)C12
20ऑफसेट मशीन ऑपरेटरC01
21लायब्ररी लिपिकC01
22ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्टC01
23लॅबोरेटरी अटेंडंटC09
24सिक्युरिटी इन्चार्जC01
25ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडC05
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)C179
Total394

Postwise Salary:

CCRAS Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1रिसर्च ऑफिसर (Pathology)MD (Pathology)
2रिसर्च ऑफिसर (Ayurveda)MD/MS (Ayurveda)
3असिस्टंट रिसर्च ऑफिसर (Pharmacology)M.Pharm (Pharmacology) / M.Pharm (Ay) / M.Sc (Medicinal Plant)
4स्टाफ नर्सB.Sc (Nursing) किंवा GNM + 2 वर्षे अनुभव
5असिस्टंटपदवी
6ट्रान्सलेटर (Hindi Assistant)हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी + ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र
7मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्टमेडिकल लॅब सायन्स पदवी + 2 वर्षे अनुभव
8रिसर्च असिस्टंट (Chemistry)M.Sc (Chemistry) / M.Pharm / M.Sc (Medicinal Plant)
9रिसर्च असिस्टंट (Botany)M.Sc (Botany / Medicinal Plants)
10रिसर्च असिस्टंट (Pharmacology)M.Pharm (Pharmacology) / M.Pharm (Ay) / M.Sc (Medicinal Plant)
11रिसर्च असिस्टंट (Organic Chemistry)M.Sc (Organic Chemistry)
12रिसर्च असिस्टंट (Garden)M.Sc (Botany/Medicinal Plants – Pharmacognosy)
13रिसर्च असिस्टंट (Pharmacy)M.Pharm (Pharmaceutics/Pharma Science/QA/Ayurveda)
14स्टेनोग्राफर ग्रेड-I10वी + शॉर्टहँड 120 श.प्र.मि. + टायपिंग 40 श.प्र.मि. + 3 वर्षे अनुभव
15स्टॅटिस्टिकल असिस्टंटसांख्यिकी/गणित पदव्युत्तर पदवी
16उच्च श्रेणी लिपिक (UDC)पदवी
17स्टेनोग्राफर ग्रेड-II10वी + शॉर्टहँड 100 श.प्र.मि. + टायपिंग 40 श.प्र.मि.
18निम्न श्रेणी लिपिक (LDC)12वी + संगणक टायपिंग (इंग्रजी 35 श.प्र.मि., हिंदी 30 श.प्र.मि.)
19फार्मासिस्ट (Grade-I)D.Pharm / D.Pharm (Ay.)
20ऑफसेट मशीन ऑपरेटर10वी + ऑफसेट मशीन प्रमाणपत्र + 3 वर्षे अनुभव
21लायब्ररी लिपिक12वी (विज्ञान) + लायब्ररी सायन्स प्रमाणपत्र + 1 वर्ष अनुभव
22ज्युनियर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट12वी (विज्ञान) + DMLT + 1 वर्ष अनुभव
23लॅबोरेटरी अटेंडंट12वी (विज्ञान) + 1 वर्ष अनुभव
24सिक्युरिटी इन्चार्जपदवी + 3 वर्षे अनुभव
25ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड)10वी + LMV/HMV परवाना + 2 वर्ष अनुभव
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)संबंधित ITI किंवा 10वी उत्तीर्ण

CCRAS Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

पद क्रमांकवयोमर्यादा (Age Limit)
पद क्र.1 आणि 240 वर्षांपर्यंत
पद क्र.3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 20, 2430 वर्षांपर्यंत
पद क्र.735 वर्षांपर्यंत
पद क्र.16, 17, 18, 19, 21, 23, 25, 2627 वर्षांपर्यंत
पद क्र.2228 वर्षांपर्यंत
विवरणवयोमर्यादा सूट
SC/ ST प्रवर्ग5 वर्षे सूट राहील.
OBC प्रवर्ग3 वर्षे सूट राहील.

CCRAS Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद भरती साठी निवड प्रक्रिया हि पदा नुसार वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. यामध्ये Group A, Group B आणि Group C अशा तीन ग्रुप मधील पदांसाठी निवड प्रक्रियेत भिन्नता असणार आहे.

Group A:

  • Computer-Based Test (CBT)
    • हि परीक्षा ऑनलाईन स्वरुपात होणार आहे.
    • याचे एकूण गुण हे 70 असणार आहेत.
    • मेरीट साठी CBT Exam चे गुण विचारात घेतले जाणार आहेत.
SubjectMarks Distribucation
Subject Knowledge70%
Research Methodology15%
General Knowledge, Reasoning, IT and English15%
  • Interview
    • ऑनलाईन लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बोलवले जाईल.
    • मुलाखती साठी एकूण गुण हे 30 असणार आहेत.
    • मेरीट मध्ये मुलाखतीचे गुण देखील विचारात घेतले जाणार आहे.

