Northern Railway Apprentice Bharti 2026: उत्तर रेल्वेमध्ये मेगा भरती! 4651 जागा! 10वी + ITI पास, लगेच इथून अर्ज करा

Northern Railway Apprentice Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, Stipend, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

भारतीय रेल्वेच्या सर्वात मोठ्या झोनपैकी एक असलेल्या उत्तर रेल्वेच्या (Northern Railway) Railway Recruitment Cell (RRC), नवी दिल्ली यांनी Apprentices Act 1961 अंतर्गत तब्बल 4651 Act Apprentice जागांसाठी अधिसूचना (Notification No. RRC/NR/03/2026/Act Apprentice) 06 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे. या भरतीची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात कोणतीही लेखी परीक्षा नाही आणि Interview सुद्धा नाही. 10वी आणि ITI च्या गुणांवर थेट Merit List लावली जाणार आहे.

ज्या उमेदवारांनी 10वी किमान 50% गुणांसह पास केली आहे आणि Fitter, Electrician, Welder, Mechanic Diesel, Carpenter, Machinist, COPA, Stenographer यांसारख्या कोणत्याही ITI Trade मध्ये NCVT/SCVT चे प्रमाणपत्र मिळवले आहे, त्यांच्यासाठी ही रेल्वे Workshop मध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी आहे.

Northern Railway Apprentice Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)

घटकतपशील
भरती संस्थाRailway Recruitment Cell (RRC), Northern Railway, New Delhi
जाहिरात क्रमांकRRC/NR/03/2026/Act Apprentice
जाहिरात दिनांक06/11/2026
पदाचे नावAct Apprentice
एकूण जागा4651
अर्ज पद्धतOnline
प्रशिक्षणाचे ठिकाणNorthern Railway – Lucknow, Delhi, Firozpur, Moradabad, Ambala आणि Jammu Cluster
निवड प्रक्रिया10वी + ITI गुणांवर आधारित Merit List (परीक्षा नाही, Interview नाही)
StipendApprentice नियमांनुसार (जाहिरातीत रक्कम दिलेली नाही)
अर्ज फी₹100 (SC/ST/PwBD/महिला – फी नाही)
अर्ज सुरू11 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख11 डिसेंबर 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
अधिकृत वेबसाइटwww.rrcnr.org

Northern Railway Apprentice Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

या भरतीमध्ये एकूण 4651 Training Slots आहेत. Cluster नुसार आणि प्रवर्गानुसार जागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

ClusterएकूणURSCSTOBC
Lucknow (LKO)1525774229112410
Delhi (DLI)131266819894352
Firozpur (FZR)74044216912117
Moradabad (MB)63329616
Ambala (UMB)97950114472262
Jammu3216646
एकूण465124337553001163

याशिवाय वरील जागांमध्येच दिव्यांग (PwBD) आणि माजी सैनिकांसाठी (Ex-SM) जागा राखीव आहेत:

प्रकारएकूण जागा
HI (कर्णबधिर)62
LD (अस्थिव्यंग)50
MD (बहुविकलांग)22
VI (दृष्टिदोष)31
Ex-Servicemen176

👉 आरक्षण SC, ST, OBC, PwBD आणि Ex-Servicemen उमेदवारांसाठी लागू आहे.

⚠️ नोट: पदसंख्या Provisional आहे, ती कमी किंवा जास्त होऊ शकते.

