BARTI Free Police Bharti Training: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल, पण योग्य मार्गदर्शन, शारीरिक प्रशिक्षण किंवा आर्थिक अडचणींमुळे तुम्हाला जर तयारी योग्य प्रकारे करता येत नसेल, तर ही संधी फक्त तुमच्यासाठी आहे. सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता BARTI आणि ARTI संस्था तुम्हाला मदत करणार आहेत. त्यांनी एक विशेष मोफत प्रशिक्षण योजना सुरू केली आहे जी अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी खास राबवण्यात येत आहे.
BARTI Free Police Bharti Training योजनेचा उद्देश म्हणजे SC प्रवर्गातील गरजू आणि पात्र उमेदवारांना पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण कोणत्याही चार्ज शिवाय विनामूल्य उपलब्ध करून देणं. यात शारीरिक सराव, लेखी परीक्षेचं मार्गदर्शन, मुलाखतीची तयारी यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त एकच काम – मेहनत – करायची! आणि नोकरी मिळवायची!
याशिवाय BARTI Free Police Bharti Training योजनेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना दर महिन्याला ₹10,000 मानधन (स्टायपेंड) दिलं जातं, जे एकूण 6 महिन्यांच्या प्रशिक्षणात ₹60,000 इतकं होतं. यासोबतच साहित्य खर्चासाठी शेवटी एकदाच ₹12,000 अनुदान दिलं जातं. म्हणजे एकूण मिळणारी आर्थिक मदत ₹72,000 पर्यंत आहे, जी थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे एकप्रकारे प्रशिक्षण घेताना देखील तुमच्यावर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक ताण येणार नाही.
ही संधी केवळ मोफत प्रशिक्षणाची नाही, तर स्वप्नपूर्तीची पहिली पायरी आहे. यामध्ये सहभागी होऊन अनेक विद्यार्थी यशस्वीरीत्या पोलीस, होमगार्ड, SRPF भरतीत निवडले गेले आहेत. त्यामुळे जर तुमचंही स्वप्न शासकीय पोलीस सेवेत जाण्याचं असेल, तर ही योजना तुमच्यासाठी हि एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचून घ्या आणि लगेच फॉर्म भरून टाका.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
BARTI Free Police Bharti Training 2025
घटक | माहिती |
---|---|
योजनेचं नाव | BARTI / ARTI मोफत पोलीस भरती पूर्व‑प्रशिक्षण योजना 2025 |
पात्रता | अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील उमेदवार |
राज्य | महाराष्ट्रातील रहिवासी असणे अनिवार्य |
शैक्षणिक पात्रता | 12वी पास |
प्रशिक्षण कालावधी | 6 महिने (अनिवासी) |
स्टायपेंड (मानधन) | दर महिन्याला ₹10,000 × 6 महिने = ₹60,000 |
साहित्य अनुदान | एकदाच ₹12,000 प्रशिक्षण साहित्यासाठी |
एकूण लाभ | ₹60,000 + ₹12,000 = ₹72,000 पर्यंत थेट आर्थिक मदत |
प्रशिक्षणात काय शिकवतात | ग्राउंड, लेखी परीक्षेचा अभ्यास, मुलाखत तयारी |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज – http://barti.maharashtra.gov.in |
प्रशिक्षण केंद्र | पुणे, छत्रपती संभाजीनगर व इतर ठिकाणी BARTI / ARTI मान्यताप्राप्त केंद्रांवर |
BARTI Free Police Bharti Training 2025 Eligibility Criteria पात्रता निकष
इच्छुक उमेदवारांना संस्थे द्वारे ठरवून दिलेले निकष हे पूर्ण करणे आवश्यक आहे, पात्रता निकष मध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा असे काही निकष आहेत ते पुढीलप्रमाणे –
शैक्षणिक पात्रता निकष – अर्जदार उमेदवार हा किमान 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेला असावा.
वयाची अट – उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षा दरम्यान असावे.
या BARTI Free Police Bharti Training साठी फक्त मागासवर्गीय SC प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात.
BARTI Free Police Bharti Training 2025 Benefits लाभ कोण कोणते मिळणार?
या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये उमेदवारांना 72 हजार रुपये मानधन दिल जाणार आहे, जेणेकरून अर्जदार विद्यार्थी चांगल्या प्रकारे पोलीस भरतीची तयारी करू शकतील आणि नोकरी मिळवू शकतील.