Group B & C:

  • Computer-Based Test (CBT)
    • हि परीक्षा ऑनलाईन स्वरुपात होणार आहे.
    • याचे एकूण गुण हे 100 असणार आहेत.
    • मेरीट साठी फक्त CBT Exam चे गुण विचारात घेतले जाणार आहेत.
SubjectMarks Distribucation
Subject-Specific Knowledge70%
General Awareness & Reasoning
IT & Computer Applications
English Language
30%

त्यानंतर सर्व ग्रुप मधील पदांसाठी जे उमेदवार पात्र झाले आहेत त्यांना पुढे Document Verification साठी बोलवले जाईल, त्यानंतर मेडिकल टेस्ट होतील या सर्वांमध्ये जे पात्र होतील केवळ त्यांची अंतिम निवड केली जाईल.

After Selection Posting of Candidates:

CCRAS ही एक राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे, त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची Posting भारतभर खालीलप्रमाणे विविध CCRAS अंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये होऊ शकते.

CCRAS च्या अंतर्गत असलेल्या प्रमुख संस्था आणि केंद्रे:

विभाग / संस्थास्थान
National Institute of Ayurveda (NIA)जयपूर (राजस्थान)
Regional Ayurveda Research Institutes (RARIs)नागपूर, भोपाळ, कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, भरुच, गंगटोक इ.
Central Ayurveda Research Institute (CARI)दिल्ली, कोल्हापूर, लखनऊ, त्रिवेंद्रम, पिंपरी (पुणे) इ.
CCRAS Headquartersनवी दिल्ली

✅ म्हणजेच, उमेदवाराची पोस्टिंग महाराष्ट्रासह इतर कोणत्याही राज्यात होऊ शकते.

सिलेक्शन नंतर पोस्टिंग साठी Preference निवडणे:

Preferenceकेंद्राचे नाव
1CARI, कोल्हापूर (महाराष्ट्र)
2CARI, पिंपरी (पुणे)
3RARI, नागपूर
4RARI, भोपाळ
5CARI, लखनऊ / जयपूर
6RARIs, गुवाहाटी / गंगटोक
7CCRAS HQ, नवी दिल्ली

एकदा का तुमच सिलेक्शन झाल कि त्यानंतर तुम्हाला जॉब कुठे करायचा आहे याच Preference तुम्ही भरू शकता. वरील प्रमाणे काही Preference दिलेले आहेत, त्या पैकी तुमच्या आवडीचे Preference तुम्ही प्राधान्यक्रमानुसार निवडू शकता. यामध्ये जर तुम्हाला महाराष्ट्रातच राहून जॉब करायचा असेल तर ते तुम्ही सांगू शकता किंवा जर दुसऱ्या कोणत्या राज्यात तुम्हाला नोकरी करायची आहे ते पण तुम्ही Preference द्वारे CCRAS संस्थेला कळवून तुमच्या सोयीनुसार जॉब लोकेशन तुम्ही मिळवू शकता.

CCRAS Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलDate
Online Registration Start Date01 ऑगस्ट 2025
Last Date for Online Application31 ऑगस्ट 2025

CCRAS Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFNotification वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

CCRAS Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Step 1: सर्वप्रथम CCRAS ची अधिकृत वेबसाईट उघडा –
👉 https://ccras.nic.in किंवा थेट अर्जासाठी https://ccras25.onlineregistrationform.org/

Step 2: वेबसाईटवर ‘Recruitment’ किंवा ‘Apply Online’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

Step 3: नवीन युजर असाल तर “New Registration” वर क्लिक करून तुमचं नाव, ईमेल, मोबाईल नंबर वगैरे भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.

Step 4: नंतर मिळालेल्या Login ID व Password चा वापर करून लॉगिन करा.

Step 5: लॉगिन केल्यानंतर अर्जातील Personal Details, शिक्षणाची माहिती, अनुभव (असल्यास), इत्यादी माहिती भरा.

Step 6: फोटो, सही (Signature) आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Upload करा.

Step 7: नंतर तुमच्या पदानुसार लागणारी अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरा (Debit Card, Credit Card, UPI किंवा Net Banking वापरून).

Step 8: सर्व माहिती नीट तपासून घ्या, माहिती बरोबर असेल तर शेवटी फॉर्म Submit करा.

Step 9: अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट घ्या जेणेकरून पुढे परीक्षेच्या वेळी, निवड प्रक्रियेत त्याची गरज तुम्हाला पडेल.

इतर भरती

BSF Sports Quota Bharti 2025: 10वी पास खेळाडूंना संधी! सीमा सुरक्षा दलात 241 जागांसाठी भरती! 69,000 पर्यंत पगार! अर्ज लगेच करा!

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदासाठी भरती! पगार रु.80,000 पर्यंत, लगेच फॉर्म भरा

BARTI Free Police Bharti Training 2025: पोलीस भरती मोफत ट्रेनिंग प्रोग्राम बार्टी मार्फत आणि 72,000 रु. आर्थिक मदत, महिना 10 हजार ! Apply Online

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

CCRAS Bharti 2025 – 26: FAQ

CCRAS Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

26 वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, सर्व पदांची नावे वर आर्टिकल मध्ये नमूद केली आहेत.

CCRAS Bharti 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 394 आहेत.

CCRAS Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 ऑगस्ट 2025 आहे.

CCRAS Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि पदा नुसार भिन्न आहे, यात ऑनलाईन परीक्षा, मुलाखत, कागदपत्रे तपासणी आणि मेडिकल टेस्ट हे सर्व समाविष्ट आहेत.

Leave a comment