Cluster Lucknow (1525 जागा) – Unit आणि Trade नुसार

UnitTrade नुसार जागाएकूण
LKO DivisionMechanic Diesel 110, Electrician (General) 63, Electrician (TRD) 16, Fitter 186, Electronics Mechanic 65, Stenographer (English) 50, Data Entry Operator 14504
Engineering Dept. LKO DivisionFitter 10, Carpenter 2, Welder (Gas & Electric) 3, Mason (Building Constructor) 3, Painter General 1, Blacksmith 10, Stenographer (English) 8, Data Entry Operator 946
Carriage Workshop AMV/LKOFitter 292, Machinist 11, Welder (Gas & Electric) 71374
Bridge Workshop CB/LKOFitter 13, Mechanic Motor Vehicle 5, Forger & Heat Treater 3, Welder (Gas & Electric/Structural Welder) 5, Painter (General) 4, Machinist 6, Turner 1, Material Handling Equipment Mechanic cum Operator 643
Rolling Stock Workshop (Loco & Carriage) CB/LKOFitter 208, Electrician 80, Machinist 26, Welder (Gas & Electric) 19333
Rolling Stock Workshop (Loco & Carriage) (Elect) CB/LKOElectrician 82, Refrigeration & Air Conditioning 118, Wireman 25225

Cluster Delhi (1312 जागा) – Unit आणि Trade नुसार

UnitTrade नुसार जागाएकूण
C&W NZMFitter 30, Carpenter 20, Welder (Gas & Elect.) 1363
C&W (Elect.) Workshop/Delhi & C&W Workshop/DelhiFitter 60, Carpenter 45, Welder (Gas & Elect.) 31136
C&W Workshop/DelhiFitter 32, Carpenter 21, Welder (Gas & Elect.) 1467
Electric Loco Shed/GZB/DLIElectrician 40, Fitter 40, Welder 9, Machinist 897
EMU Car Shed/GZB/DLIFitter (Elect.) 50, Fitter (Mech.) 48, Welder 5, Painter General 5, Carpenter 6, Machinist 5119
Diesel Shed TKD/DLIFitter 67, Mechanic Diesel 55, Turner 7, Welder 7136
Diesel Shed SSB/DLIFitter (Elect.) 46, Fitter (Mech.) 4591
Electrical (TRD)/DLIElectrician 9898
Personnel Department/DLIData Entry Operator 15, Stenographer (English) 520
S&T/DLIElectronics Mechanic/Signal 63, Electronics Mechanic/Tele 2992
Dy. CE/BL/TKJFitter 28, Welder 17, Carpenter 10, Painter General 6, COPA 465
Electrical General/DLIElectrician 6868
S&T/WS/GZBElectrician 6, Electronics Mechanic 3, Welder 4, Fitter 2, Painter General 2, Mechanic Machine Tool Maintenance 219
NRHQ (P. Branch)Stenographer (English) 40, Stenographer (Hindi) 25, COPA 9, Data Entry Operator 60134
Engineering Dept./DLI DivisionWelder 7, Blacksmith 13, Carpenter 6, Painter General 4, Mason (Building Constructor) 4, Fitter 539
TMCFitter 43, Welder 15, Electrician 5, Electronics Mechanic 568

Cluster Firozpur (740 जागा) – Unit आणि Trade नुसार

UnitTrade नुसार जागाएकूण
Diesel Shed LDH/FZR Div.Electrician 98, Mechanic Diesel 114, Turner 7, Carpenter 3, Painter General 2, Welder 7, Mechanic Motor Vehicle 4235
DMU Car Shed JUC/FZR Div.Electrician 15, Mechanic Diesel 35, Welder 5, Turner 358
C&W Depot/FZRWelder 8, Carpenter 5, Fitter 65, Electrician 684
Electric Loco Shed/LDH/FZR Div.Electrician 35, Fitter 34, Welder 372
Bridge Workshop JalandharPlate Fitter 16, Welder 12, Fitter/General 7, Machine Operator 11, Slinger 6, MWD Fitter 2, Pipe Fitter 2, Crane Operator 258
CWM/ASR (Amritsar)Fitter 60, Welder 40, Machinist 25125
Engg. Dept./DRM/FZRWelder 4, Blacksmith 6, Carpenter 1, Mason (Building Constructor) 3, Fitter 115
Signal Dept./DRM/FZRElectronics Mechanic 6, Information and Communication Technology System Maintenance 12, Instrument Mechanic 422
Tele Department DRM/FZRElectronics Mechanic 3, Information and Communication Technology System Maintenance 5, Instrument Mechanic 210
Elect./Gen Department/DRM/FZRElectrician 15, Refrigeration and Air Conditioning Mechanic 20, Electrician (TL) 2358
Personnel Department DRM/FZRStenographer (Hindi) 1, Stenographer (English) 23

👉 Firozpur Cluster मध्ये ST प्रवर्गासाठी फक्त 12 जागा आहेत (Bridge Workshop Jalandhar – 3 आणि CWM Amritsar – 9). इतर Units मध्ये ST साठी जागा नाहीत.