तपशील | आर्थिक मदत |
---|---|
प्रती महिना | 10 हजार रुपये (6 महिन्यासाठी) |
एकूण स्टायपेंड | 60,000 रुपये |
एकदाच साहित्य घेण्यासाठी अनुदान | 12,000 रुपये |
एकूण मदत | 72,000 रुपये |
BARTI Free Police Bharti Training 2025 Apply Online ऑनलाईन अर्ज फॉर्म कसा भरायचा?
✅ Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- BARTI च्या या प्रशिक्षणासाठी अर्ज खालील अधिकृत वेबसाईटवरून करता येईल:
- 👉 https://cpetp.barti.in
✅ Step 2: नाव नोंदणी (New Registration) करा
- “New Registration” किंवा “Apply Online” या लिंकवर क्लिक करा.
- तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख इत्यादी माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
- नोंदणीनंतर तुम्हाला Registration ID आणि Password मिळेल.
✅ Step 3: लॉगिन करा आणि अर्ज भरा
- मिळालेल्या ID आणि Password चा वापर करून लॉगिन करा.
- त्यानंतर अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र, शारीरिक मापदंड इत्यादी माहिती भरावी.
✅ Step 4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
फॉर्म भरताना खालील स्कॅन कागदपत्रे अपलोड करा:
- पासपोर्ट साईझ फोटो (JPEG – 50 KB पेक्षा कमी)
- स्वाक्षरी (Signature) (JPEG – 20 KB पेक्षा कमी)
- जात प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, शिक्षण प्रमाणपत्रे (PDF/JPEG स्वरूपात)
✅ Step 5: प्रशिक्षण केंद्र निवडा
- उपलब्ध असलेल्या यादीतून तुम्हाला हवे असलेले प्रशिक्षण केंद्र (Training Centre) निवडा.
✅ Step 6: अर्ज Final Submit करा आणि प्रिंटआउट काढा
- संपूर्ण माहिती नीट तपासून घ्या आणि मग त्यानंतर Final Submission करा.
- अर्ज सबमिट झाल्यावर फॉर्मची प्रिंटआउट काढा.
थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही BARTI Free Police Bharti Training 2025 Apply Online प्रोसेस पूर्ण करू शकता, अगदी सोपी अशी प्रक्रिया आहे तुम्हाला फक्त वर दिलेल्या स्टेप फॉलो करायच्या आहेत बाकी इतर काही पण करण्याची गरज नाही. योग्य प्रकारे फॉर्म भरला म्हणजे तुम्हाला नक्कीच BARTI द्वारे मोफत स्वरुपात पोलीस भरतीची ट्रेनिंग मिळेल.
BARTI Free Police Bharti Training Selection Process निवड प्रक्रिया
या मोफत प्रशिक्षणासाठी निवड प्रक्रिया हि सामायिक प्रवेश परीक्षा, शैक्षणिक पात्रता, आरक्षण या अशा टप्प्यामध्ये असणार आहे. केवळ पात्र उमेदवारच हे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.
- सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET)
- शैक्षणिक अहर्ता
- आरक्षण
- अंतिम निवड
या BARTI Free Police Bharti Training साठी अंतिम निवड हि सर्वस्वी (Common Entrance Test-CET) च्या प्राप्त गुणांवर असणार आहे, ज्या उमेदवाराला सर्वाधिक गुण त्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य असणार आहे. या सोबत अंतिम निवडीचे पूर्ण अधिकार हे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सनियंत्रण आणि अंमलबजावणी समिती कडे असणार आहे.
इतर भरती
BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!
BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!
ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!
Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!
NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !
BARTI Free Police Bharti Training FAQ
BARTI Free Police Bharti Training योजना कोणासाठी आहे?
ही योजना केवळ अनुसूचित जातीतील (SC) उमेदवारांसाठी आहे.
BARTI Free Police Bharti Training या प्रशिक्षणासाठी अर्ज कसा करायचा?
अर्ज BARTI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.
BARTI Free Police Bharti Training अंतर्गत किती रुपये मिळणार?
या प्रशिक्षणासाठी उमेदवारांना प्रती महिना स्टायपेंड 10 हजार रुपये मिळणार आहे, एकूण लाभ हा 72 हजार रुपयाचा असणार आहे.
BARTI Free Police Bharti Training साठी निवड कशी होते?
या प्रशिक्षणासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET), शैक्षणिक अहर्ता, आरक्षण, अंतिम निवड अशी निवड प्रक्रिया आहे.