ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रू. | Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana: नमस्कार मित्रांनो, आता OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार वर्षाला 60,000 रुपये देणार आहे. नवीन योजना सुरू झाली आहे! त्या योजनेचे नाव आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या अभिनव अशा लोकोपयोगी योजनेचा फायदा हा OBC विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विकास महामंडळाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील गरीब कुटुंबातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेद्वारे मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

तब्बल 60,000 रुपयांची आर्थिक सहाय्यता वर्षाला भेटणार आहे, यामुळे OBC प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशातून विद्यार्थी त्यांचा खर्च स्वतः करू शकणार आहेत, यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देण्याची गरज लागणार नाही.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने द्वारे वेगवेगळ्या स्तरावर भत्ते दिले जातात, यात विद्यार्थी हा भोजन भत्ता, निर्वाह भत्ता, निवास भत्ता मिळवण्यासाठी पात्र असणार आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana ची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, त्यामुळे तुम्ही जर ओबीसी प्रवर्गातील असाल, तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई आधार योजनेचा फायदा घ्या.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Maharashtra 2024

योजनेचे नावDnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana
सुरुवातमहाराष्ट्र शासन (इतर मागास बहुजन विकास महामंडळ)
उद्देशगरीब OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
लाभार्थीOBC मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी
लाभशिक्षणासाठी वार्षिक 60,000 रुपये आर्थिक सहाय्यता.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळ

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Qualification Details (योजनेसाठी पात्रता निकष)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी राज्य शासनाने काही पात्रता निकष जारी केले आहेत, त्यानुसार जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांना ज्ञानज्योती योजनेचा फायदा मिळणार आहे.

  • अर्जदार विद्यार्थी हा OBC किंवा SC, ST प्रवर्गातील असावा.
  • विद्यार्थ्याकडे ओबीसी मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट असावे.
  • विद्यार्थी हा चालू वर्षात शाळेत शिकत असावा.
  • अर्जदार विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी होस्टेलमध्ये किंवा वसतिगृहात राहत असावा.
  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी विद्यार्थी अर्ज करतील किंवा त्यांनाच लाभ भेटणार आहे.
  • योजनेद्वारे मिळणारा आर्थिक फायदा केवळ इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
  • विद्यार्थ्यांना या योजनेसाठी मेरिट लिस्ट द्वारे निवडले जाणार आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणीक वर्षात जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत, त्यांना लाभ मिळणार आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Benifits (योजनेमार्फत मिळणारे लाभ आणि फायदे)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमार्फत राज्यातील सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास प्रवर्ग आणि बहुजन विकास महामंडळ मार्फत आर्थिक सहाय्य केले जाते.

योजनेद्वारे मिळणारे लाभ हे भरपूर आहेत, तब्बल 60,000 रुपये प्रत्येकी पैसे मिळतात. तसेच हे पैसे शिष्यवृत्ती स्वरूपात विद्यार्थ्यांना दिले जातात, आणखीन एक मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, ही शिष्यवृत्ती रक्कम प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 

  • पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 60,000 रुपये मिळणार.
  • विद्यार्थांना वसतिगृहात राहण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाणार.
  • वसतिगृहात भोजन भत्ता, निर्वाह भत्ता, निवास भत्ता अशा सर्व गोष्टींसाठी राज्य शासन लाभार्थी विद्यार्थ्यांचे पैसे भरणार आहे.

थोडक्यात वर सांगितलेले सर्व लाभ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी मिळणार आहेत.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana अनुदान तपशील 

मुंबई, पुणे, तसेच इतर शहरांसाठी 

भोजन भत्ता32,000 रुपये
निवास भत्ता20,000 रुपये
निर्वाह भत्ता8,000 रुपये
एकूण लाभ60,000 रुपये

महानगरपालिका क्षेत्रासाठी 

भोजन भत्ता28,000 रुपये
निवास भत्ता15,000 रुपये
निर्वाह भत्ता8,000 रुपये
एकूण लाभ51,000 रुपये

जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी

भोजन भत्ता25,000 रुपये
निवास भत्ता12,000 रुपये
निर्वाह भत्ता6,000 रुपये
एकूण लाभ43,000 रुपये

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Document List (ज्ञानज्योती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे)

ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदार लाभार्थी विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • SC, ST, OBC मागासवगीर्य जातीचे कास्ट सर्टिफिकेट
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र 
  • विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे बँक खाते पासबुक
  • अर्जदार विद्यार्थ्याची इयत्ता 10 वी आणि 12 वी मार्कशीट
  • महाविद्यालय, विद्यापीठ किंवा कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा (प्रवेश प्रमाणपत्र किंवा पावती)

वर सांगितलेले सर्व कागदपत्रे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आवश्यक असणार आहेत. अर्जदारांना हे कागदपत्रे योजनेसाठी फॉर्म भरताना जमा करायचे आहेत, वरील कागदपत्राव्यतिरिक्त इतर कागदपत्र देखील विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आवश्यक असे सर्व कागदपत्रे झेरॉक्स प्रत आणि Orignal Copy सोबत ठेवा.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Application Form (योजनेसाठी अर्ज कसा करायचा?)

ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत, अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे, त्यामुळे आता तुम्ही या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.

अद्याप ज्ञानज्योती योजनेसाठी GR निघाला नाहीये, त्यामुळे अर्ज कसा करायचा? कोठून करायचा याची अधिकृत माहिती आलेली नाही. परंतु या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पैकी एका मार्गाने अर्ज करायचे असणार आहेत.

अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, तुम्ही इतर मागासवर्ग बहुजन विकास महामंडळ च्या कार्यालयात जाऊन सहायक संचालक यांच्याकडून या योजनेचा फॉर्म भरू शकता.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana FAQ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, तुम्ही इतर मागासवर्ग बहुजन विकास महामंडळ च्या कार्यालयात जाऊन सहायक संचालक यांच्याकडून या योजनेचा फॉर्म भरू शकता.

Who is Eligible for Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana?

राज्यातील सर्व OBC प्रवर्गातील तसेच मागासवर्गीय शाळकरी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी.

What are the benifits of Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana?

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येकी 60,000 दर वर्षी मिळणार आहेत.

12 thoughts on “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रू. | Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana”

Leave a comment