Cluster Moradabad (63 जागा) – Unit आणि Trade नुसार

UnitTrade नुसार जागाएकूण
MB DivisionData Entry Operator 14, Stenographer (English) 216
Engineering Dept./MB DivisionFitter 3, Carpenter 2, Welder 8, Mason (Building Constructor) 1, Painter General 1, Blacksmith 722
S&T/MBElectronics Mechanic (Signal) 8 + 16 (जाहिरातीत दोन वेगळ्या ओळींमध्ये दिले आहे), Electronics Mechanic (Tele) 125

Cluster Ambala (979 जागा) – Unit आणि Trade नुसार

UnitTrade नुसार जागाएकूण
UMB DivisionCarpenter 24, Welder 46, Blacksmith 13, Mason (Building Constructor) 3, Fitter 230, Painter General 13, Electrician 23, Fitter (Elect.) 9, Electrician/ACF 7, Wireman 5, Mechanic Diesel 2, Mechanic (Motor Vehicle) 3, Electrician/TRD 60, Electrician/Remote Control 2, Electronics Mechanic 10, Turner 4, COPA 20, Stenographer (English) 20494
C&W POH Workshop Jagadhari, Yamuna NagarFitter 129, Welder 65, Carpenter 61, Painter General 59, Machinist 39, Wireman 29, Electrician 24, Refrigeration and Air Conditioning Mechanic 14420
RCNKFitter/C&W 15, Fitter/Elec. 520
S&T/UMBElectrician 9, Painter General 6, Carpenter 6, Welder 9, Electronic Mechanic 8, Fitter 745

Cluster Jammu (32 जागा) – Unit आणि Trade नुसार

UnitTrade नुसार जागाएकूण
Jammu DivisionWelder 3, Blacksmith 4, Carpenter 1, Mason (Building Constructor) 2, Fitter 111
S&T/JATElectronic Mechanic (ESM) 12, Electronic Mechanic (TCM) 921

Northern Railway Apprentice Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

पात्रता 06 नोव्हेंबर 2026 (जाहिरात दिनांक) नुसार पूर्ण असणे आवश्यक आहे.

10वी पात्रता

  • 10वी (SSC/Matriculation) किंवा समकक्ष परीक्षा (10+2 पद्धतीनुसार) मान्यताप्राप्त Board मधून किमान 50% Aggregate गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.

ITI पात्रता

  • संबंधित Trade मध्ये ITI उत्तीर्ण आणि NCVT/SCVT (भारत सरकार मान्यताप्राप्त) चे प्रमाणपत्र असणे आवश्यक.

❌ ज्यांचा 10वी किंवा ITI चा निकाल 06/11/2026 रोजी प्रलंबित (Result Awaited) आहे, ते उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.

👉 10वीच्या 50% अटीसाठी कोणत्याही प्रवर्गाला सवलत जाहिरातीत दिलेली नाही.

Northern Railway Apprentice Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

  • उमेदवाराने 15 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि 24 वर्षे पूर्ण केलेली नसावीत.
  • म्हणजेच General उमेदवाराचा जन्म 12/12/2002 ते 11/12/2011 या कालावधीत झालेला असावा.
प्रवर्गवयोमर्यादा सवलत (Upper Age)
OBC+3 वर्षे
SC/ST+5 वर्षे
PwBD (दिव्यांग)+10 वर्षे
Ex-ServicemenDefence मधील सेवा कालावधी + 3 वर्षे (कमाल अतिरिक्त 10 वर्षांपर्यंत), किमान 6 महिने सलग सेवा आवश्यक

⚠️ वयाची गणना 11 डिसेंबर 2026 (अर्जाची शेवटची तारीख) नुसार केली जाईल.

