MPSC Group C Staff Nurse Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 06 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चे मोठे शुद्धिपत्रक (Corrigendum) प्रसिद्ध केले आहे. या शुद्धिपत्रकानुसार गट-क परीक्षेतील एकूण पदसंख्या 5,707 वरून थेट 16,717 करण्यात आली आहे. यामध्ये नर्सिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी सगळ्यात मोठी बातमी म्हणजे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील अधिपरिचारिका (Staff Nurse) पदाच्या तब्बल 3,911 जागा नव्याने या परीक्षेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
ज्यांनी GNM, B.Sc Nursing किंवा Post Basic B.Sc Nursing केले आहे आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेत (MNC) नोंदणी केलेली आहे, अशा सर्व उमेदवारांसाठी ही राज्य शासनाची कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे या पदासाठी 80% जागा महिलांसाठी राखीव आहेत.
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
| परीक्षेचे नाव | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 |
| जाहिरात क्रमांक | 017/2026 (शुद्धिपत्रक दिनांक 06 नोव्हेंबर 2026) |
| पदाचे नाव | अधिपरिचारिका, गट-क (Staff Nurse) |
| विभाग | वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग |
| एकूण जागा | 3,911 (महिला 3,130 + पुरुष 781) |
| शैक्षणिक पात्रता | GNM / B.Sc Nursing / Post Basic B.Sc Nursing + MNC नोंदणी |
| अर्ज पद्धत | Online |
| नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
| निवड प्रक्रिया | पूर्व परीक्षा (OMR) → स्वतंत्र मुख्य परीक्षा |
| पगार | शासन नियमानुसार (खाली सविस्तर पहा) |
| अर्ज सुरू | 13 नोव्हेंबर 2026 (दुपारी 2:00 पासून) |
| शेवटची तारीख | 27 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:59 पर्यंत) |
| पूर्व परीक्षा | 24 जानेवारी 2027 |
| अधिकृत वेबसाइट | mpsc.gov.in / mpsconline.gov.in |
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)
या भरतीत अधिपरिचारिका पदाच्या एकूण 3,911 जागा आहेत. सेवाप्रवेश नियमानुसार यातील 80% जागा (3,130) महिलांसाठी आणि 20% जागा (781) पुरुषांसाठी राखीव आहेत.
महिलांसाठी राखीव जागा (एकूण 3,130)
| प्रवर्ग | जागा |
|---|---|
| अनुसूचित जाती (SC) | 338 |
| अनुसूचित जमाती (ST) | 218 |
| विमुक्त जाती (VJ-A) | 102 |
| भटक्या जमाती (NT-B) | 86 |
| भटक्या जमाती (NT-C) | 133 |
| भटक्या जमाती (NT-D) | 59 |
| इतर मागास वर्ग (OBC) | 614 |
| विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 54 |
| सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (SEBC) | 313 |
| आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) | 305 |
| खुला (अराखीव) | 908 |
| एकूण | 3,130 |
समांतर आरक्षण (महिलांसाठीच्या 3,130 जागांमध्ये):
| समांतर आरक्षण | जागा |
|---|---|
| सर्वसाधारण महिला | 1,971 |
| खेळाडू | 157 |
| माजी सैनिक | 470 |
| पदवीधर अंशकालीन कर्मचारी | 313 |
| भूकंपग्रस्त | 62 |
| प्रकल्पग्रस्त | 157 |
👉 दिव्यांग: एकूण 125 जागा. त्यापैकी 63 जागा अस्थिव्यंगता, मेंदूचा पक्षाघात (Cerebral Palsy), कुष्ठरोग मुक्त (Leprosy Cured), शारीरिक वाढ खुंटणे (Dwarfism), आम्ल हल्लाग्रस्त (Acid Attack Victims), स्नायू विकृती (Muscular Dystrophy) या प्रकारांसाठी आहेत. उरलेल्या 62 जागा स्वमग्नता (Autism), बौद्धिक अक्षमता (Intellectual Disability), मानसिक आजार (Mental Illness), विशिष्ट शिक्षण अक्षमता (Specific Learning Disability) तसेच बहिरेपणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारच्या दिव्यांगत्वासाठी आहेत.
