Indian Railway Selection Process: TC कसं व्हायचं? जाणून घ्या पात्रता निकष, अभ्यासक्रम आणि संपूर्ण माहिती

Indian Railway Selection Process: नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण भारतीय रेल्वे भरती निवड प्रक्रिया संबंधी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. जे उमेदवार रेल्वे भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी या लेखामध्ये दिलेली माहिती मोठी फायद्याची आणि कामाची ठरणार आहे.

तुम्ही जर रेल्वे भरतीसाठी इच्छुक असाल, तर कृपया रेल्वे भरती निवड प्रक्रिया माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानुसार तुमची तयारी सुरू ठेवा, म्हणजे ज्यावेळी अधिकृत रीत्या रेल्वेत भरती निघेल तेव्हा तुम्हाला या माहिती मुळे फायदा होईल, आणि तुम्ही लागलीच Indian Railway Bharti साठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकाल.

या आर्टिकल मध्ये आपण रेल्वेमध्ये निघणाऱ्या Loco pilot आणि TC या पदांसाठी उमेदवारांची निवड कशी केली जाते, हे जाणून घेणार आहोत. निवड प्रक्रिया सोबत या रेल्वे भरती साठी अभ्यासक्रम काय असणार? याची पण माहिती आपण पाहणार आहोत.

Indian Railway Selection Process 

आपण या लेखामध्ये वर सांगितल्या प्रमाणे Loco pilot आणि TC या रेल्वे भरती साठी कोणती निवड प्रक्रिया आहे, याची सविस्तर खालील प्रमाणे घेणार आहोत.

निवड प्रक्रिया ही योग्य आणि पात्र उमेदवारांची रिक्त पदांसाठी निवड करण्यासाठी बनवलेली प्रक्रिया आहे. यात जे उमेदवार पात्र होतील किंवा पास होतील केवळ त्यांनाच रेल्वे मध्ये नोकरी मिळणार आहे.

Loco Pilot Selection Process

Loco Pilot या पदासाठी रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया ही वेगळ्या स्वरूपाची राबवली जाते, यामधे जर उमेदवारांनी ही निवड प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना या Loco Pilot Selection Process अंतर्गत रिक्त जागांसाठी निवडले जात नाही.

Loco Pilot पदासाठी एकूण 3 स्तरावर निवड प्रक्रिया राबवली जाते, यामधे Online Test, Document Verification आणि Medical Examination घेतले जाते. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Online Test

सुरुवातीला Loco Pilot पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाते, ही ऑनलाइन परीक्षा CBT म्हणजेच कॉम्प्युटर वर आधारित परीक्षा असते.

या ऑनलाइन परीक्षा मध्ये उमेदवारांना कॉम्प्युटर च्या सहाय्याने Exam Test द्यावी लागते. परीक्षा ही वस्तुस्निष्ठ स्वरूपाची असते, म्हणजे प्रश्न हे MCQ स्वरूपात असतात.

Loco Pilot Online Test ही Negative Marking System मध्ये घेतली जाते, यामधे उमेदवार जेवढे प्रश्न चुकवेल त्या नुसार 1/3 प्रश्नांचे मार्क कट केले जातील.

Document Verification

जे उमेदवार Loco Pilot Online Test CBT Exam मध्ये पास झाले असतील, त्यांना त्यांचे कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी बोलवले जाते. 

Document Verification करताना उमेदवारांना त्यांचे सर्व कागदपत्रे सादर करावे लागतात, एकही Document उपलब्ध नसेल तर उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द केला जातो. त्यामुळे Document Verification च्या वेळी उमेदवारांना त्यांचे सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे.

Document Verification वेळी कागदपत्रे हे Original असावेत, सोबतच त्यांची झेरॉक्स प्रत देखील जवळ बाळगायची आहे. 

Medical Examination

ज्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली असेल, त्यांना मेडीकल तपासणी साठी बोलावले जाते. यामधे उमेदवाराची पूर्ण शारीरिक चाचणी तसेच आरोग्य तपासणी केली जाते.