👉 जे माजी सैनिक आधीच Ex-Servicemen दर्जा वापरून Civil सरकारी नोकरीत रुजू झाले आहेत, त्यांना ही वयोमर्यादा सवलत मिळणार नाही.

Northern Railway Apprentice Bharti 2026: Stipend (मानधन)

ही नियमित सरकारी नोकरी नसून Apprenticeship (प्रशिक्षण) आहे. त्यामुळे यात पगार नसून प्रशिक्षणादरम्यान Stipend दिले जाते.

  • जाहिरातीनुसार प्रशिक्षणाचा कालावधी आणि Stipend “As per extant rules” म्हणजे सध्या लागू असलेल्या Apprentice नियमांनुसार दिला जाईल.
  • अधिकृत जाहिरातीत Stipend ची ठराविक रक्कम दिलेली नाही.

अतिरिक्त सुविधा मिळतील का?

❌ Hostel/राहण्याची सोय मिळणार नाही, उमेदवारांनी स्वतः व्यवस्था करायची आहे.

❌ Document Verification ला येण्यासाठी TA/DA मिळणार नाही.

👉 Railway सारख्या मोठ्या संस्थेच्या Workshop, Loco Shed आणि Carriage Workshop मध्ये प्रत्यक्ष काम शिकण्याचा अनुभव हा या Apprenticeship चा सर्वात मोठा फायदा आहे.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

अधिकृत जाहिरातीत राज्याबाबत (Domicile) कोणतीही अट दिलेली नाही. त्यामुळे पात्रता पूर्ण करणारे महाराष्ट्रातील उमेदवारही Online अर्ज करू शकतात.

⚠️ पण लक्षात ठेवा, ही भरती उत्तर रेल्वेची आहे. प्रशिक्षणाची सर्व ठिकाणे उत्तर भारतात आहेत, म्हणजे Lucknow (उत्तर प्रदेश), Delhi, Ghaziabad, Firozpur, Ludhiana, Jalandhar, Amritsar (पंजाब), Moradabad (उत्तर प्रदेश), Ambala, Jagadhari/Yamuna Nagar (हरियाणा) आणि Jammu. Document Verification सुद्धा संबंधित Division मध्येच होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान Hostel मिळणार नाही, त्यामुळे तिथे राहण्याची तयारी असेल तरच अर्ज करा.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही. उलट सर्व महिला उमेदवारांना अर्ज फी माफ आहे.

Northern Railway Apprentice Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

❌ लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

❌ Interview/Viva घेतला जाणार नाही.

1️⃣ अर्जाची Screening आणि Scrutiny

सर्व Online अर्जांची तपासणी केली जाईल.

2️⃣ Merit List

Merit List खालील सूत्रानुसार लावली जाईल:

Merit % = (10वी चे % + ITI चे %) ÷ 2

दोन्ही परीक्षांना समान Weightage आहे. उदाहरणार्थ, 10वीला 80% आणि ITI ला 90% असतील तर Merit 85% धरले जाईल.

Merit List Cluster नुसार, Trade नुसार आणि Community (प्रवर्ग) नुसार, जागांच्या संख्येइतकी, गुणांच्या उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.

3️⃣ गुण समान असल्यास (Tie)

  • ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे त्याला प्राधान्य मिळेल.
  • जन्मतारीखही सारखी असल्यास, ज्याने 10वी आधी पास केली त्याला प्राधान्य मिळेल.

4️⃣ Document Verification आणि Medical Certificate

Merit मध्ये आलेल्या उमेदवारांना E-Admit Card वर दिलेल्या ठिकाणी आणि तारखेला Original कागदपत्रे आणि विहित नमुन्यातील Medical Certificate घेऊन जावे लागेल.

5️⃣ Contract of Apprenticeship

प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी करार (Contract) करावा लागेल. उमेदवार अल्पवयीन (Minor) असल्यास पालक/Guardian करार करतील.

गुण कसे मोजले जातील?