👉 अनाथ: एकूण 31 जागा (संस्थात्मक 16, संस्थाबाह्य 15).
पुरुषांसाठी राखीव जागा (एकूण 781)
| प्रवर्ग | जागा |
|---|---|
| अनुसूचित जाती (SC) | 84 |
| अनुसूचित जमाती (ST) | 54 |
| विमुक्त जाती (VJ-A) | 26 |
| भटक्या जमाती (NT-B) | 21 |
| भटक्या जमाती (NT-C) | 33 |
| भटक्या जमाती (NT-D) | 15 |
| इतर मागास वर्ग (OBC) | 153 |
| विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 14 |
| सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (SEBC) | 78 |
| आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) | 76 |
| खुला (अराखीव) | 227 |
| एकूण | 781 |
समांतर आरक्षण (पुरुषांसाठीच्या 781 जागांमध्ये):
| समांतर आरक्षण | जागा |
|---|---|
| सर्वसाधारण | 491 |
| खेळाडू | 39 |
| माजी सैनिक | 117 |
| पदवीधर अंशकालीन कर्मचारी | 76 |
| भूकंपग्रस्त | 18 |
| प्रकल्पग्रस्त | 40 |
👉 दिव्यांग: एकूण 31 जागा. त्यापैकी 16 जागा पहिल्या गटातील दिव्यांग प्रकारांसाठी आणि 15 जागा दुसऱ्या गटातील प्रकारांसाठी आहेत (महिलांप्रमाणेच).
👉 अनाथ: एकूण 08 जागा (संस्थात्मक 04, संस्थाबाह्य 04).
👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे.
⚠️ नोट: पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम होईपर्यंत शासनाकडून अतिरिक्त मागणीपत्र आल्यास पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: शैक्षणिक पात्रता
MPSC च्या शुद्धिपत्रकातील परिशिष्ट-3 नुसार अधिपरिचारिका पदासाठी खालील पात्रता आवश्यक आहे:
आवश्यक शिक्षण (यापैकी कोणतेही एक)
1️⃣ मान्यताप्राप्त संस्थेतून जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (GNM) मधील पदविका (डिप्लोमा), किंवा
2️⃣ बॅचलर ऑफ सायन्स (नर्सिंग) – B.Sc Nursing, किंवा
3️⃣ पोस्ट बेसिक बॅचलर ऑफ सायन्स (नर्सिंग) – Post Basic B.Sc Nursing ची पदवी
नोंदणी (Registration) बंधनकारक
- महाराष्ट्र परिचर्या परिषद अधिनियम, 1966 आणि भारतीय परिचर्या परिषद अधिनियम, 1947 अंतर्गत, आपल्या शैक्षणिक अर्हतेची महाराष्ट्र परिचर्या परिषद (Maharashtra Nursing Council), मुंबई येथे नावनोंदणी असणे आवश्यक आहे.
- नोंदणी केली नसेल तर अर्ज करण्यापूर्वीच नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
- अधिनियमात दिलेला कालावधी संपण्यापूर्वी या नोंदणीचे वेळोवेळी नूतनीकरण (Renewal) करणे आवश्यक आहे.
⚠️ भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकांनुसार दूरस्थ शिक्षण (Distance Education) किंवा मुक्त विद्यापीठातून (Open University) घेतलेली नर्सिंग पात्रता ग्राह्य धरली जाणार नाही.
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)
शुद्धिपत्रकानुसार नव्याने समाविष्ट झालेल्या पदांसाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरातीनुसार राहील.
त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाच्या 05 नोव्हेंबर 2026 च्या शासन निर्णयानुसार कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे वयामुळे आधी अपात्र ठरलेले काही उमेदवारही आता अर्ज करू शकतात.
| प्रवर्ग | मूळ जाहिरातीनुसार कमाल वय | 1 वर्ष सवलतीनंतर |
|---|---|---|
| खुला प्रवर्ग | 38 वर्षे | 39 वर्षे |
| मागासवर्गीय / आदुघ / अनाथ | 43 वर्षे | 44 वर्षे |
👉 किमान वय: 19 वर्षे (मूळ जाहिरातीनुसार).