Examination मध्ये काही आरोग्य विषयक बाबी आढळून आल्या, तर त्यानुसार उमेदवारांचे मार्क कट केले जातात. Medical Examination ही Loco Pilot Bharti ची शेवटची पायरी आहे, त्यांनतर जे उमेदवार पास झाले आहेत त्यांना थेट रिक्त जागांसाठी निवडले जाते.

Loco Pilot Syllabus

Loco Pilot भरती साठी अभ्यासक्रम हा पुढीलप्रमाणे आहे:

Loco pilot CBT 1 Online Exam

  1. Mathematics
  2. General Intelligence and Reasoning
  3. General Science
  4. General Awareness of Current Affairs
विषयप्रश्नमार्क्स
गणित, मानसिक क्षमता, सामान्य विज्ञान, सामान्य जागरूकता7575
Total7575

Loco pilot CBT 2 Online Exam

  1. Mathematics
  2. General Intelligence and Reasoning
  3. Basic Science & Engineering
  4. General awareness & current affairs
विभागविषयप्रश्नवेळ
Aगणित
बुद्धिमता चाचणी
मूलभूत विज्ञान आणि अभियांत्रिकी10090 मिनिट
Bटेक्निकल7560 मिनिट
Total1752 घंटे 30 मिनिट

TC Selection Process

रेल्वेमध्ये अजून एका महत्त्वाच्या पदासाठीची भरती केली जाते ती म्हणजे TC Bharti, TC पदासाठी उमेदवारांना एकूण 5 स्तरावरून चाचणी द्यावी लागते आणि त्यानुसार उत्तीर्ण उमेदवारांना रिक्त जागांसाठी निवडले जाते.

  • ऑनलाईन परीक्षा
  • शारिरीक चाचणी
  • मेडीकल तपासणी
  • कागदपत्रे पडताळणी
  • मुलाखत

असे एकूण 5 स्तर आहेत, ज्याद्वारे TC Selection Process प्रक्रिया पार पडते. रेल्वेतील TC पदासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत, त्यांना वरील सर्व निवड प्रक्रिया मधून जावे लागते, आणि ते जर या सर्व प्रक्रियेत पास झाले तर अशा उमेदवारांना TC म्हणून नोकरी मिळते.

ऑनलाईन परीक्षा

TC भरतीसाठी सुरुवातीला ऑनलाइन स्वरूपात कॉम्प्युटरच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते, ही परीक्षा पूर्णतः ऑनलाइन असते, या परीक्षेसाठी उमेदवाराकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची सुविधा असणे आवश्यक आहे. यासोबतच इंटरनेट आणि वेब कॅम ची पण सुविधा असावी.

परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपात घेतली जाणार आहे, MCQ स्वरूपात प्रश्न असतील ज्यांचे बहुपर्यायी उत्तरे असतील. ऑनलाइन परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, उमेदवार जेवढे प्रश्न चुकतील त्यानुसार 0.33 प्रमाणे मार्क कपात होणार आहे.

परीक्षा या दोन स्तरावर होणार आहेत, यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आहेत. अर्जदार उमेदवारांना पात्र होण्यासाठी पहिली पूर्व परीक्षा पास करावी लागते बाकी नंतरची परीक्षा महत्वाची असते, मुख्य परीक्षेत उमेदवारांनि जेवढे मार्क मिळवले आहेत ते निवड प्रक्रियेत Count केले जाणार आहेत.

शारिरीक चाचणी

उमेदवार ऑनलाईन परीक्षा मध्ये पास झाले आहेत, त्यांना रेल्वे विभागाद्वारे शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाते. शारीरिक चाचणीमध्ये उमेदवाराची Physical Test घेतली जाते.

Physical Efficiency Test असं या शारीरिक चाचणी चे नाव आहे, उमेदवाराने या चाचणी मध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. शारीरिक चाचणीमध्ये वेगवेगळ्या कसरती घेतल्या जाणार आहेत.

मेडीकल तपासणी

जे उमेदवार रेल्वे TC Bharti Physical Test उत्तीर्ण होतील, त्यांना मेडीकल तपासणी साठी बोलावले जाईल. तेथे रेल्वे करियर विभागाद्वारे उमेदवारांची मेडीकल तपासणी केली जाईल.

