Kotak Junior Scholarship Program 2025-26. Apply here! नमस्कार मित्रांनो! शिक्षणाच्या प्रवासात योग्य वेळेला मिळणारी आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. अशाच विद्यार्थ्यांसाठी कोटक एज्युकेशन फाउंडेशनने सुरू केलेली Kotak Junior Scholarship Program 2025-26 ही योजना शिक्षणासाठी एक मजबूत आधार ठरणार आहे. ही योजना खासकरून मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमधील 10वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आहे.
या शिष्यवृत्तीअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक सहाय्यच नाही, तर मार्गदर्शन, शैक्षणिक सहकार्य, करिअर गाईडन्स आणि विविध ज्ञानवर्धक भेटींचाही लाभ मिळणार आहे. म्हणजेच हा फक्त पैशाचा नाही, तर एक संपूर्ण शिक्षण विकासाचा कार्यक्रम आहे.
कोटक महिंद्रा ग्रुपचा हा उपक्रम म्हणजे CSR अंतर्गत शिक्षण क्षेत्रात उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. जर तुम्ही 2025 मध्ये 10वी उत्तीर्ण झाले असाल, आणि मुंबई महानगर क्षेत्रात राहात असाल, तर ही शिष्यवृत्ती तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

📌 Kotak Junior Scholarship Program 2025-26: माहिती
घटक | माहिती |
---|---|
🎓 शिष्यवृत्तीचे नाव | Kotak Junior Scholarship Program 2025-26 |
🏢 आयोजक संस्था | Kotak Education Foundation (KEF) |
🎯 उद्दिष्ट | आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मदत |
📍 पात्रता क्षेत्र | फक्त मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (MMR) |
🏫 पात्रता | 10वी उत्तीर्ण (SSC/CBSE/ICSE – 2025), किमान 85% गुण |
🎁 लाभ | ₹3,500/महिना – एकूण ₹73,500 (21 महिने) + मार्गदर्शन व शैक्षणिक सहाय्य |
📅 शेवटची तारीख | 30 जून 2025 |
🌐 अर्ज पद्धत | ऑनलाइन – Buddy4Study प्लॅटफॉर्मवरून |
Kotak Junior Scholarship Eligibility Criteria– कोण करू शकतो अर्ज?
- अर्जदाराने 2025 मध्ये SSC/CBSE/ICSE बोर्डांतून 10वी 85% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेले असावे.
- विद्यार्थी सध्या मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) कनिष्ठ महाविद्यालयात (11वी) Arts, Commerce, Science या प्रवाहांपैकी कोणत्याही मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹3,20,000 पेक्षा कमी असावे.
- विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब MMR क्षेत्रात वास्तव्यास असावे.
- Kotak Education Foundation आणि Buddy4Study च्या कर्मचाऱ्यांची मुले अर्जासाठी पात्र नाहीत.
Kotak Junior Scholarship Benefits – Kotak Junior Scholarship चे फायदे काय आहेत?
- प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहिना ₹3,500 (एकूण ₹73,500 – 21 महिने) शिष्यवृत्ती.
- मार्गदर्शन व संरक्षक आधार (Mentorship Support).
- शैक्षणिक सहाय्य, जे अभ्यासात यशस्वी होण्यासाठी मदत करेल.
- करिअर मार्गदर्शन – भविष्यातील संधींसाठी योग्य दिशा.
- शैक्षणिक व ज्ञानवर्धक भेटी – Exposure Visits.
टीप: ही शिष्यवृत्ती शैक्षणिक खर्चासाठी (प्रवेश शुल्क, स्टेशनरी, पुस्तकं, प्रवास इ.) वापरण्यात येईल आणि निधी त्रैमासिक/सहामाही स्वरूपात दिला जाईल.
Documents Required for Kotak Junior Scholarship – अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील?
- 10वीचे मार्कशीट (SSC/CBSE/ICSE) – अनिवार्य
- उत्पन्नाचा दाखला (F.Y. 2025-26) – अनिवार्य
- अलीकडील पासपोर्ट साइज फोटो – अनिवार्य
- पालक व विद्यार्थ्याचे आधार कार्ड – अनिवार्य
- कमावणाऱ्या पालकाचा PAN कार्ड
- स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट
- जर कुणी IT भरत असेल, तर IT रिटर्न + Form 16 (ऐच्छिक)
- एकट्या पालक असल्यास मृत्यू प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचे बँक खाते (बँक स्टेटमेंट किंवा पासबुकची पहिली पान)
How to Apply for Kotak Junior Scholarship – ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- Buddy4Study वेबसाईटवर जा आणि ‘Apply Now’ वर क्लिक करा.
- तुमच्या ईमेल / मोबाइल / Gmail वापरून लॉगिन किंवा नवीन खाते तयार करा.
- लॉगिन केल्यानंतर ‘Kotak Junior Scholarship Program 2025-26’ अर्ज फॉर्मवर जा.
- ‘Start Application’ वर क्लिक करा.
- अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरून घ्या.
- कागदपत्रे अपलोड करा.
- Terms & Conditions स्वीकारा आणि ‘Preview’ वर क्लिक करा.
- सर्व माहिती बरोबर असल्यास ‘Submit’ वर क्लिक करून अर्ज पूर्ण करा.
Selection Process for Kotak Junior Scholarship साठी निवड प्रक्रिया
- पात्रतेच्या आधारे प्राथमिक शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
- कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
- शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची फोनवरून मुलाखत घेतली जाईल.
- अंतिमत: योग्य उमेदवारांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाईल.
टीप: अंतिम निर्णय आणि शिष्यवृत्ती मंजुरी केवळ Kotak Education Foundation च्या अधिकारात असेल.
Apply Online for Kotak Junior Scholarship – ऑनलाईन अर्ज लिंक
घटक | लिंक/माहिती |
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
Apply Online For Kotak Junior Scholarship | इथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
इतर भरती
NCL Bharti 2025: ITI पास तरुणांसाठी नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये भरती! पगार ₹35,000 पासून!
SJVN Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी SJVN लिमिटेड मध्ये भरती! पगार ₹1.60 लाख पर्यंत!
Kotak Junior Scholarship FAQs
Kotak’s Junior Scholarship साठी कोण पात्र आहे?
Kotak Junior Scholarship साठी ते विद्यार्थी पात्र आहेत ज्यांनी 2025 मध्ये 10वी परीक्षा (SSC/CBSE/ICSE) 85% किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण केली आहे आणि सध्या मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्रातील (MMR) ज्युनिअर कॉलेजमध्ये 11वीमध्ये प्रवेश घेतला आहे.
Kotak’s Junior Scholarships साठी अर्ज कधीपर्यंत करता येईल?
Kotak Junior Scholarship साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. अर्ज वेळेत व पूर्णपणे भरावा.
Kotak Junior Scholarships मध्ये कोणते फायदे मिळतात?
Kotak Junior Scholarship अंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा ₹3,500 शिष्यवृत्ती (एकूण ₹73,500), करिअर मार्गदर्शन, अभ्यास सहाय्य, मार्गदर्शन सत्रे व शैक्षणिक सहली यांचा लाभ मिळतो.
Kotak Junior Scholarship साठी अर्ज प्रक्रिया कशी आहे?
Kotak Junior Scholarship साठी अर्ज Buddy4Study पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. त्यासाठी आधी नोंदणी करून आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
10वी पास
Mi 11th