👉 दिव्यांग, खेळाडू, माजी सैनिक आणि इतर विशेष प्रवर्गांची वयोमर्यादा मूळ जाहिरात क्र. 017/2026 मध्ये दिल्याप्रमाणे राहील.
⚠️ अधिपरिचारिका पदासाठी वयाची गणना 27 नोव्हेंबर 2026 (अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक) नुसार केली जाईल.
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: पगार (Salary)
अधिपरिचारिका हे राज्य शासनाचे गट-क पद असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी मिळेल. शुद्धिपत्रकामध्ये पदाची वेतनश्रेणी स्वतंत्रपणे दिलेली नाही. अचूक वेतनश्रेणी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवाप्रवेश नियमांनुसार आणि मूळ जाहिरातीनुसार राहील.
अतिरिक्त फायदे
- महागाई भत्ता (DA)
- घरभाडे भत्ता (HRA)
- प्रवास भत्ता व शासन नियमानुसार इतर भत्ते
- वैद्यकीय सुविधा
- शासन नियमानुसार निवृत्तीवेतन योजना
👉 ही राज्य शासनाच्या आरोग्य क्षेत्रातील स्थिर आणि चांगल्या पगाराची कायमस्वरूपी सरकारी नोकरी मानली जाते.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
✅ हो, ही महाराष्ट्र राज्यातील भरती असल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.
ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागासाठी होत आहे.
मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?
✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
पण या पदासाठी सेवाप्रवेश नियमानुसार 80% जागा (3,130) महिलांसाठी आणि 20% जागा (781) पुरुषांसाठी राखीव आहेत. म्हणजे महिला उमेदवारांना जास्त संधी आहे, तरी पुरुष नर्सिंग उमेदवारांसाठीही 781 जागा उपलब्ध आहेत.
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)
1️⃣ संयुक्त पूर्व परीक्षा (Prelims)
- गट-क मधील सर्व पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाईल.
- परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीने होईल.
- परीक्षा दिनांक: 24 जानेवारी 2027 (आधी ही परीक्षा 03 जानेवारी 2027 ला होणार होती).
- अभ्यासक्रम: MPSC ने 15 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केलेलाच अभ्यासक्रम या परीक्षेसाठी लागू राहील.
2️⃣ पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल
अधिपरिचारिका हा विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेला संवर्ग आहे. त्यामुळे अर्जात दिलेला विकल्प आणि या पदाच्या आरक्षणनिहाय जागांच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी किती उमेदवार पात्र करायचे ते ठरवले जाईल. त्यानंतर पूर्व परीक्षेतील गुणांच्या आधारे या संवर्गाचा स्वतंत्र निकाल जाहीर केला जाईल.
3️⃣ स्वतंत्र मुख्य परीक्षा (Mains)
विशिष्ट शैक्षणिक अर्हता असलेल्या आणि नव्याने समाविष्ट केलेल्या संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाईल. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम MPSC प्राधान्याने तयार करून लवकरच वेबसाइटवर प्रसिद्ध करणार आहे. मुख्य परीक्षेची तारीखही स्वतंत्रपणे जाहीर होईल.
👉 म्हणजे Staff Nurse उमेदवारांची स्पर्धा मुख्य परीक्षेत फक्त नर्सिंग उमेदवारांशीच होणार आहे.
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: अर्ज फी
| तपशील | माहिती |
|---|---|
| फी रक्कम | मूळ जाहिरात 017/2026 नुसार |
| फी भरण्याची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:59 पर्यंत) |
| आधी अर्ज केलेल्यांनी विकल्प दिल्यास | पुन्हा फी भरायची गरज नाही |
- 👉 फी फक्त Online पद्धतीने (Debit Card, Credit Card, Net Banking, UPI) भरावी लागेल.
- ❌ चलनाद्वारे फी भरण्याची सवलत बंद करण्यात आली आहे.
