भारतीय सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF Bharti 2024 निघाली आहे, जे उमेदवार आर्मी मध्ये जाण्यासाठी तयारी करत आहेत, त्यांच्या साठी ही एक मोठी सुवर्णसंधी असणार आहे.
Border Security Force, BSF Recruitment 2024 ही 10 वी पास, ITI आणि संबंधित डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी असणार आहे. उमेदवारांना काही वर्षांचा अनुभव देखील आवश्यक आहे, पदा नुसार निकष हे वेगवेगळे आहेत.
BSF Bharti 2024 साठी एकूण रिक्त जागा या 82 आहेत, ज्या 10 वेगवेगळ्या पदांमध्ये विभागलेल्या आहेत. यामधे सर्वात जास्त रिक्त जागा या हेड कॉन्स्टेबल, आणि कॉन्स्टेबल या पदासाठी आहेत.
BSF भरती मध्ये उमेदवारांची निवड ही वेगवेगळ्या Phase मध्ये होणार आहे. एकूण Phase या तीन आहेत, जे उमेदवार तिन्ही टप्पे पूर्ण करून पास होतील त्यांना मेरिट लिस्ट द्वारे रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे.
या भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 असणार आहे. एकदा मुदत संपली की नंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
भारतीय सीमा सुरक्षा दल भरती 2024
BSF भरती साठी लेखी परीक्षा असणार आहे, सोबतच इतर काही Phase देखील असणार आहेत. जरी उमेदवार सर्व Phase मधून पास झाला असेल, तरी देखील अशा उमेदवारास नोकरी मिळेल याची हमी नाहीये, उमेदवारांची निवड ही पूर्णपणे मेरिट वर असणार आहे. पूर्ण Over-all ज्यांना जास्त मार्क पडले आहेत, त्यांचीच निवड केली जाणार आहे.
BSF Bharti 2024 Highlights
भरतीचे नाव | BSF Bharti 2024 |
पदाचे नाव | एकूण 10 पद आहेत, त्यांची माहिती खाली Vacancy Details मध्ये दिली आहे. |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 1,12,400 रुपये प्रति महिना (वेतन श्रेणी पदा नुसार वेगवेगळी आहे) |
वयाची अट | 18 ते 30 वर्षे (पदा नुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे) |
परीक्षा फी | 100 रुपये (मागासवर्गीय उमेदवारांना फी माफ करण्यात आली आहे.) |
BSF Bharti Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
हेड कॉन्स्टेबल (Works) | 13 |
ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर (Electrical) | 09 |
हेड कॉन्स्टेबल (Plumber) | 01 |
हेड कॉन्स्टेबल (Carpenter) | 01 |
कॉन्स्टेबल (Generator Operator) | 13 |
कॉन्स्टेबल (Generator Mechanic) | 14 |
कॉन्स्टेबल (Lineman) | 09 |
असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | 08 |
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | 11 |
कॉन्स्टेबल (Storeman) | 03 |
Total | 82 |
एकूण 10 पदांसाठी 82 रिक्त जागांची भरती निघाली आहे, तीन वेगवेगळ्या Part मध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
BSF Bharti Post Wise salary
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
---|---|
हेड कॉन्स्टेबल (Works) | 35,400 – 1,12,400 रू. महिना |
ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर (Electrical) | 35,400 – 1,12,400 रू. महिना |
हेड कॉन्स्टेबल (Plumber) | 25,500 – 81,100 रू. महिना |
हेड कॉन्स्टेबल (Carpenter) | 25,500 – 81,100 रू. महिना |
कॉन्स्टेबल (Generator Operator) | 21,700 – 69,100 रू. महिना |
कॉन्स्टेबल (Generator Mechanic) | 21,700 – 69,100 रू. महिना |
कॉन्स्टेबल (Lineman) | 21,700 – 69,100 रू. महिना |
असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | 29,200 – 92,300 रू. महिना |
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | 29,200 – 92,300 रू. महिना |
कॉन्स्टेबल (Storeman) | 21,700 – 69,100 रू. महिना |
BSF Bharti Educational Qualification
पदा नुसार शैक्षणिक पात्रता निकष हे वेगवेगळे आहेत, साधारण पणे उमेदवार हा किमान 10 वी पास असावा, आणि त्याने संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा, सोबत काही पदासाठी डिप्लोमा आवश्यक आहे.