  • Grade System असलेल्या Board साठी प्रत्येक Grade च्या Range चा मध्यबिंदू (Midpoint) घेतला जाईल आणि प्रत्येक विषय 100 गुणांचा मानून सरासरी काढली जाईल.
  • CGPA/Grade असेल तर उमेदवाराने स्वतः ते Actual Marks मध्ये रूपांतरित करून फॉर्ममध्ये भरायचे आहे.
  • सर्व विषयांचे गुण मोजायचे आहेत, फक्त Best 5 किंवा काही विषयांचे नाहीत.
  • ITI साठी सर्व Semesters च्या Consolidated Marksheet मधील सरासरी गुण, म्हणजेच NCVT/SCVT च्या Provisional National Trade Certificate मधील गुण ग्राह्य धरले जातील.

Northern Railway Apprentice Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
General / OBC (पुरुष)₹100
SC / ST / PwBD / सर्व महिलाफी नाही

👉 फी Online पद्धतीने भरावी लागेल.

👉 फी Non-refundable आहे.

👉 Cash, Cheque, DD, Money Order, IPO किंवा Recruitment Fee Stamps स्वीकारले जाणार नाहीत.

👉 Online Transaction Charges असल्यास ते उमेदवाराने भरायचे आहेत. Payment अपूर्ण किंवा Pending राहिल्यास नवीन Transaction करावे लागेल.

Northern Railway Apprentice Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

Online अर्जासोबत खालील कागदपत्रे Upload करणे बंधनकारक आहे:

✔️ फोटो, स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) – 10 ते 50 KB, JPG Format

✔️ जन्मतारखेचा पुरावा (10वी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला)

✔️ 10वी मार्कशीट आणि प्रमाणपत्र

✔️ ITI च्या सर्व Semesters ची Consolidated Marksheet / गुण असलेले Provisional National Trade Certificate

✔️ NCVT/SCVT चे National Trade Certificate आणि मार्कशीट

✔️ जात प्रमाणपत्र – SC/ST/OBC (लागू असल्यास, Central Government Format मध्ये)

✔️ OBC Non-Creamy Layer Certificate (01/01/2026 किंवा त्यानंतर जारी केलेले)

✔️ Disability Certificate (PwBD उमेदवारांसाठी)

✔️ Discharge Certificate / Serving Certificate (Ex-Servicemen कोट्यासाठी)

✔️ Medical Fitness Certificate (Document Verification ला आणायचे आहे)

Northern Railway Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी नाही

Apprenticeship पूर्ण झाल्यानंतर Railway नोकरी देईलच असे कोणतेही बंधन नाही. त्याचप्रमाणे उमेदवारावरही Railway ची नोकरी स्वीकारण्याचे बंधन नाही. त्यामुळे याला कायमची सरकारी नोकरी समजू नका.

❗ चुकीचा Cluster/Unit निवडल्यास अर्ज थेट रद्द

ज्या Cluster किंवा Unit मध्ये तुमच्या ITI Trade च्या जागाच नाहीत, तो Cluster/Unit निवडल्यास अर्ज Reject होईल आणि फी परत मिळणार नाही. वरील Trade-wise तक्ता नीट बघूनच निवड करा.

❗ फक्त एकच अर्ज करा

एका उमेदवाराने फक्त एकच अर्ज करायचा आहे. एकापेक्षा जास्त अर्ज आढळल्यास सर्वच अर्ज रद्द केले जातील.

❗ Final Submit नंतर बदल नाही

अर्ज Final Submit केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. नंतर Division/Unit बदलण्याची विनंतीही मान्य होणार नाही.

❗ 10वी मध्ये किमान 50% गुण बंधनकारक

10वीला 50% पेक्षा कमी Aggregate गुण असल्यास अर्ज करता येणार नाही.

❗ फॉर्ममधील गुण आणि मार्कशीट जुळले पाहिजेत

Online फॉर्ममध्ये भरलेले गुण/CGPA आणि Original मार्कशीट यात थोडा जरी फरक Document Verification मध्ये आढळला तरी उमेदवारी थेट रद्द होईल. त्यामुळे गुण अचूक भरा.