- 👉 फी Non-refundable आहे.
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे
मूळ जाहिरातीत सांगितलेल्या कागदपत्रांच्या सर्व तरतुदी या शुद्धिपत्रकासाठीही लागू आहेत. त्यानुसार कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
✔️ फोटो आणि स्वाक्षरी ✔️ 10वी प्रमाणपत्र (जन्मतारखेचा पुरावा) ✔️ GNM डिप्लोमा / B.Sc Nursing / Post Basic B.Sc Nursing प्रमाणपत्र व गुणपत्रके ✔️ महाराष्ट्र परिचर्या परिषद (MNC) नोंदणी प्रमाणपत्र ✔️ जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास) ✔️ EWS Certificate (लागू असल्यास) ✔️ दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) ✔️ खेळाडू / माजी सैनिक / अनाथ / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास)
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐
❗ Distance / Open University ची नर्सिंग डिग्री चालणार नाही
दूरस्थ शिक्षण किंवा मुक्त विद्यापीठातून घेतलेली नर्सिंग पात्रता ग्राह्य धरली जाणार नाही. अशा उमेदवारांचा अर्ज पुढे बाद होऊ शकतो.
❗ MNC नोंदणी अर्जाआधीच हवी
महाराष्ट्र परिचर्या परिषदेत नोंदणी नसेल तर ती अर्ज करण्यापूर्वीच करून घ्यावी लागेल. नोंदणीचे Renewal वेळेवर केलेले असणेही आवश्यक आहे.
❗ विकल्प नंतर बदलता येणार नाही
विहित मुदतीत (13 ते 27 नोव्हेंबर 2026) विकल्प दिला नाही, तर नंतर कोणत्याही टप्प्यावर विकल्प बदलण्याची विनंती MPSC मान्य करणार नाही.
❗ जुन्या अर्जातील दावे बदलता येणार नाहीत
आधी गट-क साठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे मूळ अर्जातील दावे (प्रवर्ग, आरक्षण इ.) कायम राहतील. विकल्प देताना त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
❗ 80% जागा महिलांसाठी
3,911 पैकी 3,130 जागा महिलांसाठी आणि फक्त 781 जागा पुरुषांसाठी आहेत. त्यामुळे पुरुष उमेदवारांनी स्पर्धा जास्त असेल हे लक्षात घेऊन तयारी करावी.
❗ परीक्षेची तारीख दुसऱ्या परीक्षेसोबत आली तर
24 जानेवारी 2027 ला दुसऱ्या संस्थेची परीक्षा असल्यास कोणती परीक्षा द्यायची हा निर्णय उमेदवारालाच घ्यायचा आहे. MPSC तारीख बदलणार नाही.
❗ फी फक्त Online
चलनाचा पर्याय बंद आहे. फी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत Online भरली नाही, तर अर्ज पूर्ण मानला जाणार नाही.
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: अर्ज कसा करायचा?
(अ) नवीन उमेदवार (ज्यांनी आधी गट-क साठी अर्ज केलेला नाही)
Step 1
mpsconline.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
Step 2
Login करून “Online Application” मध्ये जा आणि जाहिरात क्र. 017/2026 निवडा.
Step 3
“Check Eligibility” बटनावर क्लिक करा.
Step 4
Application Form भरा:
- Personal Details
- Educational Details (GNM / B.Sc Nursing)
- Category Information
- पदाचा विकल्प: अधिपरिचारिका
Step 5
आवश्यक Documents Upload करा.
Step 6
Application Fee Online भरा (30 नोव्हेंबर 2026 पर्यंत).
Step 7
Final Submit करून Print घ्या.
(ब) आधी गट-क साठी अर्ज केलेले उमेदवार
👉 अशा उमेदवारांना नवीन अर्ज करण्याची गरज नाही आणि पुन्हा फी भरायची गरज नाही. फक्त अधिपरिचारिका पदासाठी विकल्प द्यावा लागेल.
Step 1
mpsconline.gov.in वर आपल्या Profile मध्ये Login करा.