- पद क्र.1: सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.
- पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा.
- पद क्र.3: 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + ITI (Electrician/Wireman/Diesel/Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: 10वी उत्तीर्ण + ITI (Diesel/ Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: 10वी उत्तीर्ण + ITI (Electrical Wireman /Lineman) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: संबंधित डिप्लोमा.
- पद क्र.9: संबंधित डिप्लोमा.
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
BSF Bharti Physical Qualifaction
पुरुष | महिला | |
---|---|---|
उंची | 168 सेमी | 157 सेमी |
छाती | 80 सेमी | लागू नाही |
वजन | उंची आणि छाती नुसार | उंची आणि छाती नुसार |
BSF Bharti Age Limit
भरतीसाठी वयाची अट ही पदा नुसार भिन्न आहे, ज्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल त्यासाठी दिलेली वयोमर्यादा जाणून घेणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही त्या पदासाठी Age Limit Qualification मध्ये पात्र नसाल, तर तुम्हाला BSF भरती साठी अर्ज करता येणार नाही.
- पद क्र.1 & 2: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.3 ते 7: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.8 & 9: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.10: 20 ते 25 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा निकषात सूट देण्यात आली आहे, त्यामध्ये SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट आहे, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
BSF Bharti Application Form
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 मार्च, 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 15 एप्रिल, 2024 |
Online Application Process
- भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी सुरुवातीला अधिकृत संकेतस्थळाला भेटा द्या.
- साईट वर OTR One Time Registation करून तुमची नोंदणी करून घ्या.
- नंतर BSF भरतीचा फॉर्म ओपन होईल, तो तुम्हाला काळजीपुर्वक भरून घ्यायचा आहे.
- ऑनलाईनच भरतीची परीक्षा फी भरायची आहे, केवळ 100 रुपये फी आहे, Open, EWS आणि OBC प्रवर्गासाठी फी भरणे अनिवार्य आहे. इतर कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना फी असणार नाही.
- फी भरून झाल्यावर, तुम्ही BSF भरतीचा अर्ज सबमिट करू शकता. फॉर्म सबमिट केला की तुमचा अर्ज BSF करियर विभागाकडे सादर होईल.
BSF Bharti Important Links
जाहिरात डाऊनलोड करा
पद क्रमांक 1 ते 2 | जाहिरात डाऊनलोड करा |
पद क्रमांक 3 ते 7 | जाहिरात डाऊनलोड करा |
पद क्रमांक 8 ते 10 | जाहिरात डाऊनलोड करा |
BSF Bharti Selection Process
BSF भरती साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, शारिरीक चाचणी, आणि मेडीकल टेस्ट या तीन Phase द्वारे होणार आहे. या तिन्ही टप्प्यात जे उमेदवार पास झाले आहेत, त्या सर्वांची मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे, आणि त्याद्वारे सर्वात जास्त गुण घेणारे पात्र उमेदवार रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहेत.
BSF Bharti Selection Process ही वर सांगितल्या प्रमाणेच पार पडणार आहे, तसेच या Phase वेळीच उमेदवारांची कागदपत्रे देखील पडताळणी केली जाणार आहे. जर कोणतीही चूक आढळून आली, तर अर्जदारावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते, त्यामुळे कोणतीही चुकीची गोष्ट भरती दरम्यान करायची नाहीये.
नवीन भरती जॉब अपडेट:
- सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये 10 वी, ITI पास वर भरती सुरू! लगेच फॉर्म भरा
- 10 वी, ITI पास वर, रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 20200 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा
BSF Bharti FAQ
BSF भरती साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?
BSF Recruitment साठी एकूण रिक्त जागा या केवळ 82 आहेत.
BSF भरती साठी अर्ज कसा करायचा?
अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे, त्याची सविस्तर प्रक्रिया वर आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
BSF भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख ही 15 एप्रिल, 2024 आहे.
Electrician job chahiye puzhe