❗ मराठी प्रमाणपत्रांचे भाषांतर आवश्यक

English किंवा Hindi व्यतिरिक्त इतर भाषेतील प्रमाणपत्र (उदा. मराठीतील जात प्रमाणपत्र) असल्यास त्यासोबत English/Hindi मधील Self-attested भाषांतर जोडणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांनी ही अट विशेष लक्षात ठेवावी.

❗ फॉर्म फक्त English किंवा Hindi मध्ये भरा

इतर कोणत्याही भाषेत भरलेला अर्ज अवैध ठरेल.

❗ OBC NCL Certificate ची तारीख

OBC आरक्षणासाठी Non-Creamy Layer Certificate 2026-27 साठी वैध, Central Government Format मध्ये आणि 01/01/2026 किंवा त्यानंतर जारी झालेले असावे. जुने किंवा State Format मधील प्रमाणपत्र चालणार नाही.

❗ Medical Certificate कोणाकडून घ्यायचे?

Medical Certificate हे Central/State Hospital मधील Assistant Surgeon किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या Gazetted सरकारी डॉक्टरांच्या सहीचे असावे.

❗ फोटो आणि सहीच्या अटी

Photo मध्ये Goggles, Cap, Wig किंवा रंगीत चष्मा नसावा. फोटो अस्पष्ट किंवा खूप लहान नसावा. सही Capital Letters मध्ये केल्यास किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी सही केल्यास अर्ज रद्द होईल.

❗ Document Verification ला Photocopies

Original कागदपत्रांसोबत Self-attested Photocopies आणायच्या आहेत. जाहिरातीत एका ठिकाणी 1 Set तर दुसऱ्या ठिकाणी 2 Photocopies असा उल्लेख आहे, त्यामुळे सुरक्षिततेसाठी 2 Sets घेऊन जा. Upload न केलेले कोणतेही नवीन कागदपत्र Document Verification ला स्वीकारले जाणार नाही.

❗ PwBD उमेदवारांसाठी Trade नुसार दिव्यांगता मर्यादा

प्रत्येक Trade साठी किती दिव्यांगता चालेल याचा स्वतंत्र तक्ता जाहिरातीत दिला आहे. उदाहरणार्थ, Machinist Trade मध्ये LD प्रकारात फक्त करंगळी Damaged असलेले उमेदवार चालतात. तुमची दिव्यांगता त्या Trade शी जुळते का हे अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीत नक्की तपासा.

❗ Hostel आणि TA/DA नाही

प्रशिक्षणादरम्यान राहण्याची सोय मिळणार नाही आणि Document Verification साठी प्रवास खर्चही मिळणार नाही.

Northern Railway Apprentice Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

RRC Northern Railway ची अधिकृत वेबसाइट www.rrcnr.org ला भेट द्या.

Step 2

“Engagement of Act Apprentice” Online Application या Link वर क्लिक करा.

Step 3

Candidate Registration करा. यात Name, Father’s Name, Community, Category, Mobile Number, Email ID आणि Date of Birth भरा.

Step 4

Registration झाल्यावर Login साठी Password तुमच्या Email ID वर आणि Registered Mobile Number वर SMS द्वारे येईल.

Step 5

Login करा. Candidate Dashboard वर Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details (10वी आणि ITI चे अचूक गुण)
  • Category Information
  • Cluster/Unit आणि Trade निवड

Step 6

Photo, Signature आणि Thumb Impression (10 ते 50 KB, JPG) तसेच सर्व प्रमाणपत्रे Upload करा.

Step 7

Application Fee ₹100 Online भरा (SC/ST/PwBD/महिला उमेदवारांना फी नाही).

Step 8

Final Submit करून Application आणि Fee Payment Slip चा Print घ्या.

👉 शेवटच्या दिवसांत Website वर Load वाढू शकतो, त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकर अर्ज करा. अर्ज करताना अडचण आल्यास RRC वेबसाइटवरील Helpline वर कामाच्या दिवशी सकाळी 09:30 ते संध्याकाळी 06:00 दरम्यान संपर्क करा.

