Bank of India Bharti 2024: बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. बँकेमार्फत या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकूण 143 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज सुरू झाले आहेत, ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरता येणार आहेत.
बँकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना, या भरतीचा मोठा फायदा मिळणार आहे. जे उमेदवार पदवीधर आहेत, त्यांना भरतीसाठी प्राधान्य मिळणार आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल, तर या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या. आणि त्यानुसार दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करा.
बँक ऑफ इंडिया भरती 2024
बँक ऑफ इंडिया भरती साठी वर सांगितल्या प्रमाणे एकूण रिक्त जागा या 143 आहेत, ज्या 13 वेगवेगळ्या पदांसाठी विभागल्या गेल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त रिक्त जागा या लॉ ऑफिसर, सिनियर मॅनेजर आणि क्रेडिट ऑफिसर या पदासाठी आहेत.
भरती ही बँकेद्वारे राबवली जाणार आहे, रिक्त जागांवर ज्या उमेदवारांची निवड केली जाईल, त्यांना त्यांच्या Performence वर नोकरी मिळणार आहे. जर उमेदवार जास्त Productivity ने काम करत नसेल तर अशा उमेदवारांना नोकरी वरून काढून देखील टाकले जाते.
Bank of India Bharti 2024 Highlights
पदाचे नाव | एकूण पदे हे 13 आहेत, सर्वांची माहिती तुम्ही Vacancy Details या Section मध्ये पाहू शकता. |
रिक्त जागा | 143 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 69,294 रुपये प्रति महिना (वेतन श्रेणी पदा नुसार भिन्न आहे) |
वयाची अट | 21 ते 40 वर्षे |
परीक्षा फी | Open, OBC साठी 850 रुपये. [मागासवर्गीय उमेदवारांना 175 रुपये फी] |
Bank of India Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
क्रेडिट ऑफिसर | 25 |
चीफ मॅनेजर | 09 |
लॉ ऑफिसर | 56 |
डाटा सायंटिस्ट | 02 |
ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर | 02 |
डेटा बेस एडमिन | 02 |
डेटा क्वालिटी डेव्हलपर | 02 |
डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट | 02 |
प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट | 02 |
ओरॅकल एक्साडेटा एडमिन | 02 |
सिनियर मॅनेजर | 35 |
इकोनॉमिस्ट | 01 |
टेक्निकल एनालिस्ट | 01 |
Total | 143 |
Bank of India Bharti 2024 Educational Qualification
बँक ऑफ इंडिया भरती साठी शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे असणार आहे:
- उमेदवार हा पदवी प्राप्त, पदव्युत्तर पदवी धारक असावा.
- उमेदवाराने CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA यापैकी कोणताही कोर्स किंवा डिप्लोमा केलेला असावा.
दोन्ही निकषापैकी कोणताही एक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे, दिलेल्या निकषात जे पद किंवा रिक्त जागा येतील त्यानुसार उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
Bank of India Bharti 2024 Age Limit
बँक ऑफ इंडिया भरतीसाठी वयाची अट ही वेगवेगळी आहे, यामध्ये उमेदवाराचे वय हे प्रवर्ग आणि इतर बाबी विचारात घेऊन ठरवले जाते. यामधे उमेदवार हा दिनांक 01 फेब्रुवारी, 2024 या तारखेपर्यंत 21 ते 40 वर्षे वयाचा असावा. मागासवर्गीय उमेदवारांना Age Limit मध्ये सूट देण्यात आली आहे, त्याची माहिती खाली आहे.
- SC प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट – 21 ते 45 वर्षे
- ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट – 21 ते 45 वर्षे
- OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट – 21 ते 43 वर्षे
Bank of India Bharti 2024 Application Form
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 27 मार्च, 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 10 एप्रिल, 2024 |
Online Application Process
- IBPS द्वारे बँक ऑफ इंडिया भरती होणार आहे, त्यासाठी तुम्हाला अधिकृत https://ibpsonline.ibps.in/boiomarc24/ वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाईट वर गेल्यावर सुरुवातीला तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यावी लागेल, त्यांनतर तुमच्या समोर भरतीचा अर्ज येईल, तो पण तुम्हाला भरायचा आहे.
- विचारलेली सर्व माहिती फॉर्म मध्ये टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
- परीक्षा फी भरणे देखील अनिवार्य आहे, Open, OBC साठी 850 रुपये फी भरायची आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना फक्त 175 रुपये एवढीच फी भरायची आहे.
- फी भरून झाल्यावर एकदा अर्ज तपासून तो तुम्हाला शेवटी Submit करता येतो. अशा प्रकारे तुमचा अर्ज बँक ऑफ इंडिया कडे सादर होईल.
Bank of India Bharti 2024 Important Links
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
अधिसूचना जाहिरात | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
Bank of India Bharti 2024 Selection Process
अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची सुरुवातीला पहिल्या स्टेज मध्ये Online Exam घेतली जाते. यामधे जे उमेदवार पास होतील, त्यांना मुलाखती साठी बोलावले जाईल.
जे उमेदवार मुलाखती मध्ये उत्तीर्ण होतील, त्यांची मेरिट लिस्ट काढली जाणार आहे. ज्यांचे नाव या मेरिट लिस्टमध्ये आले आहे, त्यांना त्यांच्या गुणवत्ते नुसार रिक्त जागेवर निवडले जाणार आहे.
यादरम्यान उमेदवारांची कागदपत्रे देखील तपासली जाणार आहेत, म्हणजे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. जे उमेदवार या पडताळणी निकषात पास झाले नाहीत, त्यांना डॉक्युमेंट लवकरात लवकर सादर करणे बंधनकारक असते. ज्या उमेदवाराने डॉक्युमेंट सादर केले नाही त्यांना भरतीसाठी रिक्त जागेवर निवडले जाणार नाही.
नवीन बँक भरती जॉब अपडेट:
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी बंपर भरती! तब्बल 3000+ रिक्त जागा
- इंडिया पोस्ट बँकेत भरती सुरू! 30,000 रू. महिना पगार, मोठी संधी, अर्ज करा
Bank of India Bharti 2024 FAQ
How to Apply For Bank of India Bharti?
बँक ऑफ इंडिया भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सुरू झाले आहेत. त्याची सविस्तर माहिती वर दिली आहे.
What is the last date of Bank of India Bharti?
बँक ऑफ इंडिया भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 एप्रिल, 2024 आहे.
How many vacancies are there for Bank of India Bharti?
एकूण 143 रिक्त जागांसाठी बँक ऑफ इंडिया मध्ये भरती निघाली आहे.
1 thought on “बँक ऑफ इंडिया भरती! पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा | Bank of India Bharti 2024”