मेडीकल तपासणी मध्ये उमेदवाराचे आरोग्य तसेच इतर बाबी विचारात घेतल्या जातील, जर उमेदवार पूर्णतः तंदुरुस्त असेल आरोग्य चांगले असेल तर उमेदवाराला मेडीकल टेस्ट मध्ये पास केले जाईल.

कागदपत्रे पडताळणी

जे उमेदवार मेडिकल टेस्ट मध्ये पास होतील, त्यांचे कागदपत्रे पडताळणी केली जाईल. यामधे उमेदवाराला यावेळी सर्व कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे.

भरती साठी जेवढे कागदपत्रे लागतात तेवढे झेरॉक्स स्वरूपात प्रत्येक प्रत सोबत ठेवायची आहे. सोबतच कागदपत्रांची Original Copy पण सोबत असावी. 

ऐन वेळी जर एखादे कागदपत्रे लागले तर तुम्हाला अडचण होणार नाही, पडताळणी मध्ये कागदपत्रांची सत्यता तपासली जाणार आहे. 

मुलाखत

TC Selection Process च्या शेवटी उमेदवारांचा Personal Interview घेतला जाणार आहे. मुलाखती मध्ये उमेदवारांना वेगवेगळे प्रश्न विचारले जाणार आहेत, ही शेवटची निवड प्रक्रिया असल्याने जो उमेदवार मुलाखत योग्य प्रकारे देऊ शकेल त्याची नोकरी पक्की असणार आहे.

Indian Railway TC Syllabus ( Exam Pattern)

रेल्वे TC भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान ५०% गुणांसह १२वी पास (सायन्स / आर्ट्स / कॉमर्स) पाहिजे.

Indian Railway TC भरती हि मुळात ३ स्टेज मध्ये होत असते, (पण इतर काही Extra स्टेज देखील असतात) त्याची सविस्तर माहिती वर आपण दिली आहे तरी पण या सेक्शन मध्ये आपण त्याची किंचित माहिती समाविष्ट करू.

✍️ परीक्षा :- MCQ type परीक्षा असते, या Exam मध्ये Negative Marking असते.

  • पूर्व परीक्षा – पात्रता परीक्षा – 100 गुण
  • मुख्य परीक्षा – मेरिट – 120 गुण (मुख्य परीक्षेच्या गुणांवर मेरिट लागत असते.)
विषयप्रश्नमार्क्स
सामान्य जागरूकता2525
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क1515
अंकगणित2020
टेक्निकल विषय3030
सामान्य विज्ञान3030
120120

🔞 वयाची अट :- १८ – ३० वर्ष (अनुसूचित जाती/जमातींना वयात सूट दिली जाते.)

रेल्वे TC भरती हि RRB NTPC द्वारे राबवली जाते, हि परीक्षा दरवर्षी RRB कॅलेंडर नुसार पार पडते, त्यासाठी Special RRB कॅलेंडर प्रसिद्ध केले जाते.

मुख्य आणि महत्वाची अशी बाब म्हणजे, यंदा RRB NTPC ची जाहिरात हि जुलै किंवा सप्टेंबर दरम्यान जारी केली जाणार आहे. त्यामुळे तयारी ठेवा काही कमी जास्त होत असेल तर त्यावर विशेष काम करा आणि यावेळी Indian Railway TC भरती मध्ये यश संपादित करा.

Indian Railway Selection Process FAQ

भारतीय रेल्वे भरती अर्ज कसा करायचा?

रेल्वे भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करता येतो.

भारतीय रेल्वे भरती साठी निवड प्रक्रिया काय आहे?

रेल्वे भरती साठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही वर लेखामध्ये आपण सांगितली आहे. कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा.

भारतीय रेल्वे भरती साठी अभ्यासक्रम काय आहे?

रेल्वे भरती TC, Loco pilot या दोन्ही पदासाठी असणार अभ्यासक्रम हा वर दिला आहे. कृपया आर्टिकल पूर्ण वाचा.

8 thoughts on “Indian Railway Selection Process: TC कसं व्हायचं? जाणून घ्या पात्रता निकष, अभ्यासक्रम आणि संपूर्ण माहिती”

Leave a comment