एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये 10 वी पास वर भरती! थेट मुलाखत, कोणतीही परीक्षा नाही | AIASL Recruitment 2024

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदासाठी मेगा भरती निघाली आहे, AIASL Recruitment 2024 अंतर्गत एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एकूण 422 रिक्त जागा निघाल्या आहेत, दोन पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. Payment Salary पण चांगली आहे, पहिली गोष्ट म्हणजे या AIASL Recruitment 2024 साठी कोणतीही परीक्षा होणार नाही, मुलाखत घेतली जाणार आहे.

विशेष बाब म्हणजे ही भरती 10 वी पास वर राबवली जात आहे, परंतु पदा नुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अनुभव तसेच स्किल्स असल्या पाहिजेत, हे मात्र अनिवार्य आहे.

AIASL Recruitment 2024

पदाचे नावयूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन/हँडीवूमन
रिक्त जागा422
नोकरीचे ठिकाणचेन्नई
वेतन श्रेणी22,530 ते 24,960 रुपये
वयाची अटउमेदवाराचे वय 28 वर्षा पर्यंत असावे.
भरती फीGeneral/ OBC साठी 500 रुपये फी (बाकी इतरांना फी नाही)

AIASL Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर13024,960
हँडीमन/हँडीवूमन29222,530
Total422

AIASL Bharti 2024 Education Qualification

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती साठी पदा नुसार शिक्षणाची अट देण्यात आली आहे, सोबत पदावर राहून जे काम करायचे आहे, त्याचा अनुभव तसेच स्किल्स देखील असणे आवश्यक आहे.

यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरउमेदवार हा किमान 10 वी पास आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक असावा.
हँडीमन/हँडीवूमनउमेदवार हा किमान 10 वी पास असावा.

AIASL Recruitment 2024 Interview Details

मुलाखतीची तारीख आणि वेळ

DatesTime
पद क्र.102 मे 202409:00 AM ते 12:00 PM
पद क्र.204 मे 202409:00 AM ते 12:00 PM

मुलाखतीचा पत्ता ठिकाण:

Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai-600 043 Land Mark: Near Taj Catering.

AIASL Bharti 2024 Application Form

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDF फॉर्मडाऊनलोड करा

Offline Application Form Apply

  1. जाहिराती मध्ये दिलेला फॉर्म डाऊनलोड करून घ्या.
  2. फॉर्मची प्रिंट आउट काढून घ्या, आवश्यक ती माहिती फॉर्म मध्ये भरा.
  3. भरतीसाठी लागणारे सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडून घ्या, जाहिराती मध्ये कागदपत्रांची लिस्ट दिली आहे.
  4. फॉर्म भरून झाल्यावर एकदा रिचेक करा, तपासून घ्या फॉर्म मध्ये चुका आढळल्यास फॉर्म बाद होऊ शकतो.
  5. भरतीसाठी सांगण्यात आलेली परीक्षा फी भरून घ्या, Open आणि OBC साठी 500 रुपये फी आहे, बाकी कोणालाही फी आकारली जाणार नाही.

अर्जदार उमेदवारांना त्यांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्या तारखेला मुलाखतीसाठी ठरवलेल्या अधिकृत ठिकाणी जायचे आहे. जे उमेदवार मुलाखतीच्या ठिकाणी वेळेत येईल, किंवा उपस्थित असतील केवळ त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.

AIASL Bharti 2024 Selection Process

AIASL Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही पदा नुसार भिन्न स्वरूपात केली जाणार आहे. यामधे दोन्ही पदासाठी Personal Interview देणे अनिवार्य आहे सोबत पद क्रमांक एक साठी उमेदवारांचे Knowledge Check करण्यासाठी एक टेस्ट घेतली जाणार सोबत ड्रायव्हिंग स्किल्स देखील पारखले जाणार आहे.

पद क्रमांक दोन साठी मुलाखती बरोबर शारीरिक टेस्ट देखील घेतली जाणार आहे, यामधे Weight Lifting आणि Running समाविष्ट असणार आहे. जे उमेदवार या निवड प्रक्रियेत पास झाले त्यांना त्यांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्या पदावर Onboard केले जाणार आहे.

या भरती अंतर्गत जे उमदेवार निवडले जाणार, त्यांना 3 वर्षांच्या Contract वर AIASL मध्ये काम करता येणार आहे, जर उमेदवाराचा Performance चांगला असेल तर उमेदवाराचे Contract वाढवले देखील जाणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

AIASL Recruitment 2024 FAQ

How to apply for AIASL Bharti 2024?

AIASL Bharti साठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, भरती मुलाखती द्वारे होणार आहे, अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती लेखात दिली आहे.

Who is eligible for AIASL Bharti 2024?

AIASL Bharti साठी 10 वी पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स धारक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पदा नुसार निकष भिन्न आहेत, एकदा आर्टिकल वाचून घ्या.

What is the monthly salary for AIASL Bharti?

AIASL द्वारे यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी महिन्याला 24,960 रुपये पगार असणार आहे तर हँडीमन/हँडीवूमन पदासाठी महिन्याला 22,530 रुपये वेतन दिले जाणार आहे.

5 thoughts on “एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये 10 वी पास वर भरती! थेट मुलाखत, कोणतीही परीक्षा नाही | AIASL Recruitment 2024”

Leave a comment