Gramsevak Bharti 2025: महाराष्ट्र ग्रामसेवक भरती लवकरच सुरु होणार आहे. राज्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये 1000+ पेक्षा जास्त रिक्त पदे भरण्याची तयारी सुरू असून, ही अधिकृत जाहिरात डिसेंबर 2025 नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.
या भरतीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे 12वी उत्तीर्ण उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि कमी पात्रताधारक तरुणांसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने प्रत्येक उमेदवाराला घरबसल्या अर्ज करणे सोपे जाणार आहे.
ग्रामसेवक पदासाठी मिळणारा पगार 81,100 रुपये पर्यंत असल्यामुळे ही नोकरी आर्थिकदृष्ट्या स्थिर करिअर देणारी मानली जाते. सरकारी नोकरीसोबत मिळणारी सुरक्षितता, भत्ते आणि पदोन्नतीच्या संधीमुळे या पदाकडे अनेक उमेदवारांचे आकर्षण वाढले आहे.
भरती संबंधी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिली आहे, इच्छुक उमेदवारांनी हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा आणि भरतीची तयारी सुरु करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Gramsevak Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन |
| भरतीचे नाव | Gramsevak Bharti 2025 |
| पदाचे नाव | ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) |
| रिक्त जागा | 1000+ |
| कंत्राटी कालावधी | 3 वर्षे |
| कंत्राटी वेतन | 16,000 रु. |
| वेतन | 25,500 ते 81,100 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| शैक्षणिक पात्रता | 12वी पास |
| वयोमर्यादा | सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे |
| अर्जाची फी | माहिती उपलब्ध नाही |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
टीप: ग्रामसेवक भरती मध्ये प्रथम उमेदवाराला कंत्राटी स्वरुपात निवडले जाते, 3 वर्षे सेवा दिल्यांनतर मग उमेदवाराला नियमित ग्रामसेवक पदावर नियुक्त हे करण्यात येत.
Gramsevak Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पदाचे नाव | पद संख्या | कंत्राटी वेतन | नियमित वेतन |
|---|---|---|---|
| ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) | 1000+ जागा | 16,000 रु. | 25,500 ते 81,100 रु. |
Gramsevak Bharti 2025: Age Limit (वयाची अट)
| सामान्य प्रवर्ग | 18 ते 38 वर्षे |
| मागासवर्गीय उमेदवार | 18 ते 43 वर्षे |
| दिव्यांग उमेदवार | 18 ते 45 वर्षे |
| प्रकल्पग्रस्त | 18 ते 45 वर्षे |
| भूकंपग्रस्त | 18 ते 45 वर्षे |
Gramsevak Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पदाचे नाव | पात्रता निकष |
|---|---|
| ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) | अर्जदार हा किमान 60 गुणांसह 12वी पास असावा. किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा (3 वर्षाचा) किंवा BSW पदवी उमेदवाराकडे असावी. समाजसेवेचा आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. सोबतच उमेदवारांना संगणक कोर्स MS-CIT केलेली असणे आवश्यक आहे. |
Gramsevak Bharti 2025: ग्रामसेवक भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- स्वयंघोषणापत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- जन्मदाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रीमिलेयर (चालू वर्षाचे)
- दिव्यांग प्रमाणपत्र
- माजी सैनिक असल्यास प्रमाणपत्र
- खेळाडू प्रमाणपत्र
- अनाथ प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र (महाराष्ट्र राज्याचे)
Gramsevak Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Written Exam –
| विषय (Subject) | प्रश्नसंख्या | गुण | वेळ | विचारले जाणारे मुख्य टॉपिक्स |
|---|---|---|---|---|
| मराठी भाषा | 15 | 30 | – | व्याकरण, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, शब्दयोग, वाक्यरचना, अपठित गद्य |
| इंग्रजी भाषा | 15 | 30 | – | Grammar, Vocabulary, Sentence Formation, Comprehension |
| सामान्य ज्ञान (GK) | 15 | 30 | – | चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, संविधान, पंचायतीराज, ग्रामविकास योजना |
| बुद्धिमत्ता चाचणी (IQ Test) | 15 | 30 | – | Reasoning, Series, Coding-Decoding, गणितीय तर्क, आकृती आधारित प्रश्न |
| तांत्रिक विषय | 40 | 80 | – | – |
| एकूण | 100 | 200 | 2 तास (१२० मिनिटे) | — |
3) Documents Verification –
- लेखी परीक्षा झाली त्यावर अर्जदार उमेदवारांचे मेरीट हे ठरवले जाईल.
