Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र तलाठी भरती 2025 अखेर जाहीर झाली आहे! राज्यातील लाखो विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते त्याच संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः तलाठी भरतीची माहिती दिली असून, यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
यावर्षी तब्बल 1700+ रिक्त पदांसाठी राज्यभरात तलाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्व ठिकाणी या भरतीचा क्रेझ असल्याने हि एक मोठी मेगा भरती होणार आहे आणि सोबतच 2025 मधील ही सर्वात महत्वाची भरती ठरणार असल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या अखेरीस महाराष्ट्र तलाठी भरती 2025 ची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे अभ्यासाची तयारी सुरू केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. अर्ज प्रक्रिया, परीक्षा तारीखा आणि इतर आवश्यक माहिती अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट केली जाईल.
या लेखात तलाठी भरतीची Selection Process, Syllabus, तसेच Subject-wise Best Books यांची सविस्तर माहिती दिली आहे. तलाठी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचावा आणि लगेचच आपल्या तयारीला सुरुवात करावी, ही संधी वाया जाऊ देऊ नका!
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Maharashtra Talathi Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | महाराष्ट्र शासन |
| भरतीचे नाव | Maharashtra Talathi Bharti 2025 |
| पदाचे नाव | तलाठी |
| रिक्त जागा | 1700+ |
| वेतन | रु. २५,५०० ते रु. ८१,१०० प्रति महिना |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
| वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
| अर्जाची फी | सामान्य प्रवर्ग: 1,000 रु. राखीव प्रवर्ग: 900 रु. |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Maharashtra Talathi Bharti 2025: Age Limit (वयाची अट)
| प्रवर्ग | वयोमर्यादा / सवलत |
|---|---|
| खुला प्रवर्ग | 18 ते 38 वर्षे |
| मागासवर्गीय उमेदवार | 18 ते 43 वर्षे (5 वर्षे सूट) क्रिमी लेयरला सूट लागू नाही. |
| पदवीधारक/पदविका अंशकालीन उमेदवार | कमाल वय 55 वर्षे |
| स्वतंत्र सैनिकांचे पाल्य / 1991 जनगणना कर्मचारी / 1994 नंतर नियुक्त कर्मचारी | कमाल वय 45 वर्षे |
| खेळाडू उमेदवार | 5 वर्षे वयोमर्यादेत सूट, कमाल वय 43 वर्षे |
| दिव्यांग उमेदवार | कमाल वय 45 वर्षे (किमान 40% दिव्यांगत्व आवश्यक) |
| प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त उमेदवार | कमाल वय 45 वर्षे |
| माजी सैनिक | सेवाकाल + 3 वर्षे सूट अपंग माजी सैनिक – कमाल वय 45 वर्षे |
Maharashtra Talathi Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
तलाठी भरती साठी शैक्षणिक पात्रता निकष पदवी पास चे आहेत, म्हणजे जे उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असेल तर त्याला महाराष्ट्र तलाठी भरती साठी अर्ज हा करता येणार आहे. पण जर उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत (Final Year) असेल तर अशा अर्जदार उमेदवाराला अर्ज करता येणार नाही. केवळ ज्यांचे Graduation झाले आहे त्यांनाच अर्ज करता येणार आहे.
पदवी पास सोबत उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे, अर्जदाराला कॉम्पुटर ची किमान बेसिक माहिती तरी असावी.
| शैक्षणिक पात्रता | उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवीधर असावेत + त्यांनी MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स केलेला असावा. |
टीप: शैक्षणिक पात्रता निकषात MSCIT प्रमाणपत्र लगेच द्यायची गरज नाहीये, जॉईनिंग झाल्यावर 2 वर्षात कधी पण सादर करता येते.
Talathi Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Talathi Exam –
| अ क्र. | विषय | प्रश्न संख्या | गुण |
|---|---|---|---|
| 1 | मराठी भाषा | 25 | 50 |
| 2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
| 3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
| 4 | बौद्धिक चाचणी/अंकगणित | 25 | 50 |
| * | एकूण | 100 | 200 |
2) Document Verification –
- ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना DV साठी बोलावले जाते.
