Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: 10वी पास आणि 11वी पास विद्यार्थ्यांना ₹10,000 शिष्यवृत्ती, मोठी संधी सोडू नका!

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: नमस्कार मित्रांनो! महाराष्ट्र ११वी विद्याधन शिष्यवृत्ती २०२५ ही योजना SDF Foundation कडून राबवली जात आहे आणि यामध्ये एकूण १०,००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. ही संधी खासकरून अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असूनही शिक्षणात प्रगती करू इच्छितात.

ही शिष्यवृत्ती SDF Foundation या राष्ट्रीय पातळीवरील विश्वसनीय संस्थेमार्फत दिली जाते. ही संस्था वर्षानुवर्षे गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना scholarship च्या माध्यमातून शिक्षणासाठी मदत करत आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षासाठी ₹10,000/- ची आर्थिक मदत दिली जाते – म्हणजेच ११वी आणि १२वी या दोन वर्षांसाठी एकत्रित ₹20,000/- ची शिष्यवृत्ती!

या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत निवड प्रक्रिया संपूर्णपणे merit आणि need वर आधारित असते. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो, त्यानंतर online test आणि मुलाखतीच्या माध्यमातून अंतिम निवड केली जाते. ही एक अशी प्रोसेस आहे जी पारदर्शक असून विद्यार्थ्यांच्या पात्रतेला प्राधान्य दिलं जातं.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

✅ Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: माहिती

घटकमाहिती
🏷️ शिष्यवृत्तीचे नावमहाराष्ट्र ११वी विद्याधन शिष्यवृत्ती २०२५
🎯 उद्दिष्टआर्थिक दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मदत
💰 शिष्यवृत्तीची रक्कम₹10,000/- प्रतिवर्ष (११वी आणि १२वी साठी)

👨‍🎓 Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: Eligibility Criteria

महाराष्ट्र ११वी विद्याधन शिष्यवृत्ती २०२५ साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • 📌 मूलत: महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी असावा
  • 📌 १०वी परीक्षा २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातून उत्तीर्ण केलेली असावी
  • 📌 सध्या ११वी किंवा डिप्लोमा प्रथम वर्षात शिकत असावा
  • 📌 सामान्य विद्यार्थ्यांसाठी: किमान ८५% गुण किंवा ८.९ CGPA
  • 📌 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी: किमान ७५% गुण किंवा ७.९ CGPA
  • 📌 कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹2 लाखांपेक्षा कमी असावे

🧾 Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: Documents Required

अर्ज करताना खालील कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे आवश्यक आहे:

  • पासपोर्ट साइज फोटो
  • 10वीची गुणपत्रिका
  • उत्पन्न प्रमाणपत्र (महसूल अधिकाऱ्यांकडून; राशन कार्ड ग्राह्य नाही)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)

टीप: वरील सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतरच अर्ज वैध मानला जाईल.

📋Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: Selection Process

शिष्यवृत्ती पात्रतेनंतर खालील टप्प्यांतून निवड प्रक्रिया पार पडते:

  1. पूर्व निवड (Shortlisting): शैक्षणिक गुणवत्ता आणि कौटुंबिक पार्श्वभूमीच्या आधारे SDF Foundation कडून प्राथमिक निवड केली जाईल.
  2. ऑनलाईन परीक्षा: निवड झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलावले जाईल.
  3. मुलाखत (Interview): परीक्षेनंतर ऑनलाइन मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना बोलावले जाईल.
  4. गृहभेट: अंतिम निवडीपूर्वी विद्यार्थ्याच्या घराची भेट घेण्यात येईल.
  5. निवासी प्रशिक्षण शिबिर: निवड झालेल्या विद्यार्थ्यांना SDF तर्फे आयोजित शिबिरात भाग घ्यावा लागेल.
  6. पालक प्रवास भत्ता: एका पालकाचा प्रवास खर्च SDF तर्फे दिला जाईल.

📅 Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: Important Dates

तपशीलदिनांक
📝 अंतिम अर्ज तारीख३० जुलै २०२५
🖥️ ऑनलाइन परीक्षा१० ऑगस्ट २०२५
🗣️ मुलाखत कालावधी२५ ऑगस्ट – २७ सप्टेंबर २०२५
📢 अंतिम निकालमेल/एसएमएसद्वारे सूचित होईल

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: Important Links

घटकलिंक/माहिती
अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (रोजच्या अपडेटसाठी)येथे क्लिक करा

🖥️ Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: How to Apply Online

शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. अधिकृत वेबसाइट वर जा
  2. “Maharashtra 11th Std Program 2025” निवडा
  3. स्वतःची Gmail ID वापरून खाते तयार करा (सायबर कॅफे/इतरांची ID वापरू नका)
  4. “Apply Now” वर क्लिक करा व अकाउंट activate करा (ईमेलवर लिंक येईल)
  5. लॉगिन करून अर्ज फॉर्म भरावा
  6. सर्व माहिती नीट भरून कागदपत्रांसह Upload करा
  7. ‘Submit’ केल्यानंतर “Submission Successful” असा संदेश येतोय का हे तपासा
  8. भविष्यातील अपडेट्ससाठी ईमेल आणि SMS नियमित तपासा

इतर भरती

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!

NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !

Indian Coast Guard AC 01/2027: 12वी + पदवी पास तरुणांसाठी तटरक्षक दलात भरती! पगार 56,000 पासून! लगेच अर्ज करा!

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: FAQ

महाराष्ट्र ११वी विद्याधन शिष्यवृत्ती २०२५ साठी कोण पात्र आहे?

ही शिष्यवृत्ती २०२५ मध्ये १०वी उत्तीर्ण झालेले आणि सध्या ११वी किंवा डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹2 लाखांपेक्षा कमी असावे आणि सामान्य विद्यार्थ्यांसाठी किमान ८५% गुण आवश्यक आहेत.

महाराष्ट्र ११वी विद्याधन शिष्यवृत्ती २०२५ मध्ये किती आर्थिक मदत मिळते?

या शिष्यवृत्तीअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षासाठी ₹10,000/- ची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत दोन वर्षांसाठी (११वी आणि १२वी) मिळते, म्हणजे एकूण ₹20,000/- ची scholarship.

महाराष्ट्र ११वी विद्याधन शिष्यवृत्ती २०२५ साठी अर्ज कसा करावा?

विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन “Maharashtra 11th Std Program 2025” निवडून ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. Gmail ID वापरून रजिस्ट्रेशन करून, आवश्यक माहिती व कागदपत्रे भरून अर्ज सबमिट करावा.

महाराष्ट्र ११वी विद्याधन शिष्यवृत्ती २०२५ साठी निवड प्रक्रिया कशी असते?

निवड प्रक्रिया ही शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित असते. प्राथमिक शॉर्टलिस्टिंगनंतर विद्यार्थ्यांना online test, interview, आणि अंतिम निवडीनंतर गृहभेट व प्रशिक्षण शिबिरात सहभाग असतो. सर्व टप्पे पारदर्शकपणे पार पाडले जातात.

Leave a comment