NextGen Edu Scholarship Program 2025: 10वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 15,000 रु. स्कॉलरशिप! लगेच येथून अर्ज करा

NextGen Edu Scholarship Program 2025-26: 10वी पास विद्यार्थ्यांसाठी एक खूपच आनंदाची संधी आली आहे! NextGen Edu Scholarship Program 2026 अंतर्गत निवडक विद्यार्थ्यांना थेट १५,००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही योजना विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे पुढील शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना हे शक्य होत नाहीये, अशा विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप द्वारे मदत हि केली जाणार आहे.

या स्कॉलरशिप मार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे. यात पुस्तकं, फी, प्रोजेक्ट्स किंवा इतर शैक्षणिक खर्च विद्यार्थ्यांना भागवता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वरुपाची अडचणी येणार नाहीत.

या शिवाय या स्कॉलरशिपची अर्ज प्रक्रिया देखील अगदी सोपी आहे. पात्र विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून अर्ज करू शकतात. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज तपासला जाईल त्यानंतर निवड झाल्यास तुमच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल.

या स्कॉलरशिप संबंधी सविस्तर माहिती या लेखात दिली आहे, तुम्हाला जर या शिष्यवृतीचा लाभ घ्यायचा असेल तर हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचा आणि लगेच ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून घ्या.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

NextGen Edu Scholarship Program 2025-26 – स्कॉलरशिपची संपूर्ण माहिती

विवरणमाहिती
योजनेचं नावNextGen Edu Scholarship Program 2025-26
स्कॉलरशिप देणारी संस्थाEY Global Delivery Services (EY GDS), Buddy4Study सोबत
पात्रता (शैक्षणिक)किमान 60% गुणासह Class 10 उत्तीर्ण
शिष्यवृत्ती रक्कम₹15,000/- (academic & living खर्चासाठी वापरता येईल)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्जाची अंतिम तारीख10 सप्टेंबर 2025
संपर्क011-43092248

NextGen Edu Scholarship Program 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

या स्कॉलरशिप साठी अर्जदार विद्यार्थ्याचे शिक्षण हे 10 की पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे, केवळ 10वी पास विद्यार्थीच या NextGen Edu Scholarship Program 2025 साठी अर्ज करू शकणार आहेत.

शैक्षणिक पात्रता10वी पास
किमान गुण60 टक्के
वार्षिक उत्पन्न3 लाख रुपये
  • शैक्षणिक पात्रता: सध्या चालू वर्षात भारतातील कोणत्याही सरकारी किंवा खाजगी शाळेत इयत्ता 11वीत शिक्षण घेणारे विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात.
  • किमान गुण: इयत्ता 10वी मध्ये किमान 60% गुण मिळालेले असणे आवश्यक आहे.
  • वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे ₹3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • प्राधान्य: कर्नाटक, दिल्ली NCR, महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप साठी जास्त प्राधान्य दिले जाणार आहे.
  • अपात्रता: Buddy4Study आणि EY Global Delivery Services मधील कर्मचाऱ्यांची मुले या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकत नाहीत.
  • प्रोत्साहन: या स्कॉलरशिप साठी मुली, एकल पालकांची मुले, ट्रान्सजेंडर विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

मुख्य स्वरुपात 10वी पास विद्यार्थ्यांसाठी हि स्पेशल स्वरुपात सुरु करण्यात आलेली हि स्कॉलरशिप आहे, अर्जदार पात्र आणि गरजू मुलांच्या पुढील शिक्षणासाठी या शिष्यवृत्ती मार्फत आर्थिक मदत केली जाणार आहे.

NextGen Edu Scholarship Program 2025: Benifts विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ

लाभतपशील
शिष्यवृत्ती रक्कम₹15,000/-
शैक्षणिक मदतपुस्तके, फी, स्टेशनरी, प्रोजेक्ट साहित्य, कोचिंग फी यांसारख्या खर्चासाठी आर्थिक मदत.
विशेष प्रवर्गासाठी प्रोत्साहनमुली, अनाथ, एकल पालकांची मुले, ट्रान्सजेंडर व PwD विद्यार्थ्यांसाठी विशेष प्राधान्य.

NextGen Edu Scholarship Program 2025: Selection Process – निवड प्रक्रिया

1) प्राथमिक शॉर्टलिस्टिंग (Initial Shortlisting)

विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जातील माहिती आणि सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे प्राथमिक पात्रता तपासली जाणार आहे. पात्र निकष पूर्ण करणारे अर्जदार हेच केवळ पुढील टप्प्यासाठी पात्र असणार आहेत.

2) कागदपत्र पडताळणी (Document Verification)

त्यानंतर पुढे उमेदवार विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रमाणपत्रे, उत्पन्न प्रमाणपत्र, ओळखपत्र, बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासून त्यांच्या सत्यतेची खात्री केली जाणार आहे.

