Assam Rifles Bharti 2026 ही 10वी पास उमेदवारांसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी आहे. आसाम राइफल्समध्ये नोकरी मिळवायची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही भरती खास आहे. विशेष म्हणजे ही भरती खेळाडू उमेदवारांसाठी आहे, त्यामुळे ज्यांना क्रीडा क्षेत्राचा अनुभव आहे त्यांनी नक्की अर्ज करावा.
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे ₹30,000 पगार मिळणार आहे. सरकारी नोकरी असल्यामुळे पगारासोबतच इतर भत्ते, सुविधा आणि सुरक्षित भविष्य देखील मिळते. देशसेवेची संधी आणि स्थिर नोकरी दोन्ही एकाच ठिकाणी मिळतात.
Assam Rifles Bharti 2026 साठी किमान शैक्षणिक पात्रता 10वी पास ठेवण्यात आलेली आहे. तसेच उमेदवार खेळाडू असणे आवश्यक आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पगार, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत दिली आहे. भरतीची संधी सोडू नका, वेळेत अर्ज करा आणि Assam Rifles मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Assam Rifles Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | आसाम राइफल्स |
| भरतीचे नाव | Assam Rifles Bharti 2026 |
| पदाचे नाव | रायफलमन/ रायफल-वूमन |
| रिक्त जागा | 95 |
| वेतन | 30,000 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | 10वी पास + खेळाडू |
| वयोमर्यादा | 18 ते 23 वर्षे |
| अर्जाची फी | 100 रु. |
| अर्ज प्रक्रिया | Online |
Assam Rifles Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू] | 95 |
Assam Rifles Bharti 2026: Exam Fees (परीक्षा फी)
| General/OBC | ₹100 |
| SC/ST/महिला | फी नाही |
Assam Rifles Bharti 2026: Age Limit (वयोमर्यादा)
| सर्वसाधारण प्रवर्ग | 18 ते 23 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
Assam Rifles Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| शैक्षणिक पात्रता | उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा. |
| क्रीडा पात्रता | उमेदवार कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा/ राष्ट्रीय स्पर्धा/ आंतर-विद्यापीठ स्पर्धा/ राष्ट्रीय क्रीडा/ शालेय खेळ/ खेलो इंडिया विद्यापीठ खेळ/ खेलो इंडिया युवा खेळ/ खेलो इंडिया हिवाळी खेळांमध्ये सहभागी झालेला असावा. |
Assam Rifles Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PST/PET)
| उमेदवार गट | पुरुष उंची | महिला उंची | छाती (पुरुष) |
|---|---|---|---|
| सर्वसाधारण (All India) | 170 से.मी. | 157 से.मी. | 80 से.मी. (+5 से.मी.) |
| अनुसूचित जमाती (ST) | 162.5 से.मी. | 150 से.मी. | 76 से.मी. (+5 से.मी.) |
| ईशान्य राज्यातील ST | 157 से.मी. | 147.5 से.मी. | 76 से.मी. (+5 से.मी.) |
| LWE प्रभावित जिल्हे (ST) | 160 से.मी. | 147.5 से.मी. | 76 से.मी. (+5 से.मी.) |
| गढवाली, कुमाऊनी, डोगरा, मराठा, आसाम, J&K, HP, लडाख | 165 से.मी. | 155 से.मी. | 78 से.मी. (+5 से.मी.) |
| ईशान्य राज्य (AR, MN, ML, MZ, NL, SK, TR) | 162.5 से.मी. | 152.5 से.मी. | 77 से.मी. (+5 से.मी.) |
For All India (Except Ladakh Region)
| उमेदवार | रनिंग | वेळ |
|---|---|---|
| पुरुष | 5 km | 24 मिनिटे |
| महिला | 1.6 km | 8.30 मिनिटे |
For Ladakh Region Only
| उमेदवार | रनिंग | वेळ |
|---|---|---|
| पुरुष | 1.6 km | 7 मिनिटे |
| महिला | 800 m | 5 मिनिटे |
2) Writeen Exam (लेखी परीक्षा)
| विषय | प्रश्न | गुण | कालावधी |
|---|---|---|---|
| English Language | २५ | २५ | २ तास (१२० मिनिटे) |
| Reasoning Ability | २५ | २५ | |
| Quantitative Aptitude | २५ | २५ | |
| General Awareness | २५ | २५ |
3) Medical Examination
- उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
- मेडिकल तपासणीत डोळ्यांची दृष्टी, रंग ओळखण्याची क्षमता, दात, छाती, हृदय, श्वसन, हाडे-सांधे, वजन-उंची प्रमाण आणि मानसिक आरोग्य तपासले जाते.
- कोणताही गंभीर आजार, दमा, हृदयविकार, मधुमेह, फिट्स, जुनाट त्वचारोग, ऐकण्याची मोठी समस्या किंवा कलर ब्लाइंडनेस असल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो.
- तपासणी Assam Rifles च्या अधिकृत डॉक्टरांकडून केली जाते आणि मेडिकलमध्ये पास झाल्यानंतरच पुढील प्रक्रियेसाठी उमेदवार पात्र ठरतो.
Assam Rifles Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 17 जानेवारी, 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 09 फेब्रुवारी, 2026 |
| परीक्षेची तारीख | फेब्रुवारी ते मे 2026 |
Assam Rifles Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Assam Rifles Bharti 2026: Step-by-Step Application Process
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या – Assam Rifles च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- नवीन नोंदणी (Registration) करा – वेबसाईट वर नाव नोंदणी केली नसेल तर करा.
- लॉगिन करा – नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या ID आणि पासवर्डने लॉगिन करा.
- अर्ज फॉर्म भरा – वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक तपशील नीट भरा.
- कागदपत्रे अपलोड करा – फोटो, सही आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरा – Assam Rifles भरतीसाठी परीक्षा फी (लागू असल्यास) भरा.
- फॉर्म सबमिट करा – सर्व माहिती एकदा तपासून अर्ज सबमिट करा.
- प्रिंट काढा – भरलेल्या अर्जाची प्रिंट किंवा PDF कॉपी सेव्ह करून ठेवा.
इतर भरती अपडेट्स
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Assam Rifles Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
रायफलमन/ रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू] पदासाठी हि भरती केली जात आहे.
Assam Rifles Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा 95 आहेत.
Assam Rifles Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 09 फेब्रुवारी 2026 आहे.
Assam Rifles Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि शारीरिक पात्रता, लेखी परीक्षा, मेडिकल तपासणी च्या माध्यमातून होणार आहे.
Assam Rifleman Riflewoman पदासाठी वेतन पगार किती आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा 30,000 रु. मिळणार आहे.