- यात उमेदवाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र, जात/ जात वैधता प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, फोटो आणि सही असे सर्व कागदपत्रे चेक केले जातील.
- जर कागदपत्रे ओरीजनल असतील आणि काहीच अडचण नसेल तरच उमेदवाराला या टप्प्यात पात्र ठरवले जाईल.
3) Final Merit List –
- ऑनलाइन परीक्षा + DV यावर अंतिम मेरिट तयार केली जाईल.
- ऑनलाईन परीक्षेतील मार्क्स हे मेरीट ठरवण्यासाठी वापरले जातील.
- सोबतच तलाठी भरतीची मेरिट हि जिल्हानिहाय तयार केली जाईल, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला होता त्या नुसार मेरीट ठरवली जाईल.
- आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कट-ऑफ गुणांनुसार उमेदवारांची तलाठी पदासाठी निवड हि केली जाईल.
Maharashtra Talathi Syllabus 2025: महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम
| अ क्र. | विषयाचे नाव | अभ्यासक्रम |
|---|---|---|
| 1 | इंग्रजी | Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag) |
| Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) | ||
| Fill in the blanks in the sentence | ||
| Simple Sentence structure (Error, Types of Sentence) | ||
| 2 | मराठी | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) |
| म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह | ||
| प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक | ||
| 3 | सामान्य ज्ञान | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
| 4 | बौद्धिक चाचणी/ अंकगणित | बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.) |
| अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी) |
Talathi Bharti Best Book 2025: तलाठी भरती साठी कोणते पुस्तक वाचावे?
तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल तलाठी भरती साठी कोणते पुस्तक वाचावे? तर त्याच विषयी तलाठी भरती 2025 परीक्षेसाठी महत्वाची पुस्तकांची यादी इथे खाली दिली आहे. यातील तुम्हाला जे पुस्तक आवडतील ते तुम्ही तलाठी परीक्षेच्या तयारी साठी वापरू शकता.
| विषय | पुस्तकाचे नाव / लेखकाचे नाव |
|---|---|
| इंग्रजी | बाळासाहेब शिंदे |
| मराठी | बाळासाहेब शिंदे |
| सामान्य ज्ञान | तात्यांचा ठोकळा |
| बुद्धिमत्ता गणित | सचिन ढवळे |
इतर पुस्तक: Bee Target Talathi 25000+, Adda247 Talathi Practice Book, Vidyabharti Talathi Margadarshak, Lucent GK, Reasoning – R.S. Aggarwal
याशिवाय तुम्ही इतर पण पुस्तक तलाठी परीक्षेच्या अभ्यासासाठी वापरू शकता. मार्केट मध्ये हूप सारे पुस्तक उपलब्ध आहेत, त्यातील जे तुम्हाला पुस्तक चांगले वाटेल ते तुम्ही निवडू शकता. याशिवाय जर तुम्ही MPSC ची तयारी करत असाल तर MPSC साठी चे पुस्तक आणि नोट्स पण अभ्यासासाठी वापरू शकता.
Maharashtra Talathi Bharti 2025: FAQs
महाराष्ट्र तलाठी भरती 2025 कधी जाहीर होणार?
तलाठी भरतीची अधिकृत घोषणा डिसेंबर 2025 च्या अखेरीस होणार आहे.
तलाठी भरतीचे यावर्षी किती रिक्त पदे जाहीर होणार आहेत?
या वर्षी राज्यभरात 1700+ रिक्त पदे जाहीर होणार आहेत.
तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असते?
उमेदवार पदवीधर (Any Graduate) असणे आवश्यक आहे, आणि त्याला संगणकाचे बेसिक ज्ञान असावे.
तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
Open Category साठी वयाची अट 18 ते 38 वर्षे असणार आहे, बाकी राखीव Reserved Category साठी सवलत लागू असणार आहे.
तलाठी पदासाठी पगार किती असतो?
तलाठी पदासाठी वेतन पगार हा 81,100 रुपया पर्यंत असतो.
तलाठी भरती साठी कोणते पुस्तक वाचावे?
तलाठी भरती साठी बेस्ट पुस्तक कोणते याची माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.