- आणि मग पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल.
- यात अर्जदारांचे शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासले जातील.
- काही चुकीचे आढळले तर उमेदवाराचा फॉर्म हा बाद पण होऊ शकतो.
4) Final Merit List –
- अंतिम निवड हि पूर्णपणे लेखी परीक्षेवर अवलंबून असणार आहे.
- परीक्षेत ज्याला जास्त मार्क्स पडले त्यांचे नाव मेरीट लिस्ट मध्ये येणार आहेत.
- मेरीट लिस्ट नुसारच मग पात्र उमेदवारांना ग्रामसेवक म्हणून निवडले जाणार आहे.
Gramsevak Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | डिसेंबर 2025 नंतर (अपेक्षित) |
| अर्जाची शेवटची तारीख | माहिती उपलब्ध नाही |
| परीक्षेची तारीख | माहिती उपलब्ध नाही |
Gramsevak Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| मुख्य जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Gramsevak Bharti 2025: Step-by-Step Application Process
स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत जाहीरात प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करा. जाहिरात डिसेंबर 2025 नंतर येण्याची शक्यता आहे.
स्टेप 2: जाहिरात आल्यानंतर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि “Gramsevak Recruitment 2025” किंवा “Apply Online” हा पर्याय शोधा.
स्टेप 3: नवीन उमेदवार असल्यास प्रथम Registration करा, यासाठी तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आणि इतर मूलभूत माहिती भरा.
स्टेप 4: Registration पूर्ण झाल्यानंतर Login करा आणि अर्ज फॉर्म ओपन करा. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, पत्ता आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
स्टेप 5: आवश्यक कागदपत्रे (12वी मार्कशीट, फोटो, सही, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र इ.) दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
स्टेप 6: अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती नीट तपासून घ्या आणि Submit बटणावर क्लिक करा.
स्टेप 7: अंतिम स्टेप म्हणून Application Fee ऑनलाइन मोडद्वारे भरावी लागेल. पेमेंट यशस्वी झाल्यावर तुमचा अर्ज पूर्ण समजला जाईल.
स्टेप 8: पेमेंट केल्यानंतर मिळणारी Application Receipt / Acknowledgement पावती डाउनलोड करून ठेवा.
इतर भरती
Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांची मेगा भरती! पदवी पास अर्ज करा
AFCAT 2026: भारतीय हवाई दलात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 12वी पास/ पदवी पास अर्ज करा
Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेत अग्निशमन दलात भरती! 63,200 रु. पगार, 10वी पास अर्ज करा
MJP Recruitment 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 10वी/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा
Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका मध्ये भरती सुरु! 1,32,300 रु. पगार, डिग्री पास अर्ज करा
Arogya Vibhag MO Bharti 2025: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगाभरती! 56,100 रु. पगार, पदवी/ डिप्लोमा पास अर्ज करा
NHM CHO Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगाभरती! 40,000 रु. स्टायपेंड, B.Sc नर्सिंग पास अर्ज करा
PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क पदासाठी भरती! 22,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा
GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 10वी पास वर भरती! 47600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा
Gramsevak Bharti 2025 – 26: FAQ
Gramsevak Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) या पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Gramsevak Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 1000+ अपेक्षित आहेत.
Gramsevak Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी अजून अर्जच सुरु झाले नाहीत, त्यामुळे शेवटची तारीख उपलब्ध नाही.
Gramsevak Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मेरीट लिस्ट च्या आधारे होणार आहे.
ग्रामसेवक पदासाठी वेतन पगार किती आहे?
ग्रामसेवक पदासाठी वेतन हे 25,500 ते 81,100 रु. प्रती महिना पर्यंत आहे.
