महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जाणाऱ्या Annasaheb Patil Loan Scheme विषयी आजच्या या आर्टिकल मध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच अर्जदार व्यक्तीला किती रुपया पर्यंत, कसे? कर्ज मिळणार याची पण पूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे.
राज्यातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासनाने ही अभिनव अशी Loan Yojana सुरू केली आहे. तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी या Annasaheb Patil Loan Scheme द्वारे तब्बल 50 लाख रुपया पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. यात एक मोठी विशेष बाब म्हणजे व्याज स्वरूपात एक रुपया देखील घेतला जाणार नाही, 0% व्याज दरावर बिनव्याजी कर्ज शासन देणार आहे.
तुम्ही जर कोणताही व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर तुम्हाला या योजनेद्वारे कर्ज मिळणार आहे. योजनेचा लाभ कसा घ्यायचा? अर्ज कसा करायचा? कोणते व्यक्ती पात्र असणार आहेत? अशी सर्व माहिती आपण खाली सविस्तरपणे पाहणार आहोत.
Annasaheb Patil Loan Scheme In Marathi
योजनेचे नाव | Annasaheb Patil Loan Scheme |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
उद्देश | तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कर्ज देणे |
फायदा | 10 ते 50 लाख रुपये कर्ज |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील तरुण नागरिक |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://udyog.mahaswayam.gov.in/ |
Annasaheb Patil Loan Scheme Qualification Details
आण्णासाहेब पाटील कर्ज योजना साठी कोणते व्यक्ती पात्र असणार? पात्रता निकष पुढीलप्रमाणे:
- अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- पुरुष उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 50 वर्षे असावे.
- महिला उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 55 वर्षे असावे.
- पुरुष महिला उमेदवार अर्जदार हे मराठा समाजातील असावेत.
Annasaheb Patil Loan Scheme Benifits
- तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आगोदरचा व्यवसाय असेल तर तो वाढवण्यासाठी त्याचा विस्तार करण्यासाठी 10 लाख ते 50 लाख रुपया पर्यंत कर्ज मिळणार आहे.
- अर्जदाराला मिळणारे कर्ज हे मंडळाद्वारे बिनव्याजी दिले जाणार आहे, आणि कर्जावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा द्वारे परतफेड केले जाणार आहे.
- जर उमेदवाराने दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केली, किंवा मुदतीमध्ये हप्ते भरले तर व्यक्तीला कर्जावरील व्याजाची 12% रक्कम मिळणार आहे, सोबतच ही रक्कम लाभार्थी अर्जदाराच्या बँक खात्यावर दर महिन्याला जमा देखील केली जाणार आहे.
या नागरिकांना मिळणार महिन्याला 600 रुपये! संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र 2024
Annasaheb Patil Loan Scheme Documents
अधिकृत वेबसाईटवर अर्ज करताना लागणारी कागदपत्रे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्डची प्रत
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- कास्ट सर्टिफिकेट
- अर्जदाराचा फोटो
- चालू मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- व्यवसाय अहवाल
बँकेतून लोन घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- लाईट बिल
- शिधापत्रिका
- व्यवसाय सुरू करण्यासाठी License
- बँक खाते स्टेटमेंट
- बँकेचा Cibil Score
- व्यवसाय अहवाल
- व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र
हप्ते वेळेत भरल्यावर व्याज परताव्यासाठी लागणारी कागदपत्रे:
- बँकेचे Loan Approval Latter
- बँक खात्याचे स्टेटमेंट
- व्यवसाय सुरू करण्यासाठी License
- व्यवसाय अहवाल
- व्यवसायाचा फोटो
Annasaheb Patil Loan Scheme Application Process
- सुरुवातीला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत @udyog.mahaswayam.gov.in या पोर्टल ला भेट द्या.
- साईट वर गेल्यावर तेथे तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, त्यासाठी जी माहिती विचारली आहे, ती माहिती भरा, आणि साईट वर लॉगिन करा.
- त्यानंतर Home Page वरील अर्ज करण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा, तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. तेथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे, सोबत जी माहिती विचारली आहे, ती माहिती देखील टाकायची आहे.
- फॉर्म मध्ये व्यवसायाची संपूर्ण माहिती टाकणे आवश्यक आहे, सोबतच जी कागदपत्रे विचारली आहे, ती सर्व Soft Copy मध्ये अपलोड करून घ्यायची आहेत.
- अशा रीतीने तुम्ही तुमचा Annasaheb Patil Loan Scheme साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तुम्हाला कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून दिले जाते, जर तुम्ही Annasaheb Patil Loan Scheme साठी रीतसर अर्ज केला असेल, आणि तुम्ही कर्जासाठी पात्र असाल, तर तुम्हाला बँकेतून Loan मंजूर केले जाते.
- केंद्र सरकार देत आहे, स्वस्तात इंटरनेट! नवीन PM वानी Wifi Yojana जाहीर, जाणून घ्या माहिती
- विदेशात शिकण्यासाठी मिळणार 50 लाख रुपये! जाणून घ्या संपूर्ण माहिती
- 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप! 400 रूपया पर्यंत, फायदा घ्या
Annasaheb Patil Loan Scheme FAQ
Who is eligible for Annasaheb Patil Loan Scheme?
महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुण ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, किंवा व्यवसाय वाढवायचा आहे, असे मराठा समाजातील 50-55 वर्षा पर्यंतचे पुरुष आणि महिला पात्र असणार आहेत.
How to Apply for Annasaheb Patil Loan Scheme?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करता येतो, अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.
What is the Benefits of Annasaheb Patil Loan Scheme?
तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 ते 50 लाख रुपया पर्यंत बिनव्याजी व्याज मिळते, सोबत कर्जाचे हप्ते वेळेत भरले तर व्याजाच्या 12% रक्कम लाभार्थी अर्जदाराच्या बँक खात्यावर जमा केली जाते.
2 thoughts on “50 लाख रुपया पर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार! आण्णासाहेब पाटील कर्ज योजना, लगेच फायदा घ्या | Annasaheb Patil Loan Scheme”