Step 2
“My Account” मध्ये जाहिरात क्र. 017/2026 समोरील “View” बटनावर क्लिक करा.
Step 3
“Recheck Eligibility” बटनावर क्लिक करा.
Step 4
उजव्या बाजूच्या स्तंभात अधिपरिचारिका पद निवडा.
Step 5
“Apply व Submit” बटनावर क्लिक करा.
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: Job Benefits
मुख्य फायदे
- महाराष्ट्र शासनाची कायमस्वरूपी गट-क नोकरी
- 7 व्या वेतन आयोगानुसार पगार आणि शासन नियमानुसार भत्ते
- Job Security
- आरोग्य क्षेत्रात सेवा करण्याची संधी आणि Career Growth
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?
- GNM डिप्लोमा पूर्ण केलेले उमेदवार
- B.Sc Nursing आणि Post Basic B.Sc Nursing पदवीधर
- खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करत असलेले आणि सरकारी नोकरी हवी असलेले नर्सेस
- महिला नर्सिंग उमेदवार (80% जागा राखीव)
- MPSC गट-क ची तयारी करणारे नर्सिंग विद्यार्थी
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| शुद्धिपत्रक प्रसिद्ध | 06 नोव्हेंबर 2026 |
| अर्ज / विकल्प सुरू | 13 नोव्हेंबर 2026 (दुपारी 2:00 पासून) |
| अर्ज / विकल्प शेवटची तारीख | 27 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:59 पर्यंत) |
| Online फी भरण्याची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:59 पर्यंत) |
| पूर्व परीक्षा | 24 जानेवारी 2027 |
| मुख्य परीक्षा | नंतर जाहीर होईल |
| Admit Card | परीक्षेपूर्वी जाहीर होईल |
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| शुद्धिपत्रक PDF | इथे क्लिक करा |
| प्रसिद्धिपत्रक PDF | इथे क्लिक करा |
| Online अर्ज | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
MPSC Group C Staff Nurse Bharti 2026: FAQs
MPSC Staff Nurse पदासाठी पात्रता काय आहे?
GNM डिप्लोमा किंवा B.Sc Nursing किंवा Post Basic B.Sc Nursing पदवी आणि महाराष्ट्र परिचर्या परिषद (MNC), मुंबई येथे नोंदणी आवश्यक आहे.
अधिपरिचारिका पदाच्या किती जागा आहेत?
एकूण 3,911 जागा आहेत. त्यापैकी 3,130 जागा महिलांसाठी आणि 781 जागा पुरुषांसाठी आहेत.
वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा मूळ जाहिरातीनुसार राहील आणि आता कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाची सवलत मिळाली आहे. वयाची गणना 27 नोव्हेंबर 2026 नुसार होईल.
पगार किती आहे?
महाराष्ट्र शासनाच्या 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी आणि DA, HRA सह इतर भत्ते मिळतील.
निवड प्रक्रिया काय आहे?
आधी संयुक्त पूर्व परीक्षा (OMR) होईल. त्यानंतर Staff Nurse पदासाठी स्वतंत्र निकाल लागेल आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाईल.
पूर्व परीक्षा कधी आहे?
पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार आहे.
Distance मधून B.Sc Nursing केले असेल तर अर्ज करता येईल का?
❌ नाही. दूरस्थ शिक्षण किंवा मुक्त विद्यापीठातून घेतलेली नर्सिंग पात्रता ग्राह्य धरली जाणार नाही.
आधी गट-क साठी अर्ज केला असेल तर पुन्हा अर्ज करायचा का?
नाही. फक्त “My Account” मधून “Recheck Eligibility” करून अधिपरिचारिका पदाचा विकल्प द्यायचा आहे. पुन्हा फी भरायची गरज नाही.
महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?
✅ हो. या पदासाठी 80% म्हणजे 3,130 जागा महिलांसाठी राखीव आहेत.
अर्जाची शेवटची तारीख कधी आहे?
अर्ज किंवा विकल्प देण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:59) आहे आणि फी भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2026 आहे.
इतर भरती अपडेट्स