Northern Railway Apprentice Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • लेखी परीक्षा आणि Interview न देता फक्त गुणांवर निवड
  • SC/ST/PwBD आणि सर्व महिला उमेदवारांना अर्ज फी नाही
  • भारतीय रेल्वेच्या मोठ्या Workshop, Loco Shed, Carriage Workshop आणि Signal & Telecom विभागात प्रत्यक्ष प्रशिक्षण
  • प्रशिक्षणादरम्यान नियमांनुसार Stipend
  • ITI नंतर Practical Industrial अनुभव मिळाल्यामुळे पुढील Career साठी मदत

Northern Railway Apprentice Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • 10वी मध्ये 50% पेक्षा जास्त आणि ITI मध्ये चांगले गुण असलेले उमेदवार
  • Fitter, Electrician, Welder, Mechanic Diesel, Carpenter, Machinist, Painter, Wireman, Electronics Mechanic, Refrigeration & AC, COPA, Stenographer, Data Entry Operator इत्यादी Trade चे ITI पास उमेदवार
  • परीक्षा न देता Railway मध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी
  • उत्तर भारतात राहून प्रशिक्षण घेण्याची तयारी असलेले उमेदवार

Northern Railway Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
जाहिरात प्रसिद्ध06 नोव्हेंबर 2026
Online अर्ज सुरू11 नोव्हेंबर 2026
Online अर्जाची शेवटची तारीख11 डिसेंबर 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
Merit List (अपेक्षित)February 2027
Document VerificationE-Admit Card द्वारे कळवले जाईल

Northern Railway Apprentice Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Northern Railway Apprentice Bharti 2026: FAQs

Northern Railway Apprentice Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

या भरतीमध्ये एकूण 4651 Act Apprentice जागा आहेत. यात Lucknow Cluster मध्ये 1525, Delhi मध्ये 1312, Ambala मध्ये 979, Firozpur मध्ये 740, Moradabad मध्ये 63 आणि Jammu मध्ये 32 जागा आहेत.

या भरतीसाठी पात्रता काय आहे?

10वी किमान 50% Aggregate गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित Trade मध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती आहे?

11/12/2026 रोजी 15 वर्षे पूर्ण आणि 24 वर्षे पूर्ण झालेली नसावीत. OBC ला 3, SC/ST ला 5 आणि PwBD ला 10 वर्षांची सवलत आहे.

या भरतीसाठी परीक्षा आहे का?

नाही. लेखी परीक्षा आणि Interview दोन्ही नाहीत. 10वी आणि ITI च्या टक्केवारीच्या सरासरीवर Merit List लावली जाईल.

Stipend किती मिळणार?

जाहिरातीनुसार Stipend आणि प्रशिक्षण कालावधी सध्याच्या Apprentice नियमांनुसार असेल. जाहिरातीत ठराविक रक्कम दिलेली नाही.

अर्ज फी किती आहे?

General/OBC पुरुष उमेदवारांसाठी ₹100 आहे. SC/ST/PwBD आणि सर्व महिला उमेदवारांना फी नाही.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो. जाहिरातीत Domicile ची अट दिलेली नाही. पण प्रशिक्षण आणि Document Verification उत्तर रेल्वेच्या संबंधित Division मध्ये होईल आणि Hostel मिळणार नाही.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, महिला उमेदवार अर्ज करू शकतात आणि त्यांना अर्ज फी माफ आहे.

ITI चा निकाल बाकी असेल तर अर्ज करता येईल का?

नाही. 06/11/2026 रोजी 10वी किंवा ITI चा निकाल प्रलंबित असलेले उमेदवार पात्र नाहीत.

Apprenticeship नंतर Railway मध्ये कायमची नोकरी मिळेल का?

नाही. जाहिरातीत स्पष्ट सांगितले आहे की प्रशिक्षणानंतर नोकरी देण्याचे Railway वर कोणतेही बंधन नाही.

शेवटची तारीख कधी आहे?

Online अर्जाची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2026 (रात्री 11:59 पर्यंत) आहे.

इतर भरती अपडेट्स

Leave a comment