3) दूरध्वनी मुलाखत (Telephonic Interview)

मग पुढच्या टप्प्यात १० ते १५ मिनिटांची थोडक्यात मुलाखत घेतली जाणार आहे, यात विद्यार्थ्यांचे शिक्षण, उद्दिष्टे, ध्येय, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि आर्थिक गरज याबद्दल विचारणा केली जाईल.

4) अंतिम निवड (Final Selection)

जे विद्यार्थी वरील सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करतील अशा पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर मग निवड झालेल्यांना शिष्यवृत्तीची रक्कम डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात जमा करून दिली जाणार आहे.

NextGen Edu Scholarship Program 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्ज सुरू होण्याची तारीखजुलै 2025
अर्जाची अंतिम तारीख10 सप्टेंबर 2025

NextGen Edu Scholarship Program 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथून अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

NextGen Edu Scholarship Program 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या
या लिंकवर क्लिक करा – NextGen Edu Scholarship Apply Link

2) “Apply Now” वर क्लिक करा
अर्ज सुरू करण्यासाठी पेज वर दिसणाऱ्या “Apply Now” बटणावर क्लिक करा.

3) लॉगिन / नोंदणी करा

  • जर तुमचे Buddy4Study वर खाते असेल तर ईमेल/मोबाईल नंबर व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • जर तुम्ही नवीन असाल तर नोंदणी (Register) पर्याय निवडा आणि नाव, ईमेल, मोबाईल नंबर टाकून खाते तयार करा.

4) अर्ज फॉर्म भरा
वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरा.

5) कागदपत्रे अपलोड करा

  • Class 10 मार्कशीट
  • उत्पन्न प्रमाणपत्र / ITR / Salary Slip
  • ओळखपत्र (Aadhaar इ.)
  • शाळेचे प्रवेश प्रमाणपत्र
  • बँक पासबुकची प्रत
  • (लागू असल्यास) ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र

6) फॉर्म तपासा आणि सबमिट करा
दिलेली सर्व माहिती पुन्हा तपासा, काही चुकल असेल तर ते दुरुस्त करून घ्या आणि मग शेवटी Submit बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करून टाका.

इतर स्कॉलरशिप

HDFC Bank Parivartan ECSS Programme 2025-26: 1ली ते 10वी, ITI, 12वी, डिप्लोमा, डिग्री करणाऱ्यांसाठी 75 हजार रु पर्यंतची स्कॉलरशिप ! इथून अर्ज लवकर करा!

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: 10वी पास आणि 11वी पास विद्यार्थ्यांना ₹10,000 शिष्यवृत्ती, मोठी संधी सोडू नका!

Raman Kant Munjal Scholarship 2025-26: 12वी पास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 5.5 लाख पर्यंतची स्कॉलरशि मिळणार! संधी गमावू नका!

Infosys Foundation STEM Stars Scholarship Program 2025-26: 12वी पास मुलींना मिळणार ₹1 लाख शिष्यवृत्ती! आजच अर्ज करा!

Mirae Asset Scholarship 2024-25: 12वी नंतर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी 40 हजार रु.पर्यंत स्कॉलरशिप मिळत आहे! लगेच इथून अर्ज करा!

Kotak Junior Scholarship Program 2025-26: कोटककडून गरीब विद्यार्थ्यांसाठी 10वी नंतर दरमहा ₹3,500 शिष्यवृत्ती! लवकर अर्ज करा!

Kotak Suraksha Scholarship Program 2024-25: ग्रेजुएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये स्कॉलरशिप!

Swami Dayanand Merit India Scholarships 2024-25:1 लाख रू.स्कॉलरशिप मिळत आहे इंजीनियरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी!

NextGen Edu Scholarship Program 2025 – 26 : FAQ

NextGen Edu Scholarship Program साठी कोण पात्र आहे?

जे विद्यार्थी १०वी पास आहेत त्यांना या स्कॉलरशिप साठी अर्ज करता येणार आहे.

NextGen Edu Scholarship Program मध्ये लाभ काय भेटणार आहे?

गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरुपाची मदत हि भेटणार आहे, यात प्रती विद्यार्थी 15 हजार रुपये एवढी स्कॉलरशिप या प्रोग्राम अंतर्गत दिली जाणार आहे.

NextGen Edu Scholarship Program 2025 साठी अर्ज कसा करायचा?

ऑनलाईन स्वरुपात buddy4study या वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.

NextGen Edu Scholarship Program मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

या स्कॉलरशिप साठी निवड प्रक्रिया हि प्राथमिक शॉर्टलिस्टिंग, कागदपत्रे पडताळणी, मुलाखत आणि अंतिम निवड या प्रकारे असणार आहे.

4 thoughts on “NextGen Edu Scholarship Program 2025: 10वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 15,000 रु. स्कॉलरशिप! लगेच येथून अर्ज करा”